रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

चंद्रशेखर आझाद

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक  समूह 🖥️
     ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬          संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                                           ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  
    🔥🔫💥🇮🇳👨‍🦰🇮🇳💥🔫🔥                                                                        क्रांतिकारक 
           चंद्रशेखर आझाद 


      जन्म : २३ जुलै, १९०६
(भाबरा, झाबुआ, अलिराजपूर, मध्यप्रदेश)
     विरमरण : २७फेब्रुवारी,१९३१
      (अल्फ्रेड पार्क, अलाहाबाद)
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: कीर्ति किसान पार्टी,  
            नवजवान किसान सभा
धर्म: हिंदू
वडील: पंडित सिताराम तिवारी
आई: जगरानी देवी

          चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १९०६ रोजी सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'सिताराम तिवारी' व आईचे नाव 'जगरानी देवी' असे होते. त्यांचे पुर्वज कानपूर जवळच्या बादरका गावात राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले.
            वाराणसीला संस्कृतचे अध्ययन करीत असताना वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतके लहान होते की, त्यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या हातांना हातकडीच बसेना. ब्रिटीश न्यायाने या छोट्या मुलाला १२ फटक्यांची आमानुष शिक्षा दिली. फटक्यांनी आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला, व अहिंसेवरील त्यांचा विश्वास पार उडाला. मनाने ते क्रांतिकारक बनले. काशीत श्रीप्रणवेश मुखर्जींनी त्यांना क्रांतिची दीक्षा दिली. सन १९२१ सालापासून १९३२ सालापर्यंत ज्या ज्या क्रांतिकारी चळवळी, प्रयोग, योजना, क्रांतिकारी पक्षाने योजल्या, त्यात चंद्रशेखर आझाद हे आघाडीवर होते.
       साँडर्सचा बळी घेतल्यावर चंद्रशेखर आझाद हे जे निसटले ते निरनिराळे वेष पालटून भूमिगत स्थितीत उदासी महंताचा चेला बनले होते. कारण की, या महंताजवळ पुष्कळ द्रव्य होते. ते द्रव्य आझाद यांनाच मिळणार होते, परंतु आझादांना त्या मठातील मनसोक्त वागणे पसंत पडले नाही म्हणून त्यांनी तो नाद सोडून दिला. पुढे ते झाशी येथे राहू लागले. तेथे मोटार चालवणे व पिस्तूलाने गोळी मारणे, अचूक नेम साधणे याचे शिक्षण त्यांनी घेतले.
         काकोरी कटापासून त्यांच्या डोक्यावर फाशीची तलवार लटकत होती. तरी त्या खटल्यातील क्रांतिकारकांना सोडविण्याच्या योजनेत ते गर्क होते. वर वर पाहणार्‍याला त्यांनी क्रांतिकार्य सोडले आहे असे वाटे.
         गांधी आयर्वीन करार होत असताना त्यांनी गांधीजींना असा संदेश पाठविला की, आपल्या वजनाने भगतसिंग वगैरेंची सुटका आपण करावी, असे झाल्यास हिंदुस्थानच्या राजकारणाला निराळे वळण लागेल, परंतू गांधींनी तो संदेश फेटाळून लावला. तरी आझादांनी क्रांतिकारकांना सोडविण्याचे जोरदार प्रयत्न चालू ठेवले.”मी जीवंतपणी ब्रिटीश सरकारच्या हाती कधीच पडणार नाही’,ही आझादांची प्रतिज्ञा होती. २७ फेब्रुवारी १९३१ ला ते शेवटचे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये शिरले. पो. अधिक्षक नॉट बॉबरने तेथे येता क्षणी आझादांवर गोळी झाडली. ती त्यांच्या मांडीस लागली. पण त्याच वेळी आझादांनी नॉट बॉबरवर गोळी झाडून त्याचा हातच निकामी केला. मग ते सरपटत एका जांभळीच्या झाडाआड गेले. हिंदी शिपायांना ओरडून ते म्हणाले,” अरे शिपाई भाईंओ, तुम लोग मेरे ऊपर गोलियाँ क्यों बरस रहे हो ? मै तो तुम्हारी आजादी के लिये लढ रहा हूँ ! कुछ समझो तो सही !” इतर लोकांना ते म्हणाले,” इधर मत आओ ! गोलियाँ चल रही है ! मारे जाओगे ! वंदे मातरम् ! वंदे मातरम् !”
        आपल्या पिस्तुलात शेवटची गोळी राहिली, तेव्हा ते त्यांनी आपल्या मस्तकाला टेकले आणि चाप ओढला ! तत्क्षणी त्यांचे प्राण त्यांचा नश्वर देह सोडून पंचतत्वात विलीन झाले.
       नॉट बॉबर उद्गारला, ” असे सच्चे निशाणबाज मी फार थोडे पाहिले आहेत !”
       पोलिसांनी त्यांच्या निष्प्राण देहात संगिनी खुपसून ते मेल्याची खात्री करून घेतली. त्यांचा मृतदेह आल्फ्रेड पार्कमध्ये एक दरोडेखोर मारला गेला, असा अपप्रचार करीत, तसाच जाळून टाकायचा सरकारने प्रयत्न केला. पण पंडीत मालवीय, सौ. कमला नेहरू यांनी तो उधळून लावून त्यांच्या अर्धवट जळलेल्या देहाची चिता विझवून पुन्हा त्यांचा अंत्यविधी हिंदू परंपरेप्रमाणे केला. २८ फेब्रुवारीला त्यांची प्रचंड अंत्ययात्रा काढून एका विराट सभेत सर्व पुढार्‍यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
     भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले.
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳     
 
🌹🙏 विनम्र अभिवादन 🙏🌷         
       
          ♾♾♾ ♾♾♾
         संदर्भ ~ WikipediA                                             ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन : श्री अविनाश काशिनाथ पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                      
   ➿➿➿➿➿➿➿➿➿
    🚩🤽🏻‍♂⛓️🇮🇳👨🏻🇮🇳⛓️✍🚩

          स्वातंत्र्यवीर विनायक
            दामोदर सावरकर  
   
                                                                  
 (महान क्रांतिकारक, उत्कट देशभक्त, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक) 
         जन्म : २८ मे १८८३
(भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत)
      मृत्यू : २६ फेब्रुवारी १९६६
      (दादर, मुंबई, महाराष्ट्र,भारत)
चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना : अभिनव भारत,
अखिल भारतीय हिंदू महासभा
प्रमुख स्मारके : मुंबई, पुणे, बिहार, दिल्ली, अंदमान
धर्म : हिंदू
प्रभाव : शिवाजी महाराज, जोसेफ मॅझिनी
वडील : दामोदर विनायक सावरकर
आई : राधाबाई दामोदर सावरकर 
पत्नी : यमुनाबाई विनायक सावरकर (माई)
अपत्ये : प्रभाकर, प्रभा, शालिनी, विश्वास
भाषाशुद्धीचा आग्रह धरून सावरकरांनी मराठी भाषेला ४५ शब्द दिले आहेत.
           विनायक दामोदर सावरकर  हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.
⚜️ चरित्र
           सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या शहरात झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव सावरकर हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई, ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील इ.स. १८९९ च्या प्लेगला बळी पडले.

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली. मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.
                       राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले.  इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली . श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.
                    इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले. राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली (इ.स. १९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११). मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.
           अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. अंदमानमध्ये असतांना सावरकरांनी Essentials of Hindutva हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्‍नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली. (दिनांक ६ जानेवारी १९२४).
                 अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्‍न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.

♨️ सावरकरांचे जात्युच्छेदन
              अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६). हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्‍नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य (१९३० नोव्हें ) जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. स्वकीयांतील जातीयतेवरपण निर्भीड टीका केली. त्यांनी रत्‍नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले. जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले. या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.

🐄 गाय हा एक उपयुक्त पशू
             ‘मायासृष्टीत जोवर मनुष्य आहे आणि गाय व बैल हे पशू आहेत, तोवर माणसाने त्याच्याहून सर्व गुणांत हीन असलेल्या पशूस देव मानणे म्हणजे मनुष्यास पशूहून नीच मानण्यासारखे आहे. गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशू असलेल्या गाईस देव मानावे; मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये. ..कोणत्याही गोष्टीत ती धर्म आहे असे पोथीत सांगितले आहे, म्हणूनच तसे डोळे मिटून मानण्याची पोथीनिष्ठ आंधळी भावना आता झपाट्याने मावळत आहे आणि ती मावळत जावी हेच आता मनुष्याच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे.
                  एक वेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होता कामा नये. यास्तव गाय वा बैल हे पशू आपल्या कृषिप्रधान देशात मनुष्यहितास अत्यंत उपकारक आहेत इतकेच सिद्ध करून, व त्या पशूचा उपयोग राष्ट्रास ज्या प्रमाणात, नि ज्या प्रकारे होईल, त्या प्रमाणात नि त्या प्रकारे पशू म्हणूनच जोपासना करू म्हणाल, तरच ते राष्ट्राच्या निर्भेळ हिताचे होईल. पण त्या हेतूने गाय ही देव आहे कारण पोथीत तिची पूजा करणे हा धर्म आहे, इत्यादी थापा माराल, तर त्यावर जरी राष्ट्राने यापुढेही विश्वास ठेवला नि गोरक्षण थोडेसे अधिक झाले, तरीही त्या पोथीजात प्रवृत्तीला उत्तेजन देण्याचे जे अपकार्य त्यायोगे करावे लागते त्याचे परिणाम राष्ट्राची शतपटीने अधिक हानी करील.(संपादित लेख – ‘गाय- एक उपयुक्त पशू’: वि. दा. सावरकर )

⛓️ सात बेड्या
           सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जातिव्यवस्थेवर हल्ला केला. अनुवंशात जातीचे मूळ आहे. त्या मुळावरच सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश हा आचरटपणा आहे, जर ब्राह्मणाच्या घरी 'ढ' जन्मला तर त्याला 'ढ'च म्हटले पाहिजे आणि जर शूद्रांत 'ज्ञ' निघाला तर त्याला 'ज्ञ'च म्हटले पाहिजे, मग त्याचा बाप, आजा अथवा पणजा 'ढ' असो की 'ज्ञ' असो. सावरकरांनी हल्ला करताना 'आपले हिंदुत्वाचे समर्थक दुखावतील' वगैरे फाजील भीती न बाळगता त्यांचे प्रबोधन केले. सावरकर म्हणतात की 'आज आमच्या हिंदू समाजात पोथीत तसे लिहिले आहे ते सोडून इतर कोणत्याही लक्षणाने सहज विभिन्नत्व विविध जातींमध्ये दिसून येत नाही. जात मानणे ही मूळ चूक! त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात निघाली आणि ब्रह्मदेवाच्या बेंबीपासून अमुक जात निघाली इत्यादी उपरत्या अक्षरशः खऱ्या मानून त्या त्या जातींच्या अंगी ते गुण उपजतच आहेत हे मानणे ही घोडचूक!! अन् तो गुण त्या जातीच्या संतानात प्रकट झाला नसला तरी तो आहेच समजून तशी उच्च-नीचता त्या संतानास भोगावयास लावणे ही पहाड चूक.
         जातिव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातिभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे १) वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुद्धा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर} २) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७) बेटीबंदी. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे. सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.

🛕 हिंदू महासभेचे कार्य
          रत्‍नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. इ.स. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.
                        एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.
                   सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.

🗽 सावरकर स्मारके
                     पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृह क्रमांक १ मधील १७व्या क्रमांकाच्या खोलीत सावरकरांचे इ.स. १९०२ ते १९०५ या काळात वास्तव्य होते. सावरकर जयंतीच्या दिवशी ही एरवी बंद असलेली खोली जनतेला पाहण्यासाठी खुली केली जाते.
सावरकरांना अंदमानमधील तुरुंगातल्या ज्या कोठडीत ठेवले होते, ती खोली सावरकरांचे स्मारक म्हणून सांभाळली जाते. पोर्ट ब्लेयरमधील स्वातंत्र्यज्योती स्तंभावर सावरकरांची वचने कोरलेल्या धातूच्या पट्ट्या बसवल्या होत्या. ही वचने ताम्रपट्ट्यांवर कोरण्याचे काम मुंबईच्या गणेश एन्ग्रेव्हरने केले होते. तत्कालीन पेट्रोलमंत्री मणिशंकर अय्यर यांनी ९ ऑगस्ट २००४ रोजी ती वचने हटवली. २०१६ साली ती वचने पुन्हा प्रस्थापित करण्याचे काम चालू आहे.
पुण्यात कर्वे रोडवर एक, एस.एम जोशी पुलानजीक एक आणि शिवराम म्हात्रे रोडवर एक अशी सावरकरांची तीन स्मारके आहेत.
गोसावीवाडा (भगूर) येथील स्मारक
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क (मुंबई)
स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क (मुंबई)
🏤 संस्था
          सावरकरांचे कार्य जनेतुपुढे आणणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. त्यांतील काही संस्थांची ही नावे :-

नादब्रह्म (चिंचवड-पुणे) : डॉ.रवींद्र घांगुर्डे,डॉ.वंदना घांगुर्डे आणि सावनी रवींद्र - यांनी चालविलेली ही संस्था सावरकरांच्या वाङ्‌मयावर आधारित अनेक कार्यक्रम रंगमंचावर सादर करते.
वीर सावरकर फाउंडेशन (कलकता)
वीर सावरकर मित्र मंडळ ()
वीर सावरकर स्मृती केंद्र (बडोदा)
समग्र सावरकर वाङ्मय प्रकाशन समिती
सावरकर दर्शन प्रतिष्ठान (मुंबई)
सावरकर रुग्ण सेवा मंडळ (लातूर)
स्वातंत्र्यवीर सावरकर गणेश मंडळ 
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ (निगडी-पुणे जिल्हा)
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (डोंबिवली-ठाणे जिल्हा)
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (मुंबई). ही संस्था सावरकर साहित्य संमेलने भरविते.
✍️ मृत्युपत्र
                       ‘माझे प्रेत शक्यतो विद्युत-चितेवरच जाळण्यात यावे. जुन्या पद्धतीप्रमाणे ते शक्यतो माणसांनी खांद्यावरून नेऊ नये, किंवा कोणत्याही प्राण्याच्या गाडीमधून नेऊ नये, तर ते यांत्रिक शववाहिकेतूनच विद्युत – स्मशानात नेले जावे.. माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपली दुकाने किंवा व्यवसाय बंद ठेवू नयेत. कारण त्याने समाजाला फार त्रास होतो. घरोघरीच्या संसारासाठी दैनिक आवश्यकतेच्या वस्तू न मिळाल्याने अडथळा होतो. माझ्या निधनानिमित्त कोणीही सुतक, विटाळ, किंवा ज्यायोगे कुटुंबीयांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होतो अश्या पिंडदानासारख्या कोणत्याही जुन्या रूढी पाळू नयेत. त्या पिंडांना काकस्पर्श होईतो वाट पाहत बसणे इत्यादी कालबाह्य गोष्टी पाळू नयेत.’ वगैरे.

📚 ग्रंथ आणि पुस्तके
           वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.'सागरा प्राण तळमळला' या कवितेला २००९ साली १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ४१ पुस्तकांचा संच बाजारात उपलब्ध आहे, त्यातील पुस्तके अशी :

अखंड सावधान असावे
१८५७ चे स्वातंत्र्यसमर
अंदमानच्या अंधेरीतून
अंधश्रद्धा भाग १
अंधश्रद्धा भाग २
संगीत उत्तरक्रिया
संगीत उ:शाप
ऐतिहासिक निवेदने
काळे पाणी
क्रांतिघोष
गरमा गरम चिवडा
गांधी आणि गोंधळ
जात्युच्छेदक निबंध
जोसेफ मॅझिनी
तेजस्वी तारे
नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन
प्राचीन अर्वाचीन महिला
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
भाषा शुद्धी
महाकाव्य कमला
महाकाव्य गोमांतक
माझी जन्मठेप
माझ्या आठवणी - नाशिक
माझ्या आठवणी - पूर्वपीठिका
माझ्या आठवणी - भगूर
मोपल्यांचे बंड
रणशिंग
लंडनची बातमीपत्रे
विविध भाषणे
विविध लेख
विज्ञाननिष्ठ निबंध
शत्रूच्या शिबिरात
संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष
सावरकरांची पत्रे
सावरकरांच्या कविता
स्फुट लेख
हिंदुत्व
हिंदुत्वाचे पंचप्राण
हिंदुपदपादशाही
हिंदुराष्ट्र दर्शन
क्ष - किरणें

📕 इतिहासविषयावरील पुस्तके
            १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाद्वारे, (इ.स. १८५७च्या युद्धाचा 'पहिले स्वातंत्र्यसमर' असा उल्लेख करून तो लढा त्यांनी पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्यलढ्यास जोडला)
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
हिंदुपदपादशाही
📙 कथा
सावरकरांच्या गोष्टी भाग - १
सावरकरांच्या गोष्टी भाग - २
📚 कादंबऱ्या
काळेपाणी
मोपल्यांचे बंड अर्थात्‌ मला काय त्याचे -मल्हार प्रॉडक्शन्सने या कादंबरीची ऑडियो आवृत्ती काढली आहे.

सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला. सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, कीलक राष्ट, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्तिवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.

वि. दा. सावरकर हे मुंबई येथे इ.स. १९३८ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

चाफेकरांचा फटका
१८ एप्रिल १८९८ रोजी दामोदर चाफेकर फासावर गेले. त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांची टिळकांशी भेट घडवून आणली गेली. टिळकांनी चाफेकरांना भगवद्‌गीतेची एक प्रत दिली, ती हातात धरूनच दामोदर फासावर गेले. त्या रात्री विनायक दामोदर चाफेकर कितीतेरी वेळ रडत होते. त्यांनंतर सावरकरांनी चाफेकरांचा फटका नावाची काव्यकृती रचली. त्यातील दोन ओळी अशा :-

भक्ष्य रँड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे॥

📜 पुरस्कार
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात. उदा.
                     ’निनाद’ तर्फे दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर ध्येयवादी पुरस्कार
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे *स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार, विज्ञान पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार
वीर सावरकर फाउंडेशनचा वीर सावरकर पुरस्कार
टिळकनगर (डोंबिवली) शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावरकर अभ्यास मंडळाचे वीर सावरकर सेवा पुरस्कार
✍️ सावरकरांवर लिहिलेली पुस्तके
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेली पुस्तके आणि त्याचे लेखक/प्रकाशक खालीलप्रमाणे:

अत्रे, प्रभाकर १९८५. वसा वादळाचा | स्नेहल प्रकाशन, पुणे
अंदूरकर, व्यं.गो. १९७०. शत्रूच्या गोटात सावरकर । सुरस ग्रंथमाला, सोलापूर
अधिकारी, गोपाळ गोविंद १९३७. बॅ. सावरकर यांचे चरित्र | महाराष्ट्र प्रकाशन संस्था, मुंबई
ओगले, अनंत | पहिला हिंदुहृदयसम्राट
आचार्य अत्रे, मालशे, स.गं.(संपादक) १९८३. क्रांतिकारकांचे कुलपुरुष सावरकर | परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
आठवले, रा.म. १९३८. बॅ. विनायक दामोदर सावरकर
आफळे, गोविंदस्वामी (लेखक व प्रकाशक) १९६७. सावरकर गाथा
उत्पात, वा.ना., सावरकर - एक धगधगते यज्ञकुंड
उपाध्ये, संजय २००२. विनायक विजय . चंद्रकला प्रकाशन, पुणे
ओगले, अनंत शंकर : होय ! मी सावरकर बोलतोय (नाटक)
करंदीकर, डॉ. विद्याधर : कवी-नाटककार सावरकर
करंदीकर, शि.ल. १९६६. असे होते वीर सावरकर । सीताबाई करंदीकर, पुणे
करंदीकर, सीताबाई १९४३. सावरकर-चरित्र (कथन) | सीताबाई करंदीकर, पुणे
१९४७. सावरकरांचे सहकारी | गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
करंदीकर, विद्याधर (लेखक, जानेवारी, २०१६) : कवी, नाटककार सावरकर
कऱ्हाडे, शंकर १९८३. गोष्टीरूप सावरकर , विजय प्रकाशन, नागपूर
कानिटकर, सचिन. माझे सावरकर
किर्लोस्कर, मुकुंदराव (संपादक) १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी जीवनावरील अलौकिक विशेषांक | सावरकर दर्शन प्रतिष्ठान, पुणे
कीर, धनंजय १९५०. सावरकर ॲन्ड हिज टाइम्स
कुळकर्णी, श्यामकांत २०००. गाथा थोर क्रांतिभास्कराची, विजय प्रकाशन, नागपूर
केळकर, भा.कृ. १९५२. सावरकर-दर्शन व्यक्ति नि विचार, गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
खाडिलकर, नीळकंठ १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रॅक्टिकल सोशॅलिझम, दैनिक नवाकाळ प्रकाशन, मुंबई
खांबेटे, द.पां. (अनुवाद), १९७२. स्वातंत्र्यवीर सावरकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
गद्रे, अनुराधा अ. २००५. स्वातंत्र्यवीर सावरकर, मनोरमा प्रकाशन, मुंबई
गोखले, द.न. १९८९. स्वातंत्र्यवीर सावरकर : एक रहस्य, मौज प्रकाशन गृह, मुंबई
गोखले, मो.शी. १९४०. वीर सावरकर
गोखले, विद्याधर २००५. झंझावात, मनोरमा प्रकाशन, मुंबई
गोखले, श्री.पु. १९६९. अशी गर्जली वीरवाणी, लोकमान्य प्रकाशन, पुणे
१९८३. सावरकरांशी सुखसंवाद, मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
गोडसे, गोपाळ १९६९. जय मृत्युंजय (स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील कविता), केसरी प्रकाशन, पुणे
गोडबोले, अ.मा. १९९७. क्रांतदर्शी सावरकर, साहित्यसेवा प्रकाशन, औरंगाबाद
गोविंदमित्र १९५७. स्वातंत्र्यवीर श्री. विनायक दामोदर सावरकर यांचे काव्यमय चरित्र | गं.वि.परचुरे, कल्याण
घाणेकर, ऋचा २००३. स्वातंत्र्यवीर सावरकर, महाजन ब्रदर्स, पुणे
चौगुले, सरोज : क्रान्तिवीर: सावरकर: अन्यरूपकाणि च : सावरकर, मदनलाल धिंग्रा वगैरे नावांच्या एकूण चार संस्कृत नाटिका
जोगळेकर, ज.द. १९८३. स्वातंत्र्यवीर सावरकर वादळी जीवन | उत्कर्ष प्रकाशन, पुणे
जोगळेकर, ज.द. १९८३. पुनरुत्थान | पंडित बखले, मुंबई
जोशी, विष्णू श्रीधर १९८५. क्रांतिकल्लोळ | मनोरमा प्रकाशन, मुंबई
१९९२. अखेर उजाडलं, पण देश रक्तबंबाळ । मनोरमा प्रकाशन, मुंबई
१९९२, झुंज सावरकरांची । मनोरमा प्रकाशन, मुंबई
ताटके, अरविंद १९७३. युगप्रवर्तक सावरकर । स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
दुगल, न.दि. १९८३. देशप्रेमा... तुझे नाव सावरकर । अजब पुस्तकालय, कोल्हापूर
देशपांडे, बालशंकर १९५८. क्रांतिकारकांचे मुकुटमणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
देशपांडे, भास्कर गंगाधर १९७४. क्रांतिसूर्य सावरकर, अजय प्रकाशन, औरंगाबाद
देसाई, हरिश्चंद्र त्र्यंबक १९८३. शतपैलू सावरकर । प्रबोधन, मुंबई
नातू, र.वि. १९९७. समग्र सावरकर खंड १० , पृष्ठे ६००० ची संदर्भसूची, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
पळसुले गजानन बाळकृष्ण-वैनायकम-( संस्कृत महाकाव्य)
परांजपे कृ.भा.. शत जन्म शोधिताना
पेठे, मंगला कृ. १९८४. सावरकर गौरव गान
फडके, य.दि. १९८४. शोध सावरकरांचा, श्रीविद्या प्रकाशन, पुणे
बखले पंडित (संपादक) १९६०. मृत्युंजय सावरकर
बर्वे, शंकर नारायण १९४७. स्वातंत्र्यवीर (बॅ.सावरकर यांच्या चरित्रातील काही पद्यमय प्रसंग), विष्णू सि. चितळे, पुणे
बोडस, आनंद ज. २००७. सावरकरांची तिसरी जन्मठेप, मनोरमा प्रकाशन, मुंबई
भट, रा.स. १९७२. सावरकरांचे जीवनदर्शन , वोरा अँड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि., मुंबई
भागवत, अ.गो. (अनुवाद) १९४७. बॅरिस्टर सावरकर चरित्र अ.गो. भागवत, बडोदा
भालेराव, सुधाकर सोवनी १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंथन , प्रमोद प्रकाशन, नागपूर
भावे, पु.भा. १९८२. सावरकर नावाची ज्योत, सन पब्लिकेशन्स, पुणे
भिडे, ग.र. १९४२. सावरकरांची सूत्रे, कोल्हापूर
भिडे, गोविंद १९७३. सागरा प्राण तळमळलाः स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्दरूप
 (वर्ष?). जीवनदर्शन । जोशी ब्रदर्स बुकसेलर्स अँड पब्लिशर्स, पुणे
भोपे, रघुनाथ गणेश १९३८. स्वातंत्र्यवीर बॅ.विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनचरित्र । भोपे प्रकाशन, अहमदनगर
मालशे, सखाराम गंगाधर. सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता
मेहरूणकर, प्रभाकर १९९३. तेजोनिधी सावरकर । मोरया प्रकाशन, डोंबिवली
मोडक, डॉ. अशोक २०१५. वीर सावरकर - विवेकानंदांचे वारसदार
मोने, प्रभाकर २००४. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य । परचुरे प्रकाशन
मोरे शेषराव. (सावरकरांसंबंधी) सत्य आणि विपर्यास; सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद (राजहंस प्रकाशन); सावरकरांचे समाजकारण; सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग (राजहंस प्रकाशन)
रानडे, सदाशिव राजाराम १९२४. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर ह्यांचे संक्षिप्त चरित्र । लोकमान्य छापखाना, मुंबई
रायकर, गजानन १९६६. महापुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र
वर्तक, श्रीधर रघुनाथ १९७०. क्रांतदर्शी सावरकर, संग्राहक काळ, प्रकाशन, पुणे
वऱ्हाडपांडे, व.कृ. (संपादक), १९८३. गरुडझेप (सावरकर गौरवग्रंथ), विजय प्रकाशन, नागपूर
वाळिंबे, वि.स. १९६७. स्वातंत्र्यवीर सावरकर, केसरी प्रकाशन, पुणे
१९८३. सावरकर , मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
शिंदे, वि.म. १९९९. आठवणींची बकुळ फुले | नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
शिदोरे, प्रभाकर गोविंद १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर | न.पा. साने, मुंबई
साटम, दौलत मुरारी १९७०. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर | साटम प्रकाशन, मुंबई
साठे, डॉ. शुभा. त्या तिघी (कादंबरी)
सावरकर, बाळाराव. सावरकरांचे चारखंडी चरित्र, पुनःप्रकाशन - २६ फेब्रुवारी २०२०. खंडांची नावे १. २. हिंदू महासभा पर्व (१९३७ ते १९४०), ३. ४.सावरकर,  बाळाराव (संकलक)                            १९६९. वीर सावरकर आणि गांधीजी | वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७२. हिंदुसमाज संरक्षक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (रत्‍नागिरी पर्व) | वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७५. स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु महासभापर्व भाग-१ (जून १९३७ ते डिसेंबर १९४०) । वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७६. स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड हिंदुस्थान लढा पर्व
१९९७. योगी योद्धा वि.दा.सावरकर । वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
(जानेवारी १९४१ ते १५ ऑगस्ट १९४७) वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
सावरकर, विश्वास विनायक १९८६. आठवणी अंगाराच्या (स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणी) । स्नेहल प्रकाशन, पुणे
सावरकर, शां.शि. १९९२. अथांग (श्री. वि.दा. सावरकर आत्मचरित्र प्रारंभ) | ?, मुंबई
सावरकरांची तिसरी जन्मठेप (डॉ. आनंद जयराम बोडस)
सोनपाटकी, मुकुंद १९८०. दर्यापार | पुरंदरे प्रकाशन, पुणे
सोवनी, म.वि. १९६७. मृत्युंजय सावरकरः चित्रमय चरित्र | चित्रसाधन प्रकाशन, पुणे
हर्षे, द.स. १९६६. सावरकर-दर्शन | द.स. हर्षे प्रकाशन, सातारा
क्षीरसागर, प्रकाश १९८९. तेजोमय दाहक ते । स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर,
श्रीवास्तव, हरीन्द्र, खोत, अनुराधा (अनुवाद) १९९६. एक झंझावात-शत्रूच्या शिबिरात । सावरकर स्मृती केंद्र, बडोदे
१९५७. आत्मवृत्त । व्हीनस प्रकाशन, पुणे
१९५८. सावरकर विविध दर्शन । व्हीनस प्रकाशन, पुणे
१९६२, सावरकर यांच्या आठवणी । अधिकारी प्रकाशन, पुणे
१९६९, महायोगी वीर सावरकर, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७३, सावरकर आत्मचरित्र (पूर्वपीठिका) ।, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
१९७२, सावरकर आत्मचरित्र (भगूर) | मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
१९७८, स्वातंत्र्यवीर सावरकर विषयक वक्ते नि लेखक यांची सूची | स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
सावरकरांवरील मृ्त्युलेख (आचार्य अत्रे)
ज्वालामुखीचे अग्निनृत्य - वि.श्री. जोशी
शोध सावरकरांचा - य.दि. फडके
क्रांतिकारकांचे कुलपुरुष - आचार्य अत्रे
सावरकरांचे समाजकार्य सत्य आणि विपर्यास - शेषराव मोरे
सावरकरांचा बुद्धिवाद एक चिकित्सक अभ्यास - शेषराव मोरे
रत्‍नागिरी पर्व - आचार्य बाळाराव सावरकर
हिंदुसभा पर्व (खंड १ व २) - आचार्य बाळाराव सावरकर
सांगता पर्व - आचार्य बाळाराव सावरकर
सावरकर चरित्र - धनंजय कीर
सावरकर नावाची ज्योत - पु.भा. भावे
सावरकर चरित्र - शि.ल. करंदीकर
दर्यापार - मुकुंद सोनपाटकी
गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी – शेषराव मोरे
🎭🎞️ सावरकरांवरील मराठी चित्रपट, नाटके, कार्यक्रम
अनादि मी अनंत मी (सावरकरांच्या जीवनावर प्रतीकात्मक सांगीतिक नाट्याविष्कार : लेखक-दिग्दर्शक माधव खाडिलकर, संगीत आशा खाडिलकर, कलावंत ओंकार-प्राजक्ता खाडिलकर आणि इतर अनेकजण.)
मी विनायक दामोदर सावरकर (एकपात्री, सादरकर्ते : योगेश सोमण)
यशोयुतां वंदे (संकल्पन/दिग्दर्शन- सारंग कुलकर्णी. संहिता - दीपा सातव सपकाळ)
व्हॉट अबाऊट सावरकर? (चित्रपट, दिग्दर्शक - रूपेश केतकर आणि नितीन गावडे, २०१५)
स्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट, निर्माते सुधीर फडके)
 
            🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
        ♾♾♾ ♾♾♾
       स्त्रोत ~ WikipediA                                                                                                                                                                                                                                                                 ➖➖➖➖➖➖➖➖➖         📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

संत एकनाथ महाराज

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
     🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
            ▬ ❚❂❚❂❚ ▬
संकलन ~ श्री अविनाश पाटील बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
   ➿➿➿➿➿➿➿➿➿
   🚩🚩🚩🚩👳‍♀🚩🚩🚩🚩

                संतश्रेष्ठ
       श्री एकनाथ महाराज


          जन्म : १५३३
     (पैठण, औरंगाबाद    
        जिल्हा,महाराष्ट्र)

    *मृत्यू : इ.स. १५९९*

गुरु : जनार्दन स्वामी

भाषा : मराठी

वडील : सूर्यनारायण

आई : रुक्मिणी

पत्नी : गिरिजा

अपत्ये : गोदावरी, गंगा व हरी

संप्रदाय: वारकरी

समाधी/निर्वाण: इ. स. १५९९, फाल्गुन व ६, कृष्णकमल तीर्थात जाऊन आत्मा ब्रम्हांडात विलीन

वाडःमय:
१. एकनाथी भागवत
२. भावार्थ रामायण
३. ज्ञानेश्वरी शुद्धीकर
४. रुख्मिणी स्वयंवर 

💁🏻‍♂ जन्म  व बालपण
संत एकनाथांचा जन्म एका खानदानी देशस्थ ब्राम्हणाच्या घरात इ.सन १५३३ पैठणात झाला. त्यांच्या आईचे नाव रूक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. परंतु एकनाथांच्या दुर्दैवानेच ते तान्हे मूल असताना त्यांचे आईवडील देवाघरी निघून गेले, तेव्हा त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला. चक्रपाणी यांचे वडील म्हणजेच एकनाथांचे पणजोबा संत भानुदास हे विठ्ठल भक्त होत. एकनाथ लहानपणापासून तल्लख बुद्धीचे होते. वयाचे सहाव्या वर्षी त्यांच्या आजोबांनी त्यांची मुंज करून त्यांना शिक्षण देण्यासाठी एका विद्वान पंडितांची नेमणूक केली. त्या पंडिताकडून त्यांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अभ्यास केला. कारण ईश्वरभक्तीचे वेड त्यांना उपजतच होते. बालवयातच ते गुरूच्या शोधात निघाले आणि दौलताबादेच्या किल्ल्यात असलेल्या जनार्दन स्वामींच्या म्हणजेच आपल्या गुरूसमोर हात जोडून उभे राहिले. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठीचा.

🕉 एकनाथ गुरुगृही

जनार्दन स्वामींनी समोर पाहिले तर एक बारा वर्षाचा मुलगा हात जोडून उभा असलेला दिसला. तेव्हा ते म्हणाले, “बाळा, तू पैठणहून माझ्याकडे आला आहेस. इतकच नव्हे तर तुझी सर्व माहिती मला माझे गुरू श्री दत्तात्रेय यांच्या दॄष्टान्ताकरवी समजली आहे. तुला मी माझे शिष्यत्व बहाल करतो.” आपल्या गुरूचे शब्द ऎकताक्षणीच एकनाथांना मोठा आनंद झाला. त्यांनी जनार्दनस्वामींना लोटांगण घातले. नकळत त्यांच्या वाणीतून शब्द बाहेर पडले.

अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता । चरणी जगन्नाथा चित्त ठेविले ।
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथांचा नाथ जनार्दन ।
एका जनार्दनी एकपणे उभा । चैतन्याची शोभा शोभतसे ।
त्यांनी जनार्दन स्वामींची मनोभावे सेवा केली.

त्यानंतर नाथ दौलताबादेच्या किल्ल्याशेजारीच असलेल्या शुलभंजन डोंगरावर तपश्चर्या करण्यासाठी बसले होते. त्या ठिकाणी एका नागाने आपला फणा नाथांच्या डोक्यावर छ्त्राप्रमाणे धरला, तरी नाथांना त्याचा मागमूस लागला नाही. कारण ते एकाग्रतेने परमेश्वराचे चिंतन करीत होते. याच सुमारास कर्मधर्मसंयोगाने जनार्दन स्वामी नाथांची तपश्चर्या पाहण्यास आले असता त्यांना हे दृष्य दिसले. त्यांनी नागाला जाण्याची आज्ञा केली. स्वामींची आज्ञा प्रमाण मानून नाग त्वरीत निघून गेला. स्वामींनी एकनाथांना ध्यानातून जागे करून ते त्यांना म्हणाले, “एकनाथा, तुझ्या तपश्चर्येची आज जवळ-जवळ सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. परमेश्वराने तुझ्या मस्तकावर वरदहस्त ठेवला असून आता तू घरी जावस ही माझी इच्छा आहे. एवढंच नव्हे तर लग्न करून गृहस्थाश्रम पत्कर. यातच तुझे कल्याण आहे. कारण संसारात राहूनच तू परमार्थ साधणार आहेस. भोळ्याभाबडया लोकांच अज्ञान दूर करणार आहेस. त्यासाठी तुझ्या हातून अमूल्य अशी ग्रंथरचना निर्माण होईल.”

एकनाथांना झालेले दत्त दर्शन

भगवतोत्तम, शांतीब्रह्म असलेल्या संत एकनाथांना दत्तात्रेयांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते. या अप्रतिम दर्शनाचे वर्णन नाथांनी आपल्या एका आरतीमधून केले होते. 

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा…. 
समाधि न ये ध्याना… हरली भवचिंता।। 

नाथ आपल्याला आवर्जून सांगत आहेत की, 
`श्रीदत्तात्रेय हे त्रिगुणात्मक आहेत. उत्पत्ती-स्थिती-लय या तीनही तत्त्वांचे मीलन या दैवतात झालेले आहे. ब्रह्मा-विष्णू-महेश या दैवताच्या ठिकाणी एकवटलेले आहेत.
दत्तात्रेयांचे वर्णन करणे चारही वेदांना शक्य झाले नाही. समाधी अवस्थेपर्यत पोहोचलेल्या योगी पुरुषांना, ऋषी-मुनींना, देवांनासुद्धा श्रीदत्तात्रेयांचे मूळ रूप आणि स्वरूप प्रत्यक्ष अनुभवता आले नाही. ध्यानावस्थेमध्येसुद्धा दत्तात्रेयांचे दर्शन घडत नाही की, त्यांचे रूप नजरेत साठवता येत नाही. तो तर त्रैलोक्याचा राणा आहे. शब्दातीत आहे. 

( ॐ श्री सदगुरु देवाय नमः )

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त…. जन्म-मरणाचा पुरलासे अंत।।

श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना नाथ महाराज म्हणातात, `ब्रह्मा म्हणजे रज, विष्णू म्हणजे सत्त्व आणि शिव म्हणजे तम. अशा तीन मुख्य देवांचा हा त्रिगुणातीत अवतार आहे. जे हवे ते प्रेमाने देणारा श्रीदत्त प्रापंचिक भक्तांच्या सर्व प्रकारच्या चिंता मिटवणारा परमेश्वर आहे. म्हणून तर माझे हे प्राणप्रिय दैवत माझ्या आत आणि बाहेर तेज फाकून आहे’. 
नाथ आवर्जून एक गोष्ट सांगतात की, `श्रीदत्तात्रेय हे माझ्या संपूर्ण अस्तित्वाला व्यापून आहेत. 

परा-पश्यती-मध्यमा-वैखरी या चारही वाणी श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करायला असमर्थ आहेत. त्या चारही वाणी अक्षरशः माघारी फिरल्या आहेत. परावाणीलासुद्धा दत्तात्रेयांचे वर्णन करणे जमले नाही. अशा या ब्रह्मांडव्यापी दत्तात्रेयांचे अवतार-रहस्य सामान्य वृत्तीच्या अभागी लोकांना कसे काय कळणार? ज्यांना श्रीदत्तात्रेयांचे अवतार-रहस्य कळेल, ते भव्य स्वरूप सततच्या चिंतनाचा विषय होईल, त्या भाग्यवान भक्तांच्या जन्म-मरणाच्या फेर्या निश्चित संपुष्टात येतील.

दत्त येऊनिया उभा ठाकला… जन्ममरणाचा फेरा चुकविला।।

नाथ समाधी लावून बसले होते. मुखात `दिगंबरा दिगंबरा। श्रीपाद वल्लभ दिगंबरा’।।
हा सिद्धमंत्र अक्षरशः घुमत होता. ध्यानावस्थेत असताना नाथांच्यासमोर भगवान श्रीदत्तात्रेय आपल्या अतिभव्य मूळ रूपात प्रकट झाले. नाथांना तर परमानंद झाला. सगुण साकार झालेल्या श्रीदत्तात्रेयांना नाथांन साष्टांग नमस्कार घातला. नाथांची ही अपूर्व भक्ती पाहूनच श्रीदत्तात्रेय नाथांवर प्रसन्न झाले होते. भगवान दत्तात्रेयांनी नाथांना अलगद उठवले आणि आपल्या छातीशी घट्ट धरले. आशीर्वाद दिला. नाथांच्या लक्षात आले की, आपली उपासना पूर्ण झाली. आपला जन्म-मरणाचा प्रवास पूर्णपणे संपुष्टात आला. प्रत्यक्ष दत्तगुरूंनी चौर्याऐंशी लक्ष योनींचा दुर्धर प्रवास एका क्षणात संपवला. नाथ भारावून गेले आणि पुन्हा पुन्हा वंदन करू लागले.

`दत्त दत्त’ ऐसें लागलें ध्यान। हारपले मन झाले उन्मन।
 `मी-तू’पणाची झाली बोळवण। एका जनार्दनीं श्रीदत्तध्यान।।

नाथांच्या मुखात `दत्त दत्त’ असे पवित्र नाम घुमू लागले. नाथांचे अवघे भान हारपले. 
सर्वत्र दत्तात्रेय व्यापून आहेत याचे भान नाथांना आले. मी-तूं पणाची भावना पूर्णपणे विलयाला गेली. आपले सद्गुरु हेच दत्तात्रेय आहेत याची सुखद जाणीव झाली. नाथ दत्तध्यानात पूर्ण विरघळून गेले. दत्तात्रेयांनी नाथांना अद्वैती अनुभव दिला होता.

गुरूंच्या आदेशानुसार एकनाथ पैठण मुक्कामी येऊन आजोबा-आजीला भेटले. तेव्हा आजोबा-आजीला परम संतोष वाटून त्यांनी लवकरच एकनाथाचे लग्न विजापूरचे देशस्थ ब्राम्हण सावकाराचे मुलीशी म्हणजेच गिरिजाबाईंशी लावून दिले. गिरिजाबाईंचा स्वभावही एकनाथांसारखा शांत व परोपकारी वृत्तीचा होता.

अशा रीतीने एकनाथांनी जरी संसार सुरू केला तरीसुद्धा ते नेहमी ईश्वरमग्नच असत. त्यांचा पारमार्थिक कार्यक्रम शिस्तबद्ध होता. सूर्योदयापूर्वी उठून परमेश्वराचे चिंतन करून मगच गोदावरी नदीत जाऊन स्नान करणे, स्नान केल्यानंतर घरी येऊन गीतेचे पारायण करणे, त्यानंतर दुपारी जेवण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणे आणि रात्री जनसमुदायासमोर देवळात कीर्तन करणे अशी होती त्यांची सर्वसाधारण दिनचर्या.

हातीं कमंडलु दंड । दत्तमूर्ति ती अखंड ॥१॥
ध्यान लागों माझें मना । विनवितो गुरुराणा ॥२॥
अंगी चर्चिली विभूति । ह्रदयीं वसे क्षमा शांति ॥३॥
तोचि चित्तांत आठव । गुरुराज दत्त देव ॥४॥
एकाजनार्दनी दत्त । तद्रूप हें झालें चित्त ॥५॥

नाथांचा भक्तांना उपदेश 
नाथांनी लोकांना फार मोलाचा उपदेश केला तो असा की, अनुताप झाल्याशिवाय देवाचे नाव मुखी येत नाही. जेथे अर्थ आहे तेथे परमार्थ नाही. हरीनाम एकच शाश्वत असून शूद्रांनाही ते घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे. जे देवाला शरण जातात त्यांना मृत्यूची भीती नसते. भक्ती हे मूळ आहे तर वैराग्य हे घर आहे आणि संतांची भेट होणे हे परमभाग्य होय. नाथांची शिकवण होती सर्व धर्म, पंथ, जाती-उपजाती सारख्याच आहेत. सर्व मानवजातीकडे सहिष्णू वृत्तीने पाहणे त्यांना अभिप्रेत होते. नाथांचे गुरू जनार्दन स्वामी दत्तभक्त असल्यामुळे नाथही दत्तभक्तीमध्ये रममाण झाले होते.

एक प्रसंग असा घडला, रणरणत्या उन्हात एका हरिजन स्त्रीचे मूल उन्हाच्या चटक्यांनी पाय पोळ्ल्याने थयथय नाचत होते. नाथांनी क्षणाचाही विचार न करता त्याला कडेवर घेऊन शांत केले. त्यांच्या विचाराप्रमाणेच त्यांचा आचार होता.

नाथांनाच स्वप्नात दृष्टांत झाला होता की, आळंदी येथील समाधिस्थ ज्ञानदेवांच्या गळ्याभोवती अजानवृक्षाच्या मुळ्यांचा विळखा पडला होता. नाथांनी प्रत्यक्षात तेथे जाऊन त्या मूळ्या कापून ज्ञानदेवांचा गळा मोकळा केला होता. त्यांनीच ज्ञानेश्वरी ग्रंथाची शुध्द प्रत तयार केली होती. नाथांच्या घरचा श्रीखंडया म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचाच (भगवान कृष्णाचाच) अवतार होता. नाथांच्या हातून ग्रंथनिर्मिती व्हावी म्हणूनच हा जणू त्यांच्या सेवेत आला होता.

श्रीमद्भागवतातील भक्तिप्रधान अशा अकराव्या स्कंधावर त्यांनी प्राकृत भाषेत एकनाथी भागवत हा ग्रंथ लिहिला आहे. ह्या त्यांच्या ग्रंथास जनमानसात खूपच कीर्ती लाभली. नाथांनी काशी, रामेश्वरादी तीर्थयात्रा केल्या होत्या. रामेश्वरक्षेत्री त्यांनी तहानेने तळमळणाऱ्या गाढवाला गंगाजल पाजल्याची कथा सर्वश्रृत आहे. त्यासंबंधात ते म्हणाले होते, “सर्व प्राणिमात्रांचे ठिकाणी परमेश्वर भरला आहे. तहानेने तडफडणाऱ्या गाढवाला पाणी पाजणे हेही धर्मपालनच आहे.”

पैठण या तीर्थक्षेत्री नाथांच्या कीर्तनाला खूप मोठा जनसमुदाय लोटत असे. पंढरपूर या क्षेत्री देखील त्यांची कीर्तने वारकरी पंथात खूपच प्रिय ठरली होती.

नाथांची वाणी जेवढी रसाळ तेवढीच त्यांची लेखणीही ओघवती होती. कृष्णभक्ती आणि आत्मबोधाचे वर्णन असलेला ‘रूक्मिणी स्वयंवर’ हा ग्रंथही त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतो. त्याच बरोबर ते बहुजन समाजात वावरत होते. त्यामुळेच वासुदेव, वाघ्या, मुरळी, कोल्हाटीण, विंचू, सर्प, दळण, कांडण, जोगवा, गोंधळ, कापडी, पांगळा अशा अनेक नित्य जीवनातील प्रकारांवर नाथांनी भारूड रूपात केलेले कवित्व खूप काही अध्यात्म सांगून जाते. भारूडांप्रमाणेच नाथांच्या अभंगातून तत्कालीन समाजाचे चित्रण उभे राहते. त्यांच्या आरत्या तर घरोघरी पोचल्या आहेत. ते अभंग अगर आरतीच्या शेवटी लिहीत, ‘एका जनार्दनी’ म्हणजेच आपल्याबरोबर ते आपल्या गुरूंचेही नाव जोडीत.

नाथ त्यांच्या घरी राहणाऱ्या श्रीखंडयाला म्हणाले होते “फाल्गुन वद्य षष्ठी हा माझ्या गुरूजींचा जन्मदिवस आणि निर्वाणदिवस आहे. तेव्हा आमचेही निर्वाण याचदिवशी होणार आहे कारण माझे कार्य आता संपलेले आहे” आणि खरोखरच इ.स.१५९९ मध्ये नाथांनी गोदावरी नदीत आत्मसमर्पण केले. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठी. नाथ सहासष्ठ वर्षे जगले.

नाथांनी बहुजन समाजाला अध्यात्माचे ज्ञान व्हावे म्हणून प्राकृत भाषेत विपुल लिखाण केले. सर्वांभूती समभाव दाखविला मानवनिर्मित कृत्रिम भेदांना त्यांनी छेद दिला आणि मुख्य म्हणजे संसारात राहूनही परमार्थ साधता येतो हे स्वानुभवाने दाखवून दिले. अशा या थोर संताला आदरांजली वाहण्यासाठी आजही हजारो लोक फाल्गुन वद्यषष्ठीला पैठण मुक्कामी जातात आणि दर्शन, भजन-पूजन-प्रवचन व कीर्तन करून नाथांच्या नावाचा गजर करतात. 

नाथांचा शेवटचा उपदेश आहे :

एका जनार्दनी विनंती । येऊनी मनुष्य देह प्रती ॥
करोनिया भगवद्भक्ती । निजात्मप्राप्ती साधावी ॥ 

गुरु परंपरा
आदी नारायण
   |
ब्रम्हदेव
   |
अत्री
   |
दत्तात्रेय 
   |
जनार्दन स्वामी
   |
एकनाथ महाराज


👀 संत साहित्यिकांच्या नजरेतून श्री एकनाथ महाराज
एखाद्या घराण्यात तेजस्वी व्यक्ती जन्माला यायची असेल तर त्या घराण्याची तेजस्वताही तशीच असावी लागते. सत्शील कुटुंबामध्येच सत्शील व्यक्ती जन्म घेतात. कारल्याच्या वेलाला काहीही केलं तरी द्राक्ष येऊ शकत नाहीत. तसं कोणत्याही असामान्य व्यक्तीच्या इतिहासाचा अभ्यास केला तर त्या व्यक्तीचं घराणं हे असामान्यच होतं असं आढळतं. संत एकनाथ महाराजांचा जन्म ज्या कुलकर्णी घराण्यात झाल ते ही याला अपवाद नव्हतं. भास्करपंत कुलकर्णी हे या घराण्याचे मूळ पुरुष. सावित्रीबाई या त्यांच्या सात्विक स्वभावाच्या पत्नीनं ज्या भानुदास महाराजांना जन्म दिला. तेच संत एकनाथांचे पणजोबा. चक्रपाणि आणि सरस्वती या त्यांच्या मुलगा व सुनेला एकनाथ महाराजांचे आजोबा आणि आजी व्हायचं भाग्य लाभलं. सूर्यनारायण या चक्रपाणिंच्या मुलाला रुक्मिणी व गोदावरी अशा दोन बायका  होत्या. पैकी रुक्मिणी ही एकनाथांची आई.

एकनाथांचा जन्म आणि बालपण याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. पण त्यांचा जन्म साधारणपणे शके १४५० ते १४५५ (म्हणजे इ. स. १५३३-३४) या दरम्यान झाला असावा असा अभ्यासकांचा आणि इतिहास संशोधकांचा कयास आहे. पैठण हे नाथांचं जन्मगाव. त्याकाळी पैठणला प्रतिष्ठान म्हणत. 

त्यांच्या बालपणीच आई वडिल परलोकी गेले. त्यावेळी बिचाऱ्या लहानग्या नाथाला आपले आई वडिल वारले म्हणजे काय, हे देखिल कळत नव्हतं. आई वडिलांना पारख्या झालेल्या एकनाथाचं संगोपन आजोबा चक्रपाणी आणि आजी सरस्वती यांनी तळहातावरच्या फोडासारखं जपून केलं. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी आपल्याकडे एक म्हण आहे. त्याची प्रचिती एकनाथानं अगदी लहानपणापासून आणून दिली. अगदीच लहान असतानाचा काळ सोडला तर एकनाथ इतर मुलांसारखा खेळण्यात कधीच रमला नाही. तो दगडाचा देव मांडून त्याला पानं फुलं वहात असे. इतकंच नाही तर फळी खांद्यावर वीणा म्हणून घेऊन देवापुढे भजन करण्यात तल्लीन होऊन जाई. आजोबा पूजा करू लागले की, पुजेचं साहित्य गोळा करून देई. बारीकसारीक गोष्टींमधून एकनाथाची चौकसबुद्धी, तीव्र स्मरणशक्ती आणि उत्कृष्ठ अशी पाठांतर क्षमता यांची प्रचिती येत असे. लहानवयापासून परमार्थाकडे ओढा असलेला एकनाथ पुराण कीर्तन एकाग्रतेनं आणि उत्सुकतेनं ऐकत असे. त्याची तैलबुद्धी पाहून पुराणिक बुवांना देखील आश्चर्य वाटत असे. आजोबांचा लाडका ‘ऐक्या’ वेळ मिळताच रामनामामध्ये दंग होऊन जाई. पण हे सारं करत असतांना सहाव्या वर्षी मौजीबंधन झालेला हा तेजस्वी मुलगा जेंव्हा आजुबाजुच्या घटनांचं निरिक्षण करी तेंव्हा त्याला खूप गोष्टींचं आश्चर्य वाटे आणि राग ही येत असे. त्या पैठणात भक्तांची सतत ये-जा चालू असे. भजन, कीर्तन, प्रवचन यांचा हलकल्लोळ चालू असे. अनेक साधुसंत, बैरागी, योगी, तपस्वी तिथे वावरत असत. परंतु एकनाथाला या साऱ्यांमध्ये कोरडेपणा, ढोंगीपणा, अंधश्रद्धा यांचीच रेलचेल दिसत असे. 

समाजाला मार्गदर्शन करायचं असेल तर मार्गदर्शकाला ईश्वराची प्रचिती असायला हवी. नाहीतर ती नुसतीच पोपटपंची व्हायची ही एकनाथांची पक्की धारणा होती. त्यामुळे त्या परमेश्वराची कृपा संपादन करुन घेण्याचा ध्यासच एकनाथानं घेतला. आता त्यासाठी गरज होती तशा समर्थ गुरुची! एकनाथानं त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू केले. एकदा असाच शिवालयात चिंतन - मनन करीत बसला असताना तिथं आलेल्या एका वृद्ध गृहस्थानं एकनाथाला “तुला आत्मज्ञान प्राप्त करुन घ्यायचं असेल तर देवगिरीचे किल्लेदार जनार्दन स्वामी यांचेकडे जा” असं सांगितलं. नाथाच्या आनंदाला पारावार उरला नाही. ईश्वरप्राप्ती आणि नंतर समाजोद्धार या विचारांनी झपाटलेल्या एकनाथानं कशाचाही विचार न करता तडक देवगिरीचा रस्ता धरला. पैठणहून देवगिरी साधारणपणे ५० मैल लांब. पण ७-८ वर्षांचा कोवळा एकनाथ दिवस-रात्र, तहान, भूक या कशाचीही पर्वा न करता हे अंतर पायी तुडवून देवगिरीला पोहोचला.

जनार्दन स्वामींची नजर एकनाथाकडं वळताच ती बालमूर्ती स्वामींना साष्टांग दंडवत घातली झाली. पितृवत मायेनं स्वामींनी एकनाथाला उठवून जवळ घेतलं, त्याची विचारपूस केली. आई-वडिलांवर रुसून हा मुलगा पळून आला असेल असाच साऱ्यांचा समज होता परंतु एकनाथानं “चित्ताला अनुताप झाल्यामुळे” आपण आल्याचं सांगितल्यावर स्वामींनासुद्धा गहिवरुन आलं. एकनाथाची ती मुद्रा आणि बोलणं यांनी जनार्दन स्वामींच्या मनात एकनाथाबद्दल पहिल्या भेटीतच मायेचा झरा निर्माण केला. 

जनार्दनस्वामी हे परम दत्तभक्त. त्यांचा जन्म चाळीसगावचा. रमा व सावित्री या त्यांच्या दोन बायका. देवगिरीच्या परगण्याची जहागिरी त्यांचेकडे होती.जनार्दनस्वामींचा स्वभाव वैशिष्ट्यांमुळे आणि कर्तृत्वामुळेच त्यांना हा मान यवनांचं राज्य असतानाही मिळाला होता. मात्र सत्ता आणि संपत्ती हातात असतानाही जनार्दनस्वामी जीवनाच्या शाश्वत ध्येयाकडे नजर ठेवूनच प्रत्येक क्षण व्यतीत करत असत. भागवताच्या नवव्या अध्यायात :-

दत्तात्रेय शिष्यपरंपरा । सहस्त्रार्जुन यदु दुसरा 
तेणे जनार्दनु तिसरा । शिष्य केला खरा कली युगी ॥४३०॥

असा उल्लेख आहे. त्यावरून त्यांचा आध्यात्मिक अधिकार किती वरचा होता याची कल्पना येते तर अशा अधिकारी गुरुंकडे तशाच तयारीचा शिष्य येवून दाखल झाला होता. चिकाटी, अभ्यासू वृत्ती, चौकसबुद्धी, सदाचार आणि श्रद्धा या गुणपंचकाच्या बळावर एकनाथानं जनार्दन स्वामींना शिष्यत्व द्यायला भागच पाडलं. 

एकनाथाला सद्गुरु सेवेची मुळातच अतिशय आवड. तशी संधी प्राप्त झाल्यामुळे त्याला आता काय करु आणि काय नाही असं होऊन गेलं होतं. परमोच्च ध्येयानं झपाटलेल्या आठ वर्षांच्या या मुलाला सद्गुरुंशिवाय आता दुसरं काहीही सुचत नव्हतं. काही दिवस आपला गुरुंचा दिनक्रम पाहिल्याबरोबर एकनाथानं त्याला अनुसरुन आपला दिनक्रम ठरवला. जनार्दन स्वामी पहाटे उठत तर एकनाथानं त्याही अगोदर उठावं, वाडा झाडून काढावा, सडा घालावा, स्वामींचं स्नानाचं पाणी काढून द्यावं. संध्येची आणि देवपूजेची तयारी करुन ठेवावी, गंध उगाळून ठेवावं, कपडे धुवून आणावेत, पूजा वगैरे झाल्यावर स्वामी बाहेर जायच्या अगोदर त्यांचे जोडे समोर आणून ठेवावेत, जेवणाच्या वेळी वाढायला मदत करावी, रात्री स्वामींचं अंथरुण घालावं, त्यांच्या पायथ्याशी स्वत:चं अंथरुण टाकून स्वत: झोपी जावं, असा दिनक्रम या बालशिष्यानं बांधून घेतला. या गोष्टी तर रोजच्या झाल्या. पण या व्यतिरिक्त प्रसंगानं येणाऱ्या जबाबदाऱ्यांवर देखील एकनाथ झेपावत असे. आपणच गुरुसेवा या नात्यानं सर्वच्या सर्व कामं करावीत असं त्याला वाटत असे. 

मात्र एकीकडे ही सेवा चालू असतानाच दुसरीकडे हा गुणी शिष्य गीता, ज्ञानेश्वरी, ब्रह्मसूत्रे, भागवत, उपनिषदे या ग्रंथांमधलं ज्ञान आत्मसात करत होता. न्याय आणि मीमांसा ही शास्त्रही त्यानं अभ्यासली. पातंजल योगाचा देखील सखोल अभ्यास केला. मनापासून केलेली गुरुसेवा आणि आध्यात्मिक ग्रंथांचा व्यवस्थित अभ्यास यामुळे एकनाथ दिवसेंदिवस सर्वांगीणदृष्ट्या विकसित होत गेला. आध्यात्म आणि गुरुसेवा हे दोन्हीही साधत असताना एकीकडे तो तलवारबाजीही शिकला. जनार्दन स्वामींनी त्याची निष्ठा, हुशारी आणि कर्तव्यदक्षता पाहून त्याला स्वत:च्या कचेरीत न्यायला सुरुवात केल्यानंतर तारुण्यावस्थेत प्रवेश केलेल्या एकनाथानं काही काळातच तिथल्या खटले, तक्रारी, वाटण्या, संरक्षण व्यवस्था, लोकांच्या अर्जाची उत्तरं लिहीणं अशा सर्वच प्रकारच्या कामांमध्ये निपुणता संपादन केली. काही काळातच स्वामींच्या इतक्या जबाबदाऱ्या एकनाथानं उचलल्या की, जनार्दनस्वामींना आपल्या शिष्यराजाचं कौतुक कसं करावं हे ही समजेनासं झालं. 

एकनाथाकडे स्वामींनी हिशोब लिहिण्याचं एक महत्त्वाचं काम दिलेलं होतं. नाथाचा स्वभावच मुळी कशातही हयगय, कुचराई आणि ढिलेपणा खपवून न घेण्याचा असल्यामुळे एके दिवशी हिशेबात आलेल्या अधेलीच्या चुकीमुळे तो अतिशय अस्वस्थ झाला. कुठल्याही परिस्थितीत ही चूक आजच्या आज शोधून काढायची या निर्धारानं तो हिशोब तपासायला बसला. (त्याकाळी चवली, पावली, अधेली अशी नाणी चलनात होती आणि कमालीच्या स्वस्ताईमुळे कमीत कमी किंमतीच्या नाण्याला सुद्धा फार महत्त्वं होतं) होता होता मध्यरात्र उलटून गेली आणि चूक सापडल्या बरोबर “सापडली!” असं म्हणत नाथानं टाळी वाजवली. त्याचबरोबर जनार्दन स्वामी जागे झाले आणि नाथाच्या समोर पडलेल्या चोपड्या पाहून “काय सापडलं रे”? म्हणत उठून बसले. सारा वृत्तांत कळल्यावर कृतार्थतेनं नाथाच्या डोक्यावरुन हात फिरवत स्वामी म्हणाले, “एकोबा असंच मन लावून कृष्णभक्ती केलीस तर अवघं जीवन तेजानं उजळून जाईल.” नाथानं स्वामींचे पाय धरले. खरोखरच किती दिव्य प्रसंग हा!

एकनाथानं आपल्या गुणसंपन्नतेची झलक अजून एका प्रसंगी अशीच दाखवली. गुरुवार हा दत्तभक्तच काय, दत्तस्वरुप असलेल्या जनार्दन स्वामींच्या ध्यानाचा दिवस. त्या दिवशी ते इतर कोणतीच कामं करीत नसत. एकदा ही संधी साधून शत्रूनं गुरुवारीच किल्ल्यावर अचानक हल्ला केला. जनार्दनस्वामी ध्यानस्थ बसलेले. 

एकनाथ रखवालदाराचं काम करत उभा असतानाच दूतानं हल्ल्याची बातमी दिली. क्षणाचाही विलंब न करता एकनाथानं ध्यानस्थ स्वामींना वंदन करून तडक शस्त्रागार गाठलं. स्वामींचं चिलखत अंगावर चढवून, हाती तलवार घेऊन, स्वामींच्या घोड्यावर स्वार होऊन शीघ्रतेनं एकनाथ युद्धभूमीवर हजर झाला. सैन्य आदेशाची वाट पहात होतं. नाथाचा इशारा मिळताच सैन्य शत्रूवर तुटून पडलं. सहज म्हणून तलवारबाजी शिकलेल्या नाथाला आज तिचा प्रत्यक्ष उपयोग करण्याची संधीच जणू चालून आली होती. रणांगणातल्या या वीराचा आवेश आणि रणकौशल्य पाहून शत्रूच्या सैन्याची अक्षरश: पाचावर धारण बसली. 

दिवसेंदिवस नाथाची दृढतर होत चाललेली भक्ती आणि त्याच्या आचरणात दिसून येत असलेले उच्चतम संस्कार पाहून जनार्दनस्वामींनी या साऱ्याला साजेसं फळ नाथाच्या पदरात घालायचं ठरवलं. देवगिरी पासून थोड्या अंतरावर एक टेकडी होती. अतिशय दाट हिरवीगार झाडी, रंगीबेरंगी फुलं आणि सर्वांवर कळस म्हणजे परम रमणीय असं सरोवर यामुळे हा परिसर कोणावरही मोहिनी घालेल असाच होता. या ठिकाणी साक्षात् दत्तात्रयांचा रहिवास होता. जनार्दन स्वामी बऱ्याच वेळा गुरुवारी तिथे जात असत. त्यांच्यात कितीतरी वेळपर्यंत सुखसंवाद चालत असे. अशाच एका गुरुवारी तिथे जाताना स्वामींनी नाथालाही बरोबर घेतलं. स्नानसंध्या झाल्यावर स्वामी ध्यानस्थ बसले. तेवढ्यात तिथे एक मलंग म्हणजे फकीर आला. खरं तर त्या स्थळी पोहोचल्या बरोबर जनार्दन स्वामींनी एकनाथाला सांगून टाकलं होतं की, एका दत्तात्रयांवाचून इथे दुसरं कोणीही येत नाही. परंतु संपूर्ण अंगभर कातडं पांघरलेलं विशाल आणि आरक्त डोळे आणि बरोबर एक कुत्री आणि तिची पिल्लं अशा अवताराला तो फकीर बघितल्यावर तर नाथाच्या डोक्यात तशी शंका देखिल आली नाही. त्या फकिराची आणि जनार्दन स्वामींची दृष्टादृष्ट झाल्याबरोबर स्वामींनी पुढे होऊन त्या फकीराच्या चरणी माथा ठेवला. फकीरानं स्वामींना उठवून दृढ आलिंगन दिलं. दोघांची आत्मसुखाची बोलणी सुरू झाली. एकनाथ आश्चर्य चकित होऊन हे सारं पहात होता. तेवढ्यात त्या फकीरानं जनार्दन स्वामींना एक मातीचं भांड देऊन त्या कुत्रीचं दूध काढून आणायला सांगितलं. स्वामींनीही भांडे भरून दूध काढून आणून त्या फकीराच्या हाती दिलं. फकीरानं झोळीतून शिळ्या भाकरीचे तुकडे काढून त्या दुधात भिजविले आणि तो फकीर व जनार्दनस्वामी असं दोघंही एकाच भांड्यात जेवले. जेवताना जनार्दन स्वामींच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद पाहून एकनाथ चक्रावून गेला. शिस्तीचे आणि स्वच्छतेचे भोक्ते असलेले आपले गुरु अमंगल वेशातल्या त्या फकीराशी एवढी सलगी कशी काय करत आहेत, हे नाथाला उलगडेना. पण तेवढ्यात स्वामींनी सांगितलेली महत्त्वाची गोष्ट आठवली, आणि हा फकीर म्हणजे साक्षात श्रीदत्तात्रयच असणार हे नाथानं ताडलं. तेवढ्यात त्या दोघांचं जेवण झालं आणि स्वामींनी नाथाला ते भांडं (कटोरा) धुवून आणण्यास सांगितलं. नाथान ज्ञानदृष्टीनं विचार करून धुण्यासाठी त्या भांड्यात घातलेलं पाणी घटाघटा पिऊन टाकलं आणि कटोरा स्वच्छ धुवून त्या फकीराच्या हाती दिला आणि क्षणाचाही विलंब न करता साष्टांग नमस्कार घातला. उठून पहातात तो काय, त्या फकीराच्या जागी “तीन शिरे सहा हात” असे साक्षात श्री दत्तात्रय उभे ! नाथांनी भारावलेल्या अवस्थेत पुन्हा नमस्कार घातला आणि श्री दत्तात्रय अंतर्धान पावले ! नाथाला धन्य धन्य वाटलं. साक्षात् दत्तदर्शनाचा महत्त्वाचा टप्पा झाल्यानंतर जनार्दन स्वामींनी एकनाथाला स्वतंत्रपणे काही साधना करायला लावली असा विचार केला. 

या देवगिरी पासून थोड्याच अंतरावर शूलभंजन नावाचा पर्वत आहे. मार्कंडेय ऋषींची ती तपोभूमी अतिशय रमणीय आणि पावन आहे. तिथे मौन धारण करुन एकाग्रतेनं आत्मसाधना कर आणि उद्धरेत आत्मना आत्मानम् या वचनाप्रमाणं स्वत:च कल्याण करून घे. लक्षात ठेव साक्षात्कारप्राप्ती करुन घेऊन मगचं परतायचं. जा बाळ, माझे आशिर्वाद आहेत. 

मोठ्या जड अंत:करणानं त्यांनी नाथाला निरोप दिला. आपल्या परमप्रिय गुरुचं रूप डोळ्यात साठवून घेऊन नाथांना शूलभंजन पर्वताकडे प्रयाण केलं. देवगिरीच्या वायव्येकडे असलेल्या या पर्वताचा परिसर पाहून नाथाला परमानंद झाला. नाथानं तिथे एक पर्णकुटी बांधली. रोज सकाळी लवकर उठून सूर्यकुंडात स्नान करावं आणि ध्यानस्थ व्हावं व त्यातच दिवसातला बहुतेक वेळ खर्च करावा असा दिनक्रम सुरू झाला. श्रीकृष्णाचं ध्यान करताच ध्यानात श्रीकृष्ण प्रगट होई आणि त्याची मानसपूजा करताना नाथाला बाह्य जगाचा पूर्ण विसर पडत असे. वेळ कसा आणि किती गेला याचं भानही उरत नसे. ध्यानातून बाहेर आल्यानंतर मिळतील ती कंदमुळं खायची आणि जगाच्या कल्याणाचं चिंतन करत बसायचं असा कार्यक्रम असे.

परमतत्वाचा साक्षात्कार झाल्यानंतर गुरुंच्या शब्दाप्रमाणे आता माघारी देवगिरीला जायला हरकत नाही असा विचार करुन एकनाथांनी पुन्हा देवगिरी गाठली. जनार्दन स्वामींना नमस्कार करून नाथ समोर उभे राहिले. त्यांच्या मुखकमलाकडे पहाताच ज्ञानी जनार्दन स्वामींनी सर्व काही ओळखलं. त्यांना परमसंतोष झाला. “एकोबा, तुझी आत्मसाधना सफल झाली. आता आपण बरोबरच तीर्थयात्रेला जाऊ असे एकनाथांना प्रेमभरानं म्हणून शुभमुहुर्तावर ते उभयता तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले. साक्षात्कार घडलेला परमात्मा सर्वसामान्य लोकांमध्ये पाहण्यासाठी आणि तीर्थक्षेत्रांच्या पावित्र्याला उजाळा देण्यासाठी खरं तर साक्षात्कारी महात्म्यांचा तीर्थयात्रा असतात.

तीर्थक्षेत्रा मागून तीर्थक्षेत्र करत ते गुरुशिष्य गोदावरी नदीच्या उत्तरेला असलेल्या चंद्रगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या चंद्रावती नामक नगरीत दाखल झाले. या नगरीत चंद्रभट नामाचे सत्वशील व तपस्वी असे सत्पुरुष रहात होते. ते चतु:श्लोकी भागवताचं नेहमी चिंतन करीत असत. त्यांच्याकडे हे गुरुशिष्य मुक्कामास थांबले असतांना स्वामींनी चंद्रभटांना चतु:श्लोकी भागवतावर निरुपण करण्यास सांगितलं. अभ्यासू चंद्रभटांनी केलेलं निरुपण स्वामींना आणि नाथांना खूप आवडलं. परंतु हे निरुपण संस्कृत भाषेत झालं असावं. कारण धर्मग्रंथामधल्या ज्ञानापासून उपेक्षित राहिलेल्या सर्वसामान्य जनतेचा कळवळा असलेल्या जनार्दन स्वामींनी त्यानंतर लगेचच एकनाथांना चतु:श्लोकी भागवतावर मराठीत ओवीबद्ध टीका लिहायला सांगितली. हे चतु:श्लोकी भागवत म्हणजे काय माहित आहे? तर मूळच्या ‘भागवत’ या संस्कृत ग्रंथांच्या द्वितीय स्कंधाच्या नवव्या अध्यायातल्या एकंदर ४३ श्लोकांपैकी क्र. ३२ ते ३५ या केवळ ४ श्लोकांमध्ये आदिनारायणांनी ब्रह्मदेवाला अध्यात्मरहस्य उलगडून सांगितलं आहे. या ४ श्लोकांनाच ‘चतु:श्लोकी भागवत’ असं म्हणतात. 

पुढे ब्रह्मदेवांनी हे अध्यात्मरहस्य नारदांना सांगितलं, नारदांनी ते व्यासांना सांगितलं, व्यासांनी या ४३ श्लोकांचा १२ स्कंधांमध्ये विस्तार केला. व्यासांकडून हा ग्रंथ शुकांनी श्रवण केला आणि शुकांकडून परिक्षीत राजाला ऐकायला मिळाला. व्यासांनी लिहिलेल्या १२ स्कंधाच्या भागवतामधील ११व्या स्कंधावर एकनाथांनी जनार्दन स्वामींच्या आज्ञेवरून टीका लिहीली.

या ग्रंथालाच ‘एकनाथी भागवत’ म्हणतात. ११व्या स्कंधात १३६७ श्लोक आहेत तर नाथांच्या त्यावर लिहिलेल्या भागवतात १८११० ओव्या आहेत. यावरुन एक गोष्ट स्पष्टच दिसते की, नाथांनी ग्रंथ खूपच विस्ताराने लिहिलेला आहे. पैकी चतु:श्लोकी भागवत असलेल्या अध्यायात १०३६ ओव्या आहेत. १००व्या स्कंधात श्रीकृष्णाचं संपूर्ण चरित्र आलेलं आहे. तरीदेखील एकनाथांनी टीका लिहायला ११वा स्कंधच निवडला. कारण या स्कंधात श्रीकृष्णानं सांगितलेलं वेदांताचं निरुपण आहे. ११व्या स्कंधात ३१ अध्याय आहेत. आपल्या गुरुंच्या आज्ञेवरून एकनाथांनी ही टीकारुपी ग्रंथराज निर्माण केला. या बाबतीत कितीतरी गोष्टी अचंबित करणाऱ्या आहेत. एकतर हा ग्रंथ लिहितेवेळी एकनाथाचं वय केवळ १० वर्षांच्या जवळपास होतं. दुसरी गोष्ट, त्यांचा लिहीण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. तिसरी गोष्ट, मूळ ग्रंथचा एकनाथांनी खूपच विस्तार करून हा ग्रंथ तयार केला. जनार्दनस्वामींबरोबर चंद्रभटांकडे राहिले असताना एकनाथांनी ‘एकनाथी भागवत’ लिहायला सुरुवात केली. 

गुर्वाज्ञा प्रमाण असल्यामुळे एकनाथ महाराज एकटेच मधुरा, वृदांवन, गोकुळ, गया, प्रयाग, अयोध्या, बद्रीनाथ इ. असंख्य तीर्थक्षेत्री जाऊन शेवटी पैठणला परत आले ते वयाच्या पंचवीसाव्या वर्षी. पण वयाच्या सातव्या-आठव्या वर्षीचा कोवळा पोर “एकनाथ” घराबाहेर पडल्यानंतर आता वयाच्या पंचवीसाव्या वर्षी ‘एकनाथ महाराज’ म्हणून पैठणात परत येणं या संपूर्ण कालावधीमध्ये काय झालं ते काय सांगावं! पोरक्या एकनाथाच्या संगोपनाची जबाबदारी घेतलेले आजोबा चक्रपाणि आणि आजी सरस्वती यांना एकनाथाच्या निघून जाण्यामुळे वेडच काय ते लागायचं बाकी राहिलं होतं. उरलेली तीर्थयात्रा आटोपून एकनाथ महाराज पैठणला परत आले. एक दिवस माध्यान्हीला माधुकरी मागायला आले असताना आजोबाआजी आणि नाथांची नजरानजर झाली. सात वर्षांचा असताना पाहिलेला बाळ आता पंचविशीत गेल्यानंतर पुन्हा डोळ्यांसमोर येत होता. पण डोळ्यामध्ये प्राण आणून ते आपल्या एकोबाची वाट पहात असल्यामुळे त्यांच्या अंतर्मनानं एकनाथ समोर येताच सूचना दिली. एकनाथांनीही आपल्या आजोबा - आजींना ओळखलं. त्यांचं अंत:करण भरून आलं. नाथांनी पुढं होऊन आजीला मिठी मारली. बिचारी आजी थरथर कापत होती, डोळ्यातून आनंदाश्रू ढाळत होती.

काय बोलावं ते सुचत नव्हतं. एकनाथावर न सांगता गेल्याबद्दल रागवावं का परत भेटल्याबद्दल आनंदाचा वर्षाव करावा हे त्या माऊलीला कळत नव्ह्तं. आजी जरा सावरल्यानंतर नाथांनी आजोबांच्या पायावर डोकं ठेवलं. तेवढ्यात आजोबांनी जनार्दनस्वामींचं सांभाळून ठेवलेलं पत्र एकनाथाच्या हातावर ठेवलं. नाथांनी पत्र उघडलं. आतमध्ये लिहिलं होतं, “पैठणातच राहून जगदुद्धार करावा.” नाथांनी आज्ञा शिरोधार्थ मानून पैठणातच रहायचं ठरवलं. 

पैठण ही कर्मभूमी म्हणून निश्चित झाल्यानंतर नाथांनी लोकजागृतीच्या कार्याचा श्रीगणेशा कीर्तनानं केला. एकादशीच्या निमित्तानं नाथांनी स्वत: होऊनच हे कीर्तन केलं. आजवर पैठणातल्या लोकांना एकनाथ कीर्तन करतात हे देखिल माहीत नव्हतं. पण केलेला अभ्यास आणि आजवरच्या गुरुसेवेची पुण्याई यांच्यामुळे नाथ कीर्तनाला उभे राहिले की, साक्षात सरस्वतीच त्यांच्या मुखातून बोलत असे. अशी प्रासादिक वाणी त्या पैठणात लोकांनी यापूर्वी कधी ऐकलीच नव्हती. मग काय, बघता बघता नाथांची किर्ती फुलांच्या सुगंधाप्रमाणे दाही दिशांना पसरली. कीर्तनाला ही गर्दी होऊ लागली ! हळुहळू रोज कीर्तन आणि रोज वाढती गर्दी असं समीकरण झालं. लोकांचा वाढता प्रतिसाद बघून नाथांना समाधान वाटत होतं. नाथ लोकांच्या गळ्यातले ताईत बनले होते. परंतु अहंकाराचा मात्र लवलेशही नाथांना शिवला नव्हता. आपल्या अंगी असलेलं सर्व काही त्या परमेश्वराची किमया आहे, त्यानं आपल्याला हे सारं लोकांच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी दिलेलं आहे अशा विनम्र भावानं नाथ लोकांच्या अंतरंगातला परमेश्वर जागृत करण्याचा घेतलेला वसा पाळत होते. आपण सारे त्या एका परमेश्वराचेच अंश आहोत त्यामुळे कोणत्याही जातीचा माणूस दुसऱ्या जातीच्या माणसापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असूच शकत नाही. माणसाचा मोठेपणा तो इतरांशी किती प्रेमानं वागतो त्यावरुनच ठरतो. हा त्यांच्या उपदेशाचा गाभा होता. अतिशय साध्या, सोप्या पण काळजाला भिडणाऱ्या भाषेमुळे विद्वानांबरोबरच महार, मांग, सुतार, लोहार, कासार, डोंबारी, कैकाडी, गारुडी, वासुदेव, कोल्हाटी अशा असंख्य जाती-जमातींचे लोक कानांत प्राण आणून नाथांचं कीर्तन ऐकत. प्रत्येकाला परमेश्वर आपल्या जवळचा वाटावा म्हणून नाथांनी निरनिराळ्या जातींची रुपकं वापरुन असंख्य अभंग आणि भारुडं लिहिली. नाथांचं कवित्व इतकं शीघ्र होतं की, कीर्तन चालू असताना देखील त्यांना अभंग सूचत आणि ते लगेचच त्या कीर्तनात वापरतही असत. 

गोकुळअष्टमीचा उत्सव संपन्न झाल्यावर जनार्दनस्वामी काही दिवस पैठणला राहिले. आपल्या प्रियतम शिष्यानं परमार्थामध्ये जसा आदर्श निर्माण केला तसाच प्रपंचामध्येही आदर्श लोकांसमोर ठेवावा असं स्वामींना वाटलं. योगायोगाने त्याच वेळी नाथांचे आजोबा आणि आजीही स्वामींना तेच सांगण्यासाठी आले. मग स्वामींनी एकनाथांना गृहस्थाश्रमी व्हायची आज्ञा दिली. “जशी स्वामींची आज्ञा” म्हणत एकनाथांनी होकार दिला. आजी आजोबांना हायसं वाटलं. नंतर जनार्दनस्वामी देवगिरीकडे परतले. 

काही काळ असाच लोटला आणि एक दिवस सुन्न करणारी ती बातमी आली. देवगिरीवरती जनार्दनस्वामींचं महानिर्वाण झालं होतं. नाथांना हे कळल्यावर क्षणभरच त्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले आणि दुसऱ्या क्षणीच येत्या वर्षी स्वामींच्या महानिर्वाण दिनी म्हणजेच फाल्गुन वद्य षष्ठीला मोठा उत्सवर करण्याचा मनोदय व्यक्त केला. जन्म मरणाचं भय आपल्याला. ज्याला त्याचा खरा अर्थ कळला त्याला जन्म-मरणाचं सुखदु:ख कुठून असणार ? गुरुंच्या आज्ञेप्रमाणे गृहस्थाश्रम स्विकारायला नाथांनी तयारी दाखवताच आजोबा-आजी या वयातही उत्साहानं कामाला लागले. चारचौघांमध्ये त्यांनी हा विषय काढताच ही बातमी गावोगाव पसरली. आपले आवडते नाथ विवाहबद्ध होणार म्हटल्यावर प्रत्येकालाच आनंद झाला. पैठणच्या वायव्येला वैजापूर नावाचं गाव आहे. तेथे रहाणाऱ्या एका सुखवस्तू सद्गृहस्थाचा मित्र पैठणला राहणारा. त्यानं त्या गृहस्थांना त्यांची मुलगी नाथांसाठी दाखवण्याचा सल्ला दिला. नाथांची किर्ती अगोदरच कानावर असलेल्या त्या गृहस्थांनी तातडीनं नाथांच्या आजोबांची चक्रपाणींची भेट घेतली. नक्षत्रासारखी असणारी त्यांची गुणवंती मुलगी आजोबांनी लगेचच आपली नातसून म्हणून पसंत केली. झालं.लग्न ठरलं. पाहुणे मंडळी गोळा झाली, आणि ठरल्या मुहूर्तावर एकनाथ आणि गिरिजा यांचा विवाह मोठ्या थाटानं पार पडला. विवेक आणि शांती यांचा जणू संगमच तो. 

या विवाहाचा सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो नाथांच्या आजीआजोबांना. त्यांना आता इति कर्तव्य वाटू लागलं होतं. नाथांच्या लग्नाच्या निमित्तानं वैजापूरला राहणारा त्यांचा एक लांबचा नातलग लग्नाच्या काही दिवस अगोदर नाथांकडे आला, तो एकनाथांपायी आपलं उर्वरित आयुष्य वाहण्याच्या निर्धारानंच. उद्धव त्याचं नाव. श्री गोपाळकृष्णांनी निजधामी जाताना आपला परमप्रिय भक्त बद्रीनारायणाला लोकसंग्रहासाठी ठेवला होता. तोच हा उद्धव ! उद्धव आयुष्यभर नाथांबरोबर सावलीसारखा राहिला. एकनाथांनी जनार्दनस्वामींची सेवा केली त्याचीच पुनरावृत्ती उद्धवाच्या रुपानं पहायला मिळाली. त्याला नाथांशिवाय इतर कोणताच ध्यास नव्हता. 

नाथांच्या समत्व दृष्टीचं दर्शन घडवणाऱ्या घटना लोक पहात होते. एकदा नाथ स्नानासाठी गंगेवर गेले असताना दुपारच्या त्या रणरण उन्हात पाय भाजत असल्यामुळे जिवाच्या आकांतानं रडणारं महाराचं पोर नाथांनी पाहिलं. झपाझपा जाऊन नाथांनी त्याला कडेवर घेऊन शांत केलं. इतकच नाही तर महार वाड्यात जाऊन त्याच्या घरी पोहोचतं केलं. महाराच्या पोराला नाथांनी उचललं ही गोष्ट साऱ्यांच्या चर्चेचा विषय झाला. पण महार वाड्यातल्या लोकांना त्यांचे आवडते नाथ महार वाड्यात आले म्हणून खूप आनंद झाला.

एकनाथ महाराज म्हणजे मूर्तिमंत दया, क्षमा, शांती आणि प्रेम. काम, क्रोध, लोभ, मोह, मोद, मत्सर या षड्रिरुप वर विजय मिळवणं म्हणजे काय हे नाथांच्या चरित्रावरुन कुणालाही लख्ख दिसावं. दया नाथांच्या नसानसामध्ये भिनलेली होती. गंगा तहानलेल्या गाढवाला पाजण्याच्या गोष्टीमध्ये नाथांनी भूतदयेचा केवढा महान आदर्श जगापुढे ठेवला ना !

जगाचा संसार करणाऱ्या नाथांना अर्धांगी गिरिजाबाईंची बरोबरीची साथ होती आणि कष्टांमध्ये कधीही कमी न पडणारे श्रीखंड्या आणि उद्धव हे तर घरचे आधारस्तंभच होते. नाथांना गोदावरी आणि गंगा या दोन कन्या तर हरी हा पुत्र झाला. हरी वेदशास्त्रांत पारंगत होऊन मोठेपणी हरिपंडित म्हणून लोकमान्य झाला.

नाथांच्या थोरल्या मुलीचा गोदावरी (लीला) चा विवाह पैठणातच राहणाऱ्या विश्वंभर (चिंतोंपंत मुद्गल) यांच्याशी झाला. त्यांचा मुक्तेश्वर नावाचा मुलगा सुरुवातीला बोलतच नसे. परंतु नाथांच्या कृपेनं तो बोलायलाच नाही तर काव्य ही करायला लागला. रामायण, महाभारत आणि भागवतावरही अजरामर अशा काव्यरचना करून तो महाकवी म्हणून प्रसिद्ध झाला. पुढे पंचगंगेच्या तीरावर तेरवाड या गावी त्यानं समाधी घेतली. 

नाथांच्या धाकट्या मुलीचं, गंगाचं सासर कर्नाटकातलं. तिचा मुलगा पुंडाजी हा देखील परमभक्त होता. अशा रितीनं अमृतवृक्षाला अमृताच्याच फळांचे घोस लागले होते.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हे एकनाथांचं परम श्रद्धास्थान. एकनाथांनी ज्ञानेश्वरीचा अतिशय सखोल अभ्यास केलेला होता याचं प्रत्यंतर त्यांच्या लिखाणात जागोजाग पहायला मिळतं. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी नाथांच्या स्वप्नात येऊन “आपल्या समाधीच्या ठिकाणी असलेल्या अजानवृक्षाची मुळी आपल्या गळ्याला लागत आहे ती काढावी’ असं सांगितलं. हे कळताच गहिवरुन गेलेले एकनाथ आपल्या बरोबर काही जणांना घेऊन आळंदीकडे त्वरेने रवाना झाले. यावेळी माऊलींनी नाथांना आणखी एक महत्त्वाचं कार्य करायला सांगितलं. ते म्हणजे ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाचं. त्याकाळी हस्तलिखित पोत्थाच वापरत असल्याने एका पोथीवरून दुसरी प्रत लिहून काढताना होणार्या चुका तर होत्याच, पण काही माणसं अशा प्रती तयार करताना हेतुपुरस्सर त्यात स्वत:च्याही मोडक्या तोडक्या ओव्याही घुसडत असत.

पैठणला परत आल्यावर नाथांनी ज्ञानेश्वरीच्या अनेक हस्तलिखीत प्रती जमवल्या. त्यांचा अभ्यास आणि संशोधन केलं, आणि शेवटी नितांत श्रद्धेनं, कष्टानं श्रीज्ञानेश्वरीची निर्दोष प्रत तयार केली. ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणानंतर एकनाथांनी तितक्याच तोलामोलाचं केलेलं दुसरं कार्य म्हणजे ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती. परकीय आक्रमणामुळे हवालदिल झालेल्या, स्वत्व विसरून गेलेल्या लोकांच्या मनात अन्यायाविरुद्ध चीड निर्माण करण्यासाठी दुष्ट रावणाची रामानं कशी खोड मोडली याचं सकस वर्णन करून नाथांनी जनजागरणांच मोठ कार्य केलं. या दोन ग्रंथाशिवाय नाथांनी शुकाष्टक, रुक्मिणी स्वयंवर, आनंदलहरी, गीतासार, हस्तामलक, स्वात्मसुख गाथा असे एकापेक्षा एक लोकप्रिय ग्रंथ लिहिले. गाथेमध्ये अभंग, भारुड, गुरूस्तुती असे अनेक प्रकार आलेले आहेत. या सर्व ग्रंथांचा विचार केला तर नाथांनी लिहीलेल्या एकंदर पदांची संख्या जवळजवळ ७५ हजार एवढी प्रचंड होते. यावरून नाथांच्या प्रगल्भ प्रतिभेची कल्पना येते.

स्वत: एवढ्या उच्चकोटीच्या अवस्थेला जाऊनही नाथांना इतरांच्या उपासना मार्गाबद्दल नितांत आदर असे. कोणत्याही मार्गानं गेलं तरी एकमेकांवर प्रेम करणं आणि डोळसपणे त्या परमेश्वराला शरण जाणं याचं गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असं त्यांचं सांगणं होतं. समाजासाठी सर्व मार्गांनी उदंड कार्य करून कृतकृत्य झाल्यानंतर आता आपली जीवनयात्रा संपवावी असं नाथांना वाटू लागलं. उत्कृष्ठ ग्रंथरचना, आदर्श प्रपंच व उदंड ज्ञानदान अशा गुणालंकारांनी सुशोभित झालेलं नाथांचं जीवन कुणाचंही मस्तक विनम्रपणे झुकावं असंच होतं. देहाची आसक्ती माहितच नसलेल्या नाथांनी एकेदिवशी आपण देहत्याग करणार असल्याचं लोकांसमोर सांगितल्यावर क्षणभर लोकांचा आपल्या कानांवर विश्वास बसेना, आणि नंतर मात्र पुराच्या पाण्यासारखी सैरभर पसरत ही बातमी गावोगाव पोहोचली. आपण अनाथ होणार या कल्पनेनं सारे दु:खात बुडाले. 

एके दिवशी नाथांनी उद्धवाला बोलावून सांगितलं, “उद्धवा, मागे मी तुला फाल्गुन वद्य षष्ठीचं महत्त्व सांगितलं होतं ते आठवतंय का ?

एकनाथ महाराज पादुका, पैठण
एकनाथ महाराज पादुका, पैठण
“होय नाथ, त्याच दिवशी तुमच्या गुरूंचा जनार्दन स्वामींचा जन्म झाला, त्याच दिवशी त्यांना दत्तात्रयाचं दर्शन झालं, त्याच तिथीला स्वामींचं महानिर्वाणही झालं, आणि त्याच तिथीला स्वामींचा तुमच्यावर अनुग्रह ही झाला. होय नां ?”

उद्धवानं सारं बरोबर सांगितलं. “ त्याच वेळी मी तुला सांगितलं होतं की अजून पाचवी घटनाही त्याच तिथीला घडणार आहे म्हणून” नाथ म्हणाले. “ ती कोणती नाथ ”? उद्धवानं उत्सुकतेनं विचारलं. ‘‘येत्या फाल्गुन वद्य षष्ठीला आम्हीही जाणार ”! नाथ निर्विकारपणे बोलले. पण उद्धव मात्र  ओक्साबोक्शी रडू लागला. 

षष्ठीच्या आदल्या दिवशी नाथ कीर्तन करत करत मोठ्या जनसमुदायासह गोदावरी काठी वाळवंटात येऊन दाखल झाले. वाटेत जागोजागी आरत्या झाल्या. नाथांचं कीर्तन म्हणजे लोकांचं देहभान हरपण्याची पर्वणीच. नेहमीप्रमाणेच ते शेवटचं कीर्तनही रंगलं. भजनाचे फड पडले. नाथ हातात वीणा घेऊन नामस्मरण करू लागले. मध्यरात्र उलटून गेली. भजनाचे स्वरही मंद होत गेले. अशा सर्वजणांच्या अर्धनिद्रा अवस्थेत असण्याच्या काळात नाथांनी दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीत प्रवेश करून देहत्याग केला. लौकिकार्थानं बहुजनांचा त्राता गेला, पण तो विशाल भुमिकेतून सर्वांचा अदृश्य रूपानं वावरणारा पिता म्हणून वावरण्यासाठी. शके १५२१ मधल्या फाल्गुन वद्य षष्ठीच्या त्या रविवारी हा ज्ञानरवी अस्त पावला.

एकनाथ नावाचा कल्पवृक्ष भागवत, गाथा, भावार्थ रामायण, शुकाष्टक, रुक्मिणी स्वयंवर, आनंदलहरी यासारख्या फांद्यांनी विस्तारून समस्त जनांना सुखाच्या सावलीची व्यवस्था करून पुन्हा अकर्ता म्हणून उरला होता. अग्निसंस्कार होऊन दुसऱ्या दिवशी अस्थी गोळा करायला आलेल्या हरिपंडिताला अस्थींच्या ठिकाणी एक तुळशीच रोप आणि पिंपळ पाहिल्यावर; आपलं निर्गमन म्हणजे मरण नव्हे, याची साक्ष देणाऱ्या त्या विभूतीला आमचे कोटीकोटी प्रणाम !

पिडा हारुनी दाविला दिव्य मार्ग ।
जनांसाठी भूमीवरी आणी स्वर्ग ।
सदा सर्व लोकां गमे एक नाथ ।
सुरां पूज्य जो धन्य तो एकनाथ । 

⚜ एकनाथ महाराजांचे सामर्थ्य

पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे एक शिष्य रहात होते. सर्व प्राणिमात्रात त्यांना परमेश्वर दिसे. ते प्रत्येकाला साष्टांग नमस्कार करत. त्यामुळे लोक त्यांना चेष्टेने 'दंडवतस्वामी' म्हणत असत.

एकदा ते मार्गाने चालले असतांना काही टवाळ विरोधक मंडळींनी त्यांची थट्टा करण्याचे ठरवले. ते स्वामींना एका मेलेल्या गाढवाजवळ घेऊन गेले. त्यांनी विचारले, ''काय हो दंडवत स्वामी, त्या मेलेल्या गाढवातही परमेश्वर आहे का ?'' ''त्याच्यातही परमेश्वर आहे'', असे म्हणून स्वामींनी त्या मृत गाढवाला नमस्कार केला. त्यामुळे ते मेलेले गाढव ताडकन उठले आणि धावू लागले.

गाढव जिवंत झाले, ही गोष्ट एकनाथ महाराजांच्या कानावर गेली. ते दंडवत स्वामींना म्हणाले, ''स्वामी तुम्ही गाढवाला प्राणदान दिलेत ही गोष्ट चांगली असली, तरी आता लोक तुम्हाला फार त्रास देतील. ज्यांचे नातेवाईक मृत होतील, ते तुमच्याकडे येतील आणि मृत व्यक्तीला जिवंत करायला सांगतील. तुमच्या सिद्धीला चुकीचे वळण लागेल. हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही ताबडतोब समाधी घ्या.'' ''जशी गुरूंची आज्ञा !'' असे म्हणून स्वामींनी एकनाथ महाराजांच्या चरणांवर मस्तक ठेवून डोळे मिटले. एकनाथांनी आपला आशीर्वादाचा हात त्यांच्या मस्तकावर ठेवला. क्षणातच स्वामींनी देह त्याग केला.

एकनाथ महाराजांकडून ब्रह्महत्येचे भयंकर पाप घडले आहे. त्यासाठी त्यांनी प्रायश्चित घेतले, तरच शुद्ध होईल, असा तोडगा पैठणकरांनी सुचवला. त्यांनी एकनाथ महाराजांना सभेत बोलावले. एकनाथ महाराज प्रसन्न मुखाने सभेसमोर येऊन उभे राहिले. सभेने त्यांना ब्रह्महत्येविषयी प्रायश्चित घ्यावे लागेल, असे सुचवले. एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले, ''आपण दिलेल्या प्रायश्चित्ताचा मी आनंदाने स्वीकार करीन.'' ब्रह्महत्येला शास्त्रात देहांताची शिक्षा सांगितलेली आहे; पण याच पैठण नगरात ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि आपले पावित्र्य सिद्ध केले. तेव्हा एकनाथांनीही देवालया समोरील पाषाण नंदीला गवताचा घास खायला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे, नाहीतर पुढील प्रायश्चित्तास सिद्ध व्हावे, असे सुचवले. एकनाथ महाराजांनी गवताची एक मूठ घेतली आणि ते त्या पाषाणाच्या नंदीजवळ गेले. '''हे देवा, तू आता हा गवताचा घास घे'', असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले. नंदीने जीभ लांब करून नाथांच्या हातातील गवत तोंडात घेतले. तो गवत चावून खावू लागला. पैठणचे विरोधक त्यांना शरण गेले. त्याच वेळी एकनाथ महाराज नंदीला म्हणाले, ''देवा, आता आपणही येथे राहू नका. आपणालाही साक्षात्कारी नंदी म्हणून इतरांचा त्रास सहन करावा लागेल. आपण नदीत जाऊन जलसमाधी घ्यावी.'' तो पाषाणाचा नंदी ताडकन् उठला आणि नदीत जाऊन त्याने जलसमाधी घेतली. या दृश्याने एकनाथ महाराजांचे सामर्थ्य न समजलेल्या लोकांचे चांगलेच डोळे उघडले.

🌀 एकनाथ महाराजांचा गुरू शोध व गुरुनिष्ठा

समाजाला मार्गदर्शन करायचं असेल तर मार्गदर्शकाला ईश्वराची प्रचिती असायला हवी. नाहीतर ती नुसतीच पोपटपंची व्हायची ही एकनाथांची पक्की धारणा होती. त्यामुळे त्या परमेश्वराची कृपा संपादन करुन घेण्याचा ध्यासच एकनाथानं घेतला. आता त्यासाठी गरज होती तशा समर्थ गुरुची! एकनाथानं त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू केले. एकदा असाच शिवालयात चिंतन - मनन करीत बसला असताना तिथं आलेल्या एका वृद्ध गृहस्थानं एकनाथाला “तुला आत्मज्ञान प्राप्त करुन घ्यायचं असेल तर देवगिरीचे किल्लेदार जनार्दन स्वामी यांचेकडे जा” असं सांगितलं. नाथाच्या आनंदाला पारावार उरला नाही. ईश्वरप्राप्ती आणि नंतर समाजोद्धार या विचारांनी झपाटलेल्या एकनाथानं कशाचाही विचार न करता तडक देवगिरीचा रस्ता धरला. पैठणहून देवगिरी साधारणपणे ५० मैल लांब. पण ७-८ वर्षांचा कोवळा एकनाथ दिवस-रात्र, तहान, भूक या कशाचीही पर्वा न करता हे अंतर पायी तुडवून देवगिरीला पोहोचला.

जनार्दन स्वामींची नजर एकनाथाकडं वळताच ती बालमूर्ती स्वामींना साष्टांग दंडवत घातली झाली. पितृवत मायेनं स्वामींनी एकनाथाला उठवून जवळ घेतलं, त्याची विचारपूस केली. आई-वडिलांवर रुसून हा मुलगा पळून आला असेल असाच साऱ्यांचा समज होता परंतु एकनाथानं “चित्ताला अनुताप झाल्यामुळे” आपण आल्याचं सांगितल्यावर स्वामींनासुद्धा गहिवरुन आलं. एकनाथाची ती मुद्रा आणि बोलणं यांनी जनार्दन स्वामींच्या मनात एकनाथाबद्दल पहिल्या भेटीतच मायेचा झरा निर्माण केला. 

जनार्दनस्वामी हे परम दत्तभक्त. त्यांचा जन्म चाळीसगावचा. रमा व सावित्री या त्यांच्या दोन बायका. देवगिरीच्या परगण्याची जहागिरी त्यांचेकडे होती. जनार्दनस्वामींचा स्वभाव वैशिष्ट्यांमुळे आणि कर्तृत्वामुळेच त्यांना हा मान यवनांचं राज्य असतानाही मिळाला होता. मात्र सत्ता आणि संपत्ती हातात असतानाही जनार्दनस्वामी जीवनाच्या शाश्वत ध्येयाकडे नजर ठेवूनच प्रत्येक क्षण व्यतीत करत असत. भागवताच्या नवव्या अध्यायात :-

दत्तात्रेय शिष्यपरंपरा । सहस्त्रार्जुन यदु दुसरा 
तेणे जनार्दनु तिसरा । शिष्य केला खरा कली युगी ॥४३०॥

असा उल्लेख आहे. त्यावरून त्यांचा आध्यात्मिक अधिकार किती वरचा होता याची कल्पना येते तर अशा अधिकारी गुरुंकडे तशाच तयारीचा शिष्य येवून दाखल झाला होता. चिकाटी, अभ्यासू वृत्ती, चौकसबुद्धी, सदाचार आणि श्रद्धा या गुणपंचकाच्या बळावर एकनाथानं जनार्दन स्वामींना शिष्यत्व द्यायला भागच पाडलं. 

एकनाथाला सद्गुरु सेवेची मुळातच अतिशय आवड. तशी संधी प्राप्त झाल्यामुळे त्याला आता काय करु आणि काय नाही असं होऊन गेलं होतं. परमोच्च ध्येयानं झपाटलेल्या आठ वर्षांच्या या मुलाला सद्गुरुंशिवाय आता दुसरं काहीही सुचत नव्हतं. काही दिवस आपला गुरुंचा दिनक्रम पाहिल्याबरोबर एकनाथानं त्याला अनुसरुन आपला दिनक्रम ठरवला. जनार्दन स्वामी पहाटे उठत तर एकनाथानं त्याही अगोदर उठावं, वाडा झाडून काढावा, सडा घालावा, स्वामींचं स्नानाचं पाणी काढून द्यावं. संध्येची आणि देवपूजेची तयारी करुन ठेवावी, गंध उगाळून ठेवावं, कपडे धुवून आणावेत, पूजा वगैरे झाल्यावर स्वामी बाहेर जायच्या अगोदर त्यांचे जोडे समोर आणून ठेवावेत, जेवणाच्या वेळी वाढायला मदत करावी, रात्री स्वामींचं अंथरुण घालावं, त्यांच्या पायथ्याशी स्वत:चं अंथरुण टाकून स्वत: झोपी जावं, असा दिनक्रम या बालशिष्यानं बांधून घेतला. या गोष्टी तर रोजच्या झाल्या. पण या व्यतिरिक्त प्रसंगानं येणाऱ्या जबाबदाऱ्यांवर देखील एकनाथ झेपावत असे. आपणच गुरुसेवा या नात्यानं सर्वच्या सर्व कामं करावीत असं त्याला वाटत असे. 
मात्र एकीकडे ही सेवा चालू असतानाच दुसरीकडे हा गुणी शिष्य गीता, ज्ञानेश्वरी, ब्रह्मसूत्रे, भागवत, उपनिषदे या ग्रंथांमधलं ज्ञान आत्मसात करत होता. न्याय आणि मीमांसा ही शास्त्रही त्यानं अभ्यासली. पातंजल योगाचा देखील सखोल अभ्यास केला. मनापासून केलेली गुरुसेवा आणि आध्यात्मिक ग्रंथांचा व्यवस्थित अभ्यास यामुळे एकनाथ दिवसेंदिवस सर्वांगीणदृष्ट्या विकसित होत गेला. आध्यात्म आणि गुरुसेवा हे दोन्हीही साधत असताना एकीकडे तो तलवारबाजीही शिकला. जनार्दन स्वामींनी त्याची निष्ठा, हुशारी आणि कर्तव्यदक्षता पाहून त्याला स्वत:च्या कचेरीत न्यायला सुरुवात केल्यानंतर तारुण्यावस्थेत प्रवेश केलेल्या एकनाथानं काही काळातच तिथल्या खटले, तक्रारी, वाटण्या, संरक्षण व्यवस्था, लोकांच्या अर्जाची उत्तरं लिहीणं अशा सर्वच प्रकारच्या कामांमध्ये निपुणता संपादन केली. काही काळातच स्वामींच्या इतक्या जबाबदाऱ्या एकनाथानं उचलल्या की, जनार्दनस्वामींना आपल्या शिष्यराजाचं कौतुक कसं करावं हे ही समजेनासं झालं. एकनाथाकडे स्वामींनी हिशोब लिहिण्याचं एक महत्त्वाचं काम दिलेलं होतं. नाथाचा स्वभावच मुळी कशातही हयगय, कुचराई आणि ढिलेपणा खपवून न घेण्याचा असल्यामुळे एके दिवशी हिशेबात आलेल्या अधेलीच्या चुकीमुळे तो अतिशय अस्वस्थ झाला. कुठल्याही परिस्थितीत ही चूक आजच्या आज शोधून काढायची या निर्धारानं तो हिशोब तपासायला बसला. (त्याकाळी चवली, पावली, अधेली अशी नाणी चलनात होती आणि कमालीच्या स्वस्ताईमुळे कमीत कमी किंमतीच्या नाण्याला सुद्धा फार महत्त्वं होतं) होता होता मध्यरात्र उलटून गेली आणि चूक सापडल्या बरोबर “सापडली!” असं म्हणत नाथानं टाळी वाजवली. त्याचबरोबर जनार्दन स्वामी जागे झाले आणि नाथाच्या समोर पडलेल्या चोपड्या पाहून “काय सापडलं रे”? म्हणत उठून बसले. सारा वृत्तांत कळल्यावर कृतार्थतेनं नाथाच्या डोक्यावरुन हात फिरवत स्वामी म्हणाले, “एकोबा असंच मन लावून कृष्णभक्ती केलीस तर अवघं जीवन तेजानं उजळून जाईल.” नाथानं स्वामींचे पाय धरले. खरोखरच किती दिव्य प्रसंग हा!

एकनाथानं आपल्या गुणसंपन्नतेची झलक अजून एका प्रसंगी अशीच दाखवली. गुरुवार हा दत्तभक्तच काय, दत्तस्वरुप असलेल्या जनार्दन स्वामींच्या ध्यानाचा दिवस. त्या दिवशी ते इतर कोणतीच कामं करीत नसत. एकदा ही संधी साधून शत्रूनं गुरुवारीच किल्ल्यावर अचानक हल्ला केला. जनार्दनस्वामी ध्यानस्थ बसलेले. 

एकनाथ रखवालदाराचं काम करत उभा असतानाच दूतानं हल्ल्याची बातमी दिली. क्षणाचाही विलंब न करता एकनाथानं ध्यानस्थ स्वामींना वंदन करून तडक शस्त्रागार गाठलं. स्वामींचं चिलखत अंगावर चढवून, हाती तलवार घेऊन, स्वामींच्या घोड्यावर स्वार होऊन शीघ्रतेनं एकनाथ युद्धभूमीवर हजर झाला. सैन्य आदेशाची वाट पहात होतं. नाथाचा इशारा मिळताच सैन्य शत्रूवर तुटून पडलं. सहज म्हणून तलवारबाजी शिकलेल्या नाथाला आज तिचा प्रत्यक्ष उपयोग करण्याची संधीच जणू चालून आली होती. रणांगणातल्या या वीराचा आवेश आणि रणकौशल्य पाहून शत्रूच्या सैन्याची अक्षरश: पाचावर धारण बसली. 

दिवसेंदिवस नाथाची दृढतर होत चाललेली भक्ती आणि त्याच्या आचरणात दिसून येत असलेले उच्चतम संस्कार पाहून जनार्दनस्वामींनी या साऱ्याला साजेसं फळ नाथाच्या पदरात घालायचं ठरवलं. देवगिरी पासून थोड्या अंतरावर एक टेकडी होती. अतिशय दाट हिरवीगार झाडी, रंगीबेरंगी फुलं आणि सर्वांवर कळस म्हणजे परम रमणीय असं सरोवर यामुळे हा परिसर कोणावरही मोहिनी घालेल असाच होता. या ठिकाणी साक्षात् दत्तात्रयांचा रहिवास होता. जनार्दन स्वामी बऱ्याच वेळा गुरुवारी तिथे जात असत. त्यांच्यात कितीतरी वेळपर्यंत सुखसंवाद चालत असे. अशाच एका गुरुवारी तिथे जाताना स्वामींनी नाथालाही बरोबर घेतलं. स्नानसंध्या झाल्यावर स्वामी ध्यानस्थ बसले. तेवढ्यात तिथे एक मलंग म्हणजे फकीर आला. खरं तर त्या स्थळी पोहोचल्या बरोबर जनार्दन स्वामींनी एकनाथाला सांगून टाकलं होतं की, एका दत्तात्रयांवाचून इथे दुसरं कोणीही येत नाही. परंतु संपूर्ण अंगभर कातडं पांघरलेलं विशाल आणि आरक्त डोळे आणि बरोबर एक कुत्री आणि तिची पिल्लं अशा अवताराला तो फकीर बघितल्यावर तर नाथाच्या डोक्यात तशी शंका देखिल आली नाही. त्या फकिराची आणि जनार्दन स्वामींची दृष्टादृष्ट झाल्याबरोबर स्वामींनी पुढे होऊन त्या फकीराच्या चरणी माथा ठेवला. फकीरानं स्वामींना उठवून दृढ आलिंगन दिलं. दोघांची आत्मसुखाची बोलणी सुरू झाली. एकनाथ आश्चर्य चकित होऊन हे सारं पहात होता. तेवढ्यात त्या फकीरानं जनार्दन स्वामींना एक मातीचं भांड देऊन त्या कुत्रीचं दूध काढून आणायला सांगितलं. स्वामींनीही भांडे भरून दूध काढून आणून त्या फकीराच्या हाती दिलं. फकीरानं झोळीतून शिळ्या भाकरीचे तुकडे काढून त्या दुधात भिजविले आणि तो फकीर व जनार्दनस्वामी असं दोघंही एकाच भांड्यात जेवले. जेवताना जनार्दन स्वामींच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद पाहून एकनाथ चक्रावून गेला. शिस्तीचे आणि स्वच्छतेचे भोक्ते असलेले आपले गुरु अमंगल वेशातल्या त्या फकीराशी एवढी सलगी कशी काय करत आहेत, हे नाथाला उलगडेना. पण तेवढ्यात स्वामींनी सांगितलेली महत्त्वाची गोष्ट आठवली, आणि हा फकीर म्हणजे साक्षात श्रीदत्तात्रयच असणार हे नाथानं ताडलं. तेवढ्यात त्या दोघांचं जेवण झालं आणि स्वामींनी नाथाला ते भांडं (कटोरा) धुवून आणण्यास सांगितलं. नाथान ज्ञानदृष्टीनं विचार करून धुण्यासाठी त्या भांड्यात घातलेलं पाणी घटाघटा पिऊन टाकलं आणि कटोरा स्वच्छ धुवून त्या फकीराच्या हाती दिला आणि क्षणाचाही विलंब न करता साष्टांग नमस्कार घातला. उठून पहातात तो काय, त्या फकीराच्या जागी “तीन शिरे सहा हात” असे साक्षात श्री दत्तात्रय उभे! नाथांनी भारावलेल्या अवस्थेत पुन्हा नमस्कार घातला आणि श्री दत्तात्रय अंतर्धान पावले!

⚜🚩 दत्त तिर्थक्षेत्रे

श्री क्षेत्र नृसिंहवाडी
श्री क्षेत्र औदुंबर
श्री क्षेत्र कुरवपूर
श्री क्षेत्र पीठापूर
श्री क्षेत्र कडगंची
श्री क्षेत्र करंजी
श्री क्षेत्र मुरगोड
श्री क्षेत्र कुमशी
श्री क्षेत्र बाचणी दत्तपादुका
श्री क्षेत्र शिरोळ भोजनपात्र
श्री क्षेत्र बसवकल्याण
श्री क्षेत्र दत्तभिक्षालिंग
श्री क्षेत्र अनसूयातीर्थ
श्री क्षेत्र गुरुशिखर अबु
श्री क्षेत्र आष्टी दत्तमंदिर
श्री क्षेत्र नारायणपूर
श्री क्षेत्र कर्दळीवन
श्री क्षेत्र चिकुर्डे दत्त देवस्थान
श्री क्षेत्र जवाहरद्वीप (बुचर आयलंड)
श्री क्षेत्र शुचिन्द्रम दत्तमंदिर
श्री दगडुशेठ दत्तमंदिर पुणे
नासिक रोड दत्तमंदिर
श्री भटगाव दत्तमंदिर नेपाळ
श्री क्षेत्र पवनी
श्री क्षेत्र कुबेरेश्र्वर बडोदा
श्री तारकेश्र्वर स्थान
श्री क्षेत्र नीलकंठेश्र्वर बडोदा
श्री स्वामी समर्थ संस्थान बडोदा
माधवनगर फडके दत्तमंदिर
श्री क्षेत्र राक्षसभुवन
श्री क्षेत्र शिवपुरी दत्तमंदिर
श्री क्षेत्र अमरापूर
श्री क्षेत्र कारंजा
श्री क्षेत्र दत्तवाडी सांखळी गोवा
श्री क्षेत्र माणगांव
श्री क्षेत्र माणिकनगर
श्री क्षेत्र माहूर
श्री क्षेत्र सटाणे
श्री क्षेत्र साकुरी
श्री दत्तमंदिर रास्तापेठ पुणे
श्री क्षेत्र डभोई बडोदा
श्री दत्तमंदिर डिग्रज
श्री जंगली महाराज मंदिर पुणे
श्री क्षेत्र लोणी भापकर दत्तमंदिर
श्री एकमुखी दत्तमुर्ती कोल्हापूर
श्री क्षेत्र अंतापूर
श्री क्षेत्र अंबेजोगाई
श्री क्षेत्र अक्कलकोट
श्री क्षेत्र अमरकंटक
श्री क्षेत्र आष्टे दत्तमंदिर
श्री क्षेत्र कोळंबी
श्री क्षेत्र खामगाव दत्त मंदिर
श्री क्षेत्र गरुडेश्वर गुजराथ
श्री क्षेत्र गाणगापूर
श्री क्षेत्र गिरनार गुरुशिखर
श्री क्षेत्र गुंज
श्री क्षेत्र गेंडीगेट दत्तमंदिर बडोदा
श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर
श्री क्षेत्र चौल दत्तमंदीर
श्री क्षेत्र जबलपूर पादुकामंदिर
श्री क्षेत्र टिंगरी
श्री क्षेत्र दत्ताधाम - प्रती गिरनार
श्री क्षेत्र दत्ताश्रम जालना
श्री क्षेत्र दुर्गादत्त मंदिर माशेली गोवा
श्री क्षेत्र देवगड नेवासे
श्री क्षेत्र नरसी
श्री क्षेत्र नारेश्र्वर
श्री क्षेत्र पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ
श्री क्षेत्र पाथरी, परभणी
श्री क्षेत्र पैजारवाडी
श्री क्षेत्र पैठण
श्री क्षेत्र बाळेकुंद्री
श्री क्षेत्र बासर आणि ब्रह्मेश्वर
श्री क्षेत्र भामानगर (धामोरी)
श्री क्षेत्र भालोद
श्री क्षेत्र मंथनगड
श्री क्षेत्र माचणूर
श्री क्षेत्र रुईभर दत्तमंदिर
श्री क्षेत्र विजापूर नृसिंह मंदिर
श्री क्षेत्र वेदांतनगरी (दत्तदेवस्थान नगर)
श्री क्षेत्र शिर्डी
श्री क्षेत्र शेगाव
श्री क्षेत्र सुलीभंजन
श्री गुरुदेवदत्त मंदिर पुणे
श्री गोरक्षनाथ मंदिर श्रीक्षेत्र भामानगर (धामोरी)
श्री दत्तपादुका मंदिर देवास
श्री दत्तमंदिर वाकोला
श्री भणगे दत्त मंदिर फलटण
श्री वासुदेवनिवास (श्री गुळवणी महाराज आश्रम)
श्री सद्गुरू गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर, पुणे
श्री साई मंदिर कुडाळ गोवा
श्री स्वामी समर्थ मठ चेंबूर
श्री स्वामी समर्थ मठ दादर
श्री हरिबाबा मंदिर, पणदरे
श्री हरिबुवा समाधी मंदिर फलटण
श्री हिंगोलीचे दत्त मंदिर
दत्तसंप्रदाय सत्पुरुष
श्रीपाद श्रीवल्लभ
श्री अनंतसुत कावडीबोवा
डॉ. अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू)
श्री आनंदनाथ महाराज
श्री आनंदभारती स्वामी महाराज
श्री आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज
श्री आत्माराम शास्त्री जेरें
ओम श्री चिले महाराज
श्री उपासनी बाबा साकोरी
श्री एकनाथ महाराज
श्री काशीकर स्वामी (कृष्णानंदसरस्वती)
श्री किनाराम अघोरी
श्री किसनगिरी महाराज, देवगड
श्री कृष्णनाथ महाराज
श्री कृष्णेन्द्रगुरु
श्री गंगाधर तीर्थ स्वामी
श्री गगनगिरी महाराज
श्री गजानन महाराज अक्कलकोट
श्री गजानन महाराज शेगाव
श्री गुरुकृष्णसरस्वती (कुंभार स्वामी)
गुरु ताई सुगंधेश्र्वर
श्री गुरुनाथ महाराज दंडवते
श्री गुळवणी महाराज
श्री गोपाळ स्वामी
श्री गोपाळबुवा केळकर
श्री गोरक्षनाथ
श्री गोविंद स्वामी महाराज
श्री चिदंबर दिक्षीत
श्री चोळप्पा
श्री जंगलीमहाराज
श्री जनार्दनस्वामी
ताई दामले
श्री दत्तगिरी महाराज
श्री दत्तनाथ उज्जयिनीकर
श्री दत्तमहाराज अष्टेकर
श्री दत्तमहाराज कवीश्र्वर
श्री दत्तावतार दत्तस्वामी
श्री दादा महाराज जोशी
श्री दासगणु महाराज
श्री दासोपंत
श्री दिंडोरीचे मोरेदादा
श्री दिगंबरदास महाराज (वि. ग. जोशी)
श्री दिगंबरबाबा वहाळकर
श्री दीक्षित स्वामी (नृसिंहसरस्वती)
श्री देवमामालेदार
श्री देवेंद्रनाथ महाराज
श्री धूनी वाले दादाजी (गिरनार सौराष्ट्र)
श्री नरसिंहसरस्वती स्वामी आळंदी
श्री गोपालदास महंत, नाशिक
श्री गोविंद महाराज उपळेकर
कोल्हापूरच्या विठामाई
श्री नानामहाराज तराणेकर
श्री नारायण गुरुदत्त महाराज
श्री नारायण महाराज केडगावकर
श्री नारायण महाराज जालवणकर
श्री नारायणकाका ढेकणे महाराज
श्री नारायणतीर्थ देव
श्री नारायणस्वामी
श्री नारायणानंद सरस्वती औदुंबर
श्री निपटनिरंजन
श्री निरंजन रघुनाथ
श्री नृसिंह सरस्वती
श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर
श्री पंडित काका धनागरे
श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज
श्री परमात्मराज महाराज
श्री पाचलेगावकर महाराज (संचारेश्वर)
श्री पिठले महाराज
श्री बाबामहाराज आर्वीकर
श्री बालमुकुंद
श्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज
श्री बाळकृष्ण महाराज सुरतकर
श्री बाळाप्पा महाराज
श्री ब्रह्मानंद स्वामी महाराज
श्री भैरवअवधूत ज्ञानसागर
श्री मछिंद्रनाथ
श्री माणिकप्रभु
श्री महिपतिदास योगी
श्री मामा देशपांडे
श्री मुक्तेश्वर
श्री मोतीबाबा योगी जामदार
श्री मौनी स्वामी महाराज
श्री यती महाराज
श्री योगानंद सरस्वती (गांडा महाराज)
श्री रंगावधूत स्वामीमहाराज
श्री रघुनाथभटजी नाशिककर (सतरावे शतक)
श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज
श्री रामचंद्र योगी
श्री रामानंद बिडकर महाराज
श्री लोकनाथतीर्थ स्वामी
श्री वामनराव वैद्य वामोरीकर
श्री वासुदेव बळवंत फडके
श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी
श्री विद्यानंद बेलापूरकर
श्री विरुपाक्षबुवा नागनाथ
श्री विष्णुदास महाराज दत्तवाडी तेल्हारा
श्री विष्णुदास महाराज, माहुर
श्री विष्णुबुवा ब्रह्मचारी
श्री शंकर पुरूषोत्तमतीर्थ
श्री शंकर महाराज
श्री शंकर दगडे महाराज
श्री शंकर स्वामी
श्री शरद जोशी महाराज
श्री शांतानंद स्वामी
श्री श्रीधरस्वामी महाराज
श्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती
श्री सहस्त्रबुद्धे महाराज पुणे
श्री साईबाबा शिर्डी
श्री साधु महाराज कंधारकर
श्री साटम महाराज
श्री सायंदेव
श्री सिद्धेश्वर महाराज
श्री सीताराम महाराज
श्री स्वामीसुत
श्री स्वामी अद्वितीयानंदसरस्वती महाराज
श्री स्वामी समर्थ अक्कलकोट
श्री हरिबाबा महाराज
श्री हरिभाऊ निठुरकर महाराज
श्री हरिश्चंद्र जोशी
सौ. ताईमहाराज चाटुपळे
ॐ श्रीदत्त ठाकूर महाराज
उत्सव, ग्रंथ, व्रते व दत्त संप्रदाय विशेष
मानसपूजा
श्री गुरुचरित्र
श्री दत्त महात्म्य
श्री गजानन विजय ग्रंथ
श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ
श्री दत्तपुराण
श्री गुरुगीता
श्री स्वामी चरित्र सारामृत
श्री अनघाष्टमी व्रत
श्रीचंद्रलापरमेश्वरी
श्री सत्यदत्तव्रत पूजा
श्री अनंत व्रत
चांद्रायण व्रत
इंदुकोटी तेजकिरण स्तोत्र
श्री दत्तभावसुधारस स्तोत्र
श्री दत्त मालामंत्र
अपराधक्षमापनस्तोत्रं
करुणात्रिपदी
श्री दत्तात्रेय स्तोत्र
श्रीगुरुसहस्रनामस्तोत्रम्
सिद्धमंगलस्तोत्र
जयलाभ यश स्तोत्र
नर्मदा परिक्रमा
दत्त परिक्रमा
तीर्थयात्रा 
देवपूजा
गुरुपौर्णिमा
औदुंबर वृक्ष - कल्पवृक्ष
श्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - १ ते ७
श्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - ८ ते १६
श्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - १७ ते २३
कन्यागत महापर्वकाल
कुंडलिनी शक्ती जागृती  (शक्तिपात दीक्षा) 
रुद्राक्ष
श्री दत्तलीलामृताब्धिसार अष्टमलहरी
श्री नवनाथ पारायण पुजा विधी 
श्री रूद्र अभिषेक महत्त्व 
अश्वत्थ वृक्ष
गुरुद्वादशी
घोरकष्टोद्धरण स्तोत्र
चार वाणी
दत्त संप्रदाय साहित्यातील माणिकमोती
भस्म महात्म्य
श्री गुरुप्रतिपदा
श्री दत्त जयंती
श्री दत्त बावनी
श्री दत्तस्तवस्तोत्र
श्री दत्तात्रय वज्रकवच स्तोत्र
श्री नृसिहसरस्वती जयंती
श्री स्वामी चरित्र व श्री गुरुस्तवन स्तोत्र
श्री स्वामी समर्थ प्रकटदिन

              ॥ अभंग

▪अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना 
▪आम्हां नादी विठ्ठलु आम्हां छंदी विठ्ठलु 
▪काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल 
▪कुणीतरी सांगा गे । माझा कृष्ण देखिला काय
▪ गुरु परमात्मा परेशु देवासी तो पुरे एक प्रेमभाव 
▪माझे माहेर पंढरी 
▪माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद 
▪येथोनी आनंदू रे आनंदू 
▪वारियाने कुंडल हाले 
▪विठ्ठलावांचुनीं आणिकाचे ध्यान 
▪सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर 
▪सत्वर पाव ग मला भवानी आई 
▪राम नाम ज्याचें मुखी 
▪रूपे सुंदर सावळा गे माये ▪ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था 
▪आवडीनें भावें हरिनाम घेसी ▪कशि जांवू मी वृंदावना 
▪कसा मला टाकुनी गेला 
▪राम कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल 
▪या पंढरीचे सुख पाहतां डोळां 
▪असा कसा देवाचा देव बाई ठकडा

            🚩🚩🚩🚩🚩

    🙏 विनम्र अभिवादन🙏
      ♾️♾️♾️ ♾️♾️♾
स्त्रोत ~ dattamaharaj.com

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

छत्रपती राजाराम भोसले

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️                     
➿➿➿➿➿➿➿➿➿
     🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन :  श्री अविनाश काशिनाथ पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                       
   ➿➿➿➿➿➿➿➿➿
  🚩🏇🤺🇮🇳🤴🏻🇮🇳🏇🤺🚩

       छत्रपती राजाराम भोसले
( मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती )


     जन्म : २४ फेब्रुवारी १६७०
              (राजगड)

       मृत्यू : ३ मार्च १७००
                 (सिंहगड)
           अधिकारकाळ
          १६८९ - १७००
        अधिकारारोहण
       १२ फेब्रुवारी १६८९
पुर्ण नाव : छत्रपती राजारामराजे शिवाजीराजे भोसले
राज्याभिषेक : १६८९

राज्यव्याप्ती : पश्चिम महाराष्ट्र, कोकण,दक्षिण भारतात तंजावर पर्यंत उत्तर नर्मदेपर्यंत

राजधानी : जिंजी, राजगड

संभाजी २रे
उत्तराधिकारी : ताराराणी भोसले
वडील : शिवाजीराजे भोसल
आई : सोयराबाई
पत्नी : जानकीबाई, ताराबाई
राजघराणे : भोसले
चलन : होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन)

पहिले राजारामराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठी स्वराज्याच्या अतिशय अवघड काळात (१६८९ ते १७००) त्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सेनापतींच्या साहाय्याने नेतृत्व केले. कारकिर्दीचा त्यांनी मोठा कालखंड त्यांनी तामिळनाडूतील जिंजी येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली. इ.स. १७०० मध्ये पुण्याजवळील सिंहगड येथे त्यांचा मृत्यू झाला.

🏇 छत्रपती राजाराम महाराजांचा इतिहासप्रसिद्ध जिंजीचा प्रवास !

१. मराठेशाहीही खालसा करण्याची जिद्द बाळगत महाराष्ट्रात छावणी करून बसलेला औरंगजेब !

‘छत्रपती संभाजी महाराजांच्या मोगली छावणीत झालेल्या अत्यंत क्रूर आणि दारुण वधाने हिंदवी स्वराजाचा पायाच हादरून गेला होता. मोगली फौजा स्वराज्यात सर्व बाजूंनी घुसून आक्रमण करत होत्या. स्वराज्याचे गडकोट, ठाणी एकामागून एक याप्रमाणे शत्रूच्या हाती पडत होती. प्रत्यक्ष राजधानी रायगडला औरंगजेबाचा सेनापती जुल्फीकार खान याचा वेढा पडला होता आणि सर्व मराठा राजकुटुंबांसह मराठ्यांची राजधानी हस्तगत करून दक्षिणेतील आदिलशाही आणि कुतुबशाही यांच्या पाठोपाठ मराठेशाहीही खालसा करण्याचा दुराग्रह (जिद्द) बाळगत औरंगजेब महाराष्ट्रात छावणी करून बसला होता.

२. राजाराम महाराजांनी रायगडाबाहेर पडून अनेक किल्ल्यांवर जाणे, ते जेथे जेथे गेले, तेथे तेथे मोगली फौजांनी त्यांचा पिच्छा पुरवणे आणि त्यांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे जिंजीकडे जाण्याचा निर्णय घेणे

अशा भयंकर संकटात रायगडावर संभाजी महाराजांची राणी येसूबाई आणि स्वराज्यातील प्रमुख अधिकारी यांनी एकत्र येऊन राजाराम महाराजांना मंचकारोहण करून त्यांना ‘छत्रपती’ म्हणून घोषित केले आणि ‘मराठ्यांचे राज्य बुडालेले नाही, एवढेच नव्हे, तर मराठ्यांचे शत्रूंशी निकराने युद्ध
चालूच राहील’, हे त्यांनी बादशहास दाखवून दिले. अशा प्रसंगी रायगडावर राजकुटुंबातील सर्वच व्यक्तींनी एकाच स्थानी अडकून रहाणे धोक्याचे होते; म्हणून राजाराम महाराजांनी आपल्या सहकार्‍यांसह गडाबाहेर पडावे, किल्लो-किल्ले फिरते राहून शत्रूशी प्रतिकार चालू ठेवावा आणि त्यातूनही बिकट
परिस्थिती उद्भवली, तर जीव वाचवण्यासाठी कर्नाटकात जिंजीकडे निघून जावे, अशी मसलत येसूबाईंच्या मार्गदर्शनाखाली ठरली. त्यानुसार राजाराम महाराज रायगडाबाहेर पडून प्रतापगडास आले. प्रतापगडाहून सज्जनगड, सातारा, वसंतगड असे करत पन्हाळ्यास पोहोचले. ते जेथे जेथे गेले, तेथे तेथे मोगली फौजांनी त्यांचा पिच्छा पुरवला. लवकरच पन्हाळ्यासही मोगलांचा वेढा पडला. स्वराज्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट बनू लागली. तेव्हा पूर्वनियोजित मसलती प्रमाणे राजाराम महाराजांनी आपल्या प्रमुख सहकार्‍यांनिशी जिंजीकडे जाण्याचा निर्णय घेतला.

३. कोणत्याही परिस्थितीत राजास पकडायचे, असा चंग औरंगजेबाने बांधला असणे आणि कोणत्याही परिस्थितीत शत्रूस चकवा देऊन जिंजीस पोहोचायचे, असा राजाचा कूटनिश्चय असणे

‘आपल्या दबावामुळे मराठ्यांचा नवा राजा महाराष्ट्रातून निसटून जिंजीकडे जाण्याची शक्यता आहे’, याचा अंदाज चाणाक्ष औरंगजेबाने अगोदरच बांधला होता आणि त्या दृष्टीने दक्षिणेतील सर्व संभाव्य मार्गावरील किल्लेदार आणि ठाणेदार यांना त्याने सावधानतेचा आदेश पाठवला होता. राजा कदाचित समुद्रमार्गावरून पळून जाईल; म्हणून त्याने गोव्याच्या पोर्तुगीज व्हॉईसरॉयलाही लक्ष ठेवण्यास सांगितले होते. ‘कोणत्याही परिस्थितीत राजास पकडायचे’, असा चंग त्याने बांधला होता आणि ‘कोणत्याही परिस्थितीत शत्रूस चकवा देऊन जिंजीस पोहोचायचे’, असा राजाचा कूटनिश्चय होता.

४. पन्हाळगडाहून सरळ दक्षिणेचा मार्ग न धरता महाराजांनी शत्रूस चकवण्यासाठी पूर्वेचा मार्ग धरणे

पन्हाळ्याचा वेढा चालू असतांनाच २६.९.१६८९ या दिवशी राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी लिंगायत वाण्याचा वेश परिधान करून गुप्तपणे वेढ्याबाहेर पडले. सोबत मानसिंग मोरे, प्रल्हाद, निराजी, कृष्णाजी अनंत, निळो मोरेश्वर, खंडो बल्लाळ, बाजी कदम इत्यादी मंडळी होती. वेढ्याबाहेर पडताच घोड्यावरून प्रवास चालू झाला. सूर्योदयाच्या वेळी सर्व जण कृष्णातीरावरील नृसिंहवाडीजवळ पोहोचले. पन्हाळगडाहून सरळ दक्षिणेचा मार्ग न धरता महाराजांनी शत्रूस चकवण्यासाठी पूर्वेचा मार्ग धरला होता. आग्र्‍याहून निसटतांना शिवछत्रपतींनी अशी युक्ती अवलंबली होती. ते सरळ दक्षिणेस न जाता प्रथम उत्तरेस नंतर पूर्वेस आणि नंतर दक्षिणेस वळले होते. कृष्णेच्या उत्तरतिराने काही काळ प्रवास करून त्यांनी पुन्हा कृष्णा पार करून दक्षिणेचा रस्ता धरला; कारण जिंजीकडे जायचे, तर कृष्णा आणखी एकदा पार करणे गरजेचे होते. हा सर्व वरवर ‘अव्यापारेषु व्यापार’ केवळ शत्रूस हुलकावणी देण्यासाठी होता. शिमोग्यापर्यंतचा महाराजांचा प्रवास गोकाक-सौंदत्ती-नवलगुंद-अनेगरी-लक्ष्मीश्वर-हावेरी-हिरेकेरूर-शिमोगा असा झाला.

५. मराठ्यांचा राजा आपल्या हातातून निसटला आहे, हे मोगलांना माहीत होणे आणि स्वतः बादशहाने निरनिराळ्या मार्गांनी त्यांच्या पाठलागावर सैन्य पाठवणे

मार्गात ठिकठिकाणी महाराजांनी बहिर्जी घोरपडे, मालोजी घोरपडे, संताजी जगताप, रूपाजी भोसले इत्यादी आपले सरदार यापूर्वीच रवाना केले होते. ते प्रवासात महाराजांना मिळत गेले. इकडे महाराष्ट्रात मोगलांना उमजून चुकले होते की, मराठ्यांचा राजा आपल्या हातातून निसटला आहे. स्वतः बादशहाने निरनिराळ्या मार्गांनी त्यांच्या पाठलागावर सैन्य पाठवले होते. अशाच एका सैन्याने महाराजांना वरदा नदीजवळ गाठले. तेव्हा त्यांनी बहिर्जी आणि मालोजी या बंधूंच्या साहाय्याने शत्रूला हुलकावणी देऊन नदी पार केली; पण पुढे मोगलांच्या दुसर्‍या एका सैन्याने त्यांची वाट अडवली. तेव्हा रूपाजी भोसले आणि संताजी जगताप या शूर भालाइतांनी (भाल्यांनी युद्ध करणारे) भीम प्रकार गाजवून मोगलांना थोपवून धरले. लवकरच महाराजांनी संताजीस आघाडीस आणि रूपाजीस पिछाडीस ठेवून पुढचा मार्ग धरला. शत्रूंशी लढत लढत, त्यास अनपेक्षितपणे हुलकावणी देऊन त्यांनी तुंगभद्रेचा तीर गाठला.

६. चन्नम्मा राणीने हिंदु धर्म आणि संस्कृती यांना इस्लामी आक्रमणापासून वाचवण्याचे शिवछत्रपतींचे कार्य ज्ञात असल्यामुळे राजाराम महाराजांना तिच्या राज्यातून सुखरूपपणे जाण्यासाठी सर्व प्रकारचे साहाय्य करणे

ही हुलकावणी मार्गातील बिदनूरच्या चन्नमा राणीच्या सहकार्याने शक्य झाली. हिंदु धर्म आणि संस्कृती यांना इस्लामी आक्रमणापासून वाचवण्याचे
शिवछत्रपतींचे कार्य चन्नमास ज्ञात होते आणि म्हणूनच राजाराम महाराजांनी तिच्या राज्यातून सुखरूपपणे जाऊ देण्याचे आवाहन करताच तिने त्यांना सर्व प्रकारचे साहाय्य देऊ केले. संकटग्रस्त मराठा राजास साहाय्य करणे हा तिने राजधर्म मानला आणि औरंगजेबाच्या संभाव्य क्रोधाची तमा न बाळगता तिने महाराजांच्या प्रवासाची गुप्तपणे चोख व्यवस्था केली. राणीच्या या साहाय्यामुळेच मराठ्यांचा राजा आपल्या सहकार्‍यांनिशी तुंगभद्रेच्या तिरावरील शिमोग्यास सुखरूपपणे पोहोचला. राणीच्या या साहाय्याची वार्ता औरंगजेबास समजताच त्याने तिला शिक्षा करण्यासाठी मोठी फौज रवाना केली; पण या फौजेचा समाचार मार्गातच संताजी घोरपड्याने घेऊन राणीचा बचाव केला.

७. राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी तुंगभद्रेच्या पात्रात असणार्‍या एका बेटावर मुक्काम करत असतांना मध्यरात्रीच्या प्रहरी त्यांच्यावर मोगलांच्या एका मोठ्या लष्करी तुकडीने छापा टाकणे

राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी तुंगभद्रेच्या पात्रात असणार्‍या एका बेटावर मुक्काम करून होते. ऐन मध्यरात्रीच्या प्रहरी त्यांच्यावर मोगलांच्या एका मोठ्या लष्करी तुकडीने छापा टाकला. या तुकडीचे नेतृत्व करत होता विजापूरचा सुभेदार सय्यद अब्दुल्ला खान. स्वतः औरंगजेबाच्या हुकमाने ३ दिवस ३ रात्र अखंड घोडदौड करून अब्दुल्ला खानाने राजाराम महाराजांस गाठले होते. सर्व दिशांनी मोगलांचा वेढा पडताच मराठ्यांनी सावध होऊन आपल्या राजाच्या रक्षणार्थ जोराचा प्रतिकार चालू केला. मोठी धुमश्चक्री उडाली.

८. खानाला कैद केलेल्यांमध्ये प्रत्यक्ष मराठ्यांचा राजा दिसणे आणि नंतर तो नकली असल्याचे त्याच्या लक्षात येणे

या चकमकीत अनेक मराठे मारले गेले. कित्येक कैद झाले. खानाला कैद केलेल्यांमध्ये प्रत्यक्ष मराठ्यांचा राजा दिसला. त्याच्या आनंदास पारावार राहिला नाही. त्याने तातडीने बादशहाकडे हे वृत्त धाडले. बादशहाने राजास सुरक्षाव्यवस्थेने (बंदोबस्ताने) आणण्यासाठी विशेष सैन्य रवाना केले; पण लवकरच अब्दुल खानाच्या लक्षात आले की, आपण पकडलेला मराठ्यांचा राजा नकली आहे. सिद्दी जोहरच्या वेढ्यात शिवछत्रपतींचे असेच सोंग करून शिवा काशीद याने शत्रूस चकवले होते. हिंदवी स्वराज्याच्या होमकुंडात या वेळी अशाच प्रकारे आत्मबलिदान करून एका अनामिक मराठ्याने
मराठ्यांच्या छत्रपतीस वाचवले होते. धन्य तो अनामिक मराठा बहाद्दूर वीर !  त्याच्या बलिदानाने मराठ्यांचे स्वातंत्र्य-समर अधिक तेजस्वी झाले.

९. आता मोगलांनी सर्व संभाव्य मार्र्गांवर हेरांचे जाळे पसरल्याने राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी यांनी नाना प्रकारची वेषांतरे करून आपला खडतर प्रवास चालूच ठेवणे

शिमोग्यापर्यंतचे अंतर राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी यांनी घोड्यांच्या पाठीवरून तोडले होते; पण आता मोगलांनी त्यांच्या सर्व संभाव्य मार्गांवर हेरांचे जाळे पसरल्याने घोड्यावरून प्रवास धोक्याचा ठरला. तेव्हा त्यांनी यात्रेकरू, तडीतापडी, कापडी, व्यापारी, भिक्षेकरी अशी नाना प्रकारची वेषांतरे करून आपला खडतर प्रवास चालूच ठेवला. ठिकठिकाणचे चौक्या-पहारे चुकवत त्यांनी शिमोग्याच्या आग्नेयेस १७० मैलांवर असणारे बंगळूर गाठले.

१०. बंगळूरच्या मुक्कामी महाराजांकडे पाहून ‘हा कोणी मातब्बर माणूस दिसतो’ हे स्थानिक लोकांच्या लक्षात येणे आणि त्यांनी ही वार्ता लगेच मोगली ठाणेदारास सांगणे

बंगळूरच्या मुक्कामी महाराजांवर आणखी एक संकट गुजरले. त्यांचे पाय एक सेवक धूत असता काही स्थानिक लोकांच्या लक्षात आले की, हा कोणी मातब्बर माणूस दिसतो. त्यांनी ही वार्ता लगेच मोगली ठाणेदारास सांगितली. त्या कालावधीत मराठी मंडळीही सावध झाली. त्यांना कोसळणार्‍या संकटाची चाहूल लागली. तेव्हा खंडो बल्लाळाने पुढाकार घेऊन महाराजांस विनंती केली की, त्यांनी आपल्या सहकार्‍यांनिशी भिन्न भिन्न मार्गांनी पुढे निघून जावे, मागे आम्ही २-४ आसामांrनिशी आल्या प्रसंगाला तोंड देऊ आणि त्यातून निसटून मार्गात ठराविक ठिकाणी येऊन मिळू. खंडो बल्लाळच्या या सल्ल्याप्रमाणे महाराज निघाले. इकडे ठाणेदाराची धाड पडली आणि त्याने खंडो बल्लाळ प्रभृतींना वैâद करून ठाण्यात नेले.

११. छत्रपती आणि हिंदवी स्वराज्य यांसाठी मोठा देहदंड सोसणारे खंडो बल्लाळ आणि इतर प्रभृती !

ठाण्यात खंडो बल्लाळ आणि त्यांचे सोबती यांच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले. त्यांना चाबकाने फोडून काढले. डोक्यावर दगड दिले. तोंडात राखेचे तोबरे दिले; पण ‘आम्ही यात्रेकरू’ याव्यतिरिक्त अधिक माहिती त्यांच्या तोंडून बाहेर पडली नाही. तेव्हा ‘हे खरेच यात्रेकरू आहेत. महाराजांचे असते, तर इतक्या मारापुढे बोलते’, असा विचार करून ठाणेदाराने त्यांना सोडून दिले. सुटका होताच ते राजाराम महाराजांना विवक्षित ठिकाणी येऊन मिळाले. खंडो बल्लाळ प्रभृतींनी छत्रपती आणि हिंदवी स्वराज्य यांसाठी मोठा देहदंड सोसला. स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यनिष्ठा यांचे हे एक प्रकरण दिव्यच होते. या दिव्याच्या कसोटीस ते उतरले.

१२. पुढे राजाराम महाराज मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या अंबूर या ठिकाणी पोहोचणे

राजाराम महाराजांचा प्रवास पुढे चालूच राहिला. बंगळूरपासून पूर्वेस ६५ मैलांवर असणार्‍या अंबूर या ठिकाणी ते पोहोचले. अंबूर हे ठाणे मराठ्यांच्या ताब्यात होते आणि तेथे बाजी काकडे हा मराठा सरदार छावणी करून होता. त्याला महाराज आल्याची वार्ता समजताच तो त्वरेने दर्शनास आला आणि त्याने महाराजांचा यथोचित सत्कार करून त्यांचा गुप्तवास संपवला. आता महाराज उघडपणे आपल्या सैन्यासह अंबूरहून वेलोरकडे निघाले. वेलोरचा कोटही मराठ्यांच्या ताब्यात होता. २८.१०.१६८९ या दिवशी महाराज वेलोरास पोहोचले. पन्हाळगड ते वेलोर हे अंतर कापण्यास त्यांना ३३ दिवस लागले होते. वेलोर मुक्कामी कर्नाटकातील आणखी काही सरदार आपल्या सैन्यासह त्यांना येऊन मिळाले. वास्तविक अंबूरहून थेट दक्षिणेस असणार्‍या जिंजीकडे त्यांनी जावयास हवे होते; पण जिंजीकडे जाण्यात त्यांच्यासमोर एक अडचण उपस्थित झाली होती.

१३. जिंजी किल्ला म्हणजे कर्नाटकातील मराठी राज्याचे प्रमुख केंद्र असणे

स्वतः शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याला अभेद्य करून ठेवले होते. पुढे महाराष्ट्रात मराठी राजाला संकटकाल प्राप्त झाला, तर येथे त्यास आश्रय घेता यावा, अशी त्यांची दूरदृष्टी होती. शिवछत्रपतींनी औरंगजेबाचा धोका जाणला होता. भाकीत केले होते. त्याचप्रमाणे घडले. औरंगजेब दक्षिणेस चालून आला. मराठी राजा संकटात पडला. तेव्हा जिंजी किल्ला साहाय्यास आला.

१४. राजाराम महाराजांच्या सावत्र बहिणीने महाराजांना विरोध करायचे ठरवून तशी सिद्धता करणे; पण सैन्यातील अधिकार्‍यांनी तिला त्या अविचारापासून परावृत्त करणे आणि महाराज आपल्या सहकार्‍यांनिशी जिंजी किल्ल्यात येणे*
संभाजीराजांच्या काळात हरजीराजे महाडीक हा कर्नाटकातील मराठ्यांचा मुख्य सुभेदार होता. त्याचे नुकतेच निधन झाले होते. त्यांची बायको, म्हणजे राजाराम महाराजांची सावत्र बहीण. हरजीराजांच्या मागे तिचा स्वतंत्र होण्याचा उद्योग चालू होता. तिने जिंजीचा किल्ला साधनसंपत्तीसह बळकावला होता. आता तिने महाराजांना विरोध करायचे ठरवून तशी सिद्धता चालू केली. ‘किल्ला आपल्या स्वाधीन करावा’, हा महाराजांचा निरोप तिने धुडकावून लावला. एवढेच नव्हे, तर त्यांना लष्करी प्रतिकार करण्यासाठी ती आपले सैन्य घेऊन जिंजीबाहेर पडली; पण काही अंतर गेल्यावर तिच्याच सैन्यातील अधिकार्‍यांनी तिला त्या अविचारापासून परावृत्त केले. शेवटी आपली बाजू दुर्बळ झाल्याचे पाहून निरुपायाने ती किल्ल्यात परतली. जिंजीतील मराठ्यांनी राजाराम महाराजांचा पक्ष उचलून धरला. परिणामी अंबिकाबाईस आपल्या बंधूच्या स्वागतासाठी जिंजीचे द्वार उघडावे लागले. नोव्हेंबर १६८९ च्या पहिल्या आठवड्यात राजाराम महाराज आपल्या सहकार्‍यांनिशी जिंजी किल्ल्यात आले. जिंजीचा प्रवास असा सुखान्त झाला.

१५. जिंजीत मराठ्यांच्या राज्याचे नवे पर्व आरंभ होणे

मराठा मंडळींनी कर्नाटकात आणि जिंजीत राजाराम महाराजांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केल्याने मद्रास किनारपट्टीवरील राजकारणाचे रंग पालटू लागले. नव्या मराठा राजाने जिंजीत आपली नवी राजधानी उभी केली. दरबार सज्ज झाला. मराठ्यांच्या राज्याचे नवे पर्व आरंभ झाले.

१६. संताजी, धनाजी अशा अनेक प्रभृतींनी राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मोगलांशी निकराची झुंज देणे आणि नंतर महाराजांनी महाराष्ट्रात येऊन मोगलांविरुद्ध मोठी धामधूम माजवणे
पुढे जिंजी जिंकून राजाराम महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिकार खानास धाडले. खिस्ताब्द १६९० या वर्षी खानाने जिंजीस वेढा दिला तो ८ वर्षे चालू राहिला. त्या काळात रामचंद्र पंडित, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी प्रभृतींनी राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मोगलांशी निकराची झुंज दिली. संताजी-धनाजींनी याच काळात गमिनी काव्याने लढून मोगलांची हैराणगत केली. नाशिकपासून जिंजीपर्यंत मराठ्यांच्या फौजा सर्वत्र संचार करू लागल्या. शेवटी खिस्ताब्द १६९७ या वर्षी जुल्फिकार खानाने जिंजी जिंकली खरी; पण तत्पूर्वीच महाराज किल्ल्यातून निसटले. महाराष्ट्रात येऊन त्यांनी मोगलांविरुद्ध मोठी धामधूम माजवली. शत्रूच्या प्रदेशावरील स्वारीत असतांनाच त्यांचा प्रकृतीने घात केला आणि सिंहगडावर फाल्गुन कृ. नवमी, शके १६२१ या दिवशी त्यांचे निधन झाले.

🚩  हर हर महादेव...!! 🚩
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

      🙏 विनम्र अभिवादन🙏
         ♾️♾️♾️ ♾️♾️♾️
   स्त्रोत ~ hindujagruti.org   l                                                                                             ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...