माहिती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माहिती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०२२

त्रिपूरारी पौर्णिमा

  🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
         ⚜️आजची कथा⚜️
   
     त्रिपुरारी ( कार्तिक ) पौर्णिमा


पौराणिक पार्श्वभूमी

त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून टाकली. शिवपुत्र कार्तिकेयने त्रिपुरासुराचा वध केला.कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले.या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते.तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात.

उत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिवपूजन केले जाते. या दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्यावतार घेतला अशीही धारणा आहे.

कार्तिक पौर्णिमा हा एक बौद्धांचा व हिंदूंचा सण आहे.

बौद्ध धर्म

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्रज्ञचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात.

हिंदू धर्म

कार्तिक महिन्याच्या या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते. या रात्री कार्तिकेयाने त्रिपुरासुराचा वध केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्यानिमित्त या दिवशी कार्तिकेयाचे पूजन केले जाते. केवळ या रात्रीच महिला कार्तिकेयाचे दर्शन घेऊ शकतात, असाही संकेत रूढ आहे. या दिवशी मंदिरांमध्ये दीपोत्सव केला जातो.

कार्तिक पौर्णिमा ही कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
        
➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२

अनंत चतुर्दशी


   🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️

           आजचा दिनविशेष 
 
         🙏अनंत चतुर्दशी🙏


अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला साजरी करतात. महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात.

भाद्रपद शुध्द चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणत असतात. या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात.

आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात.

पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत ब्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला. अशी कथा आहे.

दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन होते. तर त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येते. मात्र, अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणरायाचे विसर्जन का करण्यात येते? हे तुम्हाला माहिती आहे का? अनंत चतुर्दशीला विसर्जन करण्यामागे एक रंजक कथा आहे.

पौराणिक कथा आणि धार्मिक मान्यतेनुसार, ऋषी वेद व्यास यांनी ज्यावेळी संपूर्ण महाभारताची दृश्य आत्मसात केली त्यावळी ते सर्व लिहू शकत नव्हते. त्यानंतर त्यांनी महाभारत लिहिण्यासाठी गणेशजींना सांगितले. गणपती बाप्पाला वेद व्यास यांनी महाभारत सांगण्यास सुरुवात केली आणि गणेशजींनी सलग 10 दिवस ती कथा लिहिली.

महाभारत पूर्ण सांगून झाल्यावर जेव्हा वेद व्यास यांनी आपले डोळे उघडले त्यावेळी गणेशजींच्या शरीराचे तापमान खूपच वाढलेले दिसून आले. एकाच जागेवर दहा दिवस बसून राहिल्याने आणि सातत्याने लिहित राहिल्याने तापमान वाढले. त्यानंतर त्यांच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी गणरायाला शीतलता मिळावी यासाठी गणरायाच्या शरीराव मातीचा लेप लावण्यात आला. त्यानंतर सरोवरात डुबकी घेतली. कथेनुसार, ज्या दिवशी गणेशजींनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली तो दिवस भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षाची चतुर्थीचा दिवस होता. तर ज्यावेळी महाभारत पूर्ण लिहून झाले तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता. तेव्हापासून गणेश चतुर्थीला गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते आणि दहाव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केले जाते.

सर्वांना अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! गणपती बाप्पा तुम्हाला सुख समृद्धी आणि यश प्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया...

➖➖➖➖➖➖➖➖➖
श्री अविनाश काशिनाथ पाटील 
उपशिक्षक बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०२२

रक्षाबंधन


  🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
         🎀 रक्षाबंधन 🎀

रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन!
   या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे.
   स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणार्‍या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे, की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे.

 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:'
 
    जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे मनूने म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टीकोनाऐवजी पवित्र दृष्टीने, आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे.
    रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण! बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. राखी बांधणार्‍या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. मात्र आज तिची मस्करी करणार्‍या आणि जनावरांप्रमाणे वागणूक देणार्‍या भावांना समजावून सांगण्याची गरज आहे.
   बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्‍या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्‍या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो.
   भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून मदनाला भस्म केले होते. त्याप्रमाणे तिसर्‍या डोळ्याच्या रूपात बहिण भावाला आजार, वासना इत्यादी भस्म करण्याची सूचना करते.
   बहिण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही, तर सर्व स्त्री जातीच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते, तसेच बाह्य शत्रूपासून आणि अंतर्विकारांपासून आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो ही भावना पण त्यात असते. देवासुर संग्रामात देवांच्या विजयासाठी इंद्राणीने हिम्मत हरवलेल्या इंद्राच्या हातात राखी बांधली होती, असे वेदात सां‍गितले आहे. अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती आणि आपल्या संरक्षणासाठी राणी कर्मवतीने हुमायूँला राखी पाठवली होती. या राखीमध्ये सुरक्षिततेची भावना होती.
    रक्षाबंधन हे सुरक्षिततेचे स्मारक आहे. राखी बांधल्याने एक बंधन आपल्यावर असते. हे बंधन असते ध्येयच्युत न होण्याचे. या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची आठवण राखी देते. राखी बांधताना बहिण भावाचे बंधन किंवा ध्येयाचे रक्षण करण्याची सूचना करते.
'' स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा'' असा महान संदेश देणार्‍या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवले आहे. अशा सुंदर प्रेम आणि भावबंधनाच्या सणाला कुटूंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही. सख्या भावाकडे बहिणीची दृष्टी निर्मळ आणि प्रेमपूर्ण राहील. 
    समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. सख्ख्या बहिणीने सख्ख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्क एखाद्या बहिणीने दुसर्‍या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते. सारांश, रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे, रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे, रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर! भाऊ आणि बहिण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देन आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

गुरुवार, २८ जुलै, २०२२

दिप अमावस्या

दिप आमावस्या  ,चातुर्मासातील पहिली अमावास्या म्हणून आषाढ अमावास्येकडे पाहिले जाते.अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला'दीपपूजन' केले जाते. आषाढ अमावास्येला 'दीपान्वित अमावास्या' असेही म्हणतात.कोणत्याही शुभ कार्याची, कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने केली जाते. सत्कर्माचा साक्षीदार दिवा होत असतो. अगदी.प्राचीन काळापासून दररोज सायंकाळी तिन्ही सांजेला देवासमोर तेलाचा वा तुपाचा दिवा लावण्याची आपली संस्कृती आहे. दिव्याची ज्योत ही अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे. तर, दिवा मांगल्याचे प्रतिक आहे. अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला 'दीपपूजन' केले जाते...

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...