बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

दिपावली पाडवा/बलिप्रतिपदा

   🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
  
      👇🥇🏆✍🥇🏆✌️👇 

संकलन - श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 
        
 ☸️आज_कार्तिक_शुद्ध_प्रतिपदा! अर्थात बलिप्रतिपदा!☸️


       दीपावली पाडवा!!!!

या दिवसासाठी बळी राजाची पौराणिक कथा पूर्वपिठीका म्हणून आहे!

कार्तिक महिन्याचा शुध्द प्रतिपदेचा हा दिवस, दानशूर बळीराजाच्या स्मरणात साजरा करतात!

बटू वामनाला आनंदाने त्रिपाद भूमी दान करणा-या बळी राजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळलोकचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळी राजाचे द्वारपाल होण्याचे काम स्विकारले.तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय!

हाच तो दिवस, ज्या दिवशी बळी राजा आपल्या दानधर्मामूळे सर्व काही हरला आणि त्याच दानशूरतेमूळे तो सर्व काही हरुनही जिंकला!

असा दानशूर बळी राजा पुन्हा पुन्हा राज्य करुन प्रजेला सुखी करुन जावा, यासाठीच आजचा हा दिपावली पाडवा साजरा करतात!

या दिवशी विक्रम संवत सुरू होते.
दिपावली पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. मुहुर्त म्हणून अनेकजण या पाडव्याची अग्रक्रमाने निवड करतात.
शुभ मुहुर्त म्हणून अनेक नवनवे संकल्प केले जातात व प्रत्यक्षात आणलेही जातात!

हा दिवस बळी राजाला अर्पण असल्याने या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि.. 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात!

यासोबतच हे बळीचे राज्य जणू खरोखरच यावे यासाठी आपले शेतकरी बांधव भल्या पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात.
काही ठिकाणी बळी राजाची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस! अर्थातच बलिप्रतिपदा होय!

आता या दिवसाकडे आपण दिपावली पाडवा म्हणून जर पाहिले तर,हा दिपावली पाडव्याचा शुभ मुहुर्ताचा दिवस, आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक ही नववर्षाची सुरुवात मानतात. म्हणजेच व्यापारी लोकांच्या दृष्टीने हा दिवस नवीन वर्षाचा दिवस मानला जातो.ज्या किर्द खतावणींवर व्यापा-यांची आर्थिक उलाढाल अवलंबून असते, अशा किर्द खतावणींची / वह्यांची, लक्ष्मीप्राप्तीसाठी पूजा करून व्यापारी लोक नववर्षाचा प्रारंभ करतात. या किर्द खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात.मिठाई वा तत्सम गोड पदार्थांचा भोग चढवितात. नववर्ष साजरे करण्यासाठी रात्री फटाक्यांची आतिषबाजीही करतात!

सर्व सामान्य जणांसाठी हा दिपावली पाडवा एक वेगळे वैशिष्ट्य जपून आहे!

रक्षाबंधन असो वा भाऊबीज, बहिणीकडून भावाचे औक्षण केले जाते; भावाचे औक्षण करणे जसे महत्त्वाचे त्याप्रमाणे पत्नीकडून पतीचे औक्षणही महत्त्वाचे मानणारी आपली भारतीय संस्कृती थोर आहे!

पती युध्दावर निघतो तेव्हा अथवा दरवर्षी येणारा हा दिपावली पाडवा या दिवशी पत्नीकडून आपल्या पतीचे औक्षण होते!

आपल्या पतीराजांच्या डोक्यात "कली" शिरुन संसाराचा खेळखंडोबा होण्यापेक्षा, पतीराजांच्या डोक्यात दानशूर व सुख-समृध्दी देणारा "बली" शिरावा आणि.आपल्या पतीराजांच्या कर्तृत्वाने संसारात सुख-समृध्दी, शांती यावी यांसाठी भारतीय नारी मोठ्या श्रध्देने आपल्या पतीराजांचे औक्षण करीत,

"इडा-पिडा जळो, आणिक अमंगळही टळो; बळीचे राज्य पुन्हा पुन्हा मिळो!"

अशी मंगल प्रार्थना ही करतात!

या निमित्ताने घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी आपल्या पतीराजांचे औक्षण करते व पतीराज हे पत्नीला ओवाळणी प्रदान करतात!

आणखी विशेष म्हणजे नवविवाहीत दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात.
ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयांस मानापानाचा पाहुणचार व कपडेलत्त्यांचा आहेर करतात!

अशा रितीने हा दिपावली पाडवा अर्थात बलिप्रतिपदा हा दिवस अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो!

आपल्याला व आपल्या परिवाराला..

🏮शुभ दीपावली पाडवा!🏮
🪔शुभ बलिप्रतिपदा!🪔
➖➖➖➖➖➖➖➖➖    
➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...