साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

बैलपोळा विशेष

              बैलपोळा 

सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.
  
    श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केली जाते.
      
हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो.पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. याला 'खांद शेकणे' अथवा 'खांड शेकणे' म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. बैलाची निगा राखणाऱ्या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.

या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर (आखरावर) आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील/श्रीमंत जमीनदार) तोरण तोडतो व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणाऱ्यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात.शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो.

सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४

श्री कृष्ण जन्माष्टमी


कृष्ण जन्माच्या निमित्ताने :-

कृष्णाला आपण देव म्हणून पुजतो. आपल्याला तो वंदनीय आहे. भगवद्गीतेचा रचैता, जी भगवद्गीता आपण आपला धर्मग्रंथ मानतो पण वाचत नाही, समजून घेत नाही, आचरणात आणण्याची तर गोष्टच लांब ! 

श्री कृष्ण काय होते आणि आपण त्यांना कसे गुरु करू शकतो हे लक्षात घेतले तर निव्वळ मज्जाच !  
कृष्ण हा मुत्सद्दी, तत्त्ववेता, शिष्टाई करणारा, व्ह्यूवरचनाकार, प्रेरक, मार्गदर्शक, मित्र, सखा, प्रियकर, पालक, बालक अशा अनेक भूमिकांमधून आपल्याला भेटतो.

 या कृष्णाच्या बाबतीत आपण त्याला निव्वळ देव म्हणून पुजण्यापेक्षा त्याच्या चरित्राचे अनुकरण करावे हीच त्याला खरी वंदना आहे.

 प्रत्येकाने कृष्ण व्हावे अथवा कृष्णासारखा सोबती सोबत ठेवावा म्हणजे जीवनात प्रत्येक क्षणी पावलोपावली जे कुरुक्षेत्र आपल्यासमोर येत असते त्यात सामोरे जाणाऱ्या लढायांना यशस्वीरित्या तोंड देता येईल. 

अर्जुनाला कुरुक्षेत्रावर त्याचे कर्तव्य बजावायला सर्व क्षमता सोबत असूनही अडचण आली होती. अर्जुन थांबला होता. अर्जुनाचे कर्तव्य हे धर्माचे कर्तव्य होते, अर्जुनाची लढाई ही धर्माची लढाई होती. तथापि अनेक विविध धारणा ज्या सत्यनसूनही सत्य असल्यासारख्या दिसत होत्या. त्यामुळे तो त्याच्या कर्तव्यापासून, त्याचे कौशल्य वापरण्यापासून परावृत्त झाला होता.

 त्याला तुझ्या भावभावना बाजूला ठेवून तुला आवश्यक ते कर्तव्य पार पाडणे कसे आवश्यक आहे आणि कसे सहज शक्य आहे आणि ते कसे धर्मानुरुप आहे हे समजून सांगणारा कृष्ण होता. कृष्णाच्या उपदेशंती अर्जुन लढाईस तयार झाला आणि त्यांनी ते अक्राळविक्राळ युद्ध जिंकले.

 वास्तविकता अर्जुनाला कृष्णाने उपदेश करण्यापूर्वी आणि कृष्णाने उपदेश केल्यानंतर त्याच्या युद्ध कौशल्यामध्ये तसूभरही फरक पडलेला नव्हता. वास्तविक पाहता युद्ध कौशल्य हा कृष्णाचा प्रांतच नव्हता.

 कृष्णाला जी अनेक नावे आहेत त्यापैकी एक नाव रणछोडदासजी आहे. रणछोडदास म्हणजे जो रणांगणातून पळून गेला तो !  पण या अशा रणछोडदासांनी जगातल्या सर्वात मोठ्या युद्धात तात्कालीन सर्वश्रेष्ठ योध्याला लढाया प्रवृत्त केले, प्रेरित केले आणि त्याची कौशल्य वापरून ते युद्ध जिंकेल आणि धर्माला विजय मिळवून देईल अशी योजना केली.

 आपल्या आयुष्यातही आपल्या आजूबाजूला असे अनेक अर्जुन आहेत जे सर्व कौशल्य धारण करतात. तथापि त्यांच्या काही धारणामुळे कौशल्य वापरण्यापासून परवृत्त्त होतात, त्यांच्या कुरुक्षेत्रावरील लढाया लढत नाहीत आणि जिंकण्याची क्षमता असतानाही पराभूत होत राहतात.

 अशा सर्व अर्जुनांसाठी आपण कृष्ण बनून त्यांना त्यांच्या लढाया जिंकण्यास प्रवृत्त करू शकतो.

 त्यासोबतच आपल्या सोबतही अनेक प्रश्न असतात. आपणही क्षमता असूनही आवश्यकता असूनही कौशल्य असूनही आपल्या जीवनात पावलोपावली आपल्यासमोर येणाऱ्या कुरुक्षेत्रांवर मर्दुमकी गाजवण्यापासून आपल्या धारणामुळे परावृत्त्त होत असतो. पण आपण त्या कृष्णाचे ऐकत नाही, त्यांच्याकडे लक्ष देत नाही.

 असे आपल्या आयुष्यातील कृष्ण ओळखून त्यांच्या प्रबोधनाचा लाभ घेऊन आपण आपल्या लढाया जिंकण्याचा निर्धार कृष्ण जन्माष्टमी निमित्त करूया !
🙏🌹🙏

मंगळवार, ९ एप्रिल, २०२४

गुढी पाडवा - मराठी नववर्ष

              गुढी पाडवा

संकलन - श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 

हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

अधिकृत नाव - गुढीपाडवा

साजरा करणारे -
मराठी, कोंकणी, कानडी आणि तेलुगू

प्रकार - महाराष्ट्रीय

उत्सव साजरा - १ दिवस

सुरुवात - चैत्र शुद्ध प्रतिपदा

दिनांक - मार्च / एप्रिल

वारंवारता - वार्षिक

यांच्याशी निगडीत -
उगादी व इतर सण

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो.[३] शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.

गुढीचे स्वरूप -

चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात.या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात.गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते. सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.

अन्य धार्मिक उपचार-
स्नान इ.दैनंदिन कर्मे झाल्यावर गुढी उभारली जाते. वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करतात. गुरू, वडीलधाऱ्यांना वंदन करावे, अशीही रूढी आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे,असा संकेत रूढ आहे. संवत्सर फल म्हणजे काय? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असते, त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती - जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी असेल ते संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष हे जर मंगळवारी सुरू होत असेल तर मंगळ हा त्या वर्षाचा अधिपती असे समजले जाते. साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८ व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७ व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते. ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली. तिला पहिले पद मिळाल्याने ती ‘प्रतिपदा’ म्हणून ओळखली जाते असे मानले जाते. या तिथीला ‘युगादी’ तिथी असेही म्हणतात.या दिवशी उपाध्यायाकडून पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रवण करतात. या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे.:-

"तिथेश्च श्रीकरं प्रोक्तं वारादायुष्यावर्धनम् |
नक्षत्राद्धरते पापं योगाद्रोगनिवारणम् ||
करणाच्चिन्तितं कार्यं पञ्चाङ्गफ़लमुत्तमम् |
एतेषां श्रवणान्नित्यं गङ्गास्नानंफलं लभेत्||"

अर्थ - तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते.वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते. नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो. योगश्रवणाने रोग जातो. करणश्रवणाने चिंतिलेले कार्य साधते. असे हे पंचांग श्रवणाचे उत्तमफल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फल मिळते.

चैत्र हा अधिकमास असता, काहींच्या मते अधिकमासाच्या शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभाची धार्मिक कृत्ये करावीत; तर काहींच्या मते ती शुद्ध किंवा निज चैत्राच्या प्रतिपदेस करावी, असा मतभेद आहे. याविषयी धर्मसिंधूने निर्णय दिला आहे तो असा- अभ्यंगस्नानादी कृत्ये अधिक मासाच्या शुद्ध प्रतिपदेसच करावी; पण गुढी उभारणे, कडुलिंबाची पाने खाणे, पंचांग श्रवण करणे या गोष्टी शुद्ध चैत्राच्या प्रतिपदेस कराव्या.

महाभारताच्या आदिपर्वात (१.६३) उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात. महाभारतातच खिलपर्वात कृष्ण त्याच्या संवगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा सल्ला देतो. महाभारत ग्रंथातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात.

ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे.
श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.
शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला. प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरू केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्यादिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला. काश्मिरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. पार्वती लग्न झाले की माहेरवाशिणी म्हणून महिनाभर माहेरी राहते. तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाते. अक्षयतृतीया यादिवशी ती सासरी जाते. संदर्भ- शक्रोत्सवाचे उल्लेख संस्कृत रघुवंशात व भासांचे ‘मध्यमव्यायोग‘, शूद्रकाचे ‘मृच्छकटिकम्‌‘ या नाटकांमध्ये आले आहेत.

गूढी शब्दाची उकल -

तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे. दाते, कर्वे लिखित 'महाराष्ट्र शब्दकोशा'चा आधार घेतला तर[१६] "गुढ्या घालुनी वनीं राहूं , म्हणा त्यातें । - प्रला १९ (?)" असे उदाहरण येते यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी, झोपडी, अथवा पाल (रहाण्याची जागा) असा दिला आहे.

हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. इथे गचा क (अथवा कचा ग) होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता येते तरीही राहण्याची जागा या अर्थाने 'गुडी' हा शब्द येऊन दक्षिणेतली (आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू) खासकरून आंध्रातील स्थलनामांची (गावांच्या नावांची) संख्या अभ्यासली असता (संदर्भ सेन्सस ऑफ इंडिया - गाव नावांची यादी), लाकूड या अर्थाने तेलगूतील गुढी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड बांबू/काठी ने बनवलेले घर, हे पाहता हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र या प्रदेशात गुढी शब्दाचा प्रचार अधिक असावा. शालिवाहनपूर्व काळात कदाचित गुढीचा लाकूड बांबू/काठी हा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्द संग्रहातून मागे पडला असावा पण आंध्रशी घनिष्ट संबंध असलेल्या शालिवाहन राजघराण्याच्या लाकूड बांबू/काठी या अर्थाने तो वापरात राहिला असण्याची शक्यता असू शकते.

आरोग्यदृष्ट्या महत्त्व -

चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे,धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते.) शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.

सामाजिक महत्त्व -

गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई घालावी, पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असाही संकेत रूढ आहे.
या मंगलदिनी विविध ठिकाणी पहाटेच्या सांस्कृतिक मैफिली उत्साहाने आयोजित केल्या जातात. रसिकांचा वाढता प्रतिसाद दिवाळी पहाट, नववर्ष पहाट व गुढीपाडवा किंवा हिंदू नववर्ष पहाट या उपक्रमाला मिळत आहे.

कृषी विषयक महत्त्व -

डॉ. सरोजिनी बाबर यांच्या मतानुसार गुढीपाडव्यास लोक-संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षनाच्यामुळे भूमी सुफलित होते. सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात.
Source- Wikipedia

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०२३

भाऊबीज

 🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
          💠भाऊबीज💠

आपल्या बहिणीला किंवा सासरी गेलेल्या मुलीला आपल्या घरी दिवाळीला आणण्याची प्रथा असते, दिवाळी पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज होय, कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो या यमद्वितिया असेही म्हणतात.

या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलवले होते, यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, व यमराजाने आपली बहिण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रालंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले अशी पौराणिक कथा आहे. या दिवशी नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्याने त्याला त्यावर्षी यमापासून भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल हा दिवस साजरा केला जातो.

हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया, द्वितीयेचा चंद्र आकर्षक,वर्धमानता दाखवणारा आहे,तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन राहो हि त्यामागची भूमिका आहे.

बंधू भगिनींचा प्रेमसंवर्धनचा हा दिवस आहे, समाजातील सर्व भगिनींचा समाज व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्याचे स्वरक्षण करतील , त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील हा प्रण करून त्याप्रमाणे वागण्याचा हा दिवस आहे.

या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यावर बहीण प्रथम चंद्रकोरीस नंतर भावाला ओवाळते ,भाऊ मग ओवाळणी म्हुणुन भेटवस्तू देऊन बहिणीचा सत्कार करतो. काही समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन चित्रगुप्ताची पूजा करतात.

जर काही कारणाने बहिणीला कोण ही भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्र ला भाऊ समजून ओवाळते, भावाबहीणीने एकमेकांची विचारपूस करावी एक मेकांवर प्रेम करावे या साठी सण साजरा करतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
  श्री अविनाश काशिनाथ पाटील 
उपशिक्षक बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

रविवार, १२ नोव्हेंबर, २०२३

लक्ष्मीपूजन

    🪔लक्ष्मीपूजन(दीपावली)🏮


     🏵️महती लक्ष्मीपूजनाची🏵️

प्राचीन काळातील यक्षरात्री, दीपमाला, दीपप्रतिपदुत्सव आणि आताची दिवाळी.. या सणाचा आनंद लक्ष्मीपूजनाच्या म्हणजे दिवाळीच्या मूळ दिवशी द्विगुणित होतो. लक्ष्मीची यथासांग पूजा करुन, घरासमोर सुशोभित रांगोळी काढून, दारी झेंडूच्या माळा लावून, फराळाचा, लाह्या, बत्तास्यांचा नैवेद्य दाखवून आश्व‌नि महिन्यातील अमावस्येस लक्ष्मीपूजन साजरे केले जाते.

पुराणातील एका कथेनुसार लक्ष्मीपूजनाच्या द‌िवशी रात्रीच्या वेळी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. ज्या ठिकाणी स्वच्छता, सौंदर्य, आनंद, उत्साह अशा सकारात्मक बाबी असतात तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशिर्वाद देते. या दिवशी सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. अनेक घरांमध्ये श्रीसूक्तपठणही केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या प्राचीन काळातील उपलब्ध असलेल्या संदर्भानुसार अगोदर रात्री कुबेरपूजन करण्याची रित होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करुन पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु, गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्‍नी इरितीसह दाखविण्यात आला आहे. यावरून प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्‍नी इरिती यांची पूजा केली जात असावी, असे मानले जात. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.

लक्ष्मीपूजनाला पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात.

    📚व्यापारीवर्गात उत्साह📚

व्यापारीवर्गातही लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होत असल्याने दुकानांची सजावट करुन लक्ष्मी आणि कुबेराचे पूजन केले जाते.

     🧹केरसुणीचे महत्त्व🧹

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीला महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाबरोबरच स्वच्छता करण्यासाठी आवश्यक असणारी नवी केरसुणी विकत घेऊन तिला लक्ष्मी मानून तिची पूजा केली जाते. तिच्यावर पाणी, हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. नाशिकमध्ये वर्षानुवर्ष दिवाळीतील इतर विक्रेत्यांप्रमाणेच केरसुणी विक्रेतेदेखील परराज्यांतून दाखल होऊन केरसुणींची विक्री करतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
  श्री अविनाश काशिनाथ पाटील 
उपशिक्षक बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
➖➖➖➖➖➖➖➖➖

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३

धनत्रयोदशी


  🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
       धनतेरस किंवा धनत्रयोदशी


 अश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. म्हणूनच अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी सणाचा दुसरा दिवस म्हणून ओळखला जातो.

धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे…

कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. लग्नानंतरचा चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या यमलोकात परततो. अश्या प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचते. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात.

या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.

धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे ‘समुद्र मंथन’. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖
       

गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०२३

दिवाळीचा पहिला दिवस - वसूबारस

   🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
           🐄 वसुबारस 🐄


        आज रमा एकादशी आहे आणि वसुबारस पण आहे.वसुबारस या सणापासूनच दीपावली पर्वाला प्रारंभ होतो,असे दांते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
        वसुबारस, धनत्रयोदशी, नकरचतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सणांनी दिवाळी साजरी केली जाते. घर-अंगणात दिवे लावत अंध:कार दूर करणारा, अज्ञात मृत्यूचे भयनिवारण करणारा, इच्छा आकांक्षा बाळगणारा असा हा आल्हाददायक सण आहे.
          वसुबारस दिवशी गायीची पाडसासह सायंकाळी पूजा करतात. सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी संवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे पूजन करतात.
       या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.
     वसुबारस साजरा करण्यामागे अजून एक गंमतशीर माहिती अशी सांगितली जाते की, दिवाळीच्या दरम्यान वातावरणामध्ये अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते, ज्यामुळे वातावरणात अस्थिरता आणि प्रणाली तापमान वाढ होते. हे टाळण्यासाठी म्हणून १०० कोटी देव जिच्यात सामावले आहेत अशी ही आपली गौमाताचे पूजन केले जाते, जिच्यामध्ये देवाच्या दैवी किरण शोषण्याची कमाल क्षमता आहे. गाय देखील कृष्ण स्वरूपात प्रभु प्रतिनिधित्व करते आणि म्हणून या दिवशी उपासना केली जाते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
संकलक - श्री अविनाश काशिनाथ पाटील 
उपशिक्षक बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
➖➖➖➖➖➖➖➖➖

मंगळवार, ३ मे, २०२२

अक्षयतृतीया विशेष

✧═════•❁❀❁•═════✧*
⚜Ⓜ 🇹 🇸⚜ Ⓜ 🇹🇸⚜
             *✧═════•❁❀❁•═════✧*
       🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
          ⚜️आजची कथा⚜️
   
         अक्षय तृतीया विशेष


आज ०३/०४/२०२२ अक्षय तृतीया आहे.

"अक्षय "या शब्दाचा अर्थ काय?
वैशाख शु. तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात.

अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो.
 या तिथीला साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते.

 नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी_ _त्यांचा जन्मोत्सव करतात. तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे.(काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन आहे).

अक्षय तृतीया हे व्रत कसे करावे?

या दिवशी  व्रत करणार्‍याने प्रात:काळी स्नान करुन नरनारायणासाठी भाजलेले जव अगर गव्हाचे पीठ,परशुरामासाठी कोवळी वाळके आणि हयग्रीवासाठी भिजवलेली हरबर्‍याची डाळ घालून नैवद्य अर्पण करावा.

शक्य असल्यास उपवास आणि समुद्रस्नान अथवा गंगास्नान करावे.तसेच जवस गहु, हरबरे , सातु, दहीभात , उसाचा रस दुग्धजन्य पदार्थ ( खवा, मिठाई आदी )तसेच जलपूर्ण कुंभ, धान्य पदार्थ, सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तुंचे दान करावे.

त्याचप्रमाणे पितृश्राध्द करुन ब्राह्मणभोजन घालावे.हे सर्व यथाशक्ती करण्याने अनंत फल मिळते.या तिथीस केलेले दान, हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते , ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे, असे श्रीकृष्णांनी सांगितल्याचा उल्लेख 'मदनरत्‍न' या ग्रंथात आहे.म्हणून या तिथीला अक्षय तृतीया हे नाव पडले आहे.या दिवशी पितृतर्पण करण्यास न जमल्यास निदान तिलतर्पण तरी करावे, असे आहे.
उन्हापासून रक्षण करणार्‍या छ्त्री जोडा इ. वस्तु दान द्यावयाच्या असतात.स्त्रियांना हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो._ चैत्रात बसवलेल्या गौरीचे त्यांना या दिवशी विसर्जन करावयाचे असते.त्या निमित्ताने स्त्रिया हळदीकुंकू करतात.

अक्षय्य तृतीया या दिवशी काय खरेदी करावे?
हा धार्मिकांचा उत्सव (सण) आहे.या दिवशी दिलेले दान अगर केलेला जप, स्नान आदी कृत्यांचे फ़ल अनंत असते. सर्वच अक्षय्य (नाश न पावणारे ) होते,यामुळेच या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात.या दिवशी तुम्ही सोने किंवा जड जवाहीर खरेदी करू शकता असे केल्याने त्यात सतत वाढ होत राहते.या दिवशी नवीन वस्त्रे, शस्त्रे, दागदागिने आदि वस्तू तयार करवतात अगर परिधान करतात.तसेच, नवीन जागा , संस्था अगर मंडळे आदी यांची स्थापना ,उद्‌घाटन वगैरेही केली जातात.नवीन वाहन खरेदी केले जाते.नवीन संकल्प केले जातात तसेच नवीन व्यवसाय सुरु केले जातात.
थोडक्यात काय तर कोतेही शुभ कर्म या दिवशी चालू केल्यास ते कायम स्वरूपी अक्षय राहते व टिकून राहते.
अक्षय्य तृतीया या दिवशी कोणते दान द्यावे?
या तिथीस केलेले दान आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे._ _म्हणून या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्व आहे.या दिवशी खालील प्रमाणे वस्तू दान केल्यास पुण्य संचय वाढतो. या दिवशी
१) या दिवशी मातीचे माठ किंवा रांजण गोर गरिबांना दान करावेत. (मुख्य म्हणजे अक्षय तृतीया या दिवसापासून माठातील थंड पाणी पिण्यास सुरवात करतात त्याने आरोग्य उत्तम राहते.)
२) या दिवशी आंबे गोर गरिबांना दान करावेत._ _(मुख्य म्हणजे आंबे खाण्यास सुरवातच अक्षय तृतीया या दिवसापासून करतात त्याने आरोग्य उत्तम राहते
३) या दिवशी मिठाई किंवा गोड पदार्थ या दिवशी गोर गरिबांना दान करावेत.
४) या दिवशी वस्त्रे किंवा कापड गोर गरिबांना या दिवशी दान करावेत.
५) या दिवशी विविध प्रकारची झाडांची रोपे खरेदी करून त्यांची आपल्या अंगणात किंवा एखाद्या मंदिरा भोवती किंवा डोंगर माथ्यावर लागवड करावी व पुढे पूर्ण वर्षभर त्यांची निगा राखावी.
६) सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी आपण आपल्या आवडत्या देवतेचे नामस्मरण किंवा मंत्र पठण करावे या दिवशी केलेल्या मंत्र पठणाचे किंवा नाम स्मरणाचे पुण्य अखंड टिकून राहते. खालील पैकी कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता.

_१) ll ओम नमो भगवते वासुदेवाय ll_
_२) ll सर्व मंगल मांग्लये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ll_
_3) भृगुदेव कुलं भानुं, सहस्रबाहुर्मर्दनम्।_
_रेणुका नयनानंदं, परशुं वन्दे विप्रधनम्।।_
_ll ओम रां रां परशुरामाय सर्व सिद्धी प्रदाय नम: ll_

या दिवशी वरील मंत्र म्हटल्याने आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते व तिचा निवास कायम आपल्या घरात राहतो.

विशेष सूचना - कृपया या दिवशी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढू नये कारण ते देखील अक्षय टिकून राहते.असे म्हणतात

तुम्हा सर्वांच्या आयुष्यात अखंड,अक्षय सुख,समृद्धी नांदो.
➖➖➖➖➖➖➖➖➖
         
➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

*✧═════•❁❀❁•═════✧*
⚜Ⓜ 🇹 🇸⚜ Ⓜ 🇹🇸⚜
             *✧═════•❁❀❁•═════✧*
 🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
⚜️मकरसंक्रांत पौराणिक कथा⚜️ 

श्रीमद्भगवत तसेच देवी पुराणानुसार शनी महाराजाचे त्यांच्याच वडिलांशी वैर होते. कारण सूर्य देवाने त्याची आई छायाला त्याच्या दुसऱ्या बायकोचा संज्ञाचा मुलगा यमराजाशी भेदभाव करताना पहिले होते. या गोष्टीने नाराज होऊन सूर्य देवाने संज्ञा आणि त्यांचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते. म्हणून शनी व छाया यांनी सूर्य देवाला कुष्ठरोग्याचा शाप दिला होता. 

यमराज आपल्या वडिलांना सूर्यदेवाला कुष्ठरोगाने पछाडलेले बघून दुःखी झाले. यमराजने वडिलांना कुष्ठरोगापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी कठोर तपस्या केली. परंतु सूर्याने रागात येऊन शनी महाराजाच्या घरी असलेली कुंभ राशी जिला शनी देवाची राशी मानले जाते ती जाळून टाकली. त्यामुळे शनी व त्याची आई छाया हिला हाल-अपेष्टा सहन करावी लागली. यमराजने आपली सावत्र आई आणि भाऊ शनी ला त्रासात असलेले पाहून त्यांच्या कल्याणासाठी वडिलांना सूर्य देवाला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सूर्याने सांगितले की, शनी जेव्हा दुसऱ्या घरात म्हणजे मकर राशीत येईल तेव्हा शनीचे घर धन-धान्याने भरपूर असेल. यावर शनी महाराज प्रसन्न झाले व त्यांनी सांगितले की, मकर संक्रांतीला जे कोणी सूर्यदेवाची पूजा करतील त्यांना शनी दशेचे त्रास सहन करावे लागणार नाहीत.

🔆मकरसंक्रांतीचे सामाजिक व वैज्ञानिक कारण🔆

मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृती मध्ये बदलांना सुरुवात होते. थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते. भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील सण-उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे. मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका, ऊस, शेंगदाणे, उडीद घरी घेऊन येतात. शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले.
           
        ⚜️ मकरसंक्रांत ⚜️ 
                 
सूर्याचे मार्गक्रमण दक्षिणायनातून उत्तरायनात होण्याच्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी आप्तस्वकीयांना तीळगुळ वाटून ‘तीळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. इंग्रजी महिन्यानुसार सध्या १४ जानेवारीस येते. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.*

पौष महिन्यात येणारा एकमेव सण म्हणजे संक्रांत. हा सण धार्मिक दृष्टीने आणि सामाजिक दृष्टीने महत्वाचा असला तरी खंर म्हणजे, संक्रांत हा निसर्गाचा सण आहे. संक्रमण म्हणजे ओलांडून जाणे, अर्थात मकर राशीत सुर्याचा प्रवेश होणे याला मकर संक्रमण म्हणतात. संक्रातीच्या दिवसापासून सुर्य उत्तरेकडे जाऊ लागतो. सुर्याच्या या गमणास उत्तरायण असे म्हणतात. दिवस मोठा होतो रात्र लहान होते. सुर्यप्रकाश अधिक मिळु लागतो या घटनेचा मानवी जीवनावर परीणाम होतो.

या सणाला धार्मिक महज्ञ्ल्त्;वही आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांत देवीने संकरसुराचा नाश केला अशी कथा पुराणात आली आहे. या देवीला अनेक हात आहेत एखाद्या वहनावर बसुन, वस्त्रालंकाराने सुशोभित होऊन, हातात विविध शस्त्रे घेऊन ती एका दिशेकडून दुसऱया  दिशेकडे जात असते असे वर्णन पंचागात दिलेले आहे. संक्रांतीचे वर्णन प्रत्येक वर्षी निरनिराळे असते. विशेष म्हणजे संक्रांत देवीस ज्या गोष्टी आवडतात. त्या गोष्टींची महागाई होते असे मानतात यावरूनच आपल्याकडे संक्रांत वळणे म्हणजे संकट येणे हा वाकप्रचार आलेला आहे या दिवशी सुवासिनी स्त्रिया पाच घट आणि पाच बोळकी आणुन त्यांना चुना व कुंकू लावतात. त्यात गहु, कापुस, हळकुंडे वगैरे घालुन त्याचे वाण देतात या मातीच्या घटानां सुघट किंवा सुगड असे म्हणतात. त्या दिवशी हळदी-कुंकूही केले जाते.
तिळगुळाबरोबर एखादी संसार उपयोगी वस्तु सुवासिनींना देतात. संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी म्हणतात. त्या दिवशी मुगाच्या डाळीची खिचडी, तिळाच्या भाकरी, लोणी देवाला समर्पण करून नतंर सेवन कराव्यात असे सांगितले आहे. संक्रांतीच्या सणाला सामाजिक दृष्टयाही विशेषमहत्व आहे. यादिवशी मनातील व्देषभाव नष्ट करून परस्परात प्रेम निर्माण करावयाचे असते. जीवनात गोडी निर्माण करायची असते. तिळातील स्नेह आणि गुळातील गोडी आमच्या जीवनात यावी म्हणून तर आपण तिळगुळ देतो. मित्रमित्रांनी एकमेकांना तिळगुळ द्यावाच, परंतु ज्याच्याशी आपले भांडण झाले असेल त्यालाही तिळगुळ द्यावा. भांडण मिटवुन मैत्रिचा हात पुढे करावा. केवळ हिंदु धर्मातील बांधवांना तिळगुळ न देता अन्य धर्मियांनासुध्दा तो द्यावा. आपला देश विविध धर्म, पंथ यांनी भरलेला आहे. पण तरीही आपण भारतीय आहोत. भारत आपला देश आहे. या निमित्ताने निर्माण झालेली बंधुता, प्रेम हे देशाच्या हिताची ठरेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शनिवार, ६ नोव्हेंबर, २०२१

भाऊबीज

✧═════•❁❀❁•═════✧
⚜Ⓜ 🇹 🇸⚜ Ⓜ 🇹🇸⚜
             ✧═════•❁❀❁•═════✧
       🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
          ⚜️आजची कथा⚜️
   
             भाऊबीज


भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया(यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्ट्रीयन पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.

या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो.

 या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते. त्याला प्रेमाचा टिळा लावते. तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो. भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड दागिना असे वस्तू ओवाळणी टाकतो. या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे धर्मग्रंथात सांगितले आहे. जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत आहे. आपल्या सणामागे असलेल्या कल्पनांचा विशाल पण यावरून दिसून येते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
 श्री अविनाश पाटील उपशिक्षक 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 
➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०२१

पाडवा बलिप्रतिपदा

✧═════•❁❀❁•═════✧
⚜Ⓜ 🇹 🇸⚜ Ⓜ 🇹🇸⚜
             ✧═════•❁❀❁•═════✧
       🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
          ⚜️आजची कथा⚜️
   
      साडेतीन मुहूर्तांपैकी एक... पाडवा बलिप्रतिपदा


अश्विनातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते.

बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते.

पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

व्यापाऱ्यांसाठी नववर्ष

पाडवा, बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारीलोक वर्षाचा प्रारंभ करतात. जमा-खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात, असे व्यापारी सांगतात. वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा केले जातात.

दिवाळसण

पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरुपात काही भेटवस्तू देतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात, यालाच दिवाळसण म्हणतात. यानिमित्त यादिवशी जावयास आहेर केला जातो.  
➖➖➖➖➖➖➖➖➖
संग्राहक - श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 
➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०२१

दिवाळी लक्ष्मीपूजन

✧═════•❁❀❁•═════✧
⚜Ⓜ 🇹 🇸⚜ Ⓜ 🇹🇸⚜
             ✧═════•❁❀❁•═════✧
       🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
      ⚜️ आजची कथा ⚜️ 
   
       दिवाळी लक्ष्मीपूजन


    दिवाळी लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे. आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा प्रतिवर्षी केली जाते.

               पूजा

अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी आख्यायिका आहे. समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते. श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.याखेरीज चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा यावेळी केली जाते. व्यापारी वर्गात यापूजेच्या वेळी फटाके उडवून आनंद साजरा केला जातो.

दिवाळीतील लक्ष्मी पूजनकथा

    लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे.   
➖➖➖➖➖➖➖➖➖
 संग्राहक -   श्री अविनाश पाटील
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 
➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

कथा धनत्रयोदशी ची

✧═════•❁❀❁•═════✧*
⚜Ⓜ 🇹 🇸⚜ Ⓜ 🇹🇸⚜
             ✧═════•❁❀❁•═════✧
       🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
          ⚜️आजची कथा⚜️ 
   
 🪔धनतेरस किंवा धनत्रयोदशी🏮


अश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. म्हणूनच अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो. दिवाळीची सुरवात या दिवसापासून होते.

धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे…

कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. लग्नानंतरचा चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या यमलोकात परततो. अश्या प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचते. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात.

या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.

धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे ‘समुद्र मंथन’. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.                     
संकलन - श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१

विसपूते माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सातासमुद्रापार साधला ऑनलाईन संवाद

डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सातासमुद्रापार जाऊन साधला मुक्तसंवाद....
रोमानियाच्या ग्लोबल टिचर अवॉर्ड विजेत्या कोरीना सुजेदिया यांनी विद्यार्थ्यांशी साधला ऑनलाईन संवाद...

धुळे, येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज ऑनलाईन विदेशवारी केली. जगामध्ये अनेक देश आहेत. प्रत्येक देशाची भाषा, संस्कृती, शिक्षण पद्धती वेगवेगळी आहे. या कुतूहलातून श्री अविनाश पाटील यांनी व्हर्चुअल ट्रीप च्या माध्यमातून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत नुकतीच रोमानिया या देशाची व्हर्चुअली विदेशवारी केली. यासाठी रोमानिया देशाच्या ग्लोबल टिचर अवॉर्ड विजेत्या कोरीना सुजेदिया या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या शिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम या देशाची माहिती दिली. तेथील संस्कृती व शिक्षण पद्धती याबद्दल सविस्तर सांगीतले. चित्रफीतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रोमानियाची सफर केली. शेवटी विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांच्या मनात उद्भवलेले प्रश्न विचारले. कोरीना सुजेदिया यांनी अतीशय मुक्तसंवाद साधत त्यांच्याशी दिलखुलास गप्पा केल्या. त्यांनी देखील भारताबद्दल जाणून घेतले व अशा ऑनलाईन कार्यक्रमांच्या माध्यमातून जगाची सीमारेषा ओलांडून दोन देशांचे संबंध दृढ होतील अशी अपेक्षा कार्यक्रमाचे आयोजक महेंद्र विसपूते यांनी सांगीतले.
ऑनलाईन ग्रेट भेट या कार्यक्रमासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब महेंद्र विसपुते, सचिव स्मिताजी विसपूते, प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, पालक व सर्व स्टाप चे सहकार्य लाभले.

✍सुविचार🙏

✍ आजचे सुविचार 👍


1️⃣ "पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाचे असतात; कारण पुस्तकाच्या पानात डोक्याचे खाद्य असते आणि झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते."

2️⃣ तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे, असं मला वाटतं.

3️⃣ लोकांनी नाव घ्यावे असे काम केले पाहिजे.

4️⃣ कोणतेही काम मन लावून करावे.

5️⃣ जे काही करणार ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे.

6️⃣ इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केले पाहिजे.

7️⃣ शिपाई सुद्धा कौतुकास पात्र ठरतो; जेव्हा तो चांगलं काम करतो.

8️⃣ शिपाई होण्याची इच्छा फारच कमी मुलांची असते; कारण त्यांना शिपाई हे पद कमी महत्त्वाचे वाटते. म्हणून पद कोणतही असो. त्याचा मनापासून स्विकार करा व त्यात स्वत:ला झोकून द्या.

9️⃣ आजची मुले सुदैवी आहेत; कारण रोज नवीन नवीन गोष्टी त्यांच्या कानांवर पडतात. त्या गोष्टींच चिंतन, मनन करा. त्याविषयी चिकित्सक बना.

1️⃣0️⃣ आज-काल मुलांना कार्टूनची नावे पाठ असतात, पण झाडांची नावे विचारली, तर दहा सुद्धा सांगता येणार नाहीत. शेवटी काय महत्त्वाचं हे लक्षात घ्या.

1️⃣1️⃣ माणसे कितीही मोठी झाली, तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही. म्हणून विचाराने प्रगल्भ व कर्तुत्त्वाने मोठे व्हा.

1️⃣2️⃣ मी कोणालाही फसवणार नाही, असे प्रत्येकाने ठरवल्यास देशाचे चित्रच बदलून जाईल.

1️⃣3️⃣ पाण्याचे वाया जाणारे थेंब हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे. म्हणून पाण्याचे महत्त्व जाणा.

1️⃣4️⃣ जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. म्हणून चांगले गुणी बना कारण ज्यांच्याकडे चांगले गुण असतात, ती माणसे जीवनात कोणतेही ध्येय प्राप्त करू शकतात. कोणतेही अवघड कार्य पार पाडू शकतात.

1️⃣5️⃣ आपण निसर्गाकडे लक्ष देत नाही. त्याच्याविषयी आपल्या मनात जिव्हाळा नसतो. म्हणून अनेकदा कोणालाही दहा झाडांची किंवा पक्ष्यांची नावे सांगता येत नाहीत. प्रत्यक्ष निसर्गाशी मैत्री केल्याशिवाय हे घडणे शक्य नाही. गाडीपेक्षा झाडी महत्त्वाची आहे. निव्वळ भौतिक प्रगती माणसाला जगण्यासाठी पुरेशी नाही.

1️⃣6️⃣ परदेशातला निसर्ग पाहण्यापेक्षा स्वतःच्या देशातला निसर्ग समृद्ध केला पाहिजे. खूप पैसे मिळवून देणारा व्यवसाय करणारे खूप असतात, पण गवई होणे, उत्कृष्ट लेखक होणे किंवा उत्कृष्ट शेतकरी होणे हे सुद्धा खूप महत्वाचे असे व्यवसाय आहेत.

1️⃣7️⃣ काहीतरी भव्यदिव्य करता आले पाहिजे.

1️⃣8️⃣ मुलांनी मनसोक्त जगले पाहिजे. उत्तम रीतीने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जगाने वाखाणणी केली पाहिजे. कालांतराने लोक तुमचे काम बघतात. तुम्ही परीक्षेत किती गुण मिळवले हे बघत नाहीत.

1️⃣9️⃣ ठरावीक उच्च पदाचाच सगळ्यांनी ध्यास बाळगणे योग्य नाही. ते उच्च पद मिळाले नाही म्हणून नाईलाजाने काहीतरी स्वीकारले जाते. याने जीवनातला आनंद मिळू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने त्या त्या पदाला आपलं मानून, समजून प्रामाणिक कार्य केल पाहिजे.

2️⃣0️⃣ प्रत्येकाने स्वतःचे काम निष्ठेने केले तर काम चांगले होते. काम करणाऱ्याला काम करण्याचा आनंदही मिळतो. शिवाय, त्या कामाला आणि काम करणार्‍यालाही प्रतिष्ठा मिळते.

    अशा  प्रकारे सगळे वागले तर समाजाचा दर्जा उंचावल्याशिवाय राहणार नाही.

संकलन लेखन~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे

लोकप्रिय लेखक मा. श्री.अरविंद जगताप यांच्या 'आप्पांचे पञ' या पाठातून काही निवडक वाक्ये.

रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

✍आजचा सुविचार✍

🌺 जीवन विचार🌺 
➖➖➖➖➖➖➖
शुभ रविवार.......

तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते. दुष्ट विचार आणि दुष्ट कृती ह्या जशा तुमच्यावर वाघासारख्या झडप घालायला टपलेल्या असतात .तसेच तुमचे शुभ विचार आणि तुमची शुभ कर्मे हजारो लाखो देवदूतांची शक्ती धारण करून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतात.आपण आपल्या तनमनात सदैव भलेपणाची,चांगुलपणाची,मांगल्याची,निस्वार्थीवृत्तीने जीवन  जगण्याची तेजोमय ज्योत तेवत ठेवली पाहिजे.
'कर्मे ईशू भजावा'.आपण आपल्या कामालाच आपले दैवत मानले पाहिजे. व प्रामाणिकपणे, इमान इतबारे आपले काम करीत राहीले पाहिजे त्यासाठीच आपला देह झिजवला पाहिजे.आपल्या कामाची पूजा केली पाहिजे.आपल्या कार्यातच आपल्याला ईश्वर प्राप्त होतो.
    
📚स्वामी विवेकानंद🙏🏻
माणसाचे कर्म चांगले असावे.चांगले कर्म असणाऱ्या व्यक्तीला भीती नसावी.
पण जर का कोणी चांगले कर्म करण्याचा दिखावा करत असेल तर (मुखी राम बगल मे सुरी)
अशा प्रकारचे देखावा करणारे लोक चांगल्या  व्यक्तीच्या कामात विनाकारण अडथळा निर्माण करीत असतील तर अशा व्यक्तीला परमेश्वर कधी माफ करत नाही.
कारण ज्यांचे कोणी नसते त्यांचा ईश्वर असते.परमेश्वर अशा व्यक्तीला चांगला धडा शिकवतो.मग तो स्वतःचे रुप कुठं ?आणि कसे दाखविल हे?????? 
〰〰〰〰〰〰
 🙏🏼संकलन🙏
✍ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे
~~~~~~~~~~~~
〰〰〰〰〰〰

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१

कोजागिरी पौर्णिमा - श्री अविनाश पाटील

कोजागरी पौर्णिमा

शरद ऋतूतील आश्विन महिना. आश्विन महिन्यातील आश्विन पौर्णिमा म्हणजेच "कोजागरी पौर्णिमा" किंवा "शरद पौर्णिमा". ह्या पौर्णिमेला अजूनही बरीच नावे आहेत. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात तर कुणी कौमुदी पौर्णिमा देखील म्हणतात.

कोजागिरी पोर्णिमा !  कोऽजार्गति? कोऽजार्गति? म्हणजे कोण जागे आहे ?, कोण जागृत त आहे? असे विचारीत दुर्गा देवी सर्वत्र फिरते असे म्हणतात. नवरात्राचे नऊ दिवस शक्ति बुध्दिच्या दैवताचे आराधान करावे. विजया दशमीला विजय संपादनासाठी सीमोल्लंघन करावे. त्यानंतर येणारी ही पोर्णिमा ! शेतीची कामे अर्ध्यावर झालेली, शेतातील पिके वाऱ्यावर डोलू लागलेली, चार महिन्यांचा पावसाळा संपत आलेला. काही भागात नवीन पिके हाताशी आलेली आहेत. अनेक भागातील ही नवात्र पोर्णिमा!

या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची आश्विनी साजरी करतात. रात्री उशिरापर्यंत गप्पा-गोष्ठी करत, रास व गरबा खेळत, आठवनीतील गाणी गात सर्वजण जागरण करतात. दूध आटवून बदाम, केशर, पिस्ता वगैरे सुकामेवा घालून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो आणि ते मसाला दूध मग प्राशन केले जाते. चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात सबंध पृथ्वीला न्हाऊ घालत असतो.
कोजागरी पौर्णिमेच्या अनेक कथा आहेत, त्यापैकी एक अशी सांगितली जाते की, एकदा एक राजा आपले सगळे वैभव्य आणि संपत्ती गमावून बसतो.त्याची राणी महालक्ष्मीचे व्रत करते आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देते आणि त्या राजाचे वैभव त्याला परत मिळते. असं म्हणतात की महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्रमंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात "अमृतकलश' घेऊन प्रत्येकालाच विचारते, की "को जागर्ति...? को... जागर्ति...?' म्हणजे आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का? कुणी जागं आहे का? अन् तिच्या हाकेला साद देण्यासाठी सगळेच जागे राहतात. मग तिची वाट पाहणाऱ्या, साद देणाऱ्या सगळ्यांना ती "अमृत' म्हणजे लक्ष्मीचं वरदान देते, धनधान्य, सुखसमृद्धी देते.
शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल घडून येत असतात..एकीकडे उन्हाळा संपत असतो आणि दुसरीकडे हिवाळा सुरु होत असतो.दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते.दूध पिल्यामुळे पित्त प्रकोप कमी होतो. याच कारणामुळे बहुतेक पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रधा आहे. कोजागरीचं शीतल चांदणं अंगावर घेतलं, की मनःशांती, मनःशक्ती, उत्तम आरोग्य लाभतं.

अशा या संपन्नतेमध्ये शरद पोर्णिमेला शबरीचा जन्म झाला. शबरी कोण होती? कोणी म्हणजे ती शबर राजाची कन्या होती. कोणी तिच्या वनवासी भिल्ल समाजाची असण्यावर भर देतात. कोणाला मातंग ऋषींसमोर अध्यात्मिक आस पूर्ण करण्यासाठी गुरू उपदेश घेणारी शबरी भावते. तर कोणाला आपल्ल्या दैवताला जे आहे ते, प्रसंगी उष्टी बोरे देऊनही समर्पित होणारी बशरी आठवते. कोणाला सीतेच्या शोधार्थ निघालेल्या दशरथ नंदन राम लक्ष्मणांना मार्गदर्शन करणारी शबरी आठवते. किती विविध रूपे ! सगळीच अनुकरणीय आणि म्हणूनच आदर्शवत रूपे !!

चला तर मग … कोजागरी साजरी करूया … मसाला दूध पिऊया … धम्माल करुया !!!

माहिती संकलन: श्री अविनाश पाटील 

स्त्रोत: बालपण

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

पांगुळगाडा - लेखक श्री वासुदेव पाटील (संग्राहक : श्री अविनाश पाटील)

पांगुळगाडा

          🔖 भाग::-- तिसरा

     ✒️  वा......पा.............
   गिरधन आबाची नात गेल्यानं श्रीराम पेंटरनं मंदीर रंगवण्याचं काम पाच दिवस बंद ठेवत दुसऱ्या गावाची कामं उरकली‌. गयभू, लिला, आबा  तर सुन्न होतेच पण सोबत दोन्ही मोरबीतलं वातावरणही सुन्न. जो तो आपापल्या लहान मुलांना जपू लागला. डोळ्यात तेल घालत मुलांच्या पाळतीवर राहू लागला. रात्री केव्हाही उठत मुलं जागेवर आहेत याची खात्री करु लागला. जरा कुठं  खुट्ट झालं की काळजात धस्स होऊ लागलं. आता पर्यंत जी तापी माय मायेच्या मायेनं पालनपोषण करत आली त्याच तापी मायकडं जो तो साशंकतेनं पाहू लागला. काठाकडं जायला घाबरू लागला. गावातली तरणीबांड पोरं रात्रीची गस्त सुरू करण्याची प्लॅनिंग करु लागले.

    पाचव्या दिवशी वायकरांनी श्रीराम पेंटरला पोलीस स्टेशनला बोलवलं. त्यांना माहीत होतं की आपण जे करतोय त्याला कायद्याचा आधार नाही. तरी तूर्तास दुसरा मार्गच सापडत नव्हता.

" श्रीराम! आज रात्री पासून मंदीर रंगवायचं काम सुरू कर!"

" साहेब मंदीराचे अध्यक्ष - गिरधर आबाकडं दु:खाचा प्रसंग गुदरला म्हणून ते काम बंद ठेवलय!"

" आबांनी स्वत: काम बंद करायला सांगितलं का?"

" आबा तसं बोलले नाही पण ..."

" मग उद्याच कामाला सुरूवात कर! पण त्या आधी दिवसा आमच्या पोलीस स्टेशनची रंगरंगोटी कर नी रात्री मंदीराचं काम कर"

ततफफ करत श्रीरामनं होकार दिला व परतत कामास सुरुवात केली. त्यानं दिवसभर पोलीस स्टेशनात पेंटीग केली. कदमनं साहेबांनी सांगितल्याप्रमाणं लक्ष घालत दिवसभर त्याला अजिबात विश्रांती घेऊ दिली नाही. रात्री जेवणानंतर लगेच कदमांनी त्याला मंदीराच्या कामावर पाठवलं. श्रीराम पेंटर वाल कंपाऊड ची मधली बाजू चितारू लागला. कुठं विठ्ठलाची, शंकराची आरती लिही, कुठं शिवमहिमा चितार,  कुठं  संताची चित्रे काढ, नामा, तुकोबाराय, माऊली चितार, असं करत करत रात्रीच्या दोन पावेतो तो मोरबीकडच्या गेटपर्यंत आला. वायकरांनी कदमांना मंदीरातच आजूबाजूला दूर थांबायला लावत  त्याला झोपू न द्यायला लावलं होतं. दोनच्या सुमारास पेट्रोलींग करत वायकर ही मंदीरात आले. श्रीराम पेंटरच्या डोळ्यात आता गुंगी येऊ लागली. त्यानं गेटजवळची मधली बाजूच चितारायला घेतली. बिलकुल विरुद्ध बाजूस बाहेर मधलं दृश्य चितारलं होतं. आता मधल्या बाजूस बाहेरचं दिसणारं दृश्य चितारण्याचं त्यानं ठरवलं. समोर लहान मोरबीकडून उतरणारी उतरण तो उतारू ( चितारू)  लागला. वायकर व कदम विठ्ठल मंदीराच्या सभामंडपातल्या खिडकीतून त्याकडं पाहत होते. चितारता चितारता पेंटर नं जांभई देत ब्रश खाली ठेवला. थोडं मागे सरकत ताणलेल्या व शिणलेल्या अंगाला आळोखे पिळोखे दिले. तरी डोळ्यात आता झोप उतरत झापडं जडावली. तो ब्रश घेत वरची दिसणारी घरं, दबलेली व मागंपुढं सरकलेली धाबी, मावठी, पक्क्या हवेलीच्या तिरकस भिंती, मनोरे चितारु लागला. आता झोप पूर्ण घेरू लागली. एक झपकी घ्यावी म्हणून तो ब्रश ठेवणार तोच खाडकन पुन्हा डोळे उघडत त्याचे हात आपोआप सरावानं सपासप चालू लागले. झोप, जाग, संवेदन, जाणिव की नेणीव... आपण झोपतोय.... आपण चितारतोय ! काय नेमकं काय? रंगात ब्रश की  मनाच्या नेणीवेत जाग? की जाणिवेत झोप? ब्रशचे फर्ऱ्हाटे सुरुच, डुलकी सुरुच. तो तसाच जागेवर कलला.

    वायकर मंदीरातून हळूच पुढे आले. त्यांनी लहान मोरबीच्या उताराच्या वाटेवर केव्हाची रोखून धरलेली नजर चित्रावर रोखली! त्यांचा अंदाज खरा ठरला होता. तरी ते अचंबीत झाले. चित्रात गेटमधून दिसणारं मोरबीचं दृश्य चपखल चितारलं असलं तरी उतारावरुन  पांगुळगाडा ढकलत उतरणारी गिरधर आबाची नात बाली  कशी? बालीला जाऊन सहा दिवस झालेले. श्रीराम चित्र काढत होता तेव्हा वायकरची नजर उतारावरच होती. तेव्हा त्यांना उतारावर ना पांगुळगाडा दिसला ना बाली! मग श्रीरामनं त्या दिवसा सारखाच आजही पांगुळगाडा का चितारला!वायकरनं कदमकडं पाहिलं. कदम तर विस्फारल्या डोळ्यांनी  पाहतच होता.
       वायकरनं श्रीरामला हलवत उठवलं.

" श्रीराम! सुंदर चित्र रेखाटलं तू! "

श्रीरामची नजर चित्रावर स्थिरावली. तो चमकला.

" साहेब! आजही तशीच चूक झाली झोपेत."

तो ब्रश रंगात बुडवत बाली व पांगुळगाड्यावर मारू लागला.

" थांब श्रीराम! आधी हा झोल नेमका काय? त्या दिवशी ही झोपेत तू पांगुळगाडाच चितारला अन आजही पांगुळगाडाच! सोबत आबांची पाच - सहा दिवसांपूर्वी मेलेली नात? जागतेपणी चितारता येणार नाही ते तू झोपेत कसं चितारु शकतो! श्रीराम सत्य काय ते सांग नाही तर पट्ट्या- लाथेनं बुकलत अंदर टाकतो! दोन निष्पाप मुलांचा जीव गेलाय!"

" साहेब! झोपेत चित्रे चितारले गेलेत हे आपणास खोटं वाटत असलं तरी ते‌च सत्य आहे! भले आपण मला तुडवलं, फासावर लटकवलं तरी तेच सत्य आहे!"

 " श्रीराम! यात काही तरी पाणी मुरतंय ! पटकन सांगून मोकळा हो!"

श्रीरामनं तोच नन्नाचा  पाढा लावला.

" कदम याला झोपूच नको देऊ! झोपला तरी चित्र काढणं सुरुच ठेवा!"

   सकाळी वायकर एकदम संभ्रमात पडले. पेंटर झोपल्यावर चित्र काढूच कसा शकतो? तेही तोच पांगुळगाडा, तीच मुलगी? पांगुळगाड्याचा काय संबंध!"

  श्रीराम पेंटर दिवसा पोलीस स्टेशन रंगवू लागला. दुपारी जेमतेम एक दोन तास त्याला झोपू दिलं.
    
    वायकरांना पांगुळगाडा डोळ्याभोवती गरगर फिरु लागला. त्यांनी शेवटी बारकू बोरसास स्टेशनात आणलंच. संशयीत म्हणून एकदा तपासायला काय हरकत आहे ? असा विचार करत त्यांनी बारकूस घेतलं. श्रीराम पेंटरनं पेंटींग करतांना  बारकू बोरसास आत येतांना पाहिलं. त्यांच्या अर्धवट झोपेनं बहिरट झालेल्या मेंदूत हे कुठं तरी कोरलं गेलं.

तिशी पस्तीशीतला बारकू बोरसे अंगानं भरलेला गोरापान व कामानं शरीर पिळदार बनवलेला गडी! तरी ठाण्यावर येताच आतून पुरता घाबरलेला.

   " बोरसे! गाव कोणतं तुझं?"

" पांघण! देवाचं पांघण साहेब! इथून चाळीस किमी अंतरावर तापीकाठावरच वसलंय!"

" गाव सोडून मोरबीत कसा आलास?"

" गावात धंदा म्हणावा तसा चालत नव्हता साहेब! मग नवीन गाव शोधता शोधता याच गावात आलो!"

"  धंदाच करतो की इतर धंदे ही करतो?"

" साहेब!.... म्हणजे...?"

" उलट सवाल नको! जे विचारलं ते सांग मुकाट्यानं!"

" नाही साहेब. फक्त लाकुडकाम!" बारकू खाली मान घालत बोलला.

" गावात काय घडतंय माहीत आहे का तुला!"

"........"

" बोरसे, मी काय विचारतोय?"

" हो साहेब! तात्यांचा नातू गायब झालाय तर आबांची नात....."

" दोघा मुलांच्या घटनेस्थळी पांगुळगाडा सापडलाय!  कदम! आणा ते दोन्ही पांगुळगाडे!"  वायकरनं जोरात कदमला आरोळी ठोकली.

 कदमनं दोन्ही पांगुळगाडे आणले. श्रीराम पेंटर ब्रश चालवत तिरकी नजर मध्ये टाकत होता. बोरसा समोर पांगुळगाडे पडलेत. ही जाणीव ही त्याच्या मेदूत कोरली.

" बोरसे! तूच बनवलेत ना हे?”

" हो साहेब!"

" किती पांगुळगाडे बनवलेत तू? कुणाकुणाकडे दिलेत तू?"

" साहेब! या गावात एवढे नाही. तीन बनवलेत!"

" तुझ्या गावाला ही बनवत आला असशील तू? तिथं ही काही घटना?"

" बनवलेत साहेब!"

" काही विचीत्र अनुभव, घटना?"

" नाही साहेब"

" इथं तिसरा पांगुळगाडा कुणाकडं दिलाय? केव्हा?"

" गयभू घेऊन गेला त्याच्या दुसऱ्या दिवशीच नानजी पाटलाकडं"

वायकर चपापले.

" नानजी पाटील मोठ्या मोरबीतले का?”

" होय साहेब!"

नंतर वायकरने त्यास 'बोलवलं की सरळ ठाण्यात यायचं' सांगत  जाऊ दिलं.

" कदम ! आपला तपास हा वाऱ्यावरच्या लाथा तर नाहीत ना?
वायकरनं कदमालाच विचारलं. पण कदमच्या मनातही तेच विचार घोळत होते. हा  पेंटर भंगोड्या असावा. याच्या नादी लागून साहेब तपासाची दिशा भरकटत नेत आहेत व वेळ ही वाया घालवत आहेत.

     वायकरनं नानजी पाटलाकडं जात घरात लहान मूलं किती याबाबत‌ चौकशी करत मुलांच्या काळजी घेण्यांचा सुचक सल्लाही दिला.

 रात्री श्रीराम पेंटर ला पुन्हा मंदीराचं राहिलेलं काम करण्यासाठी पाठवलं. आता रात्री तो मंदीराची पुर्वेकडील भिंत आतून  चितारणार होता. मंदीराच्या समोरील या भागात पटांगण होतं. या भिंतीला तापीकाठाकडं जाण्यासाठी  महादेव मंदीराच्या समोर तिरकस गेट होतं. त्याच गेटमधून तात्यांचा नातू बाहेर पडला असावा. 
  पेंटरनं त्या भिंतीवर मधल्या बाजूस संत व त्यांचा जिवनपट चितारावयास सुरुवात केली. संतसेना, माती तुडवणारे गोरोबा, मळ्यात राबणारे सावता माळी ,संत नरहरी सोनार असे एक एक संत चितारता चितारत पहाटे तीन वाजायला तो काठाकडं जाणाऱ्या गेटजवळ आला. तेथे तो समोर दिसणारा तापीकाठ , संथ तापीमाय काढणार होता. पण विविध समाजाचे संत चितारता चितारता झोपेच्या गुंगीत समाज, समाजातील विविध व्यवसाय ही कल्पना त्याच्या सुप्त मनात साकारली जाऊ लागली. गोरोबा साकारतांना त्याला आपल्या मोरबीतला कुंभार आठवला, सावता माळी काढतांना गावातले भाजीपाला पिकवणारे माळी आठवू लागले. मग तंद्रीत गावातले सर्व व्यावसायिक आठवत राहिले. झोप दाटू लागली. गुंगी चढू लागली. गेटजवळ तापीकाठ, सौंदळची झाडं ...समोर दिसणारं  जे तो कायम पाहत आलेला होता ते चित्रात उतरु लागलं. पुन्हा झोप, जाग, जाणिवा- नेणिवा, मनाचे खेळ, मनातल्या प्रांतात चालणारे व्यवहार ....सारं सारं खुलं होऊ लागलं. तो चित्र चितारता चितारताच कलला. 

मंदिराच्या संभामंडपात बसून बसून डुलकी देणारे वायकर खडबडून उठले. ते चित्राजवळ आले. आता तर ते जागेवर हबकून अक्षरश: उडालेच.
गेटजवळचं मधल्या भागातून समोर दिसणारं दृश्य श्रीरामनं चितारलं होतं.
 मंदीरापासून पसरलेला तापीकाठ....खोरं...सौंदळची झाडं...एका सौंदळच्या झाडाजवळ पांगुळगाडा ठेवत काठाकडं हात वर करत- जणू कुणाचा तरी हात धरत दुडूदुडू चालत असल्यासारखा मुलगा! पण सोबत दोन्ही बाजूला कोण  चालतंय हे दिसत नव्हतं. मोरबीच्या गेटकडच्या दिशेनं असाच एक पांगुळगाडा मुलगी तापीपात्राकडं ढकलत नेत होती. तसाच तिसरा पांगुळगाडा मोठ्या मोरबीकडून येतांना दिसत होता पण त्याच्याजवळ मूल दिसत नव्हतं. आणि.....आणि....तापी पात्राजवळ बोरसाचं वासलं, किकरं, कुऱ्हाड, रंधा, करवत, लाकडं पडलेली. बोरसा खाली मान घालत किंचीत वर डोळे करत  मुलांकडं पाहत पांगुळगाडा बनवत होता. अप्रतिम, जिवंत चित्र साकारलेलं. वायकर पाहून थक्क झाले.

 " साहेब हा पेंटर भांग खाऊन काम करतो वाटतं. दिवसा जे पाहतो तेच नशेत चितारतो! याच्या नादी आपला तपास भरकटतोय! " कदम वायकर साहेबास सुचवत होता

 तोवर मोरबीतून पहाटे लोक यायला लागले. चार दोन लोकांनी चित्र पाहिलं.  वायकरनं श्रीरामला उठवलं.श्रीरामला खूण करताच श्रीरामनं ब्रश रंगात बुडवत सपासप चित्रावर फिरवत मिटवलं व तो पुन्हा तापीकाठ रंगवू लागला. पण आता समोर जे दिसायचं तेच साकारू लागलं.

   वायकरनं सकाळी नऊ वाजताच बारकू बोरसाच्या पेकाटात बुटासहीत लाथ घालत गाडीत बसवत ठाण्यात आणलं. ठाण्यात येताच पुन्हा दोन तीन लाथा घातल्या. बोरकू बोरसाच्या ओठात दात घुसत रक्त वाहत होतं. ते पुसत तो गयावया करत होता.

"बारकू शेठ! जरा ही रंधा इकडं तिकडं न चालवता गुण्यात लाकुड तासत धारकोर तासतो तसंचं सरळ सरळ सारं खरं खरं ओक!" वायकर लालेलाल होत फुत्कारत होते.

" साहेब! सारं सारं सांगतो! पण विश्वास ठेवा मी मुलांना काहीही केलं नाही! "

.
.
.
 क्रमश:......

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

सुविचार- घटस्थापना विशेष

सुविचार 

दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुले आपल्या दारात आपोआप पडतात.

सप्ताह में सात वार होते है, और आठवा वार है परिवार, जब तक आठवा वार ठीक नही होगा, तब तक ये सातो वार बेकार है ।

लोकांचे सल्ले जरूर घ्यावेत कारण ते फुकट असतात परंतु निर्णय मात्र स्वतःचेच घ्यावेत कारण ते अमूल्य असतात.

आप चाहकर भी अपने प्रति लोगोंकी धारणाको कभी नही बदल सकते, इसिलिये सुकुनसे अपनी जिंदगी जिये और खुश रहे ।

जन्म हा एका थेंबासारखा असतो तर आयुष्य हे एका ओळीसारखे असते, पण मैत्री मात्र वर्तुळासारखी असते, त्याला कधीच शेवट नसतो.

सबको इकठ्ठा रखनेकी ताकत प्रेम में है और सबको अलग करनेकी ताकत भ्रम में है, इसिलीये कभी भी मन में भ्रम मत पालिये ।

Every morning is beautiful celebration of new opportunities, that life has to offer and take the first step towards making all your dreams come true.

💐💐💐💐💐💐

आज घटस्थापना !! घटस्थापनेच्या तसेच आजपासून सुरू होत असलेल्या पवित्र शारदीय नवरात्र महोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !! माता जगदंबा तुम्हाला सुख, समृद्धी, सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो, आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच जगदंबे चरणी प्रार्थना !!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💐💐💐💐💐💐💐

संग्राहक - श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

पांगुळगाडा (भाग - 2) लेखक - श्री वासुदेव पाटील

#पांगुळगाडा

         🔖 भाग ::-- दुसरा

      ✒️ वा......पा.............

   वायकराची घारी करडी नजर दोन्ही मोरबी, तापी काठ व पंचक्रोशीत भिरभिरत होती. पण त्यांना काहीच सुगावा लागेना. पांगुळगाडा ज्या सौंदळच्या झाडाखाली पडला होता तेथून पात्राचं जे अंतर होतं ते एक सव्वा वर्षाचं पोर सहसा पार करु शकत नाही. म्हणजे पोरास तेथून कुणीतरी पात्रात घेऊन गेलं असावं! पण कोण? सजन तात्याचे गावात संबंध एकदम सलोख्याचे! माणूस अजातशत्रू! मग घेऊन जाणारा कोण? बरं पात्रात टाकलं तर प्रेत एव्हाना वर आलं असतं. दूर दूर काठावरील गावात प्रेत सापडल्याची बातमी नाही! मग पळवून कुठं नेलं असावं? का? वायकर  सिगारचा कस घेत वलय सोडत मेंदुचा किस पाडू लागले. समोर जमा केलेला पांगुळगाडा पडलेला. पांगुळगाडा अतिशय दणगट व सुबक बनवलेला! एक लहान मूल हा गाडा घेऊन मागच्या गेटजवळच्या पायऱ्या उतरुच शकत नाही. एकतर तो कोलमडून पडला असावा. पडल्या बरोबर भोकांड पसरल्यावर सात आठला मंदिरात गर्दी असतेच. कुणी तरी नक्कीच ऐकलं असतं. पण असं काहीच न होता तो सौंदळपर्यंत पोहोचतोच कसा? नाही! कोणीतरी सराईतपणे घेऊन गेलाय! पण मग घेऊन जाणारा कुणाच्या नजरेस का पडला नाही.
    आठ दहा दिवस सजन पाटलाकडे नुसता आक्रोश व जीव तोडून बाळाची वाट पाहणं सुरु होतं. हळूहळू आशा मावळायला लागली.

     गिरधन आबाच्या गयभूनं बारकू बोरसाकडं दरवाजा बनवण्यासाठी लाकडं टाकली होती. दरवाजा बनवून बरीच लाकडं उरली होती. 

" गयभू दा! या उरलेल्या लाकडाचं काय करायचं? घरी नेतोय का?" बोरसानं विचारलं.

" घरी नेऊन पसारा पेक्षा पांगुळगाडाच बनवा! आमच्या सोनूस कामाला येईल!" गयभू बोलला नी बोरसाचे हात पुन्हा थरथरले. त्यानं भितभितच रुकार भरला.
 पडलेली लाकडं परत ठेवण्यापेक्षा तो लागलीच कामास लागला.  सायंकाळी तप्ती काठावरुन टिटव्यांचा आक्रोश वर चढत चढत बारकू बोरसाच्या पत्री शेडवर कर्कशता आणू लागला. शेडच्या मागच्या शेतात आंब्याचं भलं मोठं झाड होतं. त्याच्या ढोलीत सायंकाळी घुबडाची जोडी दिसली. तशी ही जोडी दहा बारा दिवसापूर्वीच आली होती. पण आज बारकूस सायंकाळी ती नजरेस पडली. घुबडांची तीक्ष्ण नजर जणू आपणावरच रोखली असा भास त्याला जाणवला. तयार झालेला पांगुळगाडा  त्यानं आपल्या म्हाताऱ्यास गिरधन आबाकडं द्यायला पाठवलं. म्हाताऱ्यानं पांगुळगाडा उचलला व तो लहान मोरबीत चढू लागला. त्याच्या डोक्यावरच्या आभायात टिटव्या नुसत्या गचबुच गिल्ला करत होत्या.

     मंदीराचं वाल कंपाऊंड तयार होऊन दोन तीन महिने झाले होते. मंदीराच्या ट्रस्टचे अध्यक्ष असणारे गिरधन आबा गावातल्या श्रीराम पेंटरला आपल्या घरी बोलवून तासत होते. बोरसाच्या बापानं पांगुळगाडा दिला व ते माघारी फिरले.

" श्रीराम अख्ख्या तालुक्यातील कामं करतो नी गावचं मंदीराचं काम तुला जमत नाही रे? ज्या गावात राहतो त्या गावाचे असे पांग फेडतो?"

" आबा, माझं ऐका दुसरा पेंटर पहा! कारण माझ्याकडे वर्षापासूनची कामं पेंडींग पडलीत. मी रात्रंदिवस कामं करतो तरी सरकत नाहीत".

" श्रीराम! दुसरा पेंटर पाहिला असता तर एवढ्यात पुरं वालकंपाऊंड रंगवून झालं असत! मला ते काही माहीत नाही. हवं तर फुकट नको आम्हाला मजुरी घे पण गावचं काम तूच कर!"

" आबा, गावचं सार्वजनिक काम मी कधी मजुरीनं केलंय का, की याची मजूरी घेईन! काम मी असंच करीन! पण मला सवडच नाही म्हणून मी नकार देतोय!"

" मग असं कर हवंतर रोज रात्री थोडंथोडं कर! दिवसा तुझं आधीचं काम उरकव! "

श्रीराम पेंटरनं कसंनुसं तोंड करत रुकार भरला व तो उठला. गिरधन आबांनी प्रायमर व रंगाचे डब्बे त्याकडं लगोलग दिले. श्रीराम पेंटरनं सोबत आणलेल्या मुलाच्या मदतीनं ते सामान मंदीरात पोहोचतं केलं. लगेच गावातली दोन तीन माणसं पकडली व वालकंपाऊंडला प्रायमर मारावयास सुरुवात केली. रात्रभर स्वत: उभं राहत त्यानं प्रायमर मारला. श्रीराम पेंटर हाडाचा चित्रकार होता. कोणतीही पेंटीग तो लिलया साकारी. म्हणून वर्षभर आगाऊ त्याच्याकडे काम पडलेली असत. सार्वजनिक कामाची तो गावातून कधीच मजूरी घेईना.
रात्रभर प्रायमर मारल्यावर त्यानं हाताखालच्या माणसांना दिवसा रंग मारावयास ठेवलं व तो दुसऱ्या कामावर निघून गेला.

   गिरधन आबाच्या घरी गयभूचा एक वर्षाचा मुलगा सोनू व तीन वर्षाची मुलगी बाली दिवसभर पांगुळगाडा फिरवत धूम करत होती. बाली सोनूकडून पांगुळगाडा हिसकावत जोरात गरागरा घरभर फिरवी नी सोनू पाय पसरत जमिनीवर फतकल मांडत दात ओठ ताणत बोंबले.

" बाली ! तो लहान आहे त्याला दे नाहीतर तुला मी  झाडणीच्या बुडक्यानं बुकलेल!" लिला संतापू लागली. सायंकाळ पावेतो गिरधन आबाकडं हाच खेळ रंगला होता. सायंकाळ होताच आंब्यावरील घुबडाची जोडी गिरधन आबांच्या माडीच्या वरच्या वळचणीला आली.

        रात्री गावात येताच श्रीराम पेंटरनं कसंबसं जेवण उरकलं व तो मंदीरात आला. त्यानं गयभूस बोलवत आणखी लाईट आणावयास लावले. आज रात्री तो मजुरांनी रंगवलेल्या वालकंपाऊंडवर चित्रे काढणार होता. पण कालच्या रात्रीचं जागरण व दिवसाही झोप नाही म्हणून त्याचे डोळे मटमट करत बंद होत होते. त्याला झपकीवर झपकी येत होती. तसं तो रात्रंदिवस काम करी पण दिवसा वा रात्री दोन तीन तास तरी झोप काढी. पण आज झोपच झाली नव्हती.
   त्यानं मंदीराच्या लहान मोरबीकडं असणारं गेटजवळचं वालकंपाऊंड चितारावयास सुरुवात केली. मजूर आज थांबली नाहीत. कारण प्रायमर व रंगवणं संपलं होतं. आता चितारणं पेंटरचच काम होतं.

  श्रीराम पेंटरला लहान मोरबीकडून येतांना बाहेरुन मंदीराची आतली बाजू जी दिसायची तीच त्या गेटजवळच्या वाल कंपाऊंडवर चितारायची होती. त्यानं ब्रश व रंग घेत फर्ऱ्हाटे मारावयास सुरुवात केली. गेटमधून मंदीराचा जितका भाग दिसे तो त्यानं चितारावयास सुरुवात केली. विठ्ठल मंदीराची समोरची बाजू, त्यामागं दडलं असलं तरी डोकावणारं महादेव मंदीर, त्याजवळचा वड, पिंपळ , लिंब ,पटांगण तो चितारू लागला. पण हे चितारता चितारताच त्याच्या डोळ्यात झोप तरारली. तो चितारतोय की झोपतो हेच त्याला कळेना. घडीत आपण ब्रश ठेवून कंपाऊंडला टेकून झोपलोय ही जाणीव मेंदूत धडका देऊ लागली तर घडीत लगेच आपण ब्रश घेत जोमानं चितायतोय असली जाणीव नेणीवात नेऊ लागली. 

      वायकरनं आमले पोलीसास सोबत घेत पेट्रोलिंग सुरू केलं. मोठी मोरबी केल्यावर मंदीराजवळून ते लहान मोरबीत चढणार होते. तोच वालकंपाऊंड जवळ त्यांना कोणी तरी दिसलं म्हणून त्यांनी आमलेस गाडी तिकडं वळवावयास लावली.
 गाडीतून उतरत ते गेटजवळ जाताच वालकंपाऊंडला टेकून झोपलेला पेंटर दिसला. पण त्यापेक्षा  त्यांचं लक्ष चित्रावर गेलं. टांगलेल्या लाईटच्या उजेडात ते चित्राकडं एकटक पाहू लागले. गेटमधून घुसतांना दिसणारा समोरचा भाग जसाचा तसा दिसत होता. पेंटरची  अद्भुत कारीगरी पाहून ते स्तंभित होत बारकाईनं निरखू लागले. मदीर ,मधली झाडं, पटांगण समोरचं कोपऱ्यातलं तापीकाठाकडं उतरणारं गेट...अरे पण त्या गेटमध्ये काय दिसतंय? पांगुळगाडा? ते चित्राच्या अगदी जवळ सरकले. गेटमधून बाहेर निघणारा पांगुळगाडा! त्यांनी गेटमधून मध्ये पाहिलं तर समोर कोपऱ्यात गेट दिसत होतं पण पांगुळगाडा दिसत नव्हता. मग चित्रात यानं का चितारला? तो ही सजन पाटलांच्या नातूच्या घटनेत जमा केलेला पांगुळगाड्यासारखाच! वायकर एकदम धक्क्यात! त्यांनी भिंतीला टेकून झोपलेल्या पेंटरला दरडावत उठवलं. श्रीराम खडबडून गाढ झोपेतून जागा झाला.

" काय रे श्रीराम हे चित्र तू काढलं ना?"

" हो साहेब. चितारता चितारताच झोप लागली".

" चित्रात गेटमध्ये काय दिसतंय रे बघ?"

" बापरे! पांगुळगाडा? गेटजवळ हा कसा चितारला गेला? साहेब कदाचित झोपेच्या गुंगीत फर्ऱ्हाटे उलटसुलट मारले गेले असावेत"

पण उलट सुलट फर्ऱ्हाट्यानं चित्र बिघडलं असतं, इतकं साफ सुथरं चित्र आलंच नसतं हे वायकरांनी  ओळखलं.

" श्रीराम ! चित्र काढतांना तु मध्ये पाहून काढत असेल ना? आठवून पहा ! गेट चितारतांना पांगुळगाडा तिथं असावा?"

" साहेब! झोपेच्या धुंदीत मी काय चितारलं तेच आठवत नाही नी झोपच लागली" म्हणत श्रीरामनं भराभरा रंग मारत पांगुळगाड्याचं चित्र मिटवलं.

   वायकरला मात्र नवल वाटलं. वायकर तेथून पुढं  लहान मोरबीकडं सरकले. मोरबीत जाताच गिरधर आबांच्या माडीजवळ जोराचा गलका त्यांना ऐकू आला. त्यांनी गाडी माडीसमोर थांबवली. गयभू, गिरधर आबा, लिला सारे खाटेवर नसलेल्या आपल्या तीन वर्षाच्या बालीस शोधत होते.
खाटेवर झोपलेली बाली एक वाजता उठलेल्या गयभूस दिसली नाही म्हणून त्यानं  आपली पत्नी लिलास उठवलं. तिच्याजवळ सोनू झोपलेला. मग त्यांनी आबा, आई सर्वांच्या जवळ बालीस शोधलं पण बाली घरात कुठंच दिसेना. म्हणून घरात एकच गहजब उडाला. वायकर जाताच आजुबाजूंचे शेजारी ही उठले. शोधाशोध सुरू झाली. त्यातच गयभूस कालच बनवून आणलेला पांगुळगाडा ही खुंटीस दिसेना. मग तर संशय दाटावला. तात्याचा नातू साऱ्यांना आठवला. मग तर सारी मोरबीच जागे होत तपास करु लागली. शोधाशोध, रडारड, भिती, दहशत! दहा दिवसांत दुसरी घटना. 
   सकाळी तापीपात्रात पांगुळगाडा तरंगतांना दिसला. वायकरला कळताच ते धावतच काठावर आले.  बारकू बोरसानं बनवलेला हा दुसरा पांगुळ गाडा. पुन्हा पात्रात उड्या घेतल्या गेल्या. तळाचा ठाव घेतला गेला. पण भरलेली तापीमाय आपल्या उरात काय काय गुपीत दडवून‌ वाहत होती हे का सहजासहजी कुणास कळणार होतं! दुसऱ्या दिवशी बालीचं शव पात्रावर तरंगताना दिसताच शोध संपला व रडारड, आक्रोश सुरू झाला. पण वायकरचा शोध सुरू झाला.

दोन मुलांचं गायब होणं! पांगुळगाडा  घेऊन गायब होणं! समोर नसलेला पांगुळगाडा चित्रात दिसणं!  वायकर......वायकर......उठा, लागा कामाला......! काल तरंगणारा पांगुळगाडा काढतांना, आज बालीचं शव काढतांना टिटव्या आरडतच होत्या. पिंपळावरची लटकलेली वटवाघळं दिवसाच बिथरत होती. दिवसांध घुत्कारत होती! रात्रीचे वडा- पिंपळावर बसलेले बगळे वेळी अवेळी फडफडत कलकलत मोरबीच्या आभायात घिरट्या घालत होती. वायकर.....उठा...लागा ..कामाला! बारकू बोरसा मात्र पत्र्याच्या शेडमध्ये आपलं लाकूड तासत होता, रंधत होता कुस कोरतच होता!

क्रमश:......

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...