सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१

विसपूते माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सातासमुद्रापार साधला ऑनलाईन संवाद

डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सातासमुद्रापार जाऊन साधला मुक्तसंवाद....
रोमानियाच्या ग्लोबल टिचर अवॉर्ड विजेत्या कोरीना सुजेदिया यांनी विद्यार्थ्यांशी साधला ऑनलाईन संवाद...

धुळे, येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज ऑनलाईन विदेशवारी केली. जगामध्ये अनेक देश आहेत. प्रत्येक देशाची भाषा, संस्कृती, शिक्षण पद्धती वेगवेगळी आहे. या कुतूहलातून श्री अविनाश पाटील यांनी व्हर्चुअल ट्रीप च्या माध्यमातून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत नुकतीच रोमानिया या देशाची व्हर्चुअली विदेशवारी केली. यासाठी रोमानिया देशाच्या ग्लोबल टिचर अवॉर्ड विजेत्या कोरीना सुजेदिया या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या शिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम या देशाची माहिती दिली. तेथील संस्कृती व शिक्षण पद्धती याबद्दल सविस्तर सांगीतले. चित्रफीतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रोमानियाची सफर केली. शेवटी विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांच्या मनात उद्भवलेले प्रश्न विचारले. कोरीना सुजेदिया यांनी अतीशय मुक्तसंवाद साधत त्यांच्याशी दिलखुलास गप्पा केल्या. त्यांनी देखील भारताबद्दल जाणून घेतले व अशा ऑनलाईन कार्यक्रमांच्या माध्यमातून जगाची सीमारेषा ओलांडून दोन देशांचे संबंध दृढ होतील अशी अपेक्षा कार्यक्रमाचे आयोजक महेंद्र विसपूते यांनी सांगीतले.
ऑनलाईन ग्रेट भेट या कार्यक्रमासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब महेंद्र विसपुते, सचिव स्मिताजी विसपूते, प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, पालक व सर्व स्टाप चे सहकार्य लाभले.

३ टिप्पण्या:

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...