शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२

अनंत चतुर्दशी


   🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️

           आजचा दिनविशेष 
 
         🙏अनंत चतुर्दशी🙏


अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला साजरी करतात. महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात.

भाद्रपद शुध्द चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणत असतात. या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात.

आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात.

पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत ब्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला. अशी कथा आहे.

दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन होते. तर त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येते. मात्र, अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणरायाचे विसर्जन का करण्यात येते? हे तुम्हाला माहिती आहे का? अनंत चतुर्दशीला विसर्जन करण्यामागे एक रंजक कथा आहे.

पौराणिक कथा आणि धार्मिक मान्यतेनुसार, ऋषी वेद व्यास यांनी ज्यावेळी संपूर्ण महाभारताची दृश्य आत्मसात केली त्यावळी ते सर्व लिहू शकत नव्हते. त्यानंतर त्यांनी महाभारत लिहिण्यासाठी गणेशजींना सांगितले. गणपती बाप्पाला वेद व्यास यांनी महाभारत सांगण्यास सुरुवात केली आणि गणेशजींनी सलग 10 दिवस ती कथा लिहिली.

महाभारत पूर्ण सांगून झाल्यावर जेव्हा वेद व्यास यांनी आपले डोळे उघडले त्यावेळी गणेशजींच्या शरीराचे तापमान खूपच वाढलेले दिसून आले. एकाच जागेवर दहा दिवस बसून राहिल्याने आणि सातत्याने लिहित राहिल्याने तापमान वाढले. त्यानंतर त्यांच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी गणरायाला शीतलता मिळावी यासाठी गणरायाच्या शरीराव मातीचा लेप लावण्यात आला. त्यानंतर सरोवरात डुबकी घेतली. कथेनुसार, ज्या दिवशी गणेशजींनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली तो दिवस भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षाची चतुर्थीचा दिवस होता. तर ज्यावेळी महाभारत पूर्ण लिहून झाले तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता. तेव्हापासून गणेश चतुर्थीला गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते आणि दहाव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केले जाते.

सर्वांना अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! गणपती बाप्पा तुम्हाला सुख समृद्धी आणि यश प्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया...

➖➖➖➖➖➖➖➖➖
श्री अविनाश काशिनाथ पाटील 
उपशिक्षक बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...