मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०२२

त्रिपूरारी पौर्णिमा

  🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
         ⚜️आजची कथा⚜️
   
     त्रिपुरारी ( कार्तिक ) पौर्णिमा


पौराणिक पार्श्वभूमी

त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून टाकली. शिवपुत्र कार्तिकेयने त्रिपुरासुराचा वध केला.कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले.या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते.तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात.

उत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिवपूजन केले जाते. या दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्यावतार घेतला अशीही धारणा आहे.

कार्तिक पौर्णिमा हा एक बौद्धांचा व हिंदूंचा सण आहे.

बौद्ध धर्म

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्रज्ञचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात.

हिंदू धर्म

कार्तिक महिन्याच्या या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते. या रात्री कार्तिकेयाने त्रिपुरासुराचा वध केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्यानिमित्त या दिवशी कार्तिकेयाचे पूजन केले जाते. केवळ या रात्रीच महिला कार्तिकेयाचे दर्शन घेऊ शकतात, असाही संकेत रूढ आहे. या दिवशी मंदिरांमध्ये दीपोत्सव केला जातो.

कार्तिक पौर्णिमा ही कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
        
➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...