शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

प्लास्टिक प्रदुषण : धोके आणि उपाययोजना

विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वसूंधरा मित्र श्री मिलिंद पगारे यांची घेतली  ऑनलाईन भेट. 
प्लास्टिक प्रदूषण : धोके व उपाययोजना या विषयावर केले मार्गदर्शन...

धुळे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत शिक्षण देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सध्या राबविला जात आहे. याअंतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करून त्यांचा अनुभवाचा ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांना करून दिला जातो आहे. Preparing for life हे व्हिजन डोळ्या समोर ठेवून जीवन जगण्यासाठी आवश्यक शिक्षण देण्याचा प्रयत्न संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्र विसपूते यांच्या प्रेरणेतून सुरू आहे. आजच्या ऑनलाईन भेट कार्यक्रमात सेवानिवृत्त मेकॅनिकल इंजीनिअर, वसुंधरा मित्र, किर्लोस्कर पुरस्कार विजेते मा. श्री मिलिंद पगारे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
आज जगासमोर अनेक समस्या ठाण मांडून बसल्या आहेत. विद्यार्थ्यांना या समस्यांची जाणीव करून देऊन यावरील उपाययोजना वेळीच पटवून दिली तर भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या टाळता येऊ शकतात या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक श्री अविनाश पाटील यांनी सांगीतले.
श्री मिलिंद पगारे हे सेवानिवृत्त मेकॅनिकल इंजीनिअर आहेत. परंतू प्रदुषण या विषयावर त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रासह पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, दिल्ली, उत्तराखंड या राज्यातील शालेय विद्यार्थी व इतर कार्यालयात आठशे पेक्षा जास्त प्रबोधन पर कार्यक्रम घेतले आहेत. ते एक उत्तम तंत्रस्नेही वसुंधरा मित्र आहेत. म्हणूनच कोरोना काळापासून त्यांनी ऑनलाईन मार्गदर्शनावर भर दिला. त्यांच्या ज्ञानाचा व  अनुभवाचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने व पर्यावरण जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा, संवादकौशल्य, प्रश्ननिर्मिती कौशल्य वाढण्यासाठी या कार्यक्रमाची खुप मदत झाली. विद्यार्थ्यांना जीवन जगतांना पुस्तकी ज्ञानासोबत शाश्वत शिक्षण सुद्धा किती महत्वाचे आहे हे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेवरून सांगता येईल. एक तासाच्या सत्रात सरांनी पीपीटी च्या सहाय्याने प्लास्टिक पासून कोणकोणते धोके निर्माण होतात, तसेच दैनंदिन जीवनात सर्रास वापरले जाणारे प्लास्टिक किती भयंकर परिणाम घडवू शकते हे पटवून दिले सोबत या प्लास्टिक चा जर सुयोग्य वापर केला तर गंभीर परिणामांचा सामना करावा लागणार नाही हे सुद्धा त्यांनी आजच्या सेशन च्या माध्यमातून पटवून दिले. 
शेवटच्या सत्रात ग्लोबल वॉर्मिग व पर्यावरण या संबंधी विद्यार्थ्यांच्या मनात जे प्रश्न उद्भवले होते. त्याप्रश्नांचे निरसन केले. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी प्लास्टिक प्रदूषण या विषयावर सखोल माहिती मिळाली. आदरणीय पगारे सरांनी मौल्यवान मार्गदर्शन केले त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.नानासाहेब महेंद्र विसपूते, सचिव मा. स्मिताजी विसपूते, प्राचार्य श्री पी. बी. पाटील व सर्व स्टाप यांनी धन्यवाद व्यक्त केले.

📲💻🖥️🎥💻📲
श्री अविनाश काशिनाथ पाटील
८७९६७५९७०२
akpatil979@gmail.com 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे

२ टिप्पण्या:

  1. खूप सुंदर सर असा कार्यक्रम केवळ विध्यार्थ्यांन साठीच नव्हे तर समाजाच्या प्रत्येक घटका साठी आवश्यक आहे.आपली सुरुवात उत्कृष्ट आहे.आधुनिक समाज घडवण्यासाठी तुमचे प्रयत्न अभिनंदनीय आहेत

    उत्तर द्याहटवा

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...