मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

दीपोत्सव तेजोमय करण्यासाठी दिवे बनविण्याची कार्यशाळा

दिवाळी तेजोमय करण्यासाठी विसपूते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून स्वतः तयार केलेले दिवे वापरण्याचा केला संकल्प...

धुळे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिवाळी उत्साहात साजरी करण्यासाठी व तेजोमय करण्यासाठी 'टाकाऊ पासून टिकाऊ' या उपक्रमांतर्गत दिवे बनविण्याची कार्यशाळेत उत्साहात सहभाग घेतला. दिवाळीत दिवे व  पणत्या यांना खुप महत्व असते. आपल्या संस्कृतीनुसार दिवाळी या सणाच्यावेळी दिवे हे प्रकाशमय वातावरण तयार करीत असतात. ज्याप्रमाणे दिव्यांच्या सहाय्याने दिवाळी तेजोमय होते. तसा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात पण प्रकाश यावा जणू हाच संदेश दिवे देतात. म्हणून या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतः दिवे बनवले. विद्यार्थ्यांना टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कशी तयार करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत स्वतः दिवे करतांना त्यांच्या चेहर्‍यावर आनंद झळकत होता. 

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.नानासाहेब महेंद्र विसपूते यांच्या प्रेरणेतून, संस्थेच्या सचिव सौ. स्मिताजी विसपूते यांच्या संकल्पनेतून व श्री पी. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी श्री एस. आर. पाटील, श्री डी. डी. पवार, श्री ए. के. पाटील, श्री एस. बी. भदाणे, श्री विजय देसले, श्रीमती अपर्णा पाटील, तुषार कुलकर्णी, श्री विलास भामरे व महेश पवार यांचे सहकार्य लाभले.

1 टिप्पणी:

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...