कार्यक्रम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कार्यक्रम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

हिंदी दिनानिमित्त पोस्टर प्रदर्शन

हिंदी दिनानिमित्त बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालयात हिंदी साहित्यिकांच्या जीवनावर 'पोस्टर प्रदर्शनाचे' आयोजन...

लहान गटातून उमेश्वरी पारधी तर मोठ्या गटातून प्राची सोनवणे यांनी पटकावला प्रथम क्रमांक...

धुळे दि. १४ 

१४ सप्टेंबर राष्ट्रभाषा हिंदी दिवसाचे औचित्य साधून शहरातील बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक मा. श्री आर. एन. पाटील, पाॅलीटेक्नीक विभागाचे प्राचार्य श्री झेड. एफ. पिंजारी, प्राचार्य श्री पी. बी. पाटील, श्री एस. आर. पाटील, श्री डी. डी. पवार उपस्थित होते.
हिंदी विषय शिक्षक श्री ए. के. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने हिंदी साहित्यिकांची यादी तयार केली. तद्नंतर त्यांना गुगल च्या मदतीने हिंदी कवी, लेखक, नाटककार, कहानीकार यांची माहीती शोधून लिहून आणायला सांगीतली. त्यावर आधारीत विद्यार्थ्यांनी पोस्टर तयार केले. यामध्ये शाळेच्या इ. ५ वी ते १० वी तील एकूण ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामुळे विद्यार्थ्यांना हिंदी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी, लेखक, नाटककार व कहानीकार यांची माहीती झाली त्यांचा जीवनपरीचय व कार्य त्यांना समजले. भविष्यात त्यांनी या साहित्यिकांचे साहित्य वाचनाचे आश्वासीत केले. 
हिंदी विषय समितीचे प्रमूख श्री ए. के. पाटील, श्रीमती अपर्णा पाटील, श्री महेंद्र बाविस्कर व श्री डी. डी. पवार यांनी यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले.

यामध्ये इ. ५ वी ते ७ वी च्या गटातून प्रथम क्रमांक कु. उमेश्वरी पारधी, द्वितीय - राज बुधा पवार तर तृतीय क्रमांक कु. किर्ती दिनेश गवळी या विद्यार्थीनीने पटकावला. मोठ्या गटातून (इ. ८ ते १० वी) प्रथम - प्राची सुनिल सोनवणे, द्वितीय भारत अशोक जाधव तर तृतीय क्रमांक कु. निशा छोटू अहिरे या विद्यार्थ्यांनी पटकावला. यावेळी परिक्षक म्हणून पाॅलीटेक्नीक विभागाच्या प्रा. पुनम निकूमे, प्रा. विजया मराठे, प्रा. वर्षा देवरे यांनी कामगिरी बजावली. कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी श्री विजय देसले, श्री एस. बी. भदाणे, श्री योगेंद्र पाटील, श्री महेश पाटील, श्रीमती राजश्री मासूळे, श्री कुणाल साळुंके, श्री जयेश गाळणकर, श्री तुषार कुलकर्णी, श्री अभिज्ञ पवार, श्री महेश पवार व विलास भामरे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे यशस्वी पणे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते, सचिव स्मिताताई विसपूते व प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी आयोजकांचे अभिनंदन व कौतूक केले.

शुक्रवार, २८ जुलै, २०२३

वर्ग प्रतिनिधी निवडणूक २०२३\२४

लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया समजून घेण्यासाठी घेतली ई - निवडणूक : 

विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने वर्गप्रतिनिधी निवडीसाठी राबविला नाविन्यपूर्ण उपक्रम :

शालेय विकासासाठी मंत्रिमंडळाची स्थापना व शपथविधी संपन्न :
धुळे दि. २८|७|२३



विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न देता विविध प्रात्यक्षिकांसह शिकविणे ही काळाची गरजच बनलेली आहे. प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शिकवलेले चिरकाल स्मरणात राहते यासाठी आपली लोकशाही व त्यातील निवडणूक प्रक्रिया याची माहीती व्हावी म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतीच विद्यार्थी प्रतिनिधींसाठी लोकशाही पद्धतीने ई - निवडणूक, अनोखी व नाविन्यपूर्ण मतदान प्रक्रिया संपन्न झाली.
या मतदानाचे विशेष म्हणजे ईव्हीएम मशीनच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव घेतला. 'वोटींग मशीन' या मोबाईल ॲपच्या सहाय्याने उमेदवार व त्यांचे चिन्ह यासमोरील बटन दाबून विद्यार्थ्यांनी मतदान केले. 
इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या वर्गांसाठी वर्ग प्रतिनिधी म्हणून एकूण 24 उमेदवार रिंगणात उतरलेले होते. सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्राचार्य श्री प्रवीण पाटील सर यांच्याकडे सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर उमेदवार म्हणून उमेदवारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची सभा आयोजित करून त्यांना या मतदानासंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली. प्रत्येक वर्ग हा मतदार संघ असून त्या वर्गातील वर्ग प्रतिनिधींसाठी इच्छुक उमेदवारांना शैक्षणिक साहित्याचे चिन्ह वाटप करण्यात आले. आणि प्रचारासाठी सुद्धा त्यांना दोन दिवस देण्यात आले. त्यानंतर  इयत्ता पाचवी ते बारावीतील सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला अशी माहीती उपक्रम संयोजक श्री अविनाश पाटील यांनी दिली.

मतदानानंतर कु. किर्ती गवळी (इ. ५ वी), कु. खुशी कोळी (इ. ६ वी), कु. उमेश्वरी पारधी (इ. ७ वी). कु. श्रद्धा चव्हाण (इ. ८ वी), सुमित हिवरकर (इ. ९ वी), भाविका मोहीते (इ. १०), चेतन पाटील (इ. ११ वी) व प्रसाद पाटील (इ. १२ वी) यांनी बहुमत मिळवले. निकाल घोषित झाल्यानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी नाचून जल्लोष साजरा केला. यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. त्यापैकी त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, क्रीडामंत्री, सहल मंत्री, अर्थ मंत्री, स्वच्छता मंत्री अशी विविध मंत्री पदे देऊन लगेच शपथविधीचा कार्यक्रम ही संपन्न झाला. यातून शालेय कामकाजामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढणार असून प्रशासकीय कामाची माहीती देखील मिळणार असून त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसीत होईल असा आत्मविश्वास प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी व्यक्त केला.

संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते  मनोगतात म्हणाले की, "अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेमध्ये राबवून विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेतला तर नक्कीच त्यांना आपल्या लोकशाही प्रणालीतील बऱ्याचशा गोष्टीं स्पष्ट होतील. शालेय जीवनात समजून घेतलेल्या गोष्टींचा चिरकाल परिणाम होत असतो. म्हणूनच आम्ही आमच्या संस्थेमध्ये अशाप्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी संधी देत असतो. आज पुस्तकी शिक्षणापेक्षा प्रात्यक्षिक देण्याची गरज आहे. त्यांना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन देणे महत्वाचे आहे."

उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी श्री एस. आर. पाटील, श्री डी. डी. पवार, श्री एस. बी. भदाणे, श्री विजय देसले, श्रीमती अपर्णा पाटील, श्री महेंद्र बाविस्कर, श्री योगेंद्र पाटील, श्री महेश पाटील, श्रीमती राजश्री मासूळे, श्री जयेश गाळणकर, श्री कुणाल साळूंके, श्री तुषार कुलकर्णी, श्री अभिज्ञ पवार, श्री महेश पवार व विलास भामरे यांचे सहकार्य लाभले. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते, सचिव मा. स्मिताताई विसपूते व प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी अभिनंदन व कौतूक केले.

बुधवार, २६ जुलै, २०२३

पालक शिक्षक संघ सभा

विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पालक शिक्षक संघाची सभा संपन्न.
आपल्या पाल्याला ध्येय दाखवा व त्याच्या ध्येय पूर्तीसाठी प्रोत्साहन द्या : नानासाहेब महेंद्र विसपूते 
धुळे दि. २६ 

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज पालक शिक्षक संघाची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य श्री पी. बी. पाटील, पालक प्रतिनिधी श्री सुनिल पुंडलिक सोनवणे, श्री छोटू मोहीते उपस्थित होते. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा पाटील यांनी केले. स्वागत श्री ए. के. पाटील, प्रास्ताविक श्री पी. बी. पाटील यांनी तर आभार श्री डी. डी. पवार यांनी मानले. यावेळी उपस्थित पालकांमधून कार्यकारी समितीतील सदस्यांची निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष म्हणून श्री सुनिल सोनवणे यांची निवड करण्यात आली तर सचिव म्हणून श्री ए. के. पाटील यांची तर  सहसचिव म्हणून श्री डी. डी. पवार व  श्रीमती सरला गवळी यांची निवड करण्यात आली. पालक सदस्य म्हणून श्री छोटू मोहीते, श्रीमती संगीता पारधी, श्री दिलीप बच्छाव, श्री शंकर मोरे व सुक्राम मोरे यांची निवड करण्यात आली.
उपस्थित पालकांमधून श्री छोटू मोहीते व श्री सुनिल सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेत राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतूक केले. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. शेवटी अध्यक्षीय मनोगतातून 
पालकांना मार्गदर्शन करतांना नानासाहेब महेंद्रजी विसपूते यांनी सांगीतले की, आपल्या पाल्याला ध्येय ठरविण्यासाठी व ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून नियमीत प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा द्या. एक दिवस नक्कीच ते आईवडील व गुरूजणांचे नाव लौकिक करतील. संस्थाचालक म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत सर्व सुविधा पुरवीत असतो. शिक्षक त्यांचे अध्यापनाचे काम प्रामाणिक पणे करीत असतात. त्यासोबत पालक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहीजे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री एस. आर. पाटील, श्री एस. बी. भदाणे, श्री विजय देसले, श्री महेंद्र बाविस्कर, श्री योगेंद्र पाटील, श्री महेश पाटील, श्रीमती राजश्री मासूळे, श्री कुणाल साळूंखे, श्री जयेश गाळणकर, श्री तुषार कुलकर्णी, श्री अभिज्ञ पवार, श्री महेश पवार, श्री विलास भामरे यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते व सचिव मा. स्मिताताई विसपूते यांनी कार्यक्रम यशस्वी आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

शुक्रवार, १४ जुलै, २०२३

विसपूते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनूभवले चांद्रयान 3 चे लाईव्ह प्रक्षेपण...

नव्या क्षमतांसह उड्डाण घेणाऱ्या चांद्रयान-3 च्या उड्डाणाची विसपूते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली प्रत्यक्ष अनुभूती....
धुळे दि. १४/7/23


आज आपल्या देशाने  चांद्रयान 3 ची यशस्वी चाचणी केली. दुपारी ठिक 2.35 मिनीटांनी या यानाने चंद्राकडे झेप घेतली. याचे लाईव्ह प्रक्षेपण आज बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुभवले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला विज्ञान शिक्षक श्री एस. आर. पाटील यांनी या यानाची माहिती दिली. चंद्रावर जवळजवळ चाळीस दिवसानंतर पोहचणार्या या यानाचा प्रवास कसा असेल या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. आणि शेवटी उड्डाणाची वेळ जवळ आल्यानंतर सेकंद मोजत असतानाच उड्डाण घेणाऱ्या चांद्रयान 3 ने सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या चेहर्‍यावर रोमांच पसरवला. सर्व उल्हासीत होऊन जल्लोष साजरा करीत होते. विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसत होते. 
संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते, सचिव स्मिताताई विसपूते व प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून कार्यक्रम यशस्वी आयोजन करण्यात आले. यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

शनिवार, २३ जुलै, २०२२

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती

विसपूते माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन...
टिळकांच्या विचारातून प्रेरणा घ्यावी - श्री डी. डी. पवार 
धुळे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री पी. बी. पाटील अध्यक्षस्थानी होते. मंचावर जेष्ठ शिक्षक श्री एस. आर. पाटील, श्री डी. डी. पवार, श्री ए. के. पाटील व श्री एस. बी. भदाणे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. इ. ८ वी च्या कु. भाग्यश्री गवळी, प्राची पाटील, प्रांजल व अक्षरा बळसाणे यांनी अतीथींच्या  स्वागतासाठी गीत सादर केले. वक्तृत्व स्पर्धेत चि. भावेश मोहीते, प्रथमेश, भाग्यश्री गवळी, प्राची पाटील, प्रांजल शिरसाठ, भारत जाधव, दिपक मोहीते, भाविका मोहीते, अंकिता मोरे, पुनम गवळी, समाधान लोंढे, भाग्यश्री मोहीते, कविता पाटील इ. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा पाटील यांनी केले. श्री डी. डी. पवार व श्री ए. के. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विजय देसले, श्री योगेंद्र पाटील, महेश पाटील, कुणाल साळुंके, श्रीमती राजश्री मासूळे, श्री तुषार कुलकर्णी, अभिज्ञ पवार, श्री महेश पवार व विलास भामरे यांनी मेहनत घेतली. 
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल प्राचार्य श्री पी. बी. पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री राजेंद्र गवळी, संस्थेच्या सचिव मा. स्मिताताई विसपूते, अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्र विसपूते यांनी अभिनंदन व कौतूक केले.

कार्यक्रमाची क्षणचित्रे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

शुक्रवार, २२ जुलै, २०२२

पोस्टर स्पर्धा दि. २२ | ७ | २२

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पोस्टर स्पर्धेचे आयोजन...
धुळे दि २२ 
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. शालेय विद्यार्थ्यांना या उत्साहात सहभागी करून घेण्यासाठी शालेय स्तरावर विवीध स्पर्धा घेण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. म्हणून आज आमच्या विद्यालयात पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. स्वातंत्र्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने १] पारंपरिक सण २] स्वातंत्र्य दिन ३] स्वातंत्र्योत्तर भारत या विषयांवर पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेचे श्री डी. डी. पवार, श्री विजय देसले, श्री महेश पाटील यांनी नियोजन  केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री एस. आर. पाटील, श्री ए. के. पाटील, श्री एस. बी. भदाणे, श्रीमती अपर्णा पाटील, श्री महेंद्र बाविस्कर, श्री योगेंद्र पाटील, श्री महेश पाटील, श्री साळूंके सर, श्रीमती राजश्री मासूळे, श्री तुषार कुलकर्णी, श्री अभिज्ञ पवार, श्री महेश पवार, श्री विलास भामरे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल 
विद्यालयाचे प्राचार्य श्री पी.बी. पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री राजेंद्र गवळी, संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्र विसपूते, सचिव मा.  स्मिताताई विसपूते यांनी अभिनंदन व कौतूक केले.

बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

ताणतणाव व्यवस्थापन व्याख्यान

ताणतणाव मुक्त जीवन, अभ्यासाचे नियोजन, ध्येय व प्रेरणा  हेच विद्यार्थ्यांच्या यशाचे गमक : प्रा. डाॅ. जीवन पवार

धुळे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज इ. १० व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेच्या सचिव मा. स्मिताजी विसपूते अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयाचे मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमूख प्रा. डाॅ. जीवन पवार मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य श्री पी. बी. पाटील उपस्थित होते. 
मार्गदर्शन करतांना डाॅ. जीवन पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत अभ्यास कसा करावा, काय करू नये, ध्येय ठरवले पाहीजे, आयुष्यात रोल मॉडेल समोर ठेवून त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहीजे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रम घेण्याशिवाय पर्याय नाही. प्रामाणिक पणे अभ्यास करून जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय ठरवा व ते गाठण्यासाठी मेहनत घेण्याचा सल्ला सुद्धा डाॅ. साहेबांनी दिला. 
अध्यक्षीय मनोगतातून मा. सौ. स्मिताजी विसपूते यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. जीवनात यशस्वी होऊन आपल्याकडून इतरांनाही प्रेरणा मिळाली पाहीजे. मोठे होऊन आपल्या आईवडिलांचे, गुरूजणांचे व शाळेचे नाव मोठे करावे, असे सांगीतले. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्र विसपूते यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री महेश पाटील यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी व आभार श्री ए. के. पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. योगेंद्र पाटील, श्री एस. आर. पाटील, श्री डी. डी. पवार, श्री एस. बी. भदाणे, श्री विजय देसले, श्रीमती अपर्णा पाटील, श्री तुषार कुलकर्णी, श्री अभिज्ञ पवार, श्री महेश पवार व विलास भामरे यांनी परिश्रम घेतले.

सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर एक युगपुरूष - प्रा. डाॅ. विजय शिरसाठ

Preparing_For_Life

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे येथे आज #महापरिनिर्वाण_दिन साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चाळीसगाव, जि. जळगांव येथील इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. विजय शिरसाठ (M.A., B.Ed., M. Phil., SET, NET, Ph. D.) यांनी डाॅ_बाबासाहेब_आंबेडकर_एक_युगपुरूष या विषयावर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा सोप्या व ओघवत्या भाषेत त्यांनी जवळजवळ एक तास मार्गदर्शन केले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक विचार पटवून देण्यात त्यांना यश मिळाले. 
कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री पी. बी. पाटील व सर्व स्टाप उपस्थित होता. कार्यक्रमाचे संयोजन श्री अविनाश पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.नानासाहेब महेंद्र विसपूते, सचिव मा. सौ. स्मिताजी विसपूते व प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

विज्ञानाचा गुरूवार ऑनलाईन वेबीनार

विसपूते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा गुरूवार या ऑनलाईन वेबीनार चा घेतला लाभ...


धुळे येथील बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) रविनगर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञानाचा गुरूवार या ऑनलाईन वेबीनार चा लाभ घेतला. यावेळी शिकण्याकरिताचे विज्ञान - तर्क करण्याची क्षमता (Science of learning-the reasoning ability) या विषयावर वेबिनार चे आयोजन  करण्यात आले होते.  you tube च्या मदतीने हे लाईव्ह वेबीनार घेण्यात आले. यामध्ये पाणिनी तेलंग यांचे मोलाचे मार्गदर्शन  लाभले. विज्ञान शिक्षक श्री एस. आर. पाटील यांनी वेबीनार सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाविषयी प्राथमिक माहिती दिली. कार्यक्रमासाठी श्री अविनाश पाटील यांचे तंत्रसहाय्य लाभले. 
कार्यक्रमाच्या आयोजना बाबतीत संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्र विसपूते, सचिव मा. सौ. स्मिताजी विसपूते, प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी कौतूक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

प्लास्टिक प्रदुषण : धोके आणि उपाययोजना

विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वसूंधरा मित्र श्री मिलिंद पगारे यांची घेतली  ऑनलाईन भेट. 
प्लास्टिक प्रदूषण : धोके व उपाययोजना या विषयावर केले मार्गदर्शन...

धुळे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत शिक्षण देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सध्या राबविला जात आहे. याअंतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करून त्यांचा अनुभवाचा ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांना करून दिला जातो आहे. Preparing for life हे व्हिजन डोळ्या समोर ठेवून जीवन जगण्यासाठी आवश्यक शिक्षण देण्याचा प्रयत्न संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्र विसपूते यांच्या प्रेरणेतून सुरू आहे. आजच्या ऑनलाईन भेट कार्यक्रमात सेवानिवृत्त मेकॅनिकल इंजीनिअर, वसुंधरा मित्र, किर्लोस्कर पुरस्कार विजेते मा. श्री मिलिंद पगारे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
आज जगासमोर अनेक समस्या ठाण मांडून बसल्या आहेत. विद्यार्थ्यांना या समस्यांची जाणीव करून देऊन यावरील उपाययोजना वेळीच पटवून दिली तर भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या टाळता येऊ शकतात या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक श्री अविनाश पाटील यांनी सांगीतले.
श्री मिलिंद पगारे हे सेवानिवृत्त मेकॅनिकल इंजीनिअर आहेत. परंतू प्रदुषण या विषयावर त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रासह पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, दिल्ली, उत्तराखंड या राज्यातील शालेय विद्यार्थी व इतर कार्यालयात आठशे पेक्षा जास्त प्रबोधन पर कार्यक्रम घेतले आहेत. ते एक उत्तम तंत्रस्नेही वसुंधरा मित्र आहेत. म्हणूनच कोरोना काळापासून त्यांनी ऑनलाईन मार्गदर्शनावर भर दिला. त्यांच्या ज्ञानाचा व  अनुभवाचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने व पर्यावरण जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा, संवादकौशल्य, प्रश्ननिर्मिती कौशल्य वाढण्यासाठी या कार्यक्रमाची खुप मदत झाली. विद्यार्थ्यांना जीवन जगतांना पुस्तकी ज्ञानासोबत शाश्वत शिक्षण सुद्धा किती महत्वाचे आहे हे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेवरून सांगता येईल. एक तासाच्या सत्रात सरांनी पीपीटी च्या सहाय्याने प्लास्टिक पासून कोणकोणते धोके निर्माण होतात, तसेच दैनंदिन जीवनात सर्रास वापरले जाणारे प्लास्टिक किती भयंकर परिणाम घडवू शकते हे पटवून दिले सोबत या प्लास्टिक चा जर सुयोग्य वापर केला तर गंभीर परिणामांचा सामना करावा लागणार नाही हे सुद्धा त्यांनी आजच्या सेशन च्या माध्यमातून पटवून दिले. 
शेवटच्या सत्रात ग्लोबल वॉर्मिग व पर्यावरण या संबंधी विद्यार्थ्यांच्या मनात जे प्रश्न उद्भवले होते. त्याप्रश्नांचे निरसन केले. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी प्लास्टिक प्रदूषण या विषयावर सखोल माहिती मिळाली. आदरणीय पगारे सरांनी मौल्यवान मार्गदर्शन केले त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.नानासाहेब महेंद्र विसपूते, सचिव मा. स्मिताजी विसपूते, प्राचार्य श्री पी. बी. पाटील व सर्व स्टाप यांनी धन्यवाद व्यक्त केले.

📲💻🖥️🎥💻📲
श्री अविनाश काशिनाथ पाटील
८७९६७५९७०२
akpatil979@gmail.com 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...