रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

पंडीत जवाहरलाल नेहरू

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️

       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬

संकलन ~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 
                                                  
      🌹🎓⛓️🇮🇳👨🏻‍🦱🇮🇳⛓️🎓🌹
     
        पंडित जवाहरलाल नेहरू
        (भारताचे पहिले पंतप्रधान)


    जन्म : 14 नोव्हेंबर 1889
        इलाहाबाद (उत्तर प्रदेश)
    मृत्यु : 27 मे 1964
               (नवी दिल्ली)

पुर्ण नाव: जवाहरलाल मोतीलाल नेहरू
वडिल : मोतीलाल नेहरू
आई : स्वरूपरानी नेहरु
पत्नी : कमला नेहरू
मुलगी : श्रीमती इंदिरा गांधीजी
शिक्षण : 1910 मधे केंब्रिज                  विश्वविद्यालयाच्या ट्रिनटी काॅलेज मधुन पदवी प्राप्त केली, 1912 ला ’इनर टेंपल’ या लंडन च्या काॅलेज मधुन बॅरिस्टर ची पदवी प्राप्त केली.

पुरस्कार : भारतरत्न (1955)

प्रधानमंत्री पदाचा कार्यकाळ: स्वतंत्र भारताचे पंतप्रधान (15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964)

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जिवन परिचय
         “अपयश तेव्हांच पदरी पडतं जेव्हां आपण आपले आदर्श, उद्देश आणि सिध्दांत विसरतो’’

पं. जवाहरलाल नेहरू हे आदर्शवादी आणि सिध्दांतिक प्रतिमेचे महानायक होते ते म्हणायचे जी व्यक्ती आपले उद्देश, सिध्दांत आणि आदर्श विसरते ती कधीही यशस्वी होत नाही.
            पंडित जवाहर लाल नेहरू एक असे राजनेता होते ज्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव प्रत्येकाच्या जीवनावर पाडला आहे. इतकेच नाही तर ते एक समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकतांत्रिक गणतंत्राचे गणितज्ञ देखील मानले जातात.
      पं. नेहरूंना आधुनिक भारताचे शिल्पकार देखील म्हंटल्या जाते. त्यांना लहान मुलांबद्दल अतिशय प्रेम होते आणि त्यामुळे लहान मुलं त्यांना चाचा नेहरू म्हणत असत. म्हणुन त्यांच्या जन्मदिनाला “बालदिवस” Children’s Day च्या रूपात साजरे केले जाते. ते म्हणत

“देशाच्या सेवेत नागरिकत्व आहे”

या विचाराच्या बळावरच त्यांना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा बहुमान प्राप्त झाला. ते आदर्शवादी आणि महान स्वातंत्र्य सेनानी होते, त्यांनी गुलाम भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता महात्मा गांधीना साथ दिली होती.
पं. नेहरूंमधे देशभक्तीची भावना सुरूवातीपासुनच होती आणि त्यांच्या जीवनाकडुन अनेक बाबी शिकायला मिळतात ते सर्वांनकरता एक प्रेरणास्त्रोत आहेत.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे प्राथमिक जीवन
      महान लेखक, विचारक आणि कुशल राजनेता पं. जवाहरलाल नेहरू कश्मीरी ब्राम्हण परिवारात 14 नोव्हेंबर 1889 ला अलाहाबाद येथे जन्माला आले. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित मोतिलाल नेहरू असे होते ते प्रसिध्द बॅरिस्टर आणि समाजसेवक होते त्यांच्या आईचे नाव श्रीमती स्वरूप रानी होते, त्या कश्मीरी ब्राम्हण परिवारातील होत्या.
पं. नेहरू हे तिघे बहीण.भाऊ होते, नेहरूजी सर्वात मोठे होते त्यांच्या मोठया बहिणीचे नाव विजया लक्ष्मी (या पुढे संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या) त्यांच्या लहान बहिणीचे नाव कृष्णा हठिसिंग असे होते (या एक उत्तम आणि प्रभावशाली लेखिका होत्या).
त्यांनी आपले भाऊ पं. नेहरू यांच्या जिवनावर प्रकाश टाकत अनेक पुस्तकं लिहीली होती.
जन्मतः नेहरूजी कुशाग्र बुध्दीमत्तेचे आणि ओजस्वी व्यक्तिमत्वाचे होते ते ज्यालाही भेटत ती व्यक्ती नेहरूजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होत असे. या कारणांमुळेच मोठेपणी ते एक कुशल राजकारणी, आदर्शवादी, विचारक आणि महान लेखक झालेत. त्यांचे कौटुंबिक मुळ कश्मीरी पंडित समुदायाशी जोडले असल्याने त्यांना पंडित नेहरू या नावाने ओळखल्या जायचे.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आरंभिक शिक्षण
        त्यांचे प्रारंभिक शिक्षण घरीच झाले आणि पुढे 1890 ला पंडित नेहरूंनी जगभरातील प्रसिध्द शाळा आणि विश्वविद्यालयांमधुन शिक्षण प्राप्त केले. वयाच्या 15 व्या वर्षी 1905 ला नेहरूंना इंग्लंड येथील हॅरो स्कुल मध्ये शिक्षणाकरता पाठवण्यात आले.

लाॅ (वकीली) चे शिक्षण
                    2 वर्षांपर्यंत हैरो येथे राहिल्यानंतर पं. जवाहरलाल नेहरूंनी लंडन येथील ट्रिनिटी काॅलेज मधुन लाॅ ला प्रवेश घेतला त्यानंतर त्यांनी कैम्ब्रिज विश्वविद्यालयातुन न्याय शास्त्रातील शिक्षण पुर्ण केले.
कॅम्ब्रिज सोडल्यानंतर लंडनच्या इनर टेंपल येथे 2 वर्ष पुर्ण केल्यानंतर त्यांनी वकिलीचे शिक्षण पुर्ण केले. 7 वर्ष इंग्लंड ला राहुन पं. नेहरूंनी फैबियन समाजवाद आणि आयरिश राष्ट्रवाद याची देखील माहिती घेतली. 1912 ला ते भारतात परतले आणि वकिली सुरू केली.

पं. नेहरू यांचा विवाह आणि कन्या इंदिरा गांधीचा जन्म
              भारतात परतल्यानंतर 4 वर्षांनी 1916 ला पं. जवाहरलाल नेहरू यांचा विवाह कमला कौर यांच्याशी झाला. त्या दिल्लीत वसलेल्या कश्मीरी परिवारातील होत्या.
                1917 ला त्यांनी इंदिरा प्रियदर्शिनी ला जन्म दिला ज्या भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री झाल्या. त्यांना आपण इंदिरा गांधी या नावाने परिचीत आहोत.

महात्मा गांधीजींच्या संपर्कात आले पंडित नेहरू (राजकारणात प्रवेश)
            जवाहरलाल नेहरू 1917 ला होमरूल चळवळ  मधे सहभागी झाले त्याच्या 2 वर्षांनंतर 1919 ला त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला आणि तेव्हांच त्यांचा महात्मा गांधीसोबत परिचय झाला.
हा तो काळ होता जेव्हां महात्मा गांधींनी रौलेट अधिनियम – Rowlatt Act विरोधात एक मोहिम सुरू केली होती. पं. नेहरू महात्मा गांधीच्या शांतीपुर्ण सविनय कायदेभंग आंदोलनाने फार प्रभावित झाले.
पं. नेहरू महात्मा गांधींना आपला आदर्श मानु लागले, इथपर्यंत की त्यांनी विदेशी वस्तुंचा त्याग केला आणि खादी ला वापरू लागले. त्यानंतर 1920-22 मधल्या गांधीजींच्या असहकार आंदोलनाला पाठिंबा दिला. त्या दरम्यान त्यांना अटक देखील झाली होती.

संपुर्ण स्वराज्याची मागणी (राजनैतिक जीवन)
              पं. जवाहरलाल नेहरूंनी 1926 ते 1928 पर्यंत अखिल भारतीय काॅंग्रेस समितीची महासचिव म्हणुन देखील सेवा केली आहे. काॅंग्रेस च्या वार्षिक सत्राचे आयोजन 1928-29 ला करण्यात आले त्याचे अध्यक्ष त्यांचे वडिल मोतिलाल नेहरू हे होते.
त्या सत्रा दरम्यान पंडित नेहरू आणि सुभाष चंद्र बोस यांनी पुर्ण राजकिय स्वातंत्र्याच्या मागणीचे समर्थन केले होते आणि तेव्हांच मोतीलाल नेहरू आणि अन्य नेता ब्रिटिश शासनाच्या अखत्यारीतच संपन्न राज्याची ईच्छा धरून होते. 1929 ला डिसेंबर मधे लाहौर येथे काॅंग्रेसच्या वार्षिक अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं.
यात पं. जवाहरलाल नेहरूंची काॅंग्रेस पार्टीचे अध्यक्ष म्हणुन निवड झाली. या सत्रातच एक प्रस्ताव देखील पास करण्यात आला ज्यात ’पुर्ण स्वराज्याची’ मागणी करण्यात आली.

26 जानेवारी 1930 (राजनितीक प्रवासातील संघर्ष)
               26 जानेवारी 1930 ला लाहौर इथं पं. जवाहरलाल नेहरूंनी स्वतंत्र भारताचा झेंडा फडकवला. या दरम्यान महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगांच्या आंदोलनाची सुरूवात केली होती. या आंदोलनाला यश मिळालं सोबतच या शांतीपुर्ण आंदोलनाने ब्रिटिश शासनाला राजकारणात परिवर्तन आणण्यास भाग पाडलं.
आता पर्यंत नेहरूजींना राजकारणाचे चांगलेच ज्ञान प्राप्त झाले होते शिवाय त्या विषयावर त्यांची पकड देखील मजबुत झाली होती. या नंतर 1936-37 ला जवाहरलाल नेहरू यांना काॅंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवडण्यात आले. इतकेच नाही तर 1942 ला त्यांना महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलना दरम्यान अटक झाली होती आणि 1945 रोजी त्यांची कैदेतुन सुटका करण्यात आली. पं. नेहरूंनी पारतंत्र्यात असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता आपले महत्वपुर्ण योगदान दिले. 1947 मधे भारताला स्वातंत्र्य मिळतांना इंग्रज सरकार सोबत झालेल्या चर्चेदरम्यान महत्वाची भुमिका बजावली. यामुळे देशवासियांसमोर त्यांची वेगळी छाप पडत गेली आणि भारतिय त्यांना आपला आदर्श मानु लागले.
पंडित नेहरू महात्मा गांधींच्या निकटतम होते असं म्हंटलं जातं की पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधींच्या फार जवळचे मित्र होते दोघांचे कौटुंबिक संबंध देखील मजबुत होते. महात्मा गांधींच्या सांगण्यानुसारच पं. नेहरूंना प्रधानमंत्री करण्यात आले होते.
         नेहरूजी देखील गांधीजींच्या विचारांनी फार प्रभावित होते. पंडित नेहरूंना गांधीजींच्या शांततापुर्ण आंदोलनांनी नवी शिकवण आणि उर्जा मिळत असे आणि याच कारणामुळे ते त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी त्यांना साथ दिली. परंतु नेहरूजींचा राजकारणात आल्यानंतर धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन गांधीजींच्या धार्मिक आणि पारंपारिक दृष्टीकोनापेक्षा थोडा वेगळा होता.
प्रत्यक्षात गांधीजी प्राचीन भारताच्या गौरवावर जोर देत आणि नेहरू जी आधुनिक विचारधारेची कास धरणारे होते.

भारताचे पहिले प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू
            1947 साली जेंव्हा भारत स्वतंत्र झाला, देशवासी स्वतंत्र भारतात श्वास घेत होते त्याच वेळेला देशाच्या उज्वल भविष्याकरता लोकतांत्रिक व्यवस्था देखील तयार करायची होती.
            म्हणुनच देशात पहिल्यांदा प्रधानमंत्री पदाकरीता निवडणुक झाली ज्यात काॅंग्रेस च्या पंतप्रधान पदाकरीता निवडणुक घेण्यात आली. यामधे लोह पुरूष सरदार वल्लभभाई पटेल आणि आचार्य कृपलानी यांना जास्त मतं मिळाली होती. परंतु गांधीजींच्या सांगण्यावर पंडित जवाहरलाल नेहरूंना भारताचा पहिला प्रधानमंत्री बनवण्यात आले. त्यानंतर नेहरूजी सलग तीनदा पंतप्रधान पदावर विराजमान राहिले आणि भारताच्या प्रगतीकरता प्रयत्नरत सुध्दा राहिले. प्रधानमंत्री पदावर असतांना पंडित नेहरूंनी देशाच्या विकासाकरता अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले, त्यांनी मजबुत राष्ट्राचा पाया ठेवला, भारताला आर्थिक स्वरूपात सक्षम करण्यात महत्वाची भुमिका निभावली तव्दतच भारतात विज्ञान आणि प्रौद्योगिकी विकासाला प्रोत्साहन दिले.
       पं. नेहरू आधुनिक भारताच्या बाजुने होते म्हणुन त्यांनी नव्या विचारांच्या भारताकरता मजबुत पाया उभारला आणि शांततापुर्ण वातावरण व संघटन या करता निरपेक्ष आंदोलनाची रचना केली. सोबतच त्यांनी कोरिया युध्द, स्वेज नदी विवाद सोडवण्याकरता व कांगो करारात आपले महत्वपुर्ण योगदान दिले.

पं. जवाहरलाल नेहरूंना मिळालेले सर्वोच्च सन्मान
               नेहरूंनी देशवासियांच्या मनातुन जातियवादाची भावना संपवण्याकरता व गरीब लोकांना सहाय्य करण्याकरता जनतेला जागरूक केले आणि लोकतांत्रिक मुल्यांप्रती त्यांच्या मनात सन्मान निर्माण केला.
या व्यतिरीक्त त्यांनी संपत्तीच्या प्रकरणात विधवांना पुरूषांप्रमाणेच समान हक्क मिळवुन दिला अशी अनेक समाजउपयोगी कार्ये त्यांनी केली.
               पश्चिम बर्लिन, आॅस्ट्रिया आणि लाओस सारख्या अनेक विस्फोटक मुद्यांच्या समाधानात, कित्येक करारांमधे, युध्दांत त्यांचे महत्वपुर्ण योगदान राहिले आहे. त्यामुळे त्यांना 1955 साली भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लेखक स्वरूपात पं. जवाहरलाल नेहरू
                  पं. जवाहरलाल नेहरू एक चांगले राजकारणी आणि प्रभावशाली वक्ता तर होतेच शिवाय एक उत्तम लेखक देखील होते, त्यांचे लिखाण वाचकावर एक गडद प्रभाव पाडत असे. वाचक त्यांची पुस्तकं वाचण्याकरता फार उत्साही राहात. 1936 ला त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आले होते.

पं. जवाहरलाल नेहरूंची पुस्तकं
भारत और विश्व
सेवियत रूस
विश्व इतिहास की एक झलक
भारत की एकता और स्वतंत्रता
दुनिया के इतिहास का ओझरता दर्शन (1939)

डिस्कव्हरी ऑफ इंडिया
            (डिस्कव्हरी आॅफ इंडिया) हे पुस्तक नेहरूंनी 1944 ला एप्रील.सप्टेंबर दरम्यान अहमदनगर येथे जेल मधे असतांना लिहीले. या पुस्तकाचे लिखाण त्यांनी इंग्लिश भाषेत केले होते पुढे या पुस्तकाचा हिंदी सहीत अनेक भाषांमधे अनुवाद करण्यात आला.
           या पुस्तकात नेहरूंनी सिंधु सभ्यतेपासुन, भारताचे स्वातंत्र्य, भारतीय संस्कृती, धर्म आणि संघर्षाचे वर्णन केले आहे.

पं. जवाहरलाल नेहरूंचा मृत्यु
            चिन सोबतच्या संघर्षानंतर काही दिवसात नेहरूजींची प्रकृती बिघडली, त्यानंतर 27 मे 1964 ल ह्नदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
          पंडित नेहरू लहान मुलांवर फार प्रेम करायचे आणि तेवढेच ते आपल्या देशाप्रती देखील समर्पित होते.
                      जवाहरलाल नेहरू राजकारणातील असा चकाकता तारा होते की त्यांच्या अवतीभवती संपुर्ण राजकारण फिरत होते भारताचा पहिला पंतप्रधान बनुन त्यांनी भारताला गौरवान्वित केले आहे. सोबतच त्यांनी भारताचा मजबुत पाया निर्माण केला शांतता आणि संघटन याकरता निरपेक्ष आंदोलनाची रचना केली. स्वातंत्र्य संग्रामातील एक योध्दा म्हणुन त्यांना यश मिळालं, आधुनिक भारताच्या निर्माणाकरता त्यांचे योगदान अमुल्य आणि अभुतपुर्व असे होते.

पुर्व प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विचार
            देशाच्या सेवेत नागरिकत्व आहे. संस्कृती मन आणि आत्म्याचा विस्तार आहे.
अपयश तेव्हांच येतं जेव्हां आपण आपले आदर्श, उद्देश, आणि सिध्दांत विसरतो.
दुस-याला आलेल्या अनुभवाने स्वतःचा फायदा करून घेणारा बुध्दीमान असतो.
लोकतंत्र आणि समाजवाद ध्येय प्राप्त करण्याची साधनं आहेत.
लोकांच्यात असलेली कला त्यांच्या बुध्दीचा खरा आरसा असतात.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या खास गोष्टी
              पंडित नेहरूंना आधुनिक भारताचा शिल्पकार म्हंटल्या जाते.
नेहरूजींचा जन्मदिन 14 नोव्हेंबर ‘बाल दिवस’ म्हणुन साजरा केल्या जातो.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचे रस्ते, शाळा, युनिव्हर्सिटी आणि हाॅस्पिटल्स्
               पं. नेहरूंचा मृत्यु भारता करता मोठे नुकसान होते यामुळे भारतियांना अतिशय दुःख झाले कारण प्रत्येकावर त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप सोडली होती. ते लोकप्रीय राजनेता होते त्यांच्या योगदानाला आणि त्यांच्या त्यागाला कधीही विसरता येणार नाही. म्हणुन त्यांच्या स्मरणार्थ अनेक मार्ग, जवाहरलाल नेहरू शाळा, जवाहरलाल नेहरू टेक्नाॅलाॅजी युनिव्हर्सिटी, जवाहरलाल नेहरू कॅंसर हाॅस्पिटल बनविण्यास सुरूवात करण्यात आली.
त्यांचा मुख्य उद्देश त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळात लोकतांत्रिक परंपरांना मजबुत करणे, राष्ट्राच्या आणि संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेला स्थायीभाव मिळवुन देणे, योजनांच्या माध्यमातुन देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरळीत करणे हा होता.
या संकल्पांनी आणि उद्देशांनी त्यांना महान बनविले ते सर्वांकरता प्रेरणादायी आहेत.

*पं. जवाहरलाल नेहरू यांची थोडक्यात महत्वपुर्ण माहिती –*
               1912 मधे इंग्लंड येथुन परतल्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी आपल्या वडिलांचा ज्युनियर बनुन अलाहाबाद उच्च न्यायालयात वकीलीचा व्यवसाय सुरू केला.
1916 राजकारणात येण्याच्या उद्देशाने पंडित नेहरू गांधीजींना भेटले. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभागी व्हावे अशी त्यांची ईच्छा होती.
          1916 मधे त्यांनी डाॅ. अॅनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीत प्रवेश घेतला, पुढे 1918 ला ते या संघटनेचे सेक्रेटरी झाले शिवाय भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस च्या कार्यात देखील त्यांनी सहभाग घेतला.
1920 ला महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात नेहरूजी सहभागी झाले. यामुळे त्यांना सहा वर्षांची कैद झाली.
1922-23 नेहरूजी अलाहाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष निवडल्या गेले.
             1927 ला पं. नेहरू यांची सोव्हियत युनियन बरोबर भेट झाली. समाजवाद प्रयोगाने ते प्रभावित झाले आणि त्या विचारांकडे खेचले गेले.
                  1929 ला लाहौर इथं झालेल्या राष्ट्रिय काॅंग्रेस च्या ऐतिहासीक अधिवेशनाचे ते अध्यक्ष निवडल्या गेले. याच अधिवेशनात काॅंग्रेस ने संपुर्ण स्वातंत्र्याची मागणी लावुन धरली. या अधिवेशनानेच भारताला स्वतंत्र बनविण्याचा निर्णय घेतला. नंतर ‘संपुर्ण स्वातंत्र्याचा’ संकल्प पास करण्यात आला.
              हा निर्णय संपुर्ण भारतात पोहोचवण्याकरता 26 जानेवारी 1930 हा दिवस राष्ट्रीय सभेत ठरविण्यात आला. प्रत्येक गावांमधे मोठया सभांचे आयोजन करण्यात आले सामान्य जनांनी स्वातंत्र्या करता लढण्याच्या शपथा घेतल्या. म्हणुन 26 जानेवारी हा दिवस महत्वाचा मानला जातो.
       1930 ला महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले ज्याला पं. नेहरूंनी पाठिंबा देणे महत्वाचे मानले गेले.
1937 ला काॅंग्रेस ने प्राथमिक कायदे मंडळाची निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आणि भरपुर यश देखील मिळवले त्याच्या प्रचाराचा भार पं. नेहरूंच्या खांद्यावर होता.
                   1942 ला ’चले जाव' आंदोलनाला भारतिय स्वातंत्र्य संग्रामात विशेष दर्जा आहे. काॅंग्रेस ने हे आंदोलन सुरू करावयास हवे याकरता गांधीजींना तयार करण्यासाठी पं. नेहरू पुढे आले. त्यानंतर लगेच सरकारनं त्यांना कैद करून अहमदनगर जेल मधे टाकले तिथेच त्यांनी डिस्कव्हरी आॅफ इंडिया हा ग्रंथ लिहीला.
1946 ला स्थापीत झालेल्या अंतरिम सरकारने पंतप्रधान रूपात नेहरूंजींना निवडले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे ते पहिले प्रधानमंत्री झाले. मृत्यु पर्यंत ते या पदावर राहिले 1950 ला नेहरूजींनी नियोजन आयोगाची स्थापना केली.
पंडित जवाहरलाल नेहरू उर्फ चाचा नेहरू  यांनी आपल्या जीवनात कधीही हार मानली नाही. ते सतत भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता इंग्रजांशी लढत राहीले. एक यशस्वी आणि पराक्रमी नेता अशी त्यांची सर्वत्र ख्याती पसरली. ते नेहमी गांधीजींच्या आदर्शांवर चालत राहिले. त्यांचा नेहमी हा विचार होता की,
“अपयश तेव्हांच येतं जेव्हां आपण आपले आदर्श, उद्देश, आणि सिध्दांत विसरतो”

        🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
         ♾♾♾ ♾♾♾
स्त्रोत ~ majhimarathi.com
➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...