बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

ताणतणाव व्यवस्थापन व्याख्यान

ताणतणाव मुक्त जीवन, अभ्यासाचे नियोजन, ध्येय व प्रेरणा  हेच विद्यार्थ्यांच्या यशाचे गमक : प्रा. डाॅ. जीवन पवार

धुळे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज इ. १० व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेच्या सचिव मा. स्मिताजी विसपूते अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयाचे मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमूख प्रा. डाॅ. जीवन पवार मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य श्री पी. बी. पाटील उपस्थित होते. 
मार्गदर्शन करतांना डाॅ. जीवन पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत अभ्यास कसा करावा, काय करू नये, ध्येय ठरवले पाहीजे, आयुष्यात रोल मॉडेल समोर ठेवून त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहीजे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रम घेण्याशिवाय पर्याय नाही. प्रामाणिक पणे अभ्यास करून जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय ठरवा व ते गाठण्यासाठी मेहनत घेण्याचा सल्ला सुद्धा डाॅ. साहेबांनी दिला. 
अध्यक्षीय मनोगतातून मा. सौ. स्मिताजी विसपूते यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. जीवनात यशस्वी होऊन आपल्याकडून इतरांनाही प्रेरणा मिळाली पाहीजे. मोठे होऊन आपल्या आईवडिलांचे, गुरूजणांचे व शाळेचे नाव मोठे करावे, असे सांगीतले. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्र विसपूते यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री महेश पाटील यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी व आभार श्री ए. के. पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. योगेंद्र पाटील, श्री एस. आर. पाटील, श्री डी. डी. पवार, श्री एस. बी. भदाणे, श्री विजय देसले, श्रीमती अपर्णा पाटील, श्री तुषार कुलकर्णी, श्री अभिज्ञ पवार, श्री महेश पवार व विलास भामरे यांनी परिश्रम घेतले.

1 टिप्पणी:

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...