शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

*✧═════•❁❀❁•═════✧*
⚜Ⓜ 🇹 🇸⚜ Ⓜ 🇹🇸⚜
             *✧═════•❁❀❁•═════✧*
 🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
⚜️मकरसंक्रांत पौराणिक कथा⚜️ 

श्रीमद्भगवत तसेच देवी पुराणानुसार शनी महाराजाचे त्यांच्याच वडिलांशी वैर होते. कारण सूर्य देवाने त्याची आई छायाला त्याच्या दुसऱ्या बायकोचा संज्ञाचा मुलगा यमराजाशी भेदभाव करताना पहिले होते. या गोष्टीने नाराज होऊन सूर्य देवाने संज्ञा आणि त्यांचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते. म्हणून शनी व छाया यांनी सूर्य देवाला कुष्ठरोग्याचा शाप दिला होता. 

यमराज आपल्या वडिलांना सूर्यदेवाला कुष्ठरोगाने पछाडलेले बघून दुःखी झाले. यमराजने वडिलांना कुष्ठरोगापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी कठोर तपस्या केली. परंतु सूर्याने रागात येऊन शनी महाराजाच्या घरी असलेली कुंभ राशी जिला शनी देवाची राशी मानले जाते ती जाळून टाकली. त्यामुळे शनी व त्याची आई छाया हिला हाल-अपेष्टा सहन करावी लागली. यमराजने आपली सावत्र आई आणि भाऊ शनी ला त्रासात असलेले पाहून त्यांच्या कल्याणासाठी वडिलांना सूर्य देवाला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सूर्याने सांगितले की, शनी जेव्हा दुसऱ्या घरात म्हणजे मकर राशीत येईल तेव्हा शनीचे घर धन-धान्याने भरपूर असेल. यावर शनी महाराज प्रसन्न झाले व त्यांनी सांगितले की, मकर संक्रांतीला जे कोणी सूर्यदेवाची पूजा करतील त्यांना शनी दशेचे त्रास सहन करावे लागणार नाहीत.

🔆मकरसंक्रांतीचे सामाजिक व वैज्ञानिक कारण🔆

मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृती मध्ये बदलांना सुरुवात होते. थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते. भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील सण-उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे. मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका, ऊस, शेंगदाणे, उडीद घरी घेऊन येतात. शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले.
           
        ⚜️ मकरसंक्रांत ⚜️ 
                 
सूर्याचे मार्गक्रमण दक्षिणायनातून उत्तरायनात होण्याच्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी आप्तस्वकीयांना तीळगुळ वाटून ‘तीळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. इंग्रजी महिन्यानुसार सध्या १४ जानेवारीस येते. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.*

पौष महिन्यात येणारा एकमेव सण म्हणजे संक्रांत. हा सण धार्मिक दृष्टीने आणि सामाजिक दृष्टीने महत्वाचा असला तरी खंर म्हणजे, संक्रांत हा निसर्गाचा सण आहे. संक्रमण म्हणजे ओलांडून जाणे, अर्थात मकर राशीत सुर्याचा प्रवेश होणे याला मकर संक्रमण म्हणतात. संक्रातीच्या दिवसापासून सुर्य उत्तरेकडे जाऊ लागतो. सुर्याच्या या गमणास उत्तरायण असे म्हणतात. दिवस मोठा होतो रात्र लहान होते. सुर्यप्रकाश अधिक मिळु लागतो या घटनेचा मानवी जीवनावर परीणाम होतो.

या सणाला धार्मिक महज्ञ्ल्त्;वही आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांत देवीने संकरसुराचा नाश केला अशी कथा पुराणात आली आहे. या देवीला अनेक हात आहेत एखाद्या वहनावर बसुन, वस्त्रालंकाराने सुशोभित होऊन, हातात विविध शस्त्रे घेऊन ती एका दिशेकडून दुसऱया  दिशेकडे जात असते असे वर्णन पंचागात दिलेले आहे. संक्रांतीचे वर्णन प्रत्येक वर्षी निरनिराळे असते. विशेष म्हणजे संक्रांत देवीस ज्या गोष्टी आवडतात. त्या गोष्टींची महागाई होते असे मानतात यावरूनच आपल्याकडे संक्रांत वळणे म्हणजे संकट येणे हा वाकप्रचार आलेला आहे या दिवशी सुवासिनी स्त्रिया पाच घट आणि पाच बोळकी आणुन त्यांना चुना व कुंकू लावतात. त्यात गहु, कापुस, हळकुंडे वगैरे घालुन त्याचे वाण देतात या मातीच्या घटानां सुघट किंवा सुगड असे म्हणतात. त्या दिवशी हळदी-कुंकूही केले जाते.
तिळगुळाबरोबर एखादी संसार उपयोगी वस्तु सुवासिनींना देतात. संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी म्हणतात. त्या दिवशी मुगाच्या डाळीची खिचडी, तिळाच्या भाकरी, लोणी देवाला समर्पण करून नतंर सेवन कराव्यात असे सांगितले आहे. संक्रांतीच्या सणाला सामाजिक दृष्टयाही विशेषमहत्व आहे. यादिवशी मनातील व्देषभाव नष्ट करून परस्परात प्रेम निर्माण करावयाचे असते. जीवनात गोडी निर्माण करायची असते. तिळातील स्नेह आणि गुळातील गोडी आमच्या जीवनात यावी म्हणून तर आपण तिळगुळ देतो. मित्रमित्रांनी एकमेकांना तिळगुळ द्यावाच, परंतु ज्याच्याशी आपले भांडण झाले असेल त्यालाही तिळगुळ द्यावा. भांडण मिटवुन मैत्रिचा हात पुढे करावा. केवळ हिंदु धर्मातील बांधवांना तिळगुळ न देता अन्य धर्मियांनासुध्दा तो द्यावा. आपला देश विविध धर्म, पंथ यांनी भरलेला आहे. पण तरीही आपण भारतीय आहोत. भारत आपला देश आहे. या निमित्ताने निर्माण झालेली बंधुता, प्रेम हे देशाच्या हिताची ठरेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...