बुधवार, १५ नोव्हेंबर, २०२३

भाऊबीज

 🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
          💠भाऊबीज💠

आपल्या बहिणीला किंवा सासरी गेलेल्या मुलीला आपल्या घरी दिवाळीला आणण्याची प्रथा असते, दिवाळी पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज होय, कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो या यमद्वितिया असेही म्हणतात.

या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलवले होते, यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, व यमराजाने आपली बहिण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रालंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले अशी पौराणिक कथा आहे. या दिवशी नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्याने त्याला त्यावर्षी यमापासून भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल हा दिवस साजरा केला जातो.

हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया, द्वितीयेचा चंद्र आकर्षक,वर्धमानता दाखवणारा आहे,तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन राहो हि त्यामागची भूमिका आहे.

बंधू भगिनींचा प्रेमसंवर्धनचा हा दिवस आहे, समाजातील सर्व भगिनींचा समाज व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्याचे स्वरक्षण करतील , त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील हा प्रण करून त्याप्रमाणे वागण्याचा हा दिवस आहे.

या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यावर बहीण प्रथम चंद्रकोरीस नंतर भावाला ओवाळते ,भाऊ मग ओवाळणी म्हुणुन भेटवस्तू देऊन बहिणीचा सत्कार करतो. काही समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन चित्रगुप्ताची पूजा करतात.

जर काही कारणाने बहिणीला कोण ही भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्र ला भाऊ समजून ओवाळते, भावाबहीणीने एकमेकांची विचारपूस करावी एक मेकांवर प्रेम करावे या साठी सण साजरा करतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
  श्री अविनाश काशिनाथ पाटील 
उपशिक्षक बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...