सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

यशोगाथा थोरांची - भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया


यशोगाथा थोरांची - भारतरत्न  मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
(भारतीय अभियंता, विद्वान, राजकारण आणि म्हैसूरचे दिवाण)


जन्म : सप्टेंबर १५, १८६१
(मुद्देनहळ्ळी, चिकबळ्ळापूर तालुका व जिल्हा, म्हैसूर राज्य (सध्या कर्नाटक)
मृत्यू : १४ एप्रिल, १९६२ (वय १००)
             (बंगलोर)
निवासस्थान : मुद्देनहळ्ळी, चिकबळ्ळापूर तालुका व जिल्हा, म्हैसूर राज्य (सध्या कर्नाटक)
नागरिकत्व : भारतीय
राष्ट्रीयत्व : भारतीय 
धर्म : हिंदू
कार्यक्षेत्र : अभियांत्रिकी
कार्यसंस्था : अभियंता, म्हैसूर चे दिवाण
प्रशिक्षण : अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे
ख्याती : आंतरराष्ट्रीय इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स यालंडन स्थित संस्थेचे सन्माननिय सदस्यत्व ,तर इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स च्या बंगलोर शाखेची फेलोशिप
पुरस्कार : भारतरत्न ,'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर'
वडील : श्रीनिवास शास्त्री
आई : वेंकट लक्षम्मा
              सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या, ('नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर') हे एक भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी जन्मलेले समर्थ अभियंते व नागरिक होते. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला. ब्रिटीशांनी त्यांना, त्यांनी केलेल्या जनहिताच्या चांगल्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो. काही ठिकाणी विशेषतः त्यांच्या जन्मराज्य असलेल्या कर्नाटकात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.
👦🏻 *बालपण*
यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी झाला.ते श्रीनिवास शास्त्री व वेंकटलक्षम्मा यांचे अपत्य होते.त्यांचे जन्मगाव पुर्वी म्हैसूर राज्यात होते.त्यांचे वडील हे एक संस्कृत विद्वान होते व हिंदू ग्रंथांचे भाष्यकार असून आयुर्वेदिक वैद्य होते.त्यांचे पुर्वज हे मोक्षगुंडम या गिद्दलपूर नजिकच्या, सध्याच्या आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात असलेल्या गावातील होते. त्यांनी म्हैसूर राज्यात सुमारे तीन शतकापुर्वीच स्थलांतर केले.'मोक्षगुंडम ' हे नाव त्यांची आंध्र प्रदेशशी असलेली संलग्नता दाखवते. तरुण विश्वेश्वरैय्या यांच्या वडिलांचे ते १५ वर्षाचे असतांना निधन झाले.त्याने त्यांचे कुटुंब हादरले.त्यानंतर ते परतकुर्नुल येथुन मुद्देनहळ्ळीला आले.त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळापूर येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण बंगलोर येथे झाले. ते १८८१ साली मद्रास येथुन बी.ए.ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रिकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग,पुणे मध्ये पुणे येथे घेतले. १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.
👨🏻‍🚒 *अभियंता म्हणून वाटचाल*
अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर, त्यांनी बॉम्बे (सध्याचे मुंबई) येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली. नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून निमंत्रण आले. त्यांनी, दख्खन क्षेत्रात पाटबंधाऱ्यांची एक अतिशय क्लिष्ट योजना राबविली. त्यांनी 'सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली' विकसित केली व त्याचे पेटेंट घेतले, जी सन १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील खडकवासला धरणास लावण्यात आली. ही द्वारे धरणातील साठ्याची पूरपातळी, पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आली. या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे, ती टिग्रा? धरण ग्वाल्हेर व कृष्णराज सागर धरण म्हैसूर येथे बसविण्यात आली. विश्वेश्वरैया यांनी हैदराबाद शहराचे पूरापासून संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्याने त्यांना सत्कार मुर्ती झाले.विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.

सर मो. विश्वेश्वरैया यांनी, कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासून ते उदघाटनापर्यंत सर्व कामांची देखरेख केली. या बांधकामाने, धरण बांधल्या गेल्याच्या वेळचे ते आशियातील सर्वात मोठे सरोवर निर्माण झाले. त्यांना यामुळे, 'म्हैसूर राज्याचे पिता' म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या म्हैसूर राज्याचे नोकरीदरम्यान त्यांनी सरकारच्या नियंत्रणाखालील म्हैसूर सोप फॅक्टरी, किटकनाशक प्रयोगशाळा, भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्, श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट, बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, स्टेट बँक ऑफ मैसुर, सेंचुरी क्लब, म्हैसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणी औद्योगिक प्रकल्प सुरू केले. त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला. ते प्रामाणिकपणा, वेळेचे नियोजन व एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते. तिरुमला-तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीतही त्यांनी योगदान केले.

⚜️ *म्हैसूर येथे दिवाण म्हणून*
सन १९०८ मध्ये स्वेच्छानिवृत्तीनंतर, म्हैसूर या भारतातील मोठ्या व महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणून त्यांना नियुक्त केले गेले. कृष्णराज वोडेयार चतुर्थ या म्हैसूरच्या महाराजांच्या पाठिंब्यामुळे विश्वेश्वरया यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. इतर अनेक कामांसोबत सन १९१७ मध्ये बंगळूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली. ही भारताची पहिली अभियांत्रिकी संस्था होती. ती अद्यापही कर्नाटकातील एक प्रतिष्ठित संस्था आहे.
🎖️ *पुरस्कार व सन्मान*
ते म्हैसूर येथे असतांना त्यांनी जनतेसाठी केलेल्या कामांमुळे, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' या सन्मानाने गौरविले गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये 'भारतरत्न' या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले गेले.

'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' पदक
सर मो.विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स या लंडन स्थित संस्थेने सन्माननीय सदस्यत्व, तर इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्सच्या बंगलोर शाखेने फेलोशिप देऊन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना 'डॉक्टर' ही अनेक विद्याशाखातली पदवी देऊन गौरविले. ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष होते.
🛕 *मुद्देनहळ्ळी येथील कौटुंबिक मंदिर*
त्यांच्या आईस शेतात जाताना एका दगडावर कोरलेली एक मूर्ती दिसली. ती कोणाची आहे अशी गावात विचारपूस केल्यावर कोणीच समोर येईना. म्हणून त्यांनी ती घरी आणून त्याची घरी प्रतिष्ठापना केली. हेच त्यांचे कौटुंबिक मंदिर होय. हे हनुमानाचे मंदिर अजूनही अस्तित्वात आहे.
⛲ *मुद्देनहळ्ळी येथिल स्मारक*
नंदी हिल्सच्या पृष्ठभूमीवर, सर मो.विश्वेश्वरैया यांचे, त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या भूमीवर,एक सुंदर व चित्रमय स्मारक मुद्देनहळ्ळी येथे उभारण्यात आले आहे.
the Province १९४५
Rural Industrialization of Mysore (Vol. 1) १९५५
Rural Industrialization of Mysore (Vol. 2) १९५५
Rural Industrialization of Mysore (Vol. 3) १९५७
Rural Industrialization of Mysore (Vol. 4) १९५९
Village Industries (Part I & II ) १९५

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏
        

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२५

स्वामी दयानंद सरस्वती

      🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : श्री अविनाश काशिनाथ पाटील                                                     
     
  🚩📚🛕🇮🇳👨‍🦲🇮🇳🛕📚🚩

        स्वामी दयानंद सरस्वती
(समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक)

    जन्म : १२ फेब्रुवारी १८२४
   मृत्यू : ३० ऑक्टोम्बर १९५६
पूर्ण नाव : मूलशंकर अंबाशंकर तिवारी
वडील :अंबाशंकर
आई : अमृतबाई
विवाह :  अविवाहित
जन्मस्थान : टंकारा (मोरवी संस्थान, गुजरात)
शिक्षण : शालेय शिक्षणापासून वंचित
                स्वामी दयानंद सरस्वती हे एका युगपुरूषाचे नाव आहे. एकोणीसाव्या शतकातली ती एक महान व्यक्ती नव्हे, शक्ती होती. ते एक महान धर्मसुधारक व समाजसुधारक होते. अंधारात सापडलेल्या व दिशा हरवून बसलेल्या समाजाला व देशाला आधार असतो तो केवळ समोरच्या क्षीतिजावर चमकणाऱ्या ध्रुवताऱ्याचा.

महर्षी दयानंदांचा जन्म गुजरातमधील टंकारा या गावी १८२४ मध्ये झाला होता. त्यांचे मूळ नाव मूळशंकर होते. त्यांचे आई-वडील औदिच्य ब्राह्मण होते. समाजात त्यांना सन्मानाचे स्थान होते. घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. घराण्यात ज्ञानाची परंपरा होती. मूळशंकर हा कुशाग्र बुद्धीचा संवेदनशील मुलगा होता. वयाच्या चौदाव्या वर्षी यजुर्वेद त्यांना पूर्ण कंठस्थ होता. तीन प्रसंग असे घडले की त्यामुळे त्यांचे मन अस्वस्थ झाले. पहिला प्रसंग शिवरात्रीच्या दिवशी घडला. शिवमंदिरात व्रत, उपवास करत असता रात्रीच्या सामसूम झालेल्या क्षणी शिवपिंडीवर उंदीर चढला. त्याचा कुठलाच प्रतिकार पिंडीकडून होत नव्हता. वडिलांकडून भगवान शिवाबद्दल बरेच ऐकले होते, तसे होताना दिसले नाही. दुसरे, बहिणीचा मृत्यू व तिसरा प्रसंग चुत्याचा मृत्यू. या प्रसंगांनी खूप दु:ख झाले. मलाही असेच मरण येईल. मृत्यू काय आहे तेही जाणणे आवश्यक वाटून मूलशंकरनी एकेदिवशी गृहत्याग केला व तो पुन्हा कधी घरी परतला नाही. लग्नाच्या बेडीतही अडकला नाही.

🌟 *जीवनाला कलाटणी देणान्या घटना*
एकदा शिवरात्री होती. वडील म्हणाले, “मूलशंकर, आज सर्वांनी उपवास करायचा. रात्रभर देवळात जागायचे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करायची.”

हे ऐकून मूलशंकरने उपवास केला. दिवस संपला, रात्र झाली. मूलशंकर आणि वडील शंकराच्या देवळात गेले. त्यांनी पूजा केली, पिंडीवर फुले वाहिला. तादळाच्या अक्षता वाहिल्या. रात्रीच बारा वाजल. वाडलाना झाप येऊ लागली पण मूलशंकर जागा राहिला. आपला उपवास निष्फळ होईल या भीतीने तो झोपला नाही. देवळातल्या बिळांतून उंदीर बाहेर आले आणि शंकराच्या पिंडीभोवती फिरू लागले. ते पिंडीवरच्या अक्षता खाऊ लागले. हे दृश्य पाहून जी मूर्ती उंदरापासून स्वतःचे रक्षण करू शकत नाही ती भक्तांचे संकटापासून रक्षण कशी काय करू शकेल, मूर्तीत काहीही सामर्थ्य नसते ; तेव्हा मूर्तिपूजेलाही काही अर्थ नाही, अशा त-हेचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले.

त्या वेळेपासून त्यांच्या मनात धर्माविषयी जिज्ञासा जागृत झाली. परमेश्वराचे शाश्वत स्वरूप व धर्माचा खरा अर्थ जाणून घेण्याची ओढ त्यांना लागली.

एकदा टंकारा नगरामध्ये कॉलन्याची साथ आली. त्या साधीमध्ये मूलशंकरची चौदा वर्षांची बहीण मरण पावली. या घटनेनंतर तीन वर्षांनी मूलशंकरच्या आवडत्या काकांचाही कॉलन्यामुळे मृत्यू झाला. मूलशंकरला याचा जबरदस्त धक्का बसला. जणू काही त्याचे जीवनसर्वस्वच हरवले.

🏃🏻‍♂️ *गृहत्याग*
कौटुंबिक बंधनाचा त्याग करावा. अशी मूलशंकरच्या मनात इच्छा निर्माण झाली. जीवन काय आहे? मृत्यू काय आहे? या प्रश्नांची उत्तरे सुयोग्य महात्म्याकडून समजवून घ्यावीत, असे त्यांना वाटत होते. या ध्येय प्राप्तीकरिता वयाच्या २१ व्या वर्षीच त्यांनी घरदार सोडले. त्यांच्या घरातील वडीलधान्या मंडळीनी त्यांच्या लग्नाचा चालविलेला विचार हे त्यांच्या निर्णयास निमित्त झाले होते. भौतिक सुखाचा आनंद लुटण्यापेक्षा स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घेणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटले. त्यासाठी घरादाराचा त्याग करून गुरूचा शोध घेत फिरण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

🎯 *गुरूचा शोध*
गृहत्याग केल्यानंतर मूलशंकर अहमदाबाद, बड़ौदा, हरिद्वार, काशी, कानपूर या ठिकाणी गुरूंच्या शोधार्थ जंगलातून व पहाडातूनसुद्धा प्रवास करीत राहिले परंतु त्यांना योग्य गुरू मिळाला नाही. याच सुमारास त्या काळचे प्रकांड पंडित आणि संन्यासी स्वामी पूर्णानंद यांची मूलशंकरशी भेट झाली. त्यांचे शिष्यत्व पत्करतो मूळशंकर संन्यास धर्माचा स्वीकार केला। संन्यास धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी स्वामी दयानंद सरस्वती हे नाव धारण केले.

पंधरा वर्षापर्यंत सर्वत्र प्रमती केल्यावर स्वामी पूर्णशर्मा नामक साधूच्या म्हणण्यानुसार स्वामी दयानंद मधुरेस येऊन पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी स्वामी विरजानंद यांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून वेद व इतर हिंदू धर्मग्रंथाचे ज्ञान घेतले.

📜 *वैदिक ज्ञानाचा प्रसार*
स्वामी दयानंदाना येद सर्वश्रेष्ठ आणि पवित्र वाटत होते. मुख्य म्हणजे वेदांमध्ये मूर्तिपूजा नव्हती किया उच्च-ि हा भाव नव्हता. वेदातील ज्ञान है खरेखुरे ईश्वरीय ज्ञान आहे. पवित्र ज्ञान आहे आणि समाजाकरिता अत्यंत उपयुक्त आहे. अशी दयानंदांची अदा होती म्हणूनच त्यानी “वेदाकडे परत जा’ अशी भारतीयांना शिकवण दिली.

आपल्या अम्मलित प्रवचनाद्वारे ते मूर्तिपूजा, जन्मजात उच्च-निचता जातिभेद, यातक रूडी, यज्ञांमध्ये केली जाणारी पशुहत्या यांच्यावर घणाघाती आघात करू लागले.

इ.स. १८६९ मध्ये त्यांनी काशीच्या सनातनी ब्राह्मण पडिताशी शास्यार्थावर वादविवाद केला त्यामुळे त्याचे नाव सर्वत्र गाजले.

🇮🇳 *स्वातंत्र्यप्रेम*
इ.स १८५७ च्या असफलतेपासून तर कॉंग्रेसच्या स्थापनेपर्यंत भारतीयाध्य हृदयामध्ये स्वातंत्र्यप्रेम जागृत ठेवण्याचे कार्य ज्या ज्या महापुरुषांनी केले त्यात दयानंद हे एक होते. भारतात ब्रिटिशांना हाकलण्याकरिता सशस्त्र क्रांती हा एकमेव मार्ग आहे. अशी स्वामी दयानंदाची पक्की खात्री होती. आर्यसमाज आणि गुरुकुल यामध्ये राष्ट्रभक्तांना सशस्त्र क्रांतीकरिता प्रेरणा आणि प्रशिक्षण मिळत असे. स्वामी श्रद्धानंद, लाला लजपतराय आणि लाला हरदयाल इत्यादी. ब्रिटिशांना भारतातून हाकलण्याकरिता उपडपणे लढणारे नेते आर्यसमाजीच होते.

🔘 *शुद्धीकरण*
स्वामी दयानदानी खिस्ती आणि मुसलमान धर्मात गेलेल्या लोकांचे शुद्धीकरण करून त्यांना हिंदू केले.

आर्य समाजाची स्थापना:
समाजाच्या सर्व घटकाना एका सूत्रामध्ये बांधण्याकरिता समान भाषा आवश्यक आहे. अशी त्यांची धारणा होती हिन्दी भाषेला राष्ट्रभाषेचे स्थान मिळावे, असे त्यांचे स्पष्ट मत होते.

स्वामी दयानंद सरस्वतोनी धर्मसुधारणेच्या कार्याची प्रेरणा बायो समाजाकडून घेतली होती. प्रारंभीच्या काळात त्यांच्या सहकायनिच धर्मप्रचाराधे धर्मनुधारणेचे कार्य करीत. तथापि पुढे त्यांनी आपला वेगळा संप्रदाय निर्माण करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी मुंबई येथे १० एप्रिल १८७५ रोजी आर्य समाजाची स्थापना केली.

आर्य समाजाने धार्मिक व सामाजिक सुधारणांबरोबरच शैक्षणिक सुधारणा केल्या वेदांचे शिक्षण घेणारा तरुण हा निर्भय, तेजस्वी आणि काळाचे आव्हान स्वीकारणारा के होईल से स्वानी दयानंदाना वाटत होते .उत्तर भारतात त्यांनी चालविलेले चोक्षण प्रसाद कार्य अतिशय महत्वपूर्ण ठरले.

🔮 *विचार*
सर्व मानव एक, सर्वाचे देव एक, सर्वांचा धर्म एक, पृथ्वी माता एक हीच जीवनाची चतुःसूत्री आहे.

स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही, त्यांना अज्ञानात ठेवले जाते, हे भारताच्या अध:पतनाचे एक कारण आहे. ज्याप्रमाणे गाठोड्यात असलेल्या रत्नांचे प्रतिबिंब आरशात पडू शकत नाही त्याप्रमाणे जोपर्यंत स्त्रिया पडदा पद्धतीसारख्या मूर्ख रुढीचे बंधन तोडत नाहीत तोपर्यंत त्यांची प्रगती होणे अशक्य आहे. त्यांनी हा पडदा फेकून दिला पाहिजे. सीता आणि सावित्री चिरस्मरणीय झाल्या ते त्याच्या सद्गुणांमुळे. त्यांच्या पडद्यामुळे नाही.

स्त्रियांना समाजात सन्मानाचे स्थान मिळाले पाहिजे. स्त्री ही कुटुंबाची स्वामिनी असल्याने तिला तिचे अधिकार मिळाले पाहिजेत.

📚 ग्रंथसंपदा
‘सत्यार्थ प्रकाश’ हा महान ग्रंथ म्हणजे स्वामी दयानंदांनी आपल्या समाजाला दिलेली अनमोल देणगी होय. या ग्रंथामध्ये पंधरा अध्याय असून त्यामध्ये वेदांचा सत्यार्थ दिलेला आहे. म्हणून या ग्रंथाला ‘सत्यार्थ प्रकाश’ म्हटले आहे. हा ग्रंथ पूर्णपणे वेदांवर आधारलेला आहे.

वेद भाष्य, संस्कार निधी, व्यवहार भानू इत्यादी ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिले.
               
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
         ♾♾♾ *446* ♾♾♾
     स्त्रोत~ mahasarav.com                                                                                                                                                                                                                                                  ➖➖➖➖➖➖➖➖➖                                        

बुधवार, २५ डिसेंबर, २०२४

अटल बिहारी वाजपेयी

             यशोगाथा थोरांची
(संकलन व निर्मिती - श्री अविनाश पाटील उपशिक्षक बापूसाहेब डी. डी. विसपुते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे) 

     भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी
          (भारताचे ११ वे पंतप्रधान)


      जन्म : २५ डिसेंबर १९२४
         (ग्वाल्हेर,  ब्रिटिश भारत)
    मृत्यू : १६ ऑगस्ट २०१८
(एम्स हॉस्पिटल, दिल्ली, भारत)
राष्ट्रीयत्व : भारतीय
राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष
व्यवसाय : राजकारणी, कवी
धर्म : हिंदू
              अटलबिहारी वाजपेयी हे माजी भारतीय पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते. ते १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. केवळ १३ दिवस टिकलेल्या ११ व्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत (१९ मार्च १९९८ ते १९ मे २००४) ते पंतप्रधान होते. यासोबतच त्यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८-१९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५-१९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७-१९८०), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८०-१९८६) आणि भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८०-१९८४, १९८६, १९९३-१९९६), ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ दरम्यान भारतीय परराष्ट्रमंत्री ही पदे भूषविली होती.    
                      
🔆  शिक्षण
अटलबिहारी वाजपेयी यांनी व्हिक्टोरिया कॉलेजमधून राज्यशास्त्रात मास्टर्स पदवी संपादन केली होती. तसेच त्यांनी पत्रकारितेचेही काम केले होते. ते अविवाहित होते.

🎍 राजकीय प्रवासाची सुरूवात
राजकारणाशी वाजपेयी यांचा पहिला संबंध १९४२ मध्ये भारत छोडो चळवळीच्या निमित्ताने आला. तेव्हा त्यांना अटक झाली होती. नंतर ते थोड्याच दिवसांनी श्यामाप्रसाद मुखर्जी व पर्यायाने भारतीय जनसंघ यांच्या संपर्कात आले. भारतीय जनसंघाचे नेते म्हणूनच त्यांची कारकीर्द सुरू झाली. वाजपेयी १९५७ मध्ये संसदेवर बलारामपूरमधून निवडून आले. तरूणपणातच आपल्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षात असूनही सर्व स्तरावर वाहवा तसेच आदरही मिळवला. त्याची भाषणे अतिशय उत्तम व दर्जेदार म्हणून गणली जात. खुद्द जवाहरलाल नेहरूंनी वाजपेयी एकदिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान असतील अशा शब्दात त्यांचा गौरव केला होता.

जनसंघ
भारतीय जनसंघ विपक्षातला प्रबळ घटक असूनही तो राष्ट्रीय काँग्रेसला सत्तेवरून दूर सारू शकला नाही. दरम्यान नव्याने स्थापन झालेला काँग्रेस (आय) (Congress(I)) पक्ष सत्तेवर आला. तदनंतर १९७५ साली इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यांनी आणीबाणीला विरोध करणाऱ्या विविध पक्ष आणि घटकांसोबत हातमिळवणी केली. याच दरम्यान त्यांना विरोधाबद्दल तुरुंगवास भोगावा लागला. १९७७ मधे इंदिरा गांधी यानी राजीनामा दिला. यानंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी भारतीय जनसंघाने अनेक सामाजिक आणि प्रादेशिक पक्षांसोबत जनता पार्टीची निर्मिती केली. जनता पार्टीला निवडणुकांत बहुमत प्राप्त होऊन मोरारजी देसाई याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. वाजपेयी हे नवी दिल्ली येथून निवडून आले आणि परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी त्यानी स्वीकारली.

या दोन वर्षाच्या कारकिर्दीत वाजपेयी १९७९मध्ये चीन भेटीवर गेले. १९६२च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्‍न होता. त्यांनी नंतर पाकिस्तानला सुद्धा भेट दिली. १९७१च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता. वाजपेयी यानी Conference on Disarmament (निःशस्त्रीकरण परिषदे)मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणु-कार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. १९७७च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांनी हिंदीतून भाषण केले. अखेर १९७९मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरकारने केलेल्या कारवाईमुळे त्यांनी राजीनामा दिला.

🌷 भारतीय जनता पक्ष (भाजप) ची स्थापना
जनता पक्षाचे सरकार जास्त दिवस टिकले नाही. मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिला. तसेच अंतर्गत विरोधामुळे अखेर जनता पक्षाची शकले झाली. वाजपेयी यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यांतील मित्र, खासकरून लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंग शेखावत यांच्यासोबत मिळून भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० साली केली. वाजपेयी हे भाजपाचे पहिले अध्यक्ष बनले. भाजप हा काँग्रेसचा प्रबळ विरोधक होता. ऑपरेशन ब्ल्यू-स्टारला भाजपाचा पाठिंबा असला तरी अंगरक्षकाकडून झालेल्या इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये ज्या शीखविरोधी दंगली उसळल्या त्याचाही भाजपाने विरोध केला. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला केवळ २ जागा आल्या. तरीही भाजपा देशाच्या राजकारणात मुख्य प्रवाहात राहिला आणि वाजपेयी हेच पक्षाच्या केंद्रस्थानी राहिले. तरी भाजपावरील हिंदुत्वाचा प्रभाव वाढत होता, त्यामुळेच रामजन्मभूमीच्या विश्व हिंदू परिषदेच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रश्नाला भाजपाने राजकीय स्तरावर आवाज दिला. यात अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मुद्दा समाविष्ट होता. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद नावाची वास्तु पाडण्याच्या घटनेमुळे देशात जातीय हिंसाचार उसळला.

तरीही देशाच्या राजकारणातला भाजपाचा विस्तार होतच राहिला. १९९५च्या मार्चमध्ये गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांत भाजपाला विजय मिळाला. भाजपाच्या मुंबई येथील नोव्हेंबर १९९५च्या अधिवेशनात अडवाणी यानी वाजपेयी याचे नाव १९९६च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले.

⚜️ पंतप्रधान पद
पहिली खेप (मे १९९६)
१९९६ च्या निवडणुकात भाजप १६२ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. अनेक प्रादेशिक पक्ष तसेच छोट्या पक्षामुळे १९९६ ची लोकसभा त्रिशंकु राहिली. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण मिळाले. वाजपेयी यानी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पण लोकसभेत विश्वासमत प्रस्तावाच्या चर्चेवेळी इतर पक्षांकडून पाठिंबा मिळविणे भाजपाला शक्य झाले नाही. त्यामुळे बहुमत चाचणी न घेताच वाजपेयींनी १३ दिवसांत राजीनामा दिला आणि वाजपेयी सरकार कोसळले.

🔆 दुसरी खेप (मार्च १९९८)                                                 १९९६ ते ९८ दरम्यान तिसऱ्या आघाडीला सरकार स्थापनेच्या दोन संधी मिळाल्या. दैवेगोडा आणि इंद्रकुमार गुजराल भारताचे पंतप्रधान झाले. ही दोन्ही सरकारे लवकरच कोसळली. १९९८च्या निवडणुकांत भाजप पुन्हा प्रबळ दावेदार झाला आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यावेळी भाजपाने इतर पक्षांसोबत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रा.लो.आ.) ( NDA - National Democratic Alliance), ची स्थापना केली. अखेर १९९८च्या अखेरीस अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआचा पाठिंबा काढला. यावेळी विश्वासमत प्रस्तावावेळी वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पडले. विरोधी पक्षसुद्धा सरकार स्थापन करू शकला नाही व अखेर भारत पुन्हा लोकसभा निवडणुकांना सामोरा गेला. त्यावेळी वाजपेयी हे काळजीवाहू पंतप्रधान बनले. या दुसऱ्या खेपेस वाजपेयींनी स्वतःच्या राजकारणाची आणि कणखरतेची छाप सोडली होती. त्याचे काही महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे होते.

💥 अणुचाचणी पोखरण २
मे १९९८मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली ५ अणुचाचण्या केल्या. सत्ता प्राप्त केल्यावर केवळ एका महिन्यात करण्यात आलेल्या या चाचण्या जगाला, खास करून अमेरिकेला हादरवणाऱ्या ठरल्या, कारण भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या. पुढील २ आठवड्यांत पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या. रशिया आणि फ्रान्स यांनी भारताच्या स्वसंरक्षणासाठी आणि शांततापूर्ण उपयोगासाठी अण्वस्त्रक्षमतेचे समर्थन केले. तरी अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपीय महासंघ यांनी भारतावर अनेक क्षेत्रांत निर्बंध लादले, तरी वाजपेयींच्या आर्थिक धोरणांमुळे भारताला त्यांची झळ लागली नाही. अखेर भाजप आणि वाजपेयींच्या प्रतिमेच्या दृष्टीने या अणुचाचण्या लाभदायीच ठरल्या.

विशेष म्हणजे अमेरिकेने लादलेल्या आर्थिक प्रतिबंधांनंतरही वाजपेयींच्या काळात भारताच्या विदेशी गंगाजळीत, व्यापारात व विदेशी गुंतवणूकीच्या रूपात शंभर हजार कोटींपर्यंत वाढ होऊन आधीच्या सरकारांच्या काळात देशाला लागलेले 'कर्जबाजारी' हे विशेषण गळून पडले व भारत इतर देशांना कर्ज देऊ लागला.

🤝 लाहोर भेट आणि चर्चा
१९९८ च्या शेवटी वाजपेयींनी पाकिस्तान सोबत शांतता चर्चेसाठी मोठा पुढाकार घेतला. त्यांनी लाहोर-दिल्ली दरम्यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते स्वतः पहिल्या बसमधून पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी गेले. याचे भारतात, पाकिस्तानात आणि जागतिक स्तरावर उत्तम प्रतिसाद उमटले. वाजपेयीं सोबत पाकिस्तानला केवळ राजकारणी आणि मुत्सद्दीच नव्हे तर कला क्षेत्रातूनही अनेक मान्यवर गेले. देव आनंद यांचाही त्यात समावेश होता. कारगील युद्धानंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला त्यांनी " खेल भी जीतो और दिल भी" हा संदेश दिला होता. यानंतर अण्णाद्रमुकने पाठिंबा काढल्यावर त्यांनी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून ऑक्टोबरपर्यंत काम पाहिले.

🇮🇳 कारगील युद्ध
कारगील युद्धादरम्यानची मुत्सद्देगिरी वाजपेयींच्या कणखरतेची साक्ष देणारी आहे. लाहोर भेटीत दोन देशादरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी प्रयत्‍न करत असतांना पाकिस्तान काश्मीरमध्ये घुसखोरी करत होता. हिवाळ्यात काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील अतिउंचावर असलेल्या चौक्यांवर उणे ५० अंशापर्यंत तापमान घसरत असल्याने दोन्ही देशांकडून त्या चौक्या खाली केल्या जात. उन्हाळा सुरू होताच दोन्ही देशाचे सैनिक परत चौक्यांवर रुजू होत. पण १९९९ च्या प्रारंभी पाकिस्तानने आपले सैनिक आणि अधिकारी दहशतवाद्यांच्या वेशात भारतीय रिकाम्या चौक्यांवर घुसवले. त्यांतल्या कित्येक सैनिकांकडे व अधिकाऱ्यांजवळ त्यांची पाकिस्तानी ओळखपत्रेही होती. तसेच सोबतीला काही भाडोत्री दहशतवादीही होते.

उन्हाळा सुरू होताच भारतीय सैन्याच्या ध्यानात ही बाब आली. आणि जून १९९९मध्ये ऑपरेशन विजय सुरू केले. भारतीय सैन्याला अतिदुर्गम प्रदेश, अतिउंच शिखरे, बोचरी थंडी यांचा सामना करावा लागला. तरी हवाई दल आणि भूदलाच्या एकत्रित कारवाईने पाकिस्तानच्या सैन्याचा पराभव दिसू लागला. नवाझ शरीफ यानी याही परिस्थितीचे भांडवल करून त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप द्यायचा प्रयत्‍न केला. चीनला भेट देऊन त्यांनी मदतीची याचना केली. पण भारताने मोठ्या शिताफीने ऑपरेशन विजयची कारवाई नियंत्रण रेषेपर्यंतच मर्यादित ठेवली होती. भारताच्या पवित्र्यापुढे चीनने हस्तक्षेप नाकारला. नवाझ शरीफ यांनी मग अमेरिकेकडे मद्तीची याचना केली. तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मध्यस्थीची तयारी दाखवत.वाजपेयींना चर्चेसाठी वॉशिंग्टनला बोलावले. पण वाजपेयींनी बाणेदारपणे हे निमंत्रण सरळ धुडकावून लावत नकार दिला. यामुळे अमेरिकेला जागतिक पोलीस समजण्याच्या प्रवृत्तीला सणसणीत उत्तर गेलेच पण काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आणि तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप करवून शिमला करार मोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्नही शिताफीने उधळला.

तिसरी खेप (ऑक्टोबर १९९९ - मे २००४)
१९९९ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये (राष्ट्रीय लोकशाही आघाडीला(रालोआला) घवघवीत यश मिळाले आणि अटलबिहारी वाजपेयींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
           महत्त्वाच्या नोंदी
✈️ भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण
सन १९९९ साली तालीबान अतिरेक्यांनी IC - ८१४ या प्रवासी विमानाचे अपहरण केले . हे विमान नेपाळची राजधानी काठमांडूकडून दिल्लीला निघाले होते. अतिरेक्यांच्या या कृतीमुळे वाजपेयी सरकारने ३ अतिरेक्यांच्या बदल्यात प्रवासी विमानाची सुटका केली .

💥 २००१ संसदेवरचा हल्ला
२००१ साली दहशतवादी अफझल गुरू आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला . या हल्ल्यामध्ये ७ भारतीय सुरक्षा रक्षक मारले गेले. मात्र, दहशतवाद्याचा खात्मा पोलिसांनी केला म्हणून मोठा अनर्थ टळला, कारण एका दहशतवाद्याच्या अंगावर पूर्ण संसद उडवू शकेल एवढे RDX होते.

📜 पुरस्कार
२०१४, भारतरत्‍न, हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धिंगत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते.
१९९२, पद्मविभूषण पुरस्कार
१९९३, डी. लिट. कानपूर विश्वविद्यालय
१९९४, लोकमान्य टिळक पुरस्कार
१९९४, उत्कृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार

📰✍️ साहित्यिक प्रवास
वाजपेयी यानी राष्ट्रधर्म (मासिक), पाञ्चजन्य (साप्ताहिक) आणि स्वदेश व वीर अर्जुन या दैनिकांचे संपादक म्हणून काम पाहिले.                  

✍️ त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत.

अमर आग है (कवितासग्रह)
अमर बलिदान
A Constructive Parliamentarian (संपादक - एन.एम. घटाटे)
कुछ लेख कुछ भाषण
कैदी कविराज की कुंडलिया(आणीबाणीच्या काळात तुरुंगात लिहिलेल्या कविता)
जनसंघ और मुसलमान
न दैन्यं न पलायनम्‌ (कविता संग्रह)
नयी चुनौती नया अवसर
New Dimensions of India's Foreign Policy (a collection of speeches delivered as External Affairs Minister during 1977-79)
Four Decades in Parliament (भाषणांचे ३ खंड)
बिन्दु-बिन्दु विचार
मृत्यू या हत्या
मेरी इक्यावन कवितायें (कवितासंग्रह)
मेरी संसदीय यात्रा (चार खंड)
राजनीति की रपटीली राहें
Values, Vision & Verses of Vajpayee : India's Man of Destiny
लोकसभा मे अटलजी (भाषणांचा सग्रह)
शक्ति से शान्ति
संकल्प काल
संसद मे तीन दशक (speeches in Parliament - 1957-1992 - three volumes
Selected Poems

🪔 निधन
दीर्घ आजाराने दिल्लीच्या एम्स रूग्णालयात अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले.त्यांनी ५:०५ म.उ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता 'एम्स'च्या मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून ५:३५ म.उ जाहीर करण्यात आली.                                          📒 प्रसिद्ध कविता
अंतरद्वंद्व
अपने ही मन से कुछ बोलें
ऊॅंचाई
एक बरस बीत गया
क़दम मिला कर चलना होगा
कौरव कौन, कौन पांडव
क्षमा याचना
जीवन की ढलने लगी सॉंझ
झुक नहीं सकते
दो अनुभूतियॉं
पुनः चमकेगा दिनकर
मनाली मत जइयो
मैं न चुप हूॅं न गाता हूॅं
मौत से ठन गई
हरी हरी दूब पर
हिरोशिमा की पीड़ा
📜 सन्मान
२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये वाजपेयी नवव्या क्रमांकावर होते.

📚 वाजपेयींवरील पुस्तके
अटलजी : कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी (सारंग दर्शने)
Atal Bihari Vajpayee : A Man for All Seasons (इंग्रजी, लेखक - किंगशुक नाग)
The Untold Vajpayee : Politician and Paradox (N. P. Ullekh)
काश्मीर : वाजपेयी पर्व (अनुवादित, अनुवादक - चिंतामणी भिडे; मूळ इंग्रजी लेखक - ए.एस. दुलत आणि आदित्य सिन्हा)
भारतरत्न अटलजी (डाॅ. शरद कुंटे)
हार नहीं मानूॅंगा : एक अटल जीवन गाथा (लेखक - विजय त्रिवेदी)

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
        ♾♾♾ ♾♾♾
         स्त्रोत ~ WikipediA                                                                                                                                                                                                                                      

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४

तुळशी विवाह

*✧═════•❁❀❁•═════✧*
⚜Ⓜ 🇹 🇸⚜ Ⓜ 🇹 🇸⚜
             *✧═════•❁❀❁•═════✧*
       *🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️*
           
      *🏵️तुळशी विवाह🏵️* 


तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे.
 
कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे.

महत्त्व

हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे.तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर किंवा घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यत: द्वादशीला करतात. तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे.हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 *तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
*महाराष्ट्र करू स्मार्ट* 📡📲

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

बैलपोळा विशेष

              बैलपोळा 

सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.
  
    श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केली जाते.
      
हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो.पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. याला 'खांद शेकणे' अथवा 'खांड शेकणे' म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. बैलाची निगा राखणाऱ्या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.

या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर (आखरावर) आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील/श्रीमंत जमीनदार) तोरण तोडतो व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणाऱ्यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात.शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो.

सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४

श्री कृष्ण जन्माष्टमी


कृष्ण जन्माच्या निमित्ताने :-

कृष्णाला आपण देव म्हणून पुजतो. आपल्याला तो वंदनीय आहे. भगवद्गीतेचा रचैता, जी भगवद्गीता आपण आपला धर्मग्रंथ मानतो पण वाचत नाही, समजून घेत नाही, आचरणात आणण्याची तर गोष्टच लांब ! 

श्री कृष्ण काय होते आणि आपण त्यांना कसे गुरु करू शकतो हे लक्षात घेतले तर निव्वळ मज्जाच !  
कृष्ण हा मुत्सद्दी, तत्त्ववेता, शिष्टाई करणारा, व्ह्यूवरचनाकार, प्रेरक, मार्गदर्शक, मित्र, सखा, प्रियकर, पालक, बालक अशा अनेक भूमिकांमधून आपल्याला भेटतो.

 या कृष्णाच्या बाबतीत आपण त्याला निव्वळ देव म्हणून पुजण्यापेक्षा त्याच्या चरित्राचे अनुकरण करावे हीच त्याला खरी वंदना आहे.

 प्रत्येकाने कृष्ण व्हावे अथवा कृष्णासारखा सोबती सोबत ठेवावा म्हणजे जीवनात प्रत्येक क्षणी पावलोपावली जे कुरुक्षेत्र आपल्यासमोर येत असते त्यात सामोरे जाणाऱ्या लढायांना यशस्वीरित्या तोंड देता येईल. 

अर्जुनाला कुरुक्षेत्रावर त्याचे कर्तव्य बजावायला सर्व क्षमता सोबत असूनही अडचण आली होती. अर्जुन थांबला होता. अर्जुनाचे कर्तव्य हे धर्माचे कर्तव्य होते, अर्जुनाची लढाई ही धर्माची लढाई होती. तथापि अनेक विविध धारणा ज्या सत्यनसूनही सत्य असल्यासारख्या दिसत होत्या. त्यामुळे तो त्याच्या कर्तव्यापासून, त्याचे कौशल्य वापरण्यापासून परावृत्त झाला होता.

 त्याला तुझ्या भावभावना बाजूला ठेवून तुला आवश्यक ते कर्तव्य पार पाडणे कसे आवश्यक आहे आणि कसे सहज शक्य आहे आणि ते कसे धर्मानुरुप आहे हे समजून सांगणारा कृष्ण होता. कृष्णाच्या उपदेशंती अर्जुन लढाईस तयार झाला आणि त्यांनी ते अक्राळविक्राळ युद्ध जिंकले.

 वास्तविकता अर्जुनाला कृष्णाने उपदेश करण्यापूर्वी आणि कृष्णाने उपदेश केल्यानंतर त्याच्या युद्ध कौशल्यामध्ये तसूभरही फरक पडलेला नव्हता. वास्तविक पाहता युद्ध कौशल्य हा कृष्णाचा प्रांतच नव्हता.

 कृष्णाला जी अनेक नावे आहेत त्यापैकी एक नाव रणछोडदासजी आहे. रणछोडदास म्हणजे जो रणांगणातून पळून गेला तो !  पण या अशा रणछोडदासांनी जगातल्या सर्वात मोठ्या युद्धात तात्कालीन सर्वश्रेष्ठ योध्याला लढाया प्रवृत्त केले, प्रेरित केले आणि त्याची कौशल्य वापरून ते युद्ध जिंकेल आणि धर्माला विजय मिळवून देईल अशी योजना केली.

 आपल्या आयुष्यातही आपल्या आजूबाजूला असे अनेक अर्जुन आहेत जे सर्व कौशल्य धारण करतात. तथापि त्यांच्या काही धारणामुळे कौशल्य वापरण्यापासून परवृत्त्त होतात, त्यांच्या कुरुक्षेत्रावरील लढाया लढत नाहीत आणि जिंकण्याची क्षमता असतानाही पराभूत होत राहतात.

 अशा सर्व अर्जुनांसाठी आपण कृष्ण बनून त्यांना त्यांच्या लढाया जिंकण्यास प्रवृत्त करू शकतो.

 त्यासोबतच आपल्या सोबतही अनेक प्रश्न असतात. आपणही क्षमता असूनही आवश्यकता असूनही कौशल्य असूनही आपल्या जीवनात पावलोपावली आपल्यासमोर येणाऱ्या कुरुक्षेत्रांवर मर्दुमकी गाजवण्यापासून आपल्या धारणामुळे परावृत्त्त होत असतो. पण आपण त्या कृष्णाचे ऐकत नाही, त्यांच्याकडे लक्ष देत नाही.

 असे आपल्या आयुष्यातील कृष्ण ओळखून त्यांच्या प्रबोधनाचा लाभ घेऊन आपण आपल्या लढाया जिंकण्याचा निर्धार कृष्ण जन्माष्टमी निमित्त करूया !
🙏🌹🙏

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

9 ऑगस्ट क्रांतिदिन

       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
           ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : श्री अविनाश काशिनाथ पाटील बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                               ➿➿➿➿➿➿➿➿➿                                               

       चले जाव चळवळ १९४२  
         भारत छोडो आंदोलन   
               ऑगस्ट क्रांती

                हे ऑगस्ट १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सूरू झालेले नागरी असहकार आंदोलन (इंग्लिश: Civil Disobedience) होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र्य  प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.

भारत छोडो आंदोलन
या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि १४ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. ९ जुलै २०१८ रोजी चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन संपन्न झाला. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. 
             सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पेटविण्यासाठी सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला आणि गांधींजीसह काँगेस श्रेष्ठींना अटक करण्यात आली. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वत:ला अटक करवून घेतली.

चळवळीची कारणे
क्रिपस योजनेला अपयश
राज्यकर्त्यांची कृत्ये 
जपानी आक्रमणे
इंग्रजांचा विरोधाभास
महात्मा गांधी यांचे वास्तव धोरण
 
छोडो भारत चळवळीची 
अपयशाची कारणे
नियोजनाचा अभाव
सरकारी नोकर इंग्रजी विरुद्ध राहिले
दडपशाही
राष्ट्र सभेच्या नेत्यांना कैद

इतर कारणे

 त्रिमंत्री योजना
                  दुसऱ्या महायुद्धानंतर सन १९४५ मध्ये इंग्लंड सत्ता बदल होऊन मेजर अ‍ॅटली यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री योजना सुरूवातीपासून भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत अनुकूल होती. मार्च १९४७ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अ‍ॅटलीने भारताविषयी धोरण स्पष्ट केले. इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्यासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता भारतात त्रिमंत्री कमिशन पाठविण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. मेजर अ‍ॅटली यांच्या घोषणेनुसार २४ मार्च, १९४६ रोजी त्रिमंत्री कमिशन भारतात आले. स्ट्रॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व अलेक्झांडर हे तीन सभासद होते. या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी करून एक योजना मांडली, ही योजना म्हणेजच त्रिमंत्री योजना होय.

चलेजाव आंदोलन (१९४२)
क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव' ठराव पास.
मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी कॉंगे्रसचे खुले अधिवेशन सुरू. (मौलाना आझाद अध्यक्ष) ८ ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव ठराव मंजूर. ९ ऑगस्ट रोजी पहाटे नेत्यांची धरपकड. गांधीजी आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान. कार्यकारिणी सदस्य अहमदनगर तुरूंगात, ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ.
▶ प्रती सरकारे सातारा (नाना पाटील), तालचेर (ओरिसा), बलिया (उत्तर प्रदेश) इ.
बंगालात तामलुक जतिया सरकार दिनापुर येथे.
▶  या राष्ट्रीय सरकारानी कायदा, सुव्यवस्था राखली. आरोग्य, शिक्षण, शेती, पोस्टल व्यवस्था
सांभाळली.
▶ सुरूवातीला शहरी भागात अधिक जोर नंतर खेडयात.
▶ या काळात भूमिगत चळवळी जयप्रकाश नारायण व रामनंदन मिश्रा हजारीबाग जेलमधून निसटले, भूमिगत चळवळ सुरू, मुंबईत समाजवाद्यांच्या अरूणा असफअलींच्या नेतृत्वाखाली भूमिगत कारवाया.
▶ काँग्रेस रेडिओ केंद्र, उषा मेहता, शाळा-कॉलेज स्त्री-पुरूष कामगार, जनआंदोलन.
▶ व्यापारी व भांडवलदार सामील नाहीत. युध्दकाळात त्यांचा मोठा फायदा.
▶ मुस्लीम लीग दूर राहिली. हिंदु महासभेने तिरस्कार केला. कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला नाही.
▶ भारतीय संस्थानिकांची इंग्रजांना मदत. सी. राजगोपालाचारी या सारखे काँग्रेसी नेते बाजूला राहिले.
▶ निश्चित स्वरूप व कार्यक्रमाचा अभाव, हिंदी नोकरांची एकनिष्ठता, भीषण उपासमार, हिंदी लोकातील फूट, सरकारची दडपशाही यामुळे चलेजाव चळवळीला अपयश.
▶ स्वातंत्र्यासाठी जनता प्राणाची बाजी लावण्यास सिध्द आहे हे स्पष्ट झाले.
भारताचे स्वातंत्र दृष्टीपथात आले
      क्रिप्स योजनेच्या अपयशानंतर भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणून स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने छोडो भारत चळवळ सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने मुंबई येथे ८ ऑगस्ट, १९४२ रोजी घेतला. ही चळवळ दडपण्याचा ब्रिटिश शासनाने अयशस्वी प्रयत्न केला संपूर्ण देशभर या चळवळीचे लोण पसरले. समाजवादी गटाच्या नेत्यांनी भूमिगत राहून १९४२ च्या लढयाचे प्रभावी नेत्रृत्व केले. महाराष्ट्र्रात सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटिल यांनी प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश राजवटीच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले. देशात अन्यत्रही अशी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. अशा प्रकारे १९४२ चे जनआंदोलन अत्यंत यशस्वी ठरले.

 नेताजी सुभाष चंद्र बोस
                      भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला फॅसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना ब्रिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.

आझाद हिंद सेना
           ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. नेताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले. आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली. आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले. लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.
भारतीय नौदलाचा उठाव
           आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन भारतीय सैनिकांना दिल्या जाणार्‍या भेदभावी वागणुकीच्या निषेधार्थ फेब्रुवारी १९४६ मध्ये नौदलातील सैनिकांनी मुंबई व कराची येथे ब्रिटिशविरोधी उठाव केला. अखेरीस सरदार पटेल यांच्या मध्यस्थीने या सैनिकांना शरणागती स्वीकारावी लागली. या घटनेमुळे यात भारतीय सैन्याच्या आधारे भारतावर यापुढे राज्य करता येणार नाही, याची ब्रिटिशांना जाणीव झाली.

माउंटबॅटन योजना
                       २४ मार्च १९४७ रोजी माऊंट बॅटन भारतात आले. भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी फाळणीची योजना तयार केली. ३ जून १९४७ रोजी ही योजना प्रसिध्द करण्यात आली. मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर १८ जुल, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने यांवर ठराव पास केला. ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेल्या भारताविषयीचा हा ठराव म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होय. अशा रितीने स्वातंत्र्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत हा स्वतंत्र झाला.
         🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🙏 
                 
     
स्त्रोत ~ WikipediA    
            historympsc.com                                                                                                                                   ➖➖➖➖➖➖➖➖➖

यशोगाथा थोरांची - भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

यशोगाथा थोरांची - भारतरत्न  मोक्षगुंडम विश्वेश्वरैया (भारतीय अभियंता, विद्वान, राजकारण आणि म्हैसूरचे दिवाण) जन्म : सप्टेंबर १५, ...