बुधवार, ९ मार्च, २०२२

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️                                                 ➿➿➿➿➿➿➿➿➿
    🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
            ▬ ❚❂❚❂❚ ▬
संकलन ~ श्री अविनाश पाटील बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
➿➿➿➿➿➿➿➿➿
🚩🚩🚩🚩👳‍♀️🚩🚩🚩🚩
                                                            जगतगुरु संतश्रेष्ठ 
          तुकाराम महाराज 
                                            
 [तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)]
  जन्म : माघ शुद्ध ५, शके १५२८                                                 
(१ फेब्रुवारी १६०७)*म
देहू, महाराष्ट्र
  *निर्वाण : फाल्गुन कृ.२ , शके १५७१, ( ९ मार्च १६५०)*
देहू, महाराष्ट्र
संप्रदाय : वारकरी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय
गुरू : केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य), ओतूर
शिष्य : संत निळोबा, संत बहिणाबाई, शिवूर, ता.वैजापूर, जिल्हा. औरंगाबाद भगवानबाबा
भाषा : मराठी
साहित्यरचना : तुकारामाची गाथा (पाच हजारांवर अभंग)
कार्य : समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक
संबंधित तीर्थक्षेत्रे : देहू
व्यवसाय : वाणी
वडील : बोल्होबा अंबिले
आई : कनकाई बोल्होबा आंबिले
पत्नी : आवली
अपत्ये : महादेव, विठोबा, नारायण, भागूबाई                                                                                          ⚜️ १. जन्म व पूर्वज
धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥

 तुकोबांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहे. देहू गावाला धन्यत्व-पुण्यत्व आले ते तेथे नांदत असलेल्या पांडुरंग देवतेमुळे. हे जागृत स्थान आहे.

इंद्रायणी नदीच्या शोभायमान तीरावर पांडुरंग देवाचे देवालय आहे. कटेवर कर ठेवून विश्वाचा जनिता उभा आहे. वामांगी माता रखुमाई आहे. समोर अश्वत्थ वृक्ष आहे. पारावर गरुड हात जोडून उभा आहे. द्वारात विघ्नराज आहेत. बाहेर भैरव आणि हनुमानजी आहेत. दक्षिणेला हरेश्वराचे देवालय आहे. जवळच बल्लाळाचे वन आहे. त्यात सिध्देश्वराचे अधिष्ठान आहे. क्षेत्रवासी धन्य होते, ते दैववान आहेत, वाचेने देवाचा नामघोष करीत आहेत. तुकाराम तुकोबांचे वेळचें हे देहू गावचे वर्णन आहे.

तुकोबांपासून सुमारे तीनशे वर्षांपूर्वी तुकोबांचे पूर्वज विश्वंभरबाबा हे देहू गावी राहात होते. या घराण्याचे कुलदैवत विठोबा होते. घराण्यात आषाढी-कार्तिकीची वारी विश्वंभरबाबाचे वाडवडिलांपासून चालत आली होती. पंढरीची वारी वाडवडिलाप्रमाणे नियमाने चालविण्यास बाबांच्या मातोश्रीने विश्वंभरबाबांच्या या निकट सेवेने देव पंढरपुराहून देहूस धावत आले. जसे पुंडलीकरायाच्या निकट सेवेनें देव वैकुंठाहून पंढरपूरला धांवत आले.

पुंडलिकांचे निकट सेवे । कैसा धांवे बराडी ॥१॥

मूळ पुरुष विश्वंभर । विठ्ठलाचा भक्त थोर ॥१॥

त्याचे भक्तीने पंढरी । सांडूनी आले देहू हरी ॥२॥

आषाढ शुध्द दशमीच्या दिवशी देवाने विश्वंभरबाबांना स्वप्नात भेट देऊन मी तुमचे गावी आलो असल्याचे सांगून देव आंबीयाचे वनात निद्रिस्त झाले. सकाळी विश्वंभरबाबा गावकऱ्यांचे समवेत आंबीयाचे वनात गेले. तेथे त्यांना श्री विठ्ठल रखुमाईच्या स्वयंभू मूर्ती मिळाल्या. मूर्तीची स्थापना बाबांनी आपल्या वाडयांतील देवघरात केली. पंचक्रोशीतील लोकही दर्शनास येऊ लागले. देवाचा प्रतिवर्षी महोत्सव होऊ लागला. महोत्सवाचे खर्चाकरिता शेत इनाम मिळाले. शुध्द एकादशीस वारी भरू लागली. विश्वंभरबाबाचा काळ झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव हरी आणि मुकुंद देवाची सेवा सोडून मूळच्या क्षात्र वृत्तीकडे वळले. कुटुंबियांना घेऊन राजाश्रयास गेले. तेथे त्यांना सैन्यामध्ये अधिकाराच्या जागा मिळाल्या. त्यांचे हे कृत्य त्यांच्या आई आमाबाई यांना आवडले नाही. देवालाही पसंत पडले नाही. देवांनी आमाबाईंना स्वप्नात येऊन सांगितले की, तुमच्याकरिता मी पंढरपूर सोडून देहूस आलो आणि तुम्ही मला सोडून येथे राजाश्रयास आलात हे बरे नव्हे. तुम्ही देहूला परत चला. आमाबाईंनी मुलांना स्वप्नातील वृत्तांत निवेदन केला व देहूस परत जाण्याबद्दल परोपरीने सांगितले. मुलांनीं त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. पुढे लवकरच राज्यावर परचक्र आले. उभयता बंधू रणांगणावर शत्रूशी लढता लढता धारातीर्थी पडले. मुकुंदाची पत्‍नी सती गेली, हरिची पत्‍नी गरोदर होती. तिला घेऊन आमाबाई देहूस आल्या. सुनेला माहेरी बाळंतपणाकरिता पाठविले आणि आपण देवाची सेवा करू लागल्या. हरिच्या पत्‍नीला मुलगा झाला त्याचे नाव विठ्ठल ठेवले. विठ्ठलाचा पुत्र पदाजी, पदाजीचा शंकर, शंकराचा पुत्र कान्होबा आणि कान्होबाचे बोल्होबा. बोल्होबा यांना पुत्र तीन. वडील सावजी, मधले तुकाराम आणि धाकटे कान्होबाराय.

    तुकोबांचा ज्या कुळात जन्म झाला ते कुळ पवित्र होते.

पवित्र ते कुळ पावन तो देश । जेथे हरीचे दास जन्म घेती ॥१॥

  ते कूळ क्षत्रियाचे होते. पूर्वजांनी रणांगणावर शत्रूशी लढता लढता देह ठेवले होते. घराणे सुसंस्कृत होते, धार्मिक होते. घरात पिढयान् पिढया विठ्ठलाची उपासना चालू होती. पंढरीची वारी होती. महाजनकीचे वतन होते. शेतीवाडी होती, साव-सावकारकी, व्यापारधंदा होता. दोन वाडे होते. एक राहण्याचा व दुसरा बाजारपेठेतील महाजनकीचा. गावात चांगली मानमान्यता होती. पंचक्रोशीत प्रतिष्ठा होती. शेती करीत होते म्हणून त्यांना कुणबी म्हणत, व्यापार धंदा करीत होते म्हणून वाणी म्हणत. आणि तुकोबांनी या सगळयांचीच उपेक्षा केली म्हणून त्यांना गोसावी म्हणू लागले.

गोसावी हे काही या कुळाचे आडनाव नव्हे. आडनाव मोरे- आणि गोसावी ही पदवी (इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी ) गीता काली वैश्याची गणना शूद्रांत होऊ लागली होती.

स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेपि यांति - परां गतिम् ॥ गीता  ९.३२

श्रीज्ञानदेव तुकोबांच्या काळात क्षत्रियांचीही गणना शूद्रात होऊ लागली.

तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यजादि इया ॥ ज्ञानेदेवी ९. ४६०.

दोनच वर्ण राहिले होते. ब्राह्मण आणि शूद्र म्हणून तुकोबांना शूद्र म्हणू लागले.

♻️ २. राजकीय, धार्मिक आणि सामाजिक स्थिती

दक्षिणेत त्यावेळी मुसलमानी सत्तेचा अंमल होता. गोव्यात पोर्तुगीज होते. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही या राज्य करणाऱ्या तीन मुसलमानी सत्ता एकमेकांशी लढत होत्या, गावे बेचिराख होत होती, लुटली जात होती, राजे विलासात दंग असत. ते प्रजेला पीडित. “ब्राह्मणांनी आपले आचार सोडले होते. क्षत्रिय वैश्यांना नाडीत होते, सक्तीने धर्मांतर चालू होते.” महाराजांनी म्हटले.

सांडिले आचार । द्विज चाहाड झाले चोर ॥

राजा प्रजा पिडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥

वैश्यशूद्रादिक । हे तो सहज नीच लोक ॥

वैश्य आणि शूद्र यांच्या संबंधी तर बोलावयास नको. धर्माचा लोप झाला होता. अधर्म माजला होता.

ऐसे अधर्माचे बळ । लोक झकविले सकळ ।।
लोक अधर्मालाच धर्म म्हणूं लागले. संतांना मान राहिला नव्हता.

संतां नाही मान । देव मानी मुसलमान ॥१॥

समाज नाना देव-देवतांच्या मागें लागून विस्कळीत झाला होता. धर्मात आकर्षण राहिले नव्हते. अज्ञानाचा अंधकार पसरलेला होता. लोक प्रकाश देणाऱ्या सूर्याच्या उदयाची वाट पाहात होते. अशा परिस्थितीत देहू गावी चित् सूर्यांचा उदय झाला.

संतगृह मेळी । जगत् अंध्या गिळी । पैल उदयाचळी । भानु तुका ॥३॥

  (रामेश्वरभट्ट अभंग)

महान भगवत् भक्त बोल्होबा आणि माता कनकाई यांचे उदरी शके १५३० ( इ.स. १६०९ )मध्ये तुकोबांचा जन्म झाला. घरची श्रीमंती असल्यामुळे बालपण मोठया कोडकौतुकात आणि खेळण्यात गेल. प्राथमिक शिक्षण पंतोजीकडून मिळाले. पंतोजी हातांत पाटी घेऊन मुलांचा हात धरून मुलांना शिकवीत.

अर्भकाचे साठी । पंते हाते धरिली पाटी ॥१॥

मुले खडे मांडून मुळाक्षरे काढीत.

ओनाम्याच्या काळे । खडे मांडियेले बाळे ॥१॥

व्यवहारचे आणि परमार्थाचे शिक्षण तुकोबांना वडील बोल्होबा यांचेकडून मिळाले.वडील बंधू सावजी यांनी धंदा-व्यापारात लक्ष घालण्याचे नाकारल्यावर बोल्होबांनी तुकोबांना धंदा-व्यापार,सावसावकारकी पाहाण्यास सांगितली. बाजारपेठेतील महाजनकीचे वाडयात बोल्होबांच्या हाताखाली काम करता-करता व्यवसायाचे धडे मिळत गेले. वयाचे तेराव्या वर्षी तुकोबांच्या गळ्यात संसार पडला. तुकोबा लौकरच स्वतंत्रपणे व्यवसाय पाहू लागले. सावकारकीत, व्यापारधंद्यांत तुकोबांनी चांगलाच जम बसविला. लोकांकडून शाबासकी मिळू लागली. सर्वजण प्रशंसा करू लागले. राहात्या घरातील सोज्वळ सात्त्विक वातावरण तुकोबांनी बाजारपेठेतील-घरात-व्यवसायात आणले. तिन्ही भावांची लग्नकार्ये झाली. तुकोबांची प्रथम पत्‍नी दम्याने नेहमी आजारी म्हणून तुकोबांचा दुसरा विवाह पुण्यांतील सुप्रसिध्द सावकार आप्पाजी गुळवे यांची कन्या सौ. जिजाबाई उर्फ आवली यांच्याशी झाला. एका श्रीमंत घराण्याचा दुसऱ्या श्रीमंत घराण्याशी संबंध होता. हे ऐहिक ऐश्वर्य पराकोटीला पोहोचलं होतं. घरात धन-धान्य विपुल होते. प्रेमळ माता - पिता, सज्जन बंधू, आरोग्यसंपन्न शरीर होतं. कोणत्याही गोष्टीची काही उणीव नव्हती.

माता पिता बंधू सज्जन । घरीं उदंड धन धान्य ।

शरिरी आरोग्य लोकांत मान । एकहि उणे असेना ॥१॥

(महिपतीबाबा चरित्र)

हे सुखाचे समाधानाचे ऐश्वर्याचे दिवस केव्हा गेले, कसे गेले हे थोड-सुध्दा समजले नाही. या नंतर सुखापुढे येतसे दुःख। या भविष्याला सुरुवात झाली.

☯️ ३. प्रेमळ मातापित्यांचा वियोग

        वयाच्या सतराव्या वर्षी कर्तबगार प्रेमळ पिताश्री बोल्होबा मृत्यू पावले. ज्यांनी तुकोबांना मिराशीचे धनी केले.

बाप करी जोडी लेकराचे ओढी । आपली करवंडी वाळवोनी ॥१॥

एकाएकीं केला मिराशीचा धनी । कडीये वाहुनि भार खांदी ॥२॥

      मिराशी-महाजनकी आणि देवाची सेवा.ज्यांच्यामुळे संसारतापाची झळ लागत नव्हती, तेच छत्र हारपले.

बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता ॥१॥

     (न कळता म्हणजे एकाकी माझे पश्चात) तुकोबांना असह्य दुःख झाल. हे दुःख कोठे ओसरते न ओसरते तोच पुढील वर्षी प्रेमळ माता कनकाई तुकोबांच्या देखत मृत्यु पावल्या. 

माता मेली मज देखता ॥४॥

  तुकोबांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. मातेने तुकोबांकरिता काय केल नाही सर्व काही केल.

काय नाही माता गौरवीत बाळा । काय नाही लळा पाळीत ती ॥१॥

काय नाही त्याची करीते सेवा । काय नाही जीवा गोमटेते ॥२॥

अमंगळपणे कांटाळा न धरी । उचलोनि करी धरी कंठी ॥३॥

यापुढे वयाच्या अठराव्या वर्षी वडील बंधू सावजींची पत्‍नी निधन पावली. आधीच सावजीचे प्रपंचाकडे लक्ष नव्हते, त्यात पत्‍नीचा मृत्यू. ते घरदार सोडून तीर्थयात्रेला जे गेले ते गेलेच. कुटुंबातील चार माणसांचा वियोग झाला. ज्या संसारात एकही उणे नव्हते त्यात आता एक एक उण होऊ लागल. तुकोबांनी धीर खचू दिला नाही. औदासीन्य आवरून विसावे वर्षी प्रपंच नेटका करण्याची हाव धरली. पण हाय ! एकविसाव्यात विपरीत काळ आला. दक्षिणेत मोठा दुष्काळ पडला. महाभयंकर दुष्काळ होता तो. इ. स. १६२९ त (शके १५५०-५१) पाऊस उशिरा पडला. शेवटी अती वृष्टीने पिके गेली. लोकांना अजून आशा होती. इ.स. १६३० मध्ये पाऊस अजिबात पडला नाही. सर्वत्र हाहाकार उडाला. धान्याचे भाव कडाडले. चाऱ्याच्या अभावी शेकडो गुरे मेली. अन्नावाचून शेकडो माणसे मेली. सधन कुटुंबे धुळीस मिळाली. अजून दुर्दशा संपली नव्हती. इ.स. १६३१ मध्ये त्या दैवी आपत्तीचा कडेलोट झाला. अती वृष्टीमुळे पिके गेली. महापुराने भयंकर नासाडी झाली. हा दुष्काळ ही दैवी आपत्ती तीन वर्षे टिकली. दुष्काळाच्या ह्या चढत्या दुर्दशेसंबंधी महीपतीबाबा लिहितात -

ती पुढे बरग पडले कठीण । दो पायल्याची झाली धारण ।

पर्जन्य निःशेष गेला तेणे । चाऱ्यावीण बैल मेले ॥१॥

   पुढे दुष्काळाच स्वरुप भयंकरच वाढले.

महाकाळ पडीला पूर्ण । जाहाली धारण शेराची ।

ते ही न मिळे कोणा प्रती । प्राणी मृत्यूसदनी जाती ॥१॥

   पायलीभर रत्‍नास पायलीभर उडद मिळेनात.

दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान ।

   या दुष्काळामध्ये तुकोबांच्या प्रपंचाची संपूर्ण वाताहात झाली. गुरे ढोरे मेली. साव-सावकारकी बुडाली. व्यापार धंदा बसला. लोकातील मानमान्यता गेली. प्रथम कुटुंब रखुमाबाई आणि एकुलता एक लाडका मुलगा संतोबा यांचा दुष्काळाने बळी घेतला. सावकार आणि व्यापारी यांना दुष्काळी परिस्थिती म्हणजे सुवर्णसंधी. कृत्रीम दुष्काळ टंचाई निर्माण करून शेकडो रुपयांचा फायदा उठविणारे महाभाग आपण हल्ली पाहातोच की, लोकांच्याकडील येण दुष्काळी परिस्थितीत वसूल करणारे तुकोबा कठोर हृदयाचे नव्हते. उलट आपली दुर्दशा आपत्ती दुःख विसरून, बाजूला ठेवून - दुष्काळात गांजलेल्या पीडलेल्या लोकांना तुकोबांनीं सढळ हाताने मदत केली.

सहज सरले होते काही । द्रव्य थोडे बहु ते ही ।

त्याग केला नाही । दिलें द्विजां याचकां ॥३॥

काही द्रव्य सहज सरून गेल होत आणि थोडबहुत जे राहिल होत ते ब्राह्मणांना, भिकाऱ्यांना, गरजूंना सढळ हाताने दिलं. (यावरून तुकोबांचे दिवाळ निघाल होत असा शब्दशः अर्थ घ्यावयाचा नाही.)

संसाराच्या नावे घालोनिया शून्य । वाढता हा पुण्यधर्म केला ॥९॥

मायबाप, पुत्र कलत्रादि कौटुंबिकाचे मृत्यु, दुष्काळाने प्रपंचाची झालेली वाताहात, जनामधील दुर्दशा, सखे-सोयरे यांनी केलेली निंदानालस्ती, या सर्व आपत्तींना तुकोबांनी धैर्याने तोंड दिले. ते दुर्दशेला आपत्तीला सन्मुख झाले. पळून गेले नाहीत. ते पलायनवादी नव्हते. त्यांना संसार जिंकावयाचा होता. या रणांगणावर माघार घ्यावयाची नव्हती. या असारातून सार काढावयाचे होते. दुष्काळामुळे, दैवी आपत्तीमुळे, मानवी देह, देहसंबंधी - माता,पिता, पुत्र आणि संपत्ति यांचे मूल्यमापन झाले होते. अशाश्वता पटली होती. ते शाश्वत मूल्याचा शोध करूं लागले. आपण या उद्वेगातून पार कसे पडू? पैलतीर कसे गाठू. याचा विचार करू लागले.

⚛️ ४. साक्षात्कार

विचारले आधी आपुले मानसी । वाचो येथे कैसी कोण्यापरी ॥१॥

ते सत्याच्या शोधार्थ निघाले, त्या निश्चयाने ते भामनाथांच्या पर्वतावर गेले. चिरंतन सत्याचा साक्षात्कार झाला तरच परत फिरायच नाहीतर नाही. त्यांनी निर्वाण मांडले. तुकोबांच्या अंगावर मुंग्या, विंचू, सर्प चढले, ते अंगाला झोंबले व पीडा देऊ लागले. वाघाने झेप घातली. मात्र तुकोबांचा निश्चय ढळला नाही. पंधराव्या दिवशी सत्याचा साक्षात्कार झाला.

भामगिरी पाठारी वस्ती जाण केली । वृत्ती स्थिरावली परब्रह्मी ॥१॥

सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झोंबले । पिडू जे लागले सकळीक ॥२॥

पंधरा दिवसामाजी साक्षात्कार झाला । विठोबा भेटला निराकार ॥३॥

निराकार परमात्मा भेटला. देवाने भक्ताला ‘चिरंजीव भव’ आशिर्वाद दिला. दिलासा दिला.

तंव साह्य झाला हृदय निवासीं । बुध्दि दिली ऐशी नाश नाही ॥२॥

तुकोबांनी घर सोडल्यापासून तुकोबांचे धाकटे बंधू कान्होबा त्यांच्या शोधार्थ देहू गावचे परिसरातील डोंगर, दऱ्या-खोऱ्या, जंगले धुंडाळत होते. शोधता शोधता ते भामनाथ पर्वतावरील गुहेत येऊन पोहोचले आणि आश्चर्यचकित झाले. काय दृश्य त्यांना दिसल ? तुकोबांच्या अंगावर मुंगळे, सर्प, विंचू चढलेले आहेत, वाघांनी झेप घेतलेली आहे. परमात्मा प्रगट झालेला आहे, सोनियाचा दिवस तो. कान्होबांच्या नेत्रांचे पारणे फिटले. जन्माचे सार्थक झाले. उभयता बंधूंची भेट झाली. ज्या स्थळी देव तुकोबांना भेटले, त्या पवित्र स्थळाचे पावित्र्य आणि स्मृती अखंड राहण्याकरिता त्या ठिकाणी कान्होबांनी काही दगड रचले. त्या पवित्र भूमीला वंदन करून उभयता बंधू तेथून निघून सरळ इंद्रायणीच्या संगमावर आले. संगमात स्नान करून पंधरा दिवसाच्या उपवासाचे पारणे सोडले. तुकोबांनी कान्होबांकडून खते पत्रे आणून घेतली. यांचे लोकांकडे जे येणे होते त्या त्या लोकांकडून लिहून घेतलेली खते होती. त्याच्या वाटण्या केल्या. निम्मी खते कान्होबाला दिली आणि स्वतःच्या वाटयाची निम्मी खते तुकोबांनी इंद्रायणीच्या डोहात बुडविली. या धनकोने ऋणकोकडून येण असलेल्या रकमा दुष्काळानंतर येनकेन प्रकारेण वसूल करून आपल्या विस्कटलेल्या संसाराची घडी बसविण्याऐवजी खते गंगार्पण करून ऋणकोंना कर्जमुक्त केले आणि आपण सावकारकीकडे पाठ फिरवून विन्मुख झाल्याचे जगाला दाखवून दिल. याला म्हणतात सच्चा समाजवाद.

देवाचे देऊळ होते जे भंगले । चित्ती ते आले करावे ते ॥१॥

जसे खते पत्रे इंद्रायणीच्या डोहांत बुडवून सावकारशाहीला विन्मुख झाल्याचे विलक्षण रीत्या दाखवून दिले तसेच दुष्काळानंतर भंगलेला संसार न सांधता, देवाच्या भंगलेल्या देवळाचा जीर्णोध्दार करून देवाला - परमार्थाला सन्मुख झाल्याचे तुकोबांनी जग जाहीर केले. पिताश्री बोल्होबांच्या कारकिर्दीत वाढत्या यात्रेला देवघर अपुरे पडू लागले म्हणून इंद्रायणीच्या रम्य तीरावर बोल्होबांनी देवाचे देवालय बांधले व राहत्या वाडयाच्या देवघरातील मूर्तीची स्थापना या नव्या देवालयात केली. तुकोबांच्या वेळी देऊळ भंगले होते. म्हणून दुष्काळानंतर सर्वप्रथम तुकोबांनी देवालयाचा जीर्णोध्दार केला.

श्रीमूर्तींचे होते देवालय भंगले । पाहाता स्फुरले चित्ती ऐसे ॥१॥

म्हणे हे देवालय करावयाचे आता । करावया कथा जागरण ॥२॥

देवालयाचा जीर्णोध्दार केला तो देऊळ बांधण्याने होणाऱ्या पुण्यप्राप्‍तीरिता नव्हे तर भजन, कीर्तन, कथा, जागरण करण्याकरिता. हरीजागरण, श्रवण, कीर्तन, मनन, सहज साक्षात्कार आणि मग पांडुरंग कृपा - देवालयाने या अशक्य गोष्टीची सहज साध्यता-प्राप्‍ती झाली.

काही पाठ केली संतांची उत्तरे । विश्वासे आदरे करोनिया ॥१॥
कीर्तन करण्यास उभे राहण्याकरिता देवालय बांधले. आणि कीर्तन करण्यास लागणाऱ्या पाठ-पाठांतराकरिता तुकोबा रोज भंडारा डोंगरावर एकांतात जाऊन अभ्यास करूं लागले. प्रातःकाळी स्नान करून कूळ दैवत श्रीविठ्ठल-रखुमाई यांची स्वहस्ते पूजा अर्चा करावयाची व भंडारा डोंगर गाठावयाचा.

कीर्तन संपूर्ण यावयासी हाता । अभ्यास करिता झाला तुका ॥५॥

अभ्यास तुकया करीतसे ऐसा । सरितासी जैसा पात्र सिंधु ॥६॥

तैसे जे ऐके ते राहे अंतरी । ग्रंथ याहीवरी वाचीयेले ॥७॥

ज्ञानदेव महाराजांची - ज्ञानदेवी, अमृतानुभव, एकनाथ महाराजांची भागवतावरील टीका, भावार्थ रामायण, स्वात्मानुभव, नामदेवरायांचे अभंग, कबीरांची पदे यांचे तुकोबांनी परीशीलन केले. ज्ञानदेव  महाराज, नाथ महाराज, नामदेवराय आणि कबीर या थोर भक्तिमार्गीय संतांची काही वचने त्यांनी पाठ केली.

करू तैसे पाठांतर । करुणाकार भाषण ॥१॥

जिही केला मूर्तिमंत । ऐसा संतप्रसाद ॥२॥

निर्गुण निराकार परमात्म्याला ज्यांनी सगुण साकार केला. अमूर्ताला ज्यांनी मूर्तिमंत केला असा हा संत प्रसाद सेवन केला. तुकोबांनी पुराणे पाहिली, शास्त्राचा धांडोळा घेतला.

पाहिलीं पुराणे । धांडोळिली दरूषणे ॥१॥

पुराणीचा इतिहास । गोड रस सेविला ॥१॥

 तुकोबांना हा एकांतवास फार आवडत असे. या एकांतात त्यांना सखेसोयरे भेटले होते. अर्थात ते एकांतांतील सख्यासोयऱ्यांपेक्षा निराळे होते. कोण होते ते ? वृक्ष होते, वेली होत्या ! वनचरे होती. पक्षीराज मधुर, मंजुळ सुरात कुजन करीत होते. देवाला आवळीत होते.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षीये सुस्वरे आळविती ॥१॥

येणे सुखे रूचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥धृ॥

आकाश मंडप पृथिवी आसन । रमे तेथे मन क्रीडा करू ॥३॥

येणे सुखे रूचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥धृ॥

तुकोबांच्या पत्‍नी सौ. जिजाबाई रोज घरचा कामधंदा आटोपून स्वयंपाक उरकून तुकोबांचे जेवण घेऊन भंडाऱ्यावर जात असत. तुकोबांना जेऊ घातल्यानंतर आपण जेवत असत, तुकोबा परमार्थ साधनेत निमग्न असता - विदेह स्थितीत असता त्यांची सर्व काळजी सौ. जिजाबाई घेत असत. तुकोबांच्या परमार्थात जिजाबाईंचा फार मोठा वाटा होता. शरीर कष्टवून परोपकार, संत वचनाचे पाठ- पाठांतर, वाचणे विठ्ठलाचे नामस्मरण आणि चित्ताने विठोबाचे ध्यान - अशी साधना अखंड चालू असता तुकोबांच्या स्वप्नात श्रीपंढरीराय नामदेवरायांना घेऊन आले. त्यांनी तुकोबांना जागे केले आणि जगत् उध्दाराकरितां कवित्व करण्याचे काम सांगितले.

✡️ ५. कवित्वाची स्फूर्ती आणि जलदिव्य

नामदेवे केले स्वप्नामाजी जागे । सवे पांडुरंगे येऊनिया ॥१॥

सांगितले काम करावे कवित्व । वाउगे निमित्य बोलो नको ॥धृ॥

माप टाकी सळ धरिली विठ्ठले । थापटोनि केले सावधान ॥२॥

प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले शेवटी लावी तुका ॥३॥

द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥१॥

आवडीचा ठाव आलोंसे टाकून । आतां उदासीन न धरावे ॥धृ॥

सेवटील स्थळ निंच माझी वृत्ति । आधारे विश्रांती पावईन ॥२॥

नामदेवापायी तुक्या स्वप्नी भेटी । प्रसाद हा पोटी राहिलासे ॥३॥

तुकोबांचा स्वतःचा उध्दार झाला होता.आता त्यांना लोकोध्दार करावयाचा होता. त्यांना लाभलेला प्रसाद लोकांना वाटावयाचा होता. परमात्म्याचा संदेश, निरोप त्यांना घरोघर पोहोचावयाचा होता.

तुका म्हणे मज धाडिले निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥

  तुकोबांना कवित्वाची स्फूर्ती झाली.

यावरी झाली कवित्वाची स्फूर्ती । पाय धरिले चित्ती विठोबाचे ॥

 आणि तुकोबांचे मुखातून अभंगगंगा वाहू लागली. सभाग्यश्रोते श्रवण करू लागले.

बोलावे म्हणून बोलतो उपाय । प्रवाहेचि जाये गंगाजळ ॥१॥

भाग्य योगे कोणा घडेल श्रवण । कैचे तेथे जन अधिकारी ॥२॥

तुकोबांच्या अभंगातून श्रुतीशास्त्राचे मथित, महाकाव्य फलार्थ निघू लागला. आळंदीत श्रीज्ञानदेव  महाराजांच्या महाद्वारात तुकोबा कीर्तन करीत असता, ही प्रासादिक अभंगवाणी महापंडित रामेश्वरभट्टजी यांच्या कानावर जाऊन आदळली. त्यांना धक्काच बसला. ही गीताची किं मूर्तीमंत, किं नेणो श्रीमत् भागवत ॥ - ही प्रत्यक्ष वेदवाणीच आणि ती प्राकृतातून आणि ती तुकोबाच्या मुखातून !

तुकयाचे कवित्व ऐकून कानी । अर्थ शोधूनि पाहाता मनी ।

म्हणे प्रत्यक्ष हे वेदवाणी । त्याचे मुखे कानी न ऐकावी ॥

तरी यासी निषेधावे । सर्वथा भय न धरावे ॥

रामेश्वरशास्त्रींनी निषेध केला ते म्हणाले - “तुम्ही शूद्र आहात? तुमच्या अभंगवाणीतून वेदार्थ प्रगट होत आहे, तुमचा तो अधिकार नाही. तुमच्या मुखाने तो ऐकणे हा अधर्म आहे. तुम्हाला हा उद्योग कोणी सांगितला.” तुकोबा म्हणाले, “ही माझी वाणी नव्हे, ही देववाणी आहे.”

करितो कवित्व म्हणाल हे कोणी । नव्हे माझी वाणी पदरीची ॥१॥

माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥२॥

नेणे अर्थ काही नव्हती माझे बोल । विनवितो कोपाल संत झणी ॥१॥

नव्हती माझे बोल, बोले पांडुरंग । असे अंग संग व्यापुनिया ॥२॥

नामदेवराय आणि पंढरीराय स्वप्नात येऊन त्यांनी कवित्व करावयाची आज्ञा केली.

विप्र म्हणे आज्ञा कारण । श्रीची कैसे जाणेल जन ।

यालागी कवित्व बुडवून । टाकी नेऊन उदकात ॥१॥

तेथे साक्षात नारायण । आपे रक्षील जरी आपण ।

तरी सहजचि वेदाहून । मान्य होईल सर्वाशीं ॥१६॥

तुमचे कवित्व बुडवून टाका. देववाणी असेल तर देव तीच पाण्यात रक्षील. गावच्या पाटलाला रामेश्वरशास्त्रींनी तुकोबाच्या या अधर्माबद्दल कळविले. गावचा पाटील रागावला. लोक खवळले.

काय खावे आता कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥१॥

कोपला पाटील गावचे हे लोक । आता घाली भीक कोण मज ॥धृ॥

तुकोबांनी अभंगाच्या सर्व वह्या घेतल्या. दगड बांधून त्या इंद्रायणीच्या डोहात स्वहस्ते बुडविल्या. पूर्वी खत-पत्रे प्रपंच बुडविला, आता अभंगाच्या वह्या-परमार्थ बुडविला.

बुडविल्या वह्या बैसिलो धरणे ॥

     तुकोबांना असह्य दुःख झाल. लोक निंदा करू लागले. कसला दृष्टांत आणि कसला प्रसाद ! सगळ थोतांड. कसला देव आणि कसला धर्म ! तुकोबा महाद्वारात असलेल्या शिळेवर देवासमोर धरणे धरून बसले. प्राण पणाला लावला. निर्वाण मांडले. तेरा दिवस झाले. देव काही पावेना.

तेरा दिवस झाले निश्चक्र करिता । न पवसी अनंता मायबापा ॥

तुजवरी आता प्राण मी त्यजीन । हत्या मी घालीन पांडुरंगा॥

तुका म्हणे आता मांडिले निर्वाण । प्राण हा सांडीन तुज वरी ॥

इकडे रामेश्वरशास्त्री तुकोबांचा निषेध करून आळंदीहून निघाले ते नागझरीच्या उगमाजवळील पंचवटापाशी आले. ते  तेथे असलेल्या सरोवरात स्नानाकरिता उतरले. स्नान करीत असता त्या सरोवरातील पाणी नेण्याकरिता अनगड सिध्द फकीर आला. “आपण कोण ? कोठून आलात ?” म्हणून त्याने विचारले असता त्याला पाहाताच शास्त्रीबुवांनी कानात बोटे  घालून बुडी मारली- (यावनी भाषा ऐकावयाची नाही म्हणून) या कृत्याने अनगड सिध्दास राग आला व त्यांनी शाप दिला. रामेश्वरशास्त्री पाण्यातून बाहेर निघताच त्यांच्या अंगाचा दाह होऊं लागला. अंगाला ओले कपडे गुंडाळून फकिराच्या शापातून मुक्‍त होण्याकरिता शिष्या समवेत शास्त्री आळंदीला परतले व अजान वृक्षाखाली अनुष्ठान करीत बसले.

तो इकडे देहूस तेरावे रात्री भगवंताने सगुण बाळवेष धारण करून  तुकोबांना भेटले. आणि सांगितले की, “आपल्या वह्यांचे मी पाण्यांत अठरा दिवस अहोरात्र उभे राहून रक्षण केले आहे. त्या उद्या पाण्यावरती येतील.”  याप्रमाणे देहू गावच्या भाविक भक्‍तानांही दृष्टांत झाले. दृष्टांताप्रमाणे ही सर्व भक्तमंडळी इंद्रायणीच्या डोहावर गेली. तो काय सर्व वह्या पाण्यावरती आल्या व तरंगू लागल्या. पोहोणारांनी उडया टाकून त्या ऐल तीरावर आणल्या. त्यांना पाण्याचा यत्किंचितही स्पर्श झाला नव्हता. सर्वांनी जयजयकार केला. देवाला आपण त्रास दिल्याबद्दल तुकोबांना फार खेद वाटला.

थोर अन्याय मी केला । तुझा अंत म्यां पाहिला ॥

जनाचिया बोलासाठी । चित्त क्षोभविले ॥१॥

उदकी राखीले कागद । चुकविला जनवाद ।

तुका म्हणे ब्रीद । साचे केलें आपुलें ॥

       तिकडे आळंदीला रामेश्वरशास्त्रींना ज्ञानदेव महाराजांनी सांगितले की, “आपण तुकोबांची निंदानालस्ती केली त्याचे हे  फळ आहे. तरी यावर आता एकच इलाज आपण तुकोबांकडे देहूला जा.”  रामेश्वरशास्त्री देहूला निघाले, हे तुकोबांना समजले. तुकोबांनी आपल्या शिष्याजवळ शास्त्रीबुवाकरिता एक अभंग देऊन त्यास आळंदीला पाठविले तो अभंग रामेश्वरभटजींनी वाचताच त्यांचा दाह शांत झाला.

चित्त शुध्द तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥

दुःख तें देईल सर्व सुखफळ । होतील शितळ अग्निज्वाळा ॥

रामेश्वर भटजी यासंबंधी आपला अनुभव सांगतात.

काही द्वेष त्याचा करिता अंतरी । व्यथा हे शरीरी बहू झाली ॥

म्हणे रामेश्वर त्याच्या समागमें । झाले हे आराम देह माझे ॥

       रामेश्वर भट तुकोबांच्या दर्शनास देहूस आले आणि कथा कीर्तने ऐकण्याकरिता देहूलाच राहिले. रामेश्वर भटांना शापमुक्त केल्याचे वर्तमान अनगडशाहाला कळले, त्याला विषाद वाटला. तो तुकोबांचा छळ करण्याकरिता देहूस आला. तुकोबांचे घरी गेला. कटोराभर भिक्षा मागितली. तुकोबांच्या कन्या हिने चिमूटभर पीठ कटोऱ्यात टाकताच तो पूर्ण भरून पीठ खाली सांडले. सिध्दाचे सामर्थ्य तुकोबांचे द्वारी लयाला गेले. अनगडशहा भक्‍तिभावाने तुकोबांना भेटले व तुकोबांचे जवळ भजन कीर्तन ऐकण्याकरिता राहिले. दार्शनिक ज्ञान, पांडित्य ऋद्धी व सिद्धी , हरिभक्तीला शरण आल्या. असो. वह्या तरल्याचे शुभवर्तमान देशोदेशी पसरले; वह्या तरल्याने लोकापवाद टळला. अभंगवाणी अविनाशी ठरली; परमात्म्याचे सगुण दर्शन झाले तुकोबांच्या कथा कीर्तनाचा मार्ग मोकळा झाला.

⚜️ ६. तुकोबा आणि दोन संन्याशी

अवघा झाला रामराम । कोणी कर्म आचरेन ॥१॥

तुकोबांची कीर्तने नव्या जोमाने व उत्साहाने सुरू झाली. तुकोबांचे लोकाध्दाराचे व जनता जागृतीचे साधन भजन कीर्तन.

तुका म्हणे केली साधना गाळणी । सुलभ कीर्तनी होऊनी ठेला ॥४॥

भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेचा पण प्रेमसुख लुटले, गोकुळच्या लोकांनी तुकोबांचा जन्म देहूचा पण भक्‍तीप्रेम सुख लुटले लोहगावच्या लोकांनी. लोहगाव तुकोबांचे आजोळ. तुकोबांची कीर्तने नेहमी लोहगावला होत असावियीची. एकदा दोन संन्याशी तुकोबांच्या कीर्तनाला येऊन बसले. त्यांना काय दिसले- स्त्री- पुरुष, कथा- कीर्तन मोठया तल्लीनतेने ऐकत आहेत. लहान-थोर, ब्राह्मण, शूद्र एकमेकांच्या पाया पडत आहेत. भेदभाव नाहीसा झालेला आहे. हे दृश्य पाहून त्यांनी तुकोबांची  निंदा करून ब्राह्मणाची निर्भत्सना केली. तुम्ही कर्म भ्रष्ट झालात. कर्ममार्ग सोडून रामराम करत बसलात. ते तेथून निघाले. काखेतील मृगाजीन सावरत सावरत दाद मागण्याकरिता दादोजी कोंडदेवाकडे गेले.

काखे कडासन आड पडे । खडबड खडबड हुसकले ॥१॥

दाद करा दाद करा । फजीत खोरा लाज नाही ॥धृ॥

अवघा झाला रामराम । कोणी कर्म आचरेन ॥३॥

दाद करा दाद करा । फजीत खोरा लाज नाही ॥धृ॥

त्यांनी फिर्याद दिली की - “लोहगावच्या ब्राह्मणांनी ब्रह्मकर्म सोडून दिले आहे ते शूद्राचे चरणी लागले आहेत. आणि राम राम म्हणत आहेत. अधर्म माजलेला आहे. तरी आपण याचे परिपत्य केले पाहिजे.” दादोजींनी आपले सैनिक पाठवून ब्राह्मणांना १०० रुपये दंड केला. तुकोबांना आणि लोहगावच्या लोकांना यावयास सांगितले. तुकोबा लोहगावच्या लोकांसह पुण्यास संगमावर आले व कीर्तन आरंभिले. तुकोबा आल्याचे समजतांच संपूर्ण पुण्य नगरी तुकोबांचे दर्शनास व कीर्तनास लोटली. दादोजीही निघाले. दादोजी, तुकोबांचे कीर्तन ऐकत बसले. संन्याशीही बसले होते. त्यांना तुकोबा परमात्मा स्वरूप दिसू लागले. त्यांच्यावर एवढा प्रभाव पडला की, त्यांनी तुकोबांच्या चरणावर लोटांगण घातल. दादोजींने त्यांना त्यांच्या कृत्याचा जाब विचारला की, “ब्राह्मण शूद्राच्या पाया पडतात, अधर्म होतो अशी फिर्याद आपण देता आणि आपण पाया पडता हे काय?” ते म्हणाले, “आम्हाला कीर्तनात तुकोबांमध्ये नारायण दिसले. ” स्वतः दादोजीने तुकोबांचा सत्कार केला आणि संन्याशांची फटफजिती करून त्यांना शहराबाहेर हाकलून दिले.

☸️ ७. धरणेकरी

बीड परगण्याचा देशपांडे उतारवयांत त्याला वाटू लागले की, आपण पंडित व्हावे. या वयात पाठपाठांतर अभ्यास करून पंडित होण अशक्य म्हणून तो आळंदीला ज्ञानदेव  महाराजांच्या जवळ धरणे धरून बसला. ज्ञानदेव  महाराजांनी त्याला सांगितले, “बाबा, तू देहूला तुकोबांकडे जा. कोर्ट सध्या तेथे आहे.” त्याप्रमाणे तो देहूस आला. ते समयी तुकोबांनी एकतीस अभंग केले. देवाचा धांवा अभंग सात आणि उपदेश अभंग अकरा तुकोबांचा बोध, विचारसरणी, उपदेशाची पध्दत आणि तत्त्वज्ञान यांतून अभंगाच्या गटात साकल्याने पाहावयास मिळते. तुकोबांनी प्रथम देवाकडे धाव घेतली. देवा तुम्हाला न सांगताहि अंतरातलं गुप्त कळू शकत. तेव्हा अभयदान देऊन आळीकराचे समाधान करा आणि आपली लाज आपण राखा.

न सांगता कळे अंतरीचे गुज । आता तुझी लाज तुज देवा ॥१॥

आळीकर त्यांचे करी समाधान । अभयाचे दान देऊनी ॥२॥

धरणेकऱ्यास उपदेश

    पोथ्या, पुस्तक आणि ग्रंथ पाहण्याच्या भानगडीत आता पडू नको. ताबडतोब तू आता हेच एक कर. देवाकरिता देवाला आळव. म्हातारपण आलेले आहे तेव्हा आता उशीर किती करावयाचा ?

देवाचिये चाडे आळवावे देवा । वोस देहभाव पाडोनियां ॥१॥

तू मनाला गोविंदाचा छंद लाव मग तूच गोविंद होशील.

गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥

मग गोविंद ते काया । भेद नाही देवा तया ॥१॥

    सुखाने अन्न खा आणि परमात्म्याचे चिंतन कर. हरीकथा ही माउली आहे. आणि सुखाची समाधि आहे. शिणलेल्याची साऊली, विश्रांति स्थान आहे.

सुखाची समाधि हरीकथा माऊली । विश्रांति साऊली शिणलियांची ॥१॥

  इतरांनी उपास करावा. विठ्ठलाचे दासाने चिंता झुगारून द्यावी- आमच्या अंगात सगळे बळ आले आहे. तुकोबांनी हा बहुमोल उपदेश त्या धरणेकऱ्यास केला - त्याने मूर्खपणाने काय केल-

देवाचे उचित एकादश अभंग । महाफळ त्याग करोनि गेला ॥

🚩 ८. छत्रपती शिवाजी आणि तुकोबा

    तुकोबांची कीर्ती शिवाजी राजे यांच्या कानावर गेली. त्यांनी तुकोबांना दिवटया, छत्री घोडे आणि जडजवाहीर सेवकाबरोबर पाठवून दिले. तुकोबांनी त्याचा स्वीकार केला नाही. सोबत चार अभंगांचे पत्र देऊन तो नजराणा  शिवाजी राजांकडे परत पाठविला. ते देवास म्हणाले,

नावडे जे चित्ता । ते तू होशी पुरविता ॥१॥

     दिवटया, छत्री, घोडे ही काही मला फायद्यात पडणारी नाहीत (किंवा ह्यांच्यांत मी पडणारा नव्हे) देवा तूं मला यात कशाला गुंतवतोस? तुकोबांच्या ह्या निरपेक्षतेच शिवाजी राजे यांना आश्चर्य वाटलं व ते स्वतः तुकोबांचे भेटीला वस्त्रे,  भूषणे, अलंकार, मोहरा घेऊन सेवकांसह लोहगावला आले, ते राजद्रव्य पाहून तुकोबा म्हणाले -

काय दिला ठेवा । आम्हा विठ्ठलचि व्हावा ॥१॥

तुम्ही कळले ती उदार । साठी परिसाची गार ॥२॥

तुका म्हणे धन । आम्हा गोमांसासमान ॥३॥

  मुंगी आणि राव आम्हाला दोन्ही सारखेच आहे. त्याचप्रमाणे सोने आणि माती ही आम्हाला समानच वाटते.

मुंगी आणि राव । आम्हा समानचि जीव ॥१॥

सोने आणी माती । आम्हा समानचि चित्ती ॥२॥

आम्ही या गोष्टीने सुखी होणार नाहीत तर आपण देवाचे नाव घ्या. श्रीहरीचे सेवक म्हणवा.

आम्ही तेणे सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ॥१॥

म्हणवा हरिचे दास । तुका म्हणे मज हे आस ॥२॥

तुकोबांच्या उपदेशांनी प्रभावित होऊन राजांनी राज्यच सोडून दिले आणि तुकोबांचे भजन कीर्तन श्रवण करू लागले, तेव्हा तुकोबांनी त्यांना आणि त्यांच्या सेवकांना क्षात्र धर्म सांगीतला :

आम्ही जगाला उपदेश करावा । आपण क्षात्रधर्म सांभाळावा ॥

भांडण पडले असता सेवकांनी स्वामीच्या पुढे व्हावे ।

स्वामीपुढें व्हावें पडतां भांडण ॥

   गोळया, बाण यांचा वर्षाव होत असतां सैनिकांनी तो सहन करावा. आपले संरक्षण करून शत्रूला फसवावे. आणि त्याचे सगळे हिरून घ्यावे. शत्रूला आपला माग लागूं देऊ नये. आपण स्वामीकरिता जीवावर उदार असावे, असे ज्याचे सैनिक- सेवक आहेत तोच त्रैलोक्यांतील सामर्थ्यवान राजा होय.

तुकोबांनी शिवाजी राजे यांना आशीर्वाद देऊन निरोप दिला. राजे आणि सैनिक यांनी तुकोबांचा उपदेश चित्तात धरला, प्रत्यक्ष कृतीत उतरवला. तुकोबांच्या आशीर्वादाने ते सामर्थ्य संपन्न महाराजे झाले.

🌀 ९. तुकोबांचा बोध उपदेश शिकवण

माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव । आपणचि देव होय गुरु ॥१॥

   ज्ञानमार्गात गुरुची महती विशेष भक्‍तिमार्गात तितकी नाही.

  मेघवृष्टीने करावा उपदेश । परि गुरुने न करावा शिष्य  ॥

   या विचारसरणीचे तुकोबा. अद्वैत शास्त्राची तुकोबांना मुळीच आवड नसे.

अद्वैताची वाणी । नाही ऐकत मी कानी ॥१॥

  तुकोबांचे सगुणावर प्रेम विशेष. यामुळे महाराज श्रीगुरूस शरण गेले नाहीत.

अद्वैतशास्त्र नावडे यासी । यास्तव शरण न जाय सद्‍गुरुशी ॥

पुढे वाट पडेल ऐसी । गुरु भक्तीशी अवरोध ॥

एक श्रेष्ठ आचरला जैसे । जन पाहोनि वर्तती तैसे ॥

तरी आपण धरूनि विप्रवेश । द्यावा तुकयासी अनुग्रह ॥

स्वप्नामध्ये तुकोबा इंद्रायणीचे स्नान करून देवळात जात असता त्यांनी रस्त्यात एक ब्राह्यण पाहिला व त्याला नमस्कार केला. ब्राह्मणाने संतुष्ट होऊन तुकोबांच्या मस्तकावर हात ठेवला व ‘रामकृष्ण हरि’ मंत्र दिला. आपली परंपरा सांगितली. माघ शुध्द दशमीस गुरूवारी ही घटना घडली.

सापडविले वाटे जात गंगास्नाना । मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥२॥

राघव चैतन्य केशव चैतन्य । सांगितली खुण मालिकेची ॥४॥

बाबाजी आपुले सांगितले नाम । मंत्र दिला रामकृष्ण हरि ॥५॥

माघ शुध्द दशमी पाहोनि गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥६॥

तुकोबांनी स्वतः कोणापाशी मंत्राची याचना केली नाही. ते म्हणतात

नाही म्या वंचिला मत्र कोणापाशी । राहिलो जिवाशी धरोनिया ॥१॥

तुकोबा म्हणतात, मला कान फुंकण्याचे माहीत नाही व मजजवळ एकांतीचे ज्ञान नाही. पण जो देव कोणी डोळयांनी पाहिला नाही तो आम्ही दाखवू.

नेणो फुंको कान । नाही एकांतीचे ज्ञान ॥२॥

नाही देखिला तो डोळा । देव दाखवू ते कळा ॥३॥

प्रपंचामध्ये प्रभूचे अधिष्ठान असल्याखेरीज देव आपलासा केल्याखेरीज जीवांना सुख होणार नाही.

आपुला तो एक देव करोनी घ्यावा । तेणे विन जीवा सुख नोहे ॥२॥

तुम्ही माझा अनुभव पाहा

माझा पहा अनुभव । केला देव आपुला ॥१॥

बोलवले तेची द्यावे । उत्तर व्हावे ते काळी ॥२॥

हा अनुभव कशाचा म्हणाल तर-

हा गे माझा अनुभव । भक्तीभाव भाग्याचा ॥१॥

ऋणी केला नारायण । नोहे क्षण वेगळा ॥२॥

   दैवाच्या लीलेने तुकोबांचा संसार रसातळाला नेला.देवाच्या लीलेने तुकोबांनी गौरीशंकर गाठल. दैव अनिर्बंध आहे त्याला कशाचेही बंधन नाही. देवाला बंधन आहे कशाच ? तर प्रेमाच.

प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातो हरी ॥१॥

ते प्रभू प्रेम स्मरणाने मिळते.

आम्ही घ्यावे तुझे नाम । तुम्ही आम्हा द्यावे प्रेम ॥

  संताच्या गावीही प्रेमाचा सुकाळ असतो.

संताचिये गावी प्रेमाचा सुकाळ । नाही तळमळ दुःख लेश ॥१॥

संताच्या व्यापारात, उपदेशाच्या पेठेत प्रेमसुखाची देवाण- घेवाण चाललेली असते.

संतांचा व्यापार उपदेशाची पेठ । प्रेमसुखासाठी देती घेती ॥

  येऱ्हवी हे भक्‍ती प्रेमसुख काय आहे, हे पंडितांना, ज्ञानियांना, मुक्‍तांना माहितही नाही आणि कळत नाही.

भक्ति प्रेम सुख नेणवे आणिका । पंडिता वाचका ज्ञानियासी ॥

या प्रेमाने समाज सांधला जाईल. प्रेमाच्या बंधनाने समाज बांधला जातो. प्रेमात सर्व भेद-आपपरभाव नाहीसे होतात. प्रेमानें जीवन सुखी समृध्द होतें. असें हें दिव्य दैवी प्रेम प्रभुस्मरणानें मिळेल. संताचे सान्निध्यात मिळेल.प्रेमात दुःखाचे रूपांतर सुखांत होईल. मनुष्य जीवन संपूर्ण पालटून जाईल.

*उपदेश*

उपदेश तो भलत्या हाती । झाला किती धरावा ॥

आता तरी पुढे हाची उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ॥

मोलाचे आयुष्य जाते हातोहात । विचारी पाहात लवलाही ॥

गात जातो तुका । हाचि उपदेश लोका ॥

तुका म्हणे हित होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे ॥

आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिये ॥

कुळी कन्या पुत्र होती जे सात्त्वि । तयाचा हरीख वाटे देवा ॥

गीता भागवत करीती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचे ॥

हित ते करावे देवाचे चिंतन । करोनियां मन शुध्द भावे ॥

तुका म्हणे फार । थोडा तरी उपकार ॥

संतसंग

संग न करावा दुर्जनांचा । करी संतांचा सायास ॥

पतन उध्दार संतांचा महिमा । त्यजावे अधमा संत सेवी ॥

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदासे विचारे वेच करी ॥

  तुकोबांची शिकवण सुविचाराची, सदाचाराची आणि समतेची होती. प्राणिमात्राचे कल्याण होण्याकरिता ते कोणाची भीडभाड ठेवीत नसत.

नाही भिडभाड । तुका म्हणे सानाथोर ॥

तीक्ष्ण उत्तरे । हाती घेऊनि बाण फिरे ॥

तुका म्हणे लासू फासू देऊ डाव । सुखाचा उपाय पुढे आहे ॥

👬🏻 १०.  तुकोबांचे ध्रृपदे, टाळकरी, अनुयायी व शिष्य

तुकोबांचे मुख्य धृपदे टाळकरी १४ होते म्हणून महीपतीबाबाने त्याचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तुकोबांचे कीर्तनात हे ध्रृपद धरीत.

१. महादजीपंत कुलकर्णी देहू गावचे कुलकर्णी - याचा उल्लेख बहिणाबाईचे गाथेतही  

   आलेला आहे - देवालयाच्या बांधकामावर यांची देखरेख होती.

२. गंगाधरबाबा मवाळ - (तळेगाव), अभंग लेखक, हे तुकोबांचे सेवेस लागल्याचा     

   कागदोपत्री उल्लेख आहे.     

३. संताजी जगनाडे - (चाकणकर) - तुकोबाचे अभंग लेखक.

४. तुकया बंधू कान्होबा.      

५. मालजी गाडे, (येलवाडी) - तुकोबांचे जामात.

६. कोंडोपंत लोहकरे - लोहगाव.

७. गवार शेट वाणी - सुदुंबरे.

  ८. मल्हारपंत कुलकर्णी - चिखली.  

  ९.  आबाजीपंत लोहगावकर.

  १०.रामेश्वरभट्ट बहुळकर.

  ११.कोंडपाटील, लोहगाव.

  १२.नावजी माळी - लोहगाव.

  १३.शिवबा कासार - लोहगाव.

  १४.सोनबा ठाकूर - कीर्तनांत मृदंग वाजवीत असत.

तुकोबांची शिष्या बहिणाबाई यांना तुकोबांचा स्वप्नात उपदेश झाला. त्या देहूस दर्शनाकरिता आल्या, कवित्वस्फूर्ती बाईंना देहूस झाली. बहिणाबाईंनी तुकोबाची कथा कीर्तने प्रत्यक्षांत ऐकली. मंबाजीकडून यांना बराच त्रास पोहोचला. बहिणाबाईंची योग्यता अधिकार तुकोबांचे खालोखाल होता. बहिणाबाईंची अभंगाची गाथा एकदा तरी वाचून पाहावीच.

🕯️ ११. प्रयाण

    कार्तिक वद्य एकादशीला आळंदीस ज्ञानदेव  महाराजांचे पुढे तुकोबाचे कीर्तन चालले होते. यात्रा अपार होती. कीर्तनाचा अभंग होता.

भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनू ॥१॥

   शरीर कोठे ब्रह्म होईल काय? कोणी केले आहे काय? असे आत्मानात्म विचारकर्ते, ज्ञानी जे श्रोते होते त्यांनी तुकोबाला विचारले. तुकोबा म्हणाले, ‘मी करून दाखवीन.’

घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्याहाती । मुक्ता आत्मस्थिती सांडवीन ॥

ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी । भाग्य तरी ऋणी देवा ऐसा ॥

     लोहगावला तुकोबांचे कीर्तन चालू असताना परचक्र येऊन लोहगाव लुटले. तुकोबांनी देवाचा धावा केला.

न देखवे डोळा ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होते ॥१॥

देव ताबडतोब पावले नाहीत. तुकोबांनी देवाला सांगितले.

तुज भक्ताची आण देवा । जरी तुका येथे ठेवा ॥१॥

तिसरी गोष्ट - ज्ञानदेव  महाराजांनी तुकोबांची अपार सेवा केली त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरिता ज्ञानदेव  महाराज जिजाईचे पोटी आले. तुकोबाने ओळखले की, देव सेवा करू पाहातात हे बरें नव्हे आपणच येऊन जावे सर्वाची विचारपूस केली, सर्वाना सांगितले, ‘आम्ही वैकुंठाला जात आहोत. तुम्ही माझ्याबरोबर वैकुंठाला चला’ कोणी तयार झाले नाही. महाराज सर्वासमवेत इंद्रायणीच्या काठी आले तेथे नांदुरुखीचे वृक्षाखाली कीर्तनास आरंभ केला. १४ टाळकऱ्यांनी क्षेमालिंगन दिले तुकोबांचे चिरंजीव महादेव विठोबा पुढे आले त्यांनी तुकोबांना नमस्कार केला. तुकोबांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला. जिजाबाईकडे कौतुकाने पाहिले. सगळयांना सांगितले-

सकळही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावे तुम्ही ॥

वाढवेळ झाला उभा पांडुरंगा । वैकुंठा श्रीरंग बोलावतो ॥

आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥

अंतःकाळी विठो आम्हांसी पावला । कुडीसहित झाला गुप्त तुका ॥२॥

    भगवत्‌कथा करीत असता तुकोबा अदृश्य झाले. याचा उल्लेख राज्याभिषेक शके ३० च्या सनदेत आहे. श्री तुकोबा गोसावी सत्पुरुष हे मौजे देहू ता. हवेली , जि. पुणे येथे भागवत कथा करीत असता अदृश्य झाले हे गोष्ट विख्यात आहे.रा.तुकोबा गोसावी हे बहुत थोर सत्पुरुष होते. इ.स.१७०४ च्या देहूगावची सनद. सनद रामचंद्र नीळकंठ अमात्यांचे हातची आहे.रामचंद्र पंत छत्रपती शिवाजी राजे यांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य या पदावरील एक प्रधान होते.

शके पंधराशे एकाहत्तरी । विरोधी नाम संवत्सरी ।

फाल्गुन वद्य द्वितीया सोमवारी । प्रथम प्रहरि प्रयाण केले ॥२॥

“तुकोबा गोसावी वैकुंठास गेले. स्वदेहीनिशी गेले. ” बाळोजी तेली जगनाडे वही, पृ. २१६, संताजींच्या वहीची नक्कल. संताजी प्रयाण समयी प्रत्यक्ष हजर होते.

    तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्वत्र मंडळी शोकसागरात बुडाली. तुकोबांची मुले, बंधू, अनुयायी तेथेच बसून राहिले. पंचमीला तुकोबांचे टाळ, पत्र, कथा आकाशमार्गे आली. रामेश्वरशास्त्रींनी निर्णय दिला. तुकोबा सदेह वैकुंठाला गेले. सर्वानी स्नाने उरकली. तुकोबांची मुले, बंधू कान्होबा देवाशी भांडले. ‘देवा तू माझ्या बंधूला आणून दे. वैकुंठाला नेऊ नकोस.’ देवाने कान्होबाचे समाधान केले.

१२. तुकोबांच्या पश्चात्‌

तुकोबा देहासह वैकुंठास गेल्याचे वर्तमान ऐकून शिवाजीराजे विस्मय पावले. तेव्हा त्यांनी देहू येथील जानोजी भोसले याच्याजवळ तुकोबांच्या कुटुंबियांची विचारपूस केली व तुकोबांचे वडील पुत्र महादेवबुवा यांना भेटी घेऊन येण्याविषयीची आज्ञा केली. जानोजी भोसले महादेव बाबास घेऊन शिवाजी राजे यांचेकडे गेले. शिवाजी राजे यांनी महादेवबाबास वर्षासन “एक खंडी धान्य व लुगडयाकरितां एक होनाची सनद करून दिली.” संभाजी राजे यांनी हे वर्षासन पुढे चालू ठेवले.

तुकोबांचे वैकुंठ गमनानंतर नारायण महाराजांचा जन्म झाला. नारायण महाराज ज्ञानदेव  महाराजांचे अवतार असल्यामुळे दोघे वडील बंधू महादेवबुवा विठोबा नारायणरावांच्या आज्ञेत असत. मातोश्री असेपर्यत एकत्र होते. मातोश्रीचा काल जाहल्यावर विठ्ठलबुवा, नारायणबुवा, जिजाबाईंच्या अस्थी घेऊन महायात्रेला गेले. महादेवबुवा श्री विठ्ठलदेवाची पूजाअर्चा नित्य नियम सांभाळून होते. महादेवबाबांनी तुकोबांचे अभंग लिहिले आहेत. नारायणबाबा प्रथम सरंजामी - सरदारी थाटाने राहू लागले. त्यांचे भेटीस संताजी पवार आले. त्यांनीं नारायणबाबास धिःकारले. बाबांनी घर ब्राह्मणाकडून लुटविले. तपश्चर्या केली. अरण्यवास पत्करला. विठोबाचें भव्य देऊळ बांधलें.

तुकाराम तो आधीच गेले होते वैकुंठा ।बहु दिवसांनी मग वैराग्य झालें नीळकंठा ॥१॥

तुकयाचा नंदन मागे नारायणबाबा ।दर्शन त्याचे घेऊनि म्हणती सुसंग लाभावा ॥२॥

निळोबा गोसावी पिंपळनेरकर बाबांच्या दर्शनास आले. बाबांनी त्यांना साद्यंत तुकोबांचे चरित्र सांगितलें निळोबांना घेऊन ते तीर्थयात्रेला गेले. निळोबांनी तुकोबांचे भेटीकरिता ४२ दिवसाचे निर्वाण मांडले. तुकोबा भेटले.

येऊनियां कृपावंते । तुकया स्वामी सदगुरूनाथें ॥१॥

हात ठेविला मस्तकीं । देऊनी प्रसाद केले सुखी ॥२॥

निळोबांना कवित्वाची स्फूर्ती झाली. त्यांनीही अनेक अभंग केलेत. नारायणबाबा थोर तपस्वी हरिभक्त म्हणून सनदा पत्रात उल्लेख आढळतो. बाबांच्या दर्शनास तडीतापडी संन्याशी, यात्री येऊ लागले. बीजेचा महोत्सव होऊं लागला. त्यांना बाबांना अन्नदान करावे लागे. त्याकरिता इ. स. १६९१ मध्ये छत्रपति राजाराम महाराजांनी नारायणबाबांना येलवाडी गांव इनाम दिला. पुढे देहू किन्हई ही गांवे देवाच्या महोत्सवाकरिता पूजा-अर्चा, अन्नछत्राकरितां बाबांना छत्रपती दुसरे शिवाजी आणि शाहू महाराज यांचेकडून मिळाली. शाहू महाराज आणि राणी सरवारबाई बाबांना गुरूचे ठिकाणी मानीत असत. नारायण महाराजांनी तुकोबांची पालखी सोहळा आषाढी वारीस सुरू केला. बाबांनीं देवस्थान नांवारूपास आणले. सांप्रदाय वाढविला. औरंगजेबाचा तळ महाराष्ट्रात पडला असता पंढरपूरच्या आणि शिंगणापूरच्या यात्रेकरूना होणारा उपद्रव थांबविला. बाबा शके १६४५ श्रावण शुध्द चतुर्थीस वैकुंठवासी झाले. त्यांच्या अस्थी घेऊन महादेवबाबांचे चिरंजीव आबाजी बाबा काशीयात्रेस गेले.

  गंगोदकाची कावड घेऊन आबाजीबाबा देहूस आले. दरम्यान विठ्ठलबाबांचे चिरंजीव उध्दवबाबा हे या समयी शाहू तुकोबांच्याजवळ होते. ते देहूस आले. त्यांनी देवस्थान संस्थानचा कारभार हाती घेतला. आबाजीबाबांचे ताब्यात देवस्थाने ते देईनात. आबाजी बाबा हेही वैराग्यसंपन्न तपस्वी हरिभक्ती रत होते. आबाजीबाबा नंतर त्यांचे चिरंजीव महादेवबाबा हेहि देवस्थान संस्थानाकरितां भांडले. भांडण वडीलपणाच, देवाकरिता होत, संस्थानाकरिता  नव्हत. सरकारने विशेष लक्ष घातले नाही. तेव्हा महादेवबाबा देहू सोडून देवाकरिता संप्रदायाकरिता पंढरपूरला येऊन राहिले. भक्‍त देवाकडे आले. यांनी तुकोबांच्या अभंगांचे संकलन करून गाथा तयार केली, देहूकरांच्या फडाची परंपरा चालविली. त्यांचे चिरंजीव वासुदेव महाराज देहूकर यांनी पंढरीच्या ठिकाणी वारकरी सांप्रदायाचे कार्य भरीव असे केले व त्यांचेंच वेळी अनेक लहानमोठे फड नांवारूपास आले व वारकरी पंथाची परंपरा अधिकाधिक वाढू लागली. कर्नाटकापर्यंत संप्रदाय वाढविला. त्यांचे चिरंजीव वासुदेवबाबा यांनी फड नावारूपास आणला तुकोबाचे पणतू गोपाळबुवा हेहि साक्षात्कारी होते.

तुकोबांचें चरित्र लिहिले, हे त्यांचे महान कार्य होय. देहू संस्थानने घराण्याची आषाढी कार्तिकीची पंढरपूरच्या वारीचा पालखी सोहळा आजतागायत अखंड चालू ठेवला. देहूकर मंडळीनी गावोगावी कथा, कीर्तने करून वारकरी संप्रदाय वाढविला. संप्रदायाची व कुलदेवतेची अमोल सेवा केली. आजही सर्वजण,

अमृताची फळे अमृताचे वेली । तेची पुढे चाली बीजाचिहि ॥१॥

हे तुकोबांचे वचन सार्थ करून दाखवीत आहेत.                            🚩 जय जय पांडूरंग हरी... 🚩
🙏🌸 विनम्र अभिवादन 🌸🙏

       ♾♾♾ ♾♾♾
       स्त्रोत ~ Tukaram.com                                                                                                                                                                                ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

मंगळवार, ८ मार्च, २०२२

जागतिक महिला दिन

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
      🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
            ▬ ❚❂❚❂❚ ▬
संकलन ~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
    👩🏻‍🎓🏃🏻‍♀👮‍♀👩‍🎓👸🏻👩‍🚀👩🏻‍🔬💃👩🏻‍⚖️
                ८ मार्च
       जागतिक महिला दिन  

 
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
                    दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

इतिहास
                 संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.
              त्यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.

🇮🇳 भारतात
भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.
                    १९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले.

महिला दिन
मातृदिन
काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात.

🌹 शुभेच्छा देण्याची पद्धती
इटलीमध्ये या दिवशी ; पुरुष महिलांना पिवळ्या मिमोसासची फुले भेट देऊन शुभेच्छा देतात. महिला दिन हा आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगून त्याचा गौरव करण्याचा दिवस आहे.                                                                                 तुम्हीसुद्धा 8 मार्चच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची तयारी करत असाल ना. कदाचित आतापर्यंत काहींना शुभेच्छाही पाठवल्या असतील.🌹🌷🌺

मात्र, आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा केला जातो आणि याची सुरुवात कधी झाली, हे तुम्हाला माहिती आहे का ?
                          जगभरात गेली कित्येक वर्ष लोक 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतात. मात्र, या सगळ्याची सुरुवात कशी झाली?

जागतिक महिला दिन कधी सुरु झाला ?
                    आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदय एका कामगार आंदोलनातून झाला. 1908 साली याची पहिली ठिणगी पडली होती. यावर्षी 15 हजार महिलांनी न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली होती.
                 याशिवाय त्यांच्या इतर प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या होत्या - चांगलं वेतन मिळावं आणि मतदानाचा अधिकार मिळावा.
       या आंदोलनाच्या वर्षभरानंतर अमेरिकेतल्या सोशालिस्ट पक्षाने 8 मार्च हा पहिला राष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला.

हा दिवस आंतरराष्ट्रीय म्हणून साजरा करण्याची कल्पना कशी सुचली ?
                   ही कल्पनासुद्धा एका स्त्रीचीच होती. क्लारा जेटकीन यांनी 1910 साली कोपनहेगन मध्ये झालेल्या काम करणाऱ्या महिलांसाठीच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्या परिषदेत 17 देशांच्या 100 महिला सहभागी झाल्या होत्या. त्या सर्वांनीच प्रस्तावाला अनुमोदन दिलं.
                 सर्वप्रथम 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला होता. मात्र, तांत्रिकदृष्ट्या यावर्षी आपण 109 वा जागतिक महिला दिन साजरा करत आहोत.
                   1975 साली संयुक्त राष्ट्रांनी हा एक वार्षिक उत्सव म्हणून थीमसह साजरा करायला सुरुवात केली. त्यावेळी या जागतिक महिला दिनाला अधिकृत मान्यता मिळाली.
            पहिल्या जागतिक महिला दिनाची थीम होती 'Celebrating the Past, Planing for the Future' (भूतकाळाचा आनंद, भविष्यासाठी योजना).

8 मार्च हीच तारीख का ?
                8 मार्च रोजीच महिला दिन का साजरा करतात, हा प्रश्न तर तुम्हालाही पडला असेल. खरंतर क्लारा जेटकीन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी कुठलीही तारीख निश्चित केलेली नव्हती.

🙋‍♀ महिला दिन
           1917 साली युद्धादरम्यान रशियाच्या महिलांनी 'ब्रेड आणि पीस' (भाकरी आणि शांतता) अशी मागणी केली. महिलांनी केलेल्या कामबंद आंदोलनाने सम्राट निकोलसला पद सोडायला भाग पाडलं आणि त्यानंतर आलेल्या हंगामी सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला.
                   त्यावेळी रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरलं जायचं. ज्या दिवशी महिलांनी कामबंद आंदोलन पुकारलं ती तारीख होती 23 फेब्रुवारी. ग्रेगरियन कॅलेंडरनुसार हा दिवस 8 मार्च होता आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनही असतो का ?
तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र, आंतरराष्ट्रीय पुरुष दिनही असतो. जागतिक पुरूष दिवस 19 नोव्हेंबर रोजी साजरा करतात. 1990 सालापासून आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करायला सुरुवात झाली. मात्र, संयुक्त राष्ट्रांनी अजून त्याला अधिकृत मान्यता दिलेली नाही.
                60 हून जास्त देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. पुरुषांचं आरोग्य, जेंडर रिलेशन, लैंगिक समानता आणि सकारात्मकतेला चालना देणं, हा यामागचा उद्देश आहे.

जगभरात कसा साजरा होतो आंतरराष्ट्रीय महिला दिन ?
अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी सरकारी सुट्टी असते. रशिया आणि इतर काही देशांमध्ये या दिवसाच्या आसपास फुलांचे दर वधारतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनाला स्त्री-पुरुष एकमेकांना फुलं देतात.

चीनमध्ये अनेक कार्यालयांमध्ये महिलांना हाफ डे म्हणजे अर्ध्या दिवसाची रजा मिळते. तर अमेरिकेत संपूर्ण मार्च महिना 'Women's History Month' म्हणून साजरा करतात.

🤷🏻‍♀   जागतिक महिला दिनाच्या  हार्दिक शुभेच्छा...!!                             🙏🌹 सस्नेह वंदे 🌹🙏                                                                                                                                                                  ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

गुरुवार, ३ मार्च, २०२२

सुप्रभात

आपले आयुष्य इतके छान, सुंदर, आणि आनंदी बनवा की, निराश झालेल्या व्यक्तींना तुमच्याकडे पाहून जगण्याची नवी उमेद मिळायला पाहिजे.

When life gives you hundred reasons to cry,  show to life that you have thousand reasons to smile.

नाते कधीच संपत नाही, बोलण्यात संपले तरी डोळ्यांत राहते, आणि डोळ्यांत संपले तरी मनात मात्र कायम राहते.

स्वतः सोबत जेव्हा दुसऱ्याच्या मनाचा देखील जेथे विचार केला जातो, तेथेच माणुसकीचे सुंदर नाते तयार होते.

सहजता से निभे, वे ही रिश्ते सुखद होते है, जिन्हे निभाना पडता है, वो केवल दुनियादारी होती है ।

जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात, काही फायदा घेतात, तर काही आधार देतात, मात्र फायदा घेणारे डोक्यात, रहातात आणि आधार देणारे हृदयात राहतात.

आपके पास कितने सारे मित्र है उससे कोई फरक नही पडता, जरूरत पडने पर कितने काम आएंगे, वो महत्वपूर्ण है ।

लोकांचा जास्त विचार करणे सोडून द्यायला शिका, कारण ज्याच्याकडे काही नाही त्याला लोक हसतात, आणि ज्याच्याकडे सर्वकाही आहे त्याच्यावर जळतात.

भूतकाळात घडलेल्या सर्व गोष्टींना विसरून, आपल्या आयुष्यात आलेल्या नवीन क्षणांचे हसत स्वागत करणे म्हणजेच खरी सकाळ असते.

बुधवार, २ मार्च, २०२२

सरोजीनी नायडू

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन :  श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                              
   ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                           ⚜️✍📚🇮🇳👨🏻🇮🇳📚✍⚜️

           भारतिय कोकिळा
             सरोजिनी नायडू


     जन्म : 13 फेब्रुवारी 1879       
       (हैद्राबाद, आंध्रप्रदेश)
     मृत्यु : 2 मार्च 1949
       (अलाहाबाद, उत्तरप्रदेश)

पति : डॉ. एम. गोविंदराजलु नायडू
मुलं : जयसूर्य, पद्मजा नायडू, रणधीर आणि लीलामणि
विद्यालय : मद्रास विश्वविद्यालय, किंग्ज़ कॉलेज लंडन, गर्टन कॉलेज कैम्ब्रिज
नागरिकत्व  : भारतीय
पुरस्कार उपाधी : केसर ए हिंद
रचना : द गोल्डन थ्रेशहोल्ड, बर्ड ऑफ टाईम, ब्रोकन विंग

भारताची कोकिळा सरोजीनी नायडु त्या अमर आत्म्याचे नाव आहे ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य समरात आपले महत्वपुर्ण योगदान दिले. सरोजिनी नायडु त्या क्रांतिकारी महिलांपैकी एक आहेत ज्यांनी गुलामगिरीत अडकलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता प्रचंड संघर्ष केला.

सरोजिनी नायडू एक उत्तम राजकारणी आणि महान स्वातंत्र्य सेनानी होत्या या शिवाय त्या एक फेमिनिस्ट, कवयित्री, आणि आपल्या काळातील एक महान वक्त्या देखील होत्या. त्यांचे भाषण ऐकुन मोठ मोठे दिग्गज देखील मंत्रमुग्ध होऊन जात. त्या इंडियन नॅशनल कॉंग्रेस च्या पहिल्या प्रेसिडेंट होत्या. त्या उत्तरप्रदेशाच्या राज्यपाल म्हणुन नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतिय महिला होत्या.

भारतिय स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांना भारताची नाइटिंगेल व भारताची कोकिळा देखील म्हंटल्या जात होतं. त्यांच्या कवितांमधे लहान मुलांच्या, निसर्गाच्या, देशभक्तीच्या, प्रेमाच्या आणि मृत्युच्या कविता आहेत विशेषतः लहान मुलांच्या कविता करण्याकरीता त्या प्रसिध्द होत्या. त्यांच्या कविता वाचुन अधिकतर लोक आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये रममाण होत असत त्यांच्या कवितांमधे एक खोडकरपणा आढळुन यायचा त्यांच्या कवितांमध्ये त्यांच्या लहानपणाची झलक सापडायची आणि म्हणुनच त्यांना ’भारताची कोकिळा’ म्हंटले जात होते.

वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षीच सरोजिनीं मधली प्रतिभा दिसायला लागली या लहान बालिकेच्या कविता वाचुन प्रत्येकजण आश्चर्यचकीत व्हायचा. त्यांनी तेव्हांपासुनच वृत्तपत्रांमधे लेख आणि कविता लिहीण्यास सुरूवात केली होती. देशप्रेमाची भावन देखील त्यांच्यात ओतप्रोत भरली होती आणि म्हणुनच राष्ट्रीय आंदोलना दरम्यान त्या महात्मा गांधीच्या सोबत होत्या, त्यांच्या समवेत त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात हिरीरीने सहभाग घेतला.

सरोजिनी नायडुंची कन्या पद्मजा हिने देखील स्वातंत्र्य संग्रामात सहभाग नोंदवला आणि ती भारत छोडो आंदोलनाचा हिस्सा होती. आज जेव्हां ही भारताच्या महान क्रांतिकारी महिलांची चर्चा होते त्यावेळी सरोजिनी नायडुंचे नाव सर्वात आधी घेण्यात येते. सरोजिनी नायडु सगळया भारतीय महिलांकरीता एक आदर्श होत्या.

💁🏻‍♀ महान क्रांतिकारी महिला सरोजिनी नायडूंचे प्रारंभिक जीवन, कुटूंब आणि शिक्षण
                            भारतिय महान क्रांतिकारक सरोजिनी नायडूंचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 ला एका बंगाली कुटूंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अघोरनाथ चट्टोपाध्याय होते ते वैज्ञानिक, शिक्षाशास्त्री, डॉक्टर आणि शिक्षक होते हैद्राबाद येथील निज़ाम कॉलेजची स्थापना त्यांनी केली होती. पुढे त्यांच्या वडिलांना प्रिंसिपल पदावरून कमी करण्यात आले होते त्यानंतर ते नॅशनल काँग्रेस हैद्राबाद चे पहिले सदस्य बनले. आपली नौकरी सोडुन त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली होती.

स्वातंत्र्य सेनानी सरोजिनी नायडु यांच्या आईचे नाव वरद सुंदरी देवी होते त्या बंगाली भाषेत कविता करीत असत. सरोजिनी नायडुंना एकुण 8 बहिण भाऊ होते त्यांच्यात सरोजिनी या सर्वात मोठया होत्या. त्यांचा एक भाऊ विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय क्रांतिकारी होता त्याने बर्लिन कमेटीत आपली महत्वपुर्ण भुमिका बजावली होती. त्याला 1937 साली एका इंग्रजाने मारून टाकले. सरोजिनींचे दुसरे बंधु हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय एक प्रसिध्द कवि, कथाकार, व कलाकार होते या व्यतिरीक्त ते नाटकं सुध्दा लिहीत असत. त्यांची बहिण सुनालिनी देवी या एक उत्तम नृत्यांगना व अभिनेत्री होत्या.

बालपणापासुन सरोजिनी या एक हुशार विद्यार्थिनी होत्या त्यांना उर्दू, तेलगू, इंग्लिश, बांग्ला आणि फारसी भाषेचे चांगले ज्ञान होते. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी मॅट्रिक परिक्षा त्यांनी उत्तीर्ण केली मद्रास प्रेसीडेंसीत प्रथम स्थान मिळवीले. देशाकरीता स्वतःला समर्पित करणाऱ्या महान क्रांतिकारी सरोजिनीने गणितज्ञ किंवा वैज्ञानिक व्हावं अशी त्यांचे वडिल अघोरनाथ चट्टोपाध्याय यांची ईच्छा होती परंतु सरोजिनी यांना लहानपणापासुन कविता लिहीण्याचा छंद होता. कविता लिहीण्याची आवड त्यांच्यात आईकडुन आली होती.

बालपणी त्यांनी चक्क 1300 ओळींची कविता लिहीली होती. त्यांच्या कविता आणि लिखाण प्रत्येकाला प्रभावित करीत असे त्यांच्या कवितेने हैद्राबाद चे निजाम देखील प्रभावित झाले होते आणि त्यांनी सरोजिनींना विदेशात अध्ययन करण्याकरीता शिष्यवृत्ती देखील दिली होती. वयाच्या 16 व्या वर्षी जेव्हां त्या इंग्लंड येथे गेल्या तेव्हां त्यांनी प्रथम किंग्स काॅलेज लंडन येथे प्रवेश घेतला.

पुढे कैम्ब्रिज च्या ग्रिटन कॉलेज मधुन शिक्षण प्राप्त केले त्याठिकाणी त्यांची भेट त्या काळातील इंग्लिश चे प्रसिध्द कवि आर्थन साइमन आणि इडमंड गोसे यांच्याशी झाली. त्यांनी सरोजिनींना भारतिय विषयांना लक्षात ठेवत लिखाण करण्यास व डेक्कन (दक्षिण पठार) ची भारतिय कवयित्री होण्याचा सल्ला दिला.
               त्यानंतर महान कवयित्री सरोजिनी नायडुंना भारतातील पर्वत, नद्या, मंदिरे आणि सामाजिक बाबींना आपल्या कवितांमध्ये समाविष्ट करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे सरोजिनी भारतातील एक महान कवियत्री झाल्या त्यांच्या कवितांमुळे त्यांनी लाखो हृदयांमध्ये स्थान मिळविले.

👫🏻 सरोजिनी नायडुंचा विवाह
                        भारताच्या महान कवियित्री सरोजिनी नायडु ज्यावेळी इंग्लंड येथे शिक्षण घेत होत्या त्या दरम्यान त्यांची भेट गोविंद राजुलू नायडूंशी झाली त्यावेळीच त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. नायडू हे त्या वेळी इंग्लंड येथे फिजिशियन होण्याकरता गेले होते. शिक्षण पुर्ण केल्यानंतर भारतात परतल्यावर आपल्या परिवाराच्या संमतीने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्यांचा गोविंद नायडूंशी विवाह झाला.
                    1898 साली त्यांचा विवाह हा ब्राम्हो मॅरेज अॅक्ट अंतर्गत मद्रास येथे संपन्न झाला. त्यांचा विवाह हा आंतरजातिय होता त्याकाळी वेगवेगळया जातींमध्ये लग्न होणे हे एखाद्या गुन्हयापेक्षा कमी समजले जात नव्हते कारण त्यावेळी आंतर जातिय विवाहांना भारतिय समाजात मान्यता मिळाली नव्हती.
                      हे एक क्रांतिकारी पाऊल होते याकरता त्यांना फार संघर्ष करावा लागला होता परंतु त्यांच्या वडिलांनी समाजाची चिंता न करता आपल्या निर्भय आणि सुशिक्षीत अश्या सरोजिनीला तिच्या निर्णयात पुर्ण सहाय्य केले. या सर्व विपरीत परिस्थीती पश्चात त्यांचे वैवाहीक जीवन यशस्वी ठरले विवाहापश्चात त्या चार मुलांच्या आई झाल्या जयसुर्या, पद्मजा, रणधीर आणि लीलामणी अशी चार अपत्ये त्यांना झाली.
                      सरोजिनींची कन्या पद्मजा त्यांच्यासारखीच कवियित्री झाली शिवाय ती सक्रीय राजकारणात उतरली आणि 1961 ला पश्चिम बंगाल ची गव्हर्नर देखील झाली.

सरोजिनी नायडुंचे राजनितीक जीवन आणि स्वातंत्र्य संग्रामातील भुमिका
                    सामान्य महिलांपेक्षा सरोजिनी अगदी भिन्न होत्या त्यांच्यात कायम काहितरी करण्याची उर्जा आणि उमेद होती त्यामुळे विवाहानंतर देखील त्यांनी लिखाण सुरू ठेवले त्यांच्या कवितांच्या प्रशंसकांमध्ये देखील हळुहळु वाढ होत गेली व लोकप्रियता देखील वाढत गेली.

कविता लिहीण्यात त्यांचे प्रभुत्व होते आणि साहित्याची देखील त्यांना चांगली जाण होती. आपल्या अवती भवतीच्या गोष्टी, भारताचे प्राकृतिक सौंदर्य आणि इतर ही विषयांना त्या आपल्या कवितांच्या माध्यमातुन अतिशय सुरेख पणे मांडत असत. त्यांच्या कवितांवर प्रेम करणारा फार मोठा रसिक वर्ग होता जो त्यांच्या कवितांना गाण्यांसारखे गुणगुणायचा.

1905 साली त्यांची बुल बुले हिंद ही कविता प्रकाशित झाली त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत आणखीन भर पडली त्यानंतर एकामागोमाग सलग त्यांच्या कविता प्रकाशित होत गेल्या ज्यामुळे वाचकांच्या मनात त्यांनी एक जागा निर्माण केली. सरोजिनींच्या प्रशंसकांच्या यादीत जवाहरलाल नेहरू, रविन्द्रनाथ टागौर यांसारखे महान व्यक्तिमत्व देखील होते. सरोजिनी आपल्या कविता इंग्लिश भाषांमधुन देखील लिहीत असत.
                   त्यांच्या कवितांमधुन भारताच्या संस्कृतीचे अनोखे चित्र पहावयास मिळते. अश्या महान कवियित्री सरोजिनी नायडूची भेट ज्यावेळी भारताचे स्वातंत्र्य सेनानी गोपाळ कृष्ण गोखले यांच्याशी झाली तेव्हां त्यांच्या जीवनात मोठा बदल घडला. गोखलेंनी सरोजीनींना आपल्या लिखाणाची ताकद स्वातंत्र्याच्या लढाईत वापरण्याचा सल्ला दिला.
             गोपाळ कृष्ण गोखलेंनी सरोजिनींना आपली बुध्दी आणि शिक्षण पुर्णपणे देशाला समर्पित करण्यास सुचविले. शिवाय ते त्यांना हे देखील म्हणाले की तुम्ही क्रांतीकारी कविता लिहा आणि स्वातंत्र्याच्या या लढाईत लहान लहान गांवामधील लोकांना प्रोत्साहीत करा जेणेकरून वर्षानुवर्ष गुलामगिरीत अडकलेले सामान्यजन मोकळा श्वास घेऊ शकतील आणि या समरात सहभागी होतील. सरोजिनींनी गोपाळकृष्ण गोखलेंच्या या सल्ल्यावर सखोल विचार केला आणि आपले व्यावसायिक लिखाण बंद करून स्वतःला राजकारणात पुर्णपणे समर्पित करून टाकले.
              1905 साली बंगालच्या विभाजना वेळी महान क्रांतीकारी महिला सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधे सहभागी झाल्या होत्या. विभाजनामुळे त्या फार व्यथीत देखील होत्या पुढे त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. भारताला स्वातंत्र्य मिळण्याकरता त्या एक निष्ठावान देशभक्ता प्रमाणे सतत प्रयत्नं करत होत्या सामान्य जनांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत चेतवण्याकरीता संपुर्ण भारत त्यांनी पिंजुन काढला व लोकांमध्ये देशप्रेमाची भावना वाढीस लावण्यात आपले महत्वपुर्ण योगदान दिले.
                      सरोजिनी नायडुंनी मुख्यतः स्त्रियांच्यात जाऊन देशाला स्वातंत्र्य प्राप्त होण्याकरीता आपले क्रांतिकारी विचार प्रगट केले. ज्या सुमारास सरोजिनी नायडू महिलांमध्ये हे क्रांतीकारी विचार पेरत होत्या त्यावेळेसच्या काळात महिलांनी स्वतःला घराच्या चार भिंतींमध्ये कैद करून घेतले होते. त्या काळात महिलांची स्थिती फार मागासलेली होती. अश्या काळात स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेणे तर दुर स्त्रियांना घराबाहेर पाऊल ठेवण्याची देखील परवानगी नव्हती.
                अश्या परिस्थीतीत चुल आणि मुल सांभाळणाऱ्या स्त्रियांची मानसिकता बदलणे हे कार्य अजिबात सोपे नव्हते परंतु या स्त्रियांना स्वातंत्र्य समरात येण्यास प्रोत्साहीत करणे हे अवघड काम सरोजिनी नायडू मोठया निष्ठेने करीत होत्या. सरोजिनी नायडू गावां गावांमध्ये जाऊन स्त्रीयांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दयायच्या आपल्या विचारांनी त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहीत करीत असत या शिवाय त्यांनी महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या अधिकारांकरता सुध्दा आपला आवाज बुलंद केला होता.
                   1916 ला जेव्हां त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या संपर्कात आल्या त्यावेळी त्या गांधीजींच्या विचारांनी अत्यंत प्रभावित झाल्या आणि त्यांची विचारसरणी पुर्णपणे बदलुन गेली. सरोजिनी गांधीजींना आपला आदर्श मानु लागल्या, गांधीजींपासुन प्रेरणा घेत त्यांनी आपली पुर्ण ताकत देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यात लावली.
                       1919 साली क्रुर ब्रिटीश शासनकर्त्यांनी  रॉलेट एक्ट समंत केला या अंतर्गत राजद्रोह दस्तऐवजावर कब्जा करणे अवैध मानण्यात आले होते. महात्मा गांधीजींनी या एक्ट विरोधात असहकार आंदोलनाचे नेतृत्व केले होते. या आंदोलनात सरोजिनी नायडूंनी गांधीजींचे पुर्णपणे समर्थन केले. गांधीजींच्या शांततापुर्ण नितीचे आणि अहिंसावादी विचारांचे पालन देखील केले.
                     या व्यतिरीक्त त्यांनी मोंटगु-चेम्सफोर्ड सुधारणा, खिलाफत आंदोलन, साबरमती संधी सत्याग्रह आणि नागरिक अवज्ञा आंदोलना सारख्या इतर आंदोलनांचे देखील समर्थन केले. एवढेच नव्हें तर सविनय कायदेभंग आंदोलनात त्या गांधीजींसमवेत कारागृहात देखील गेल्या. 1942 च्या भारत छोडो आंदोलनात त्यांना 21 महिने कारागृहात राहावे लागले होते या दरम्यान त्यांना कित्येक यातना देखील सहन कराव्या लागल्या होत्या. अश्या त-हेने स्वातंत्र्य संग्रामा दरम्यान त्यांनी कित्येक दिवस जेल मध्ये काढले आणि एक सच्च्या देशभक्ताचे कर्तव्य पार पाडले.

राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष आणि राज्यपालाच्या रूपात सरोजीनी नायडू
                       सरोजिनी नायडूंचे स्वातंत्र्याच्या लढाईतील योगदान आणि स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या सहभागामुळे त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव सामान्य जनतेवर पडला होता त्या दरम्यान त्यांची लोकप्रियता आणखीन वाढली होती. त्यांच्या विचारांनी स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री जवाहर लाल नेहरू अत्यंत प्रभावित झाले होते.
          त्यांची प्रतिभा पाहुन 1925 साली त्यांना काँग्रेस अधिवेशनाची अध्यक्षा म्हणुन नियुक्त करण्यात आले पुढे 1932 ला भारताच्या प्रतिनिधी या नात्याने त्या दक्षिण अफ्रिकेत देखील गेल्या होत्या. भारताच्या क्रांतिकारी महिला सरोजिनी नायडूंनी भारताच्या स्वांतत्र्याकरता भारतियांव्दारे केल्या जाणाऱ्या अहिंसात्मक संघर्षाचे बारकावे सादर करण्यात आपली महत्वपुर्ण भुमिका बजावली होती.
                           एवढेच नव्हें तर त्यांनी गांधीवादी सिध्दांताचा प्रसार करण्याकरता केवळ युरोपातच नव्हे तर संयुक्त राज्य अमेरीकेपर्यंतची यात्रा केली व भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर उत्तरप्रदेशाच्या पहिल्या गव्हर्नर (राज्यपाल) झाल्या. स्वतंत्र भारताच्या त्या पहिल्या गव्हर्नर होत्या भारताच्या सर्वात मोठया राज्याच्या त्या राज्यपाल झाल्या. सरोजिनी नायडूंनी आपल्या महान विचारांनी आणि गौरवपुर्ण व्यवहाराने आपल्या राजनितीक कर्तव्यांना उत्तम रितीने पार पाडले आणि त्यामुळे त्यांचे आजही स्मरण केले जाते.

🕯 सरोजिनी नायडूंचा मृत्यु
             देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता कठोर संघर्ष करणाऱ्या महान स्वातंत्र्य सेनानी व महात्मा गांधीजींच्या प्रिय शिष्या सरोजिनी नायडूंना 2 मार्च 1949 ला कार्यालयात काम करत असतांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यु झाला.
                   अश्या तऱ्हेने आपलं संपुर्ण आयुष्य सरोजिनींनी देशाला समर्पित केलं. आपल्या जीवनात त्यांनी भरपुर ख्याती आणि सन्मान प्राप्त केला होता शिवाय त्या लोकांकरता प्रेरणास्त्रोत देखील ठरल्या.
                13 फेब्रुवारी 1964 ला भारत सरकारनं त्यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांच्या सन्मानार्थ 15 पैश्यांचे डाकतिकीट प्रकाशित केले होते.

सरोजिनी नायडूंचे साहित्यातील योगदान
             सरोजिनी नायडूंनी केवळ एक महान क्रांतिकारी आणि चांगल्या राजनितीज्ञ म्हणुनच ख्याती प्राप्त केली नाही तर त्या एक चांगल्या कवियित्री म्हणुन देखील प्रसिध्द होत्या. आपल्या कवितांमधुन लोकांमध्ये क्रांतिकारी विचारांचे बीज तर पेरलेच शिवाय भारतिय संस्कृतीची देखील अद्भुत अशी व्याख्या केली. बालकांच्या साहित्याचे त्यांनी विपुल लेखन केले आणि त्याकरता देखील त्या प्रसिध्द झाल्या.
              ईतकेच नव्हे तर त्यांच्या सुरेख कविता आणि गीतांमुळे त्यांना भारताची कोकिळा (भारताची नाइटिंगल) म्हणुन सन्मानित करण्यात आले होते. 1905 ला त्यांच्या कवितांचा संग्रह “गोल्डन थ्रेसहोल्ड” नावाने प्रकाशित झाला त्यांनतर त्यांनी आपले अन्य दोन संग्रह “दी बर्ड ऑफ टाईम” आणि “दी ब्रोकन विंग्स” देखील प्रकाशित केले या कवितांना केवळ भारतातील लोकांनीच पसंती दिली असे नव्हें तर या पुस्तकांना इंग्लंड मधे देखील मोठया संख्येने वाचकांनी पसंत केले आणि या मुळेच त्यांना एक शक्तीशाली लेखीका म्हणुन ओळख मिळाली.

प्रख्यात कवियित्री सरोजिनींनी कवितां व्यतिरीक्त काही आर्टिकल आणि निबंधांचे सुध्दा लिखाण केले होते जसे “वर्ड्स ऑफ़ फ्रीडम” हे त्यांच्या राजनितीक विचारांवर आधारीत होते. या शिवाय त्यांनी महिला सशक्तिकरणासारख्या सामाजिक मुद्दयाला देखील आपल्या पुस्तकांच्या माध्यमातुन वाचा फोडली होती. समाजात या लिखाणाचा खोलवर परिणाम झाला.

द फेदर ऑफ द डॉन ला त्यांची कन्या पद्मजाने 1961 ला एडिट करून प्रकाशित केले होते. त्यांचे इतर साहित्य “दी बर्ड ऑफ़ टाइम: साँग ऑफ लाइफ, डेथ अँड दी स्प्रिंग, दी ब्रोकन विंग: साँग ऑफ़ लव्ह, डेथ अँड स्प्रिंग, मुहम्मद जिन्नाःअन एम्बेसिडर ऑफ़ यूनिटी, दी सेप्ट्रेड फ्लूट: साँग्स ऑफ़ इंडिया, अलाहाबाद: किताबिस्तान, दी इंडियन वीवर्स, फीस्ट ऑफ़ यूथ, दी मैजिक ट्री एंड दी विज़ार्ड मास्क देखील फार चर्चित आणि प्रसिध्द आहेत. या व्यतिरीक्त त्यांच्या काही कवितांमधील सुंदर आणि लयबध्द शब्दांमुळे त्या कवितांना गाता येणे सुध्दा शक्य आहे.

🔮 सरोजिनी नायडूंविषयी थोडक्यात महत्वपुर्ण माहिती
              वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी सरोजिनींनी 1200 ओळींचा ‘ए लेडी ऑफ लेक’ नावाचा खंडकाव्य लिहीला.
               1918 ला त्यांनी मद्रास प्रांतिय संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले.
1919 ला अखिल भारतीय होमरूल लीग प्रतिनीधी मंडळातील सदस्य या नात्याने त्या इंग्लंड दौऱ्यावर जाऊन आल्या.
1930 ला महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले गुजरात येथे धारासना मधील ‘मिठाच्या सत्याग्रहाचे’ नेतृत्व सरोजिनी नायडूंनी मोठया धैर्याने केले.
1942 साली ‘चले जाव’ आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि जेल मध्ये गेल्या.
1947 ला दिल्लीत झालेल्या आशियाई परिषदेचे त्यांनी अध्यक्षपद भुषविले.
1947 साली स्वतंत्र भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या राज्यपाल म्हणुन त्यांची निवड झाली.
              🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
     ♾️♾️♾️ ♾️♾️♾️                                                                                                           ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

मंगळवार, १ मार्च, २०२२

सुप्रभात



जीवन म्हणजे रोजची शाळा असते, रोज नवीन दिवस उगवतो, एक नवा अनुभव देऊन जातो, तसेच नवीन काहीतरी शिकवून जातो.

The first ever cordless phone was created by God, he named it Prayer, it never loses it's signal and you never have to recharge it, use it anywhere.

कोणाला समजावणे हे कधी सोपे नसते, कारण समजावण्यासाठी अनुभव लागतो, आणि समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

जीभ और शब्द सबके पास होते है, मगर जो अपने लिये जीते है, वो कह लेते है और जो अपनों के लिये जीते है, वो सह लेते है ।

रागामागचे प्रेम आणि चेष्टेमागचा जिव्हाळा ज्या नात्यात समजून घेतला जातो ते नाते सहसा तुटत नाही.

Care is the most beautiful word, which makes the life richer, if sombody tells you take care, that means you live in their heart.

भाग्य और झूठ के साथ जितनी ज्यादा उम्मीद करेंगे, वो उतना ही ज्यादा निराश करेगा, लेकिन कर्म और सच पर जितना जोर देंगे, वो उम्मीद से सदैव ज्यादा ही देंगा ।

महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
शिव शंभो !! हर हर महादेव !!
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

चंद्रशेखर आझाद

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक  समूह 🖥️
     ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬          संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                                           ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  
    🔥🔫💥🇮🇳👨‍🦰🇮🇳💥🔫🔥                                                                        क्रांतिकारक 
           चंद्रशेखर आझाद 


      जन्म : २३ जुलै, १९०६
(भाबरा, झाबुआ, अलिराजपूर, मध्यप्रदेश)
     विरमरण : २७फेब्रुवारी,१९३१
      (अल्फ्रेड पार्क, अलाहाबाद)
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: कीर्ति किसान पार्टी,  
            नवजवान किसान सभा
धर्म: हिंदू
वडील: पंडित सिताराम तिवारी
आई: जगरानी देवी

          चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १९०६ रोजी सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'सिताराम तिवारी' व आईचे नाव 'जगरानी देवी' असे होते. त्यांचे पुर्वज कानपूर जवळच्या बादरका गावात राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले.
            वाराणसीला संस्कृतचे अध्ययन करीत असताना वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतके लहान होते की, त्यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या हातांना हातकडीच बसेना. ब्रिटीश न्यायाने या छोट्या मुलाला १२ फटक्यांची आमानुष शिक्षा दिली. फटक्यांनी आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला, व अहिंसेवरील त्यांचा विश्वास पार उडाला. मनाने ते क्रांतिकारक बनले. काशीत श्रीप्रणवेश मुखर्जींनी त्यांना क्रांतिची दीक्षा दिली. सन १९२१ सालापासून १९३२ सालापर्यंत ज्या ज्या क्रांतिकारी चळवळी, प्रयोग, योजना, क्रांतिकारी पक्षाने योजल्या, त्यात चंद्रशेखर आझाद हे आघाडीवर होते.
       साँडर्सचा बळी घेतल्यावर चंद्रशेखर आझाद हे जे निसटले ते निरनिराळे वेष पालटून भूमिगत स्थितीत उदासी महंताचा चेला बनले होते. कारण की, या महंताजवळ पुष्कळ द्रव्य होते. ते द्रव्य आझाद यांनाच मिळणार होते, परंतु आझादांना त्या मठातील मनसोक्त वागणे पसंत पडले नाही म्हणून त्यांनी तो नाद सोडून दिला. पुढे ते झाशी येथे राहू लागले. तेथे मोटार चालवणे व पिस्तूलाने गोळी मारणे, अचूक नेम साधणे याचे शिक्षण त्यांनी घेतले.
         काकोरी कटापासून त्यांच्या डोक्यावर फाशीची तलवार लटकत होती. तरी त्या खटल्यातील क्रांतिकारकांना सोडविण्याच्या योजनेत ते गर्क होते. वर वर पाहणार्‍याला त्यांनी क्रांतिकार्य सोडले आहे असे वाटे.
         गांधी आयर्वीन करार होत असताना त्यांनी गांधीजींना असा संदेश पाठविला की, आपल्या वजनाने भगतसिंग वगैरेंची सुटका आपण करावी, असे झाल्यास हिंदुस्थानच्या राजकारणाला निराळे वळण लागेल, परंतू गांधींनी तो संदेश फेटाळून लावला. तरी आझादांनी क्रांतिकारकांना सोडविण्याचे जोरदार प्रयत्न चालू ठेवले.”मी जीवंतपणी ब्रिटीश सरकारच्या हाती कधीच पडणार नाही’,ही आझादांची प्रतिज्ञा होती. २७ फेब्रुवारी १९३१ ला ते शेवटचे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये शिरले. पो. अधिक्षक नॉट बॉबरने तेथे येता क्षणी आझादांवर गोळी झाडली. ती त्यांच्या मांडीस लागली. पण त्याच वेळी आझादांनी नॉट बॉबरवर गोळी झाडून त्याचा हातच निकामी केला. मग ते सरपटत एका जांभळीच्या झाडाआड गेले. हिंदी शिपायांना ओरडून ते म्हणाले,” अरे शिपाई भाईंओ, तुम लोग मेरे ऊपर गोलियाँ क्यों बरस रहे हो ? मै तो तुम्हारी आजादी के लिये लढ रहा हूँ ! कुछ समझो तो सही !” इतर लोकांना ते म्हणाले,” इधर मत आओ ! गोलियाँ चल रही है ! मारे जाओगे ! वंदे मातरम् ! वंदे मातरम् !”
        आपल्या पिस्तुलात शेवटची गोळी राहिली, तेव्हा ते त्यांनी आपल्या मस्तकाला टेकले आणि चाप ओढला ! तत्क्षणी त्यांचे प्राण त्यांचा नश्वर देह सोडून पंचतत्वात विलीन झाले.
       नॉट बॉबर उद्गारला, ” असे सच्चे निशाणबाज मी फार थोडे पाहिले आहेत !”
       पोलिसांनी त्यांच्या निष्प्राण देहात संगिनी खुपसून ते मेल्याची खात्री करून घेतली. त्यांचा मृतदेह आल्फ्रेड पार्कमध्ये एक दरोडेखोर मारला गेला, असा अपप्रचार करीत, तसाच जाळून टाकायचा सरकारने प्रयत्न केला. पण पंडीत मालवीय, सौ. कमला नेहरू यांनी तो उधळून लावून त्यांच्या अर्धवट जळलेल्या देहाची चिता विझवून पुन्हा त्यांचा अंत्यविधी हिंदू परंपरेप्रमाणे केला. २८ फेब्रुवारीला त्यांची प्रचंड अंत्ययात्रा काढून एका विराट सभेत सर्व पुढार्‍यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
     भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले.
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳     
 
🌹🙏 विनम्र अभिवादन 🙏🌷         
       
          ♾♾♾ ♾♾♾
         संदर्भ ~ WikipediA                                             ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन : श्री अविनाश काशिनाथ पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                      
   ➿➿➿➿➿➿➿➿➿
    🚩🤽🏻‍♂⛓️🇮🇳👨🏻🇮🇳⛓️✍🚩

          स्वातंत्र्यवीर विनायक
            दामोदर सावरकर  
   
                                                                  
 (महान क्रांतिकारक, उत्कट देशभक्त, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक) 
         जन्म : २८ मे १८८३
(भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत)
      मृत्यू : २६ फेब्रुवारी १९६६
      (दादर, मुंबई, महाराष्ट्र,भारत)
चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना : अभिनव भारत,
अखिल भारतीय हिंदू महासभा
प्रमुख स्मारके : मुंबई, पुणे, बिहार, दिल्ली, अंदमान
धर्म : हिंदू
प्रभाव : शिवाजी महाराज, जोसेफ मॅझिनी
वडील : दामोदर विनायक सावरकर
आई : राधाबाई दामोदर सावरकर 
पत्नी : यमुनाबाई विनायक सावरकर (माई)
अपत्ये : प्रभाकर, प्रभा, शालिनी, विश्वास
भाषाशुद्धीचा आग्रह धरून सावरकरांनी मराठी भाषेला ४५ शब्द दिले आहेत.
           विनायक दामोदर सावरकर  हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.
⚜️ चरित्र
           सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या शहरात झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव सावरकर हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई, ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील इ.स. १८९९ च्या प्लेगला बळी पडले.

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली. मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.
                       राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले.  इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली . श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.
                    इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले. राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली (इ.स. १९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११). मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.
           अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. अंदमानमध्ये असतांना सावरकरांनी Essentials of Hindutva हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्‍नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली. (दिनांक ६ जानेवारी १९२४).
                 अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्‍न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.

♨️ सावरकरांचे जात्युच्छेदन
              अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६). हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्‍नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य (१९३० नोव्हें ) जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. स्वकीयांतील जातीयतेवरपण निर्भीड टीका केली. त्यांनी रत्‍नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले. जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले. या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.

🐄 गाय हा एक उपयुक्त पशू
             ‘मायासृष्टीत जोवर मनुष्य आहे आणि गाय व बैल हे पशू आहेत, तोवर माणसाने त्याच्याहून सर्व गुणांत हीन असलेल्या पशूस देव मानणे म्हणजे मनुष्यास पशूहून नीच मानण्यासारखे आहे. गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशू असलेल्या गाईस देव मानावे; मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये. ..कोणत्याही गोष्टीत ती धर्म आहे असे पोथीत सांगितले आहे, म्हणूनच तसे डोळे मिटून मानण्याची पोथीनिष्ठ आंधळी भावना आता झपाट्याने मावळत आहे आणि ती मावळत जावी हेच आता मनुष्याच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे.
                  एक वेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होता कामा नये. यास्तव गाय वा बैल हे पशू आपल्या कृषिप्रधान देशात मनुष्यहितास अत्यंत उपकारक आहेत इतकेच सिद्ध करून, व त्या पशूचा उपयोग राष्ट्रास ज्या प्रमाणात, नि ज्या प्रकारे होईल, त्या प्रमाणात नि त्या प्रकारे पशू म्हणूनच जोपासना करू म्हणाल, तरच ते राष्ट्राच्या निर्भेळ हिताचे होईल. पण त्या हेतूने गाय ही देव आहे कारण पोथीत तिची पूजा करणे हा धर्म आहे, इत्यादी थापा माराल, तर त्यावर जरी राष्ट्राने यापुढेही विश्वास ठेवला नि गोरक्षण थोडेसे अधिक झाले, तरीही त्या पोथीजात प्रवृत्तीला उत्तेजन देण्याचे जे अपकार्य त्यायोगे करावे लागते त्याचे परिणाम राष्ट्राची शतपटीने अधिक हानी करील.(संपादित लेख – ‘गाय- एक उपयुक्त पशू’: वि. दा. सावरकर )

⛓️ सात बेड्या
           सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जातिव्यवस्थेवर हल्ला केला. अनुवंशात जातीचे मूळ आहे. त्या मुळावरच सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश हा आचरटपणा आहे, जर ब्राह्मणाच्या घरी 'ढ' जन्मला तर त्याला 'ढ'च म्हटले पाहिजे आणि जर शूद्रांत 'ज्ञ' निघाला तर त्याला 'ज्ञ'च म्हटले पाहिजे, मग त्याचा बाप, आजा अथवा पणजा 'ढ' असो की 'ज्ञ' असो. सावरकरांनी हल्ला करताना 'आपले हिंदुत्वाचे समर्थक दुखावतील' वगैरे फाजील भीती न बाळगता त्यांचे प्रबोधन केले. सावरकर म्हणतात की 'आज आमच्या हिंदू समाजात पोथीत तसे लिहिले आहे ते सोडून इतर कोणत्याही लक्षणाने सहज विभिन्नत्व विविध जातींमध्ये दिसून येत नाही. जात मानणे ही मूळ चूक! त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात निघाली आणि ब्रह्मदेवाच्या बेंबीपासून अमुक जात निघाली इत्यादी उपरत्या अक्षरशः खऱ्या मानून त्या त्या जातींच्या अंगी ते गुण उपजतच आहेत हे मानणे ही घोडचूक!! अन् तो गुण त्या जातीच्या संतानात प्रकट झाला नसला तरी तो आहेच समजून तशी उच्च-नीचता त्या संतानास भोगावयास लावणे ही पहाड चूक.
         जातिव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातिभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे १) वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुद्धा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर} २) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७) बेटीबंदी. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे. सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.

🛕 हिंदू महासभेचे कार्य
          रत्‍नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. इ.स. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.
                        एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.
                   सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.

🗽 सावरकर स्मारके
                     पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृह क्रमांक १ मधील १७व्या क्रमांकाच्या खोलीत सावरकरांचे इ.स. १९०२ ते १९०५ या काळात वास्तव्य होते. सावरकर जयंतीच्या दिवशी ही एरवी बंद असलेली खोली जनतेला पाहण्यासाठी खुली केली जाते.
सावरकरांना अंदमानमधील तुरुंगातल्या ज्या कोठडीत ठेवले होते, ती खोली सावरकरांचे स्मारक म्हणून सांभाळली जाते. पोर्ट ब्लेयरमधील स्वातंत्र्यज्योती स्तंभावर सावरकरांची वचने कोरलेल्या धातूच्या पट्ट्या बसवल्या होत्या. ही वचने ताम्रपट्ट्यांवर कोरण्याचे काम मुंबईच्या गणेश एन्ग्रेव्हरने केले होते. तत्कालीन पेट्रोलमंत्री मणिशंकर अय्यर यांनी ९ ऑगस्ट २००४ रोजी ती वचने हटवली. २०१६ साली ती वचने पुन्हा प्रस्थापित करण्याचे काम चालू आहे.
पुण्यात कर्वे रोडवर एक, एस.एम जोशी पुलानजीक एक आणि शिवराम म्हात्रे रोडवर एक अशी सावरकरांची तीन स्मारके आहेत.
गोसावीवाडा (भगूर) येथील स्मारक
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क (मुंबई)
स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क (मुंबई)
🏤 संस्था
          सावरकरांचे कार्य जनेतुपुढे आणणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. त्यांतील काही संस्थांची ही नावे :-

नादब्रह्म (चिंचवड-पुणे) : डॉ.रवींद्र घांगुर्डे,डॉ.वंदना घांगुर्डे आणि सावनी रवींद्र - यांनी चालविलेली ही संस्था सावरकरांच्या वाङ्‌मयावर आधारित अनेक कार्यक्रम रंगमंचावर सादर करते.
वीर सावरकर फाउंडेशन (कलकता)
वीर सावरकर मित्र मंडळ ()
वीर सावरकर स्मृती केंद्र (बडोदा)
समग्र सावरकर वाङ्मय प्रकाशन समिती
सावरकर दर्शन प्रतिष्ठान (मुंबई)
सावरकर रुग्ण सेवा मंडळ (लातूर)
स्वातंत्र्यवीर सावरकर गणेश मंडळ 
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ (निगडी-पुणे जिल्हा)
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (डोंबिवली-ठाणे जिल्हा)
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (मुंबई). ही संस्था सावरकर साहित्य संमेलने भरविते.
✍️ मृत्युपत्र
                       ‘माझे प्रेत शक्यतो विद्युत-चितेवरच जाळण्यात यावे. जुन्या पद्धतीप्रमाणे ते शक्यतो माणसांनी खांद्यावरून नेऊ नये, किंवा कोणत्याही प्राण्याच्या गाडीमधून नेऊ नये, तर ते यांत्रिक शववाहिकेतूनच विद्युत – स्मशानात नेले जावे.. माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपली दुकाने किंवा व्यवसाय बंद ठेवू नयेत. कारण त्याने समाजाला फार त्रास होतो. घरोघरीच्या संसारासाठी दैनिक आवश्यकतेच्या वस्तू न मिळाल्याने अडथळा होतो. माझ्या निधनानिमित्त कोणीही सुतक, विटाळ, किंवा ज्यायोगे कुटुंबीयांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होतो अश्या पिंडदानासारख्या कोणत्याही जुन्या रूढी पाळू नयेत. त्या पिंडांना काकस्पर्श होईतो वाट पाहत बसणे इत्यादी कालबाह्य गोष्टी पाळू नयेत.’ वगैरे.

📚 ग्रंथ आणि पुस्तके
           वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.'सागरा प्राण तळमळला' या कवितेला २००९ साली १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ४१ पुस्तकांचा संच बाजारात उपलब्ध आहे, त्यातील पुस्तके अशी :

अखंड सावधान असावे
१८५७ चे स्वातंत्र्यसमर
अंदमानच्या अंधेरीतून
अंधश्रद्धा भाग १
अंधश्रद्धा भाग २
संगीत उत्तरक्रिया
संगीत उ:शाप
ऐतिहासिक निवेदने
काळे पाणी
क्रांतिघोष
गरमा गरम चिवडा
गांधी आणि गोंधळ
जात्युच्छेदक निबंध
जोसेफ मॅझिनी
तेजस्वी तारे
नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन
प्राचीन अर्वाचीन महिला
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
भाषा शुद्धी
महाकाव्य कमला
महाकाव्य गोमांतक
माझी जन्मठेप
माझ्या आठवणी - नाशिक
माझ्या आठवणी - पूर्वपीठिका
माझ्या आठवणी - भगूर
मोपल्यांचे बंड
रणशिंग
लंडनची बातमीपत्रे
विविध भाषणे
विविध लेख
विज्ञाननिष्ठ निबंध
शत्रूच्या शिबिरात
संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष
सावरकरांची पत्रे
सावरकरांच्या कविता
स्फुट लेख
हिंदुत्व
हिंदुत्वाचे पंचप्राण
हिंदुपदपादशाही
हिंदुराष्ट्र दर्शन
क्ष - किरणें

📕 इतिहासविषयावरील पुस्तके
            १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाद्वारे, (इ.स. १८५७च्या युद्धाचा 'पहिले स्वातंत्र्यसमर' असा उल्लेख करून तो लढा त्यांनी पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्यलढ्यास जोडला)
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
हिंदुपदपादशाही
📙 कथा
सावरकरांच्या गोष्टी भाग - १
सावरकरांच्या गोष्टी भाग - २
📚 कादंबऱ्या
काळेपाणी
मोपल्यांचे बंड अर्थात्‌ मला काय त्याचे -मल्हार प्रॉडक्शन्सने या कादंबरीची ऑडियो आवृत्ती काढली आहे.

सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला. सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, कीलक राष्ट, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्तिवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.

वि. दा. सावरकर हे मुंबई येथे इ.स. १९३८ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

चाफेकरांचा फटका
१८ एप्रिल १८९८ रोजी दामोदर चाफेकर फासावर गेले. त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांची टिळकांशी भेट घडवून आणली गेली. टिळकांनी चाफेकरांना भगवद्‌गीतेची एक प्रत दिली, ती हातात धरूनच दामोदर फासावर गेले. त्या रात्री विनायक दामोदर चाफेकर कितीतेरी वेळ रडत होते. त्यांनंतर सावरकरांनी चाफेकरांचा फटका नावाची काव्यकृती रचली. त्यातील दोन ओळी अशा :-

भक्ष्य रँड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे॥

📜 पुरस्कार
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात. उदा.
                     ’निनाद’ तर्फे दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर ध्येयवादी पुरस्कार
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे *स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार, विज्ञान पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार
वीर सावरकर फाउंडेशनचा वीर सावरकर पुरस्कार
टिळकनगर (डोंबिवली) शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावरकर अभ्यास मंडळाचे वीर सावरकर सेवा पुरस्कार
✍️ सावरकरांवर लिहिलेली पुस्तके
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेली पुस्तके आणि त्याचे लेखक/प्रकाशक खालीलप्रमाणे:

अत्रे, प्रभाकर १९८५. वसा वादळाचा | स्नेहल प्रकाशन, पुणे
अंदूरकर, व्यं.गो. १९७०. शत्रूच्या गोटात सावरकर । सुरस ग्रंथमाला, सोलापूर
अधिकारी, गोपाळ गोविंद १९३७. बॅ. सावरकर यांचे चरित्र | महाराष्ट्र प्रकाशन संस्था, मुंबई
ओगले, अनंत | पहिला हिंदुहृदयसम्राट
आचार्य अत्रे, मालशे, स.गं.(संपादक) १९८३. क्रांतिकारकांचे कुलपुरुष सावरकर | परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
आठवले, रा.म. १९३८. बॅ. विनायक दामोदर सावरकर
आफळे, गोविंदस्वामी (लेखक व प्रकाशक) १९६७. सावरकर गाथा
उत्पात, वा.ना., सावरकर - एक धगधगते यज्ञकुंड
उपाध्ये, संजय २००२. विनायक विजय . चंद्रकला प्रकाशन, पुणे
ओगले, अनंत शंकर : होय ! मी सावरकर बोलतोय (नाटक)
करंदीकर, डॉ. विद्याधर : कवी-नाटककार सावरकर
करंदीकर, शि.ल. १९६६. असे होते वीर सावरकर । सीताबाई करंदीकर, पुणे
करंदीकर, सीताबाई १९४३. सावरकर-चरित्र (कथन) | सीताबाई करंदीकर, पुणे
१९४७. सावरकरांचे सहकारी | गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
करंदीकर, विद्याधर (लेखक, जानेवारी, २०१६) : कवी, नाटककार सावरकर
कऱ्हाडे, शंकर १९८३. गोष्टीरूप सावरकर , विजय प्रकाशन, नागपूर
कानिटकर, सचिन. माझे सावरकर
किर्लोस्कर, मुकुंदराव (संपादक) १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी जीवनावरील अलौकिक विशेषांक | सावरकर दर्शन प्रतिष्ठान, पुणे
कीर, धनंजय १९५०. सावरकर ॲन्ड हिज टाइम्स
कुळकर्णी, श्यामकांत २०००. गाथा थोर क्रांतिभास्कराची, विजय प्रकाशन, नागपूर
केळकर, भा.कृ. १९५२. सावरकर-दर्शन व्यक्ति नि विचार, गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
खाडिलकर, नीळकंठ १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रॅक्टिकल सोशॅलिझम, दैनिक नवाकाळ प्रकाशन, मुंबई
खांबेटे, द.पां. (अनुवाद), १९७२. स्वातंत्र्यवीर सावरकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
गद्रे, अनुराधा अ. २००५. स्वातंत्र्यवीर सावरकर, मनोरमा प्रकाशन, मुंबई
गोखले, द.न. १९८९. स्वातंत्र्यवीर सावरकर : एक रहस्य, मौज प्रकाशन गृह, मुंबई
गोखले, मो.शी. १९४०. वीर सावरकर
गोखले, विद्याधर २००५. झंझावात, मनोरमा प्रकाशन, मुंबई
गोखले, श्री.पु. १९६९. अशी गर्जली वीरवाणी, लोकमान्य प्रकाशन, पुणे
१९८३. सावरकरांशी सुखसंवाद, मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
गोडसे, गोपाळ १९६९. जय मृत्युंजय (स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील कविता), केसरी प्रकाशन, पुणे
गोडबोले, अ.मा. १९९७. क्रांतदर्शी सावरकर, साहित्यसेवा प्रकाशन, औरंगाबाद
गोविंदमित्र १९५७. स्वातंत्र्यवीर श्री. विनायक दामोदर सावरकर यांचे काव्यमय चरित्र | गं.वि.परचुरे, कल्याण
घाणेकर, ऋचा २००३. स्वातंत्र्यवीर सावरकर, महाजन ब्रदर्स, पुणे
चौगुले, सरोज : क्रान्तिवीर: सावरकर: अन्यरूपकाणि च : सावरकर, मदनलाल धिंग्रा वगैरे नावांच्या एकूण चार संस्कृत नाटिका
जोगळेकर, ज.द. १९८३. स्वातंत्र्यवीर सावरकर वादळी जीवन | उत्कर्ष प्रकाशन, पुणे
जोगळेकर, ज.द. १९८३. पुनरुत्थान | पंडित बखले, मुंबई
जोशी, विष्णू श्रीधर १९८५. क्रांतिकल्लोळ | मनोरमा प्रकाशन, मुंबई
१९९२. अखेर उजाडलं, पण देश रक्तबंबाळ । मनोरमा प्रकाशन, मुंबई
१९९२, झुंज सावरकरांची । मनोरमा प्रकाशन, मुंबई
ताटके, अरविंद १९७३. युगप्रवर्तक सावरकर । स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
दुगल, न.दि. १९८३. देशप्रेमा... तुझे नाव सावरकर । अजब पुस्तकालय, कोल्हापूर
देशपांडे, बालशंकर १९५८. क्रांतिकारकांचे मुकुटमणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
देशपांडे, भास्कर गंगाधर १९७४. क्रांतिसूर्य सावरकर, अजय प्रकाशन, औरंगाबाद
देसाई, हरिश्चंद्र त्र्यंबक १९८३. शतपैलू सावरकर । प्रबोधन, मुंबई
नातू, र.वि. १९९७. समग्र सावरकर खंड १० , पृष्ठे ६००० ची संदर्भसूची, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
पळसुले गजानन बाळकृष्ण-वैनायकम-( संस्कृत महाकाव्य)
परांजपे कृ.भा.. शत जन्म शोधिताना
पेठे, मंगला कृ. १९८४. सावरकर गौरव गान
फडके, य.दि. १९८४. शोध सावरकरांचा, श्रीविद्या प्रकाशन, पुणे
बखले पंडित (संपादक) १९६०. मृत्युंजय सावरकर
बर्वे, शंकर नारायण १९४७. स्वातंत्र्यवीर (बॅ.सावरकर यांच्या चरित्रातील काही पद्यमय प्रसंग), विष्णू सि. चितळे, पुणे
बोडस, आनंद ज. २००७. सावरकरांची तिसरी जन्मठेप, मनोरमा प्रकाशन, मुंबई
भट, रा.स. १९७२. सावरकरांचे जीवनदर्शन , वोरा अँड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि., मुंबई
भागवत, अ.गो. (अनुवाद) १९४७. बॅरिस्टर सावरकर चरित्र अ.गो. भागवत, बडोदा
भालेराव, सुधाकर सोवनी १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंथन , प्रमोद प्रकाशन, नागपूर
भावे, पु.भा. १९८२. सावरकर नावाची ज्योत, सन पब्लिकेशन्स, पुणे
भिडे, ग.र. १९४२. सावरकरांची सूत्रे, कोल्हापूर
भिडे, गोविंद १९७३. सागरा प्राण तळमळलाः स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्दरूप
 (वर्ष?). जीवनदर्शन । जोशी ब्रदर्स बुकसेलर्स अँड पब्लिशर्स, पुणे
भोपे, रघुनाथ गणेश १९३८. स्वातंत्र्यवीर बॅ.विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनचरित्र । भोपे प्रकाशन, अहमदनगर
मालशे, सखाराम गंगाधर. सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता
मेहरूणकर, प्रभाकर १९९३. तेजोनिधी सावरकर । मोरया प्रकाशन, डोंबिवली
मोडक, डॉ. अशोक २०१५. वीर सावरकर - विवेकानंदांचे वारसदार
मोने, प्रभाकर २००४. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य । परचुरे प्रकाशन
मोरे शेषराव. (सावरकरांसंबंधी) सत्य आणि विपर्यास; सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद (राजहंस प्रकाशन); सावरकरांचे समाजकारण; सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग (राजहंस प्रकाशन)
रानडे, सदाशिव राजाराम १९२४. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर ह्यांचे संक्षिप्त चरित्र । लोकमान्य छापखाना, मुंबई
रायकर, गजानन १९६६. महापुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र
वर्तक, श्रीधर रघुनाथ १९७०. क्रांतदर्शी सावरकर, संग्राहक काळ, प्रकाशन, पुणे
वऱ्हाडपांडे, व.कृ. (संपादक), १९८३. गरुडझेप (सावरकर गौरवग्रंथ), विजय प्रकाशन, नागपूर
वाळिंबे, वि.स. १९६७. स्वातंत्र्यवीर सावरकर, केसरी प्रकाशन, पुणे
१९८३. सावरकर , मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
शिंदे, वि.म. १९९९. आठवणींची बकुळ फुले | नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
शिदोरे, प्रभाकर गोविंद १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर | न.पा. साने, मुंबई
साटम, दौलत मुरारी १९७०. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर | साटम प्रकाशन, मुंबई
साठे, डॉ. शुभा. त्या तिघी (कादंबरी)
सावरकर, बाळाराव. सावरकरांचे चारखंडी चरित्र, पुनःप्रकाशन - २६ फेब्रुवारी २०२०. खंडांची नावे १. २. हिंदू महासभा पर्व (१९३७ ते १९४०), ३. ४.सावरकर,  बाळाराव (संकलक)                            १९६९. वीर सावरकर आणि गांधीजी | वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७२. हिंदुसमाज संरक्षक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (रत्‍नागिरी पर्व) | वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७५. स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु महासभापर्व भाग-१ (जून १९३७ ते डिसेंबर १९४०) । वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७६. स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड हिंदुस्थान लढा पर्व
१९९७. योगी योद्धा वि.दा.सावरकर । वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
(जानेवारी १९४१ ते १५ ऑगस्ट १९४७) वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
सावरकर, विश्वास विनायक १९८६. आठवणी अंगाराच्या (स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणी) । स्नेहल प्रकाशन, पुणे
सावरकर, शां.शि. १९९२. अथांग (श्री. वि.दा. सावरकर आत्मचरित्र प्रारंभ) | ?, मुंबई
सावरकरांची तिसरी जन्मठेप (डॉ. आनंद जयराम बोडस)
सोनपाटकी, मुकुंद १९८०. दर्यापार | पुरंदरे प्रकाशन, पुणे
सोवनी, म.वि. १९६७. मृत्युंजय सावरकरः चित्रमय चरित्र | चित्रसाधन प्रकाशन, पुणे
हर्षे, द.स. १९६६. सावरकर-दर्शन | द.स. हर्षे प्रकाशन, सातारा
क्षीरसागर, प्रकाश १९८९. तेजोमय दाहक ते । स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर,
श्रीवास्तव, हरीन्द्र, खोत, अनुराधा (अनुवाद) १९९६. एक झंझावात-शत्रूच्या शिबिरात । सावरकर स्मृती केंद्र, बडोदे
१९५७. आत्मवृत्त । व्हीनस प्रकाशन, पुणे
१९५८. सावरकर विविध दर्शन । व्हीनस प्रकाशन, पुणे
१९६२, सावरकर यांच्या आठवणी । अधिकारी प्रकाशन, पुणे
१९६९, महायोगी वीर सावरकर, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७३, सावरकर आत्मचरित्र (पूर्वपीठिका) ।, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
१९७२, सावरकर आत्मचरित्र (भगूर) | मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
१९७८, स्वातंत्र्यवीर सावरकर विषयक वक्ते नि लेखक यांची सूची | स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
सावरकरांवरील मृ्त्युलेख (आचार्य अत्रे)
ज्वालामुखीचे अग्निनृत्य - वि.श्री. जोशी
शोध सावरकरांचा - य.दि. फडके
क्रांतिकारकांचे कुलपुरुष - आचार्य अत्रे
सावरकरांचे समाजकार्य सत्य आणि विपर्यास - शेषराव मोरे
सावरकरांचा बुद्धिवाद एक चिकित्सक अभ्यास - शेषराव मोरे
रत्‍नागिरी पर्व - आचार्य बाळाराव सावरकर
हिंदुसभा पर्व (खंड १ व २) - आचार्य बाळाराव सावरकर
सांगता पर्व - आचार्य बाळाराव सावरकर
सावरकर चरित्र - धनंजय कीर
सावरकर नावाची ज्योत - पु.भा. भावे
सावरकर चरित्र - शि.ल. करंदीकर
दर्यापार - मुकुंद सोनपाटकी
गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी – शेषराव मोरे
🎭🎞️ सावरकरांवरील मराठी चित्रपट, नाटके, कार्यक्रम
अनादि मी अनंत मी (सावरकरांच्या जीवनावर प्रतीकात्मक सांगीतिक नाट्याविष्कार : लेखक-दिग्दर्शक माधव खाडिलकर, संगीत आशा खाडिलकर, कलावंत ओंकार-प्राजक्ता खाडिलकर आणि इतर अनेकजण.)
मी विनायक दामोदर सावरकर (एकपात्री, सादरकर्ते : योगेश सोमण)
यशोयुतां वंदे (संकल्पन/दिग्दर्शन- सारंग कुलकर्णी. संहिता - दीपा सातव सपकाळ)
व्हॉट अबाऊट सावरकर? (चित्रपट, दिग्दर्शक - रूपेश केतकर आणि नितीन गावडे, २०१५)
स्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट, निर्माते सुधीर फडके)
 
            🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
        ♾♾♾ ♾♾♾
       स्त्रोत ~ WikipediA                                                                                                                                                                                                                                                                 ➖➖➖➖➖➖➖➖➖         📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...