गुरुवार, २८ जुलै, २०२२

दिप अमावस्या

दिप आमावस्या  ,चातुर्मासातील पहिली अमावास्या म्हणून आषाढ अमावास्येकडे पाहिले जाते.अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला'दीपपूजन' केले जाते. आषाढ अमावास्येला 'दीपान्वित अमावास्या' असेही म्हणतात.कोणत्याही शुभ कार्याची, कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने केली जाते. सत्कर्माचा साक्षीदार दिवा होत असतो. अगदी.प्राचीन काळापासून दररोज सायंकाळी तिन्ही सांजेला देवासमोर तेलाचा वा तुपाचा दिवा लावण्याची आपली संस्कृती आहे. दिव्याची ज्योत ही अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे. तर, दिवा मांगल्याचे प्रतिक आहे. अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला 'दीपपूजन' केले जाते...

बुधवार, २७ जुलै, २०२२

भारतरत्न डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

        🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
               ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                                       ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  
  📡🚀🛰️🇮🇳👮‍♂️🇮🇳🛰️🚀📡
                 भारतरत्न
अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम
                       तथा  
        ए. पी. जे. अब्दुल कलाम

(भारताचे ११ वे राष्ट्रपती,  वैज्ञानिक, अभियंता)
       जन्म : १५ ऑक्टोबर १९३१
                (रामेश्वर)
       मृत्यू : २७ जुलै २०१५
                (शिलाँग)
सन्मान : भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण
                   कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य 
लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

🚀 कार्य 🛰
                १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
 📚 शिक्षण
             त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत.त्यांचे वडील व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते.त्यांच्यातील अध्यात्मिक चर्चा कलाम ऐकत असत.डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

 ♦ स्वभाव
    विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
 
🥇 गौरव -
                    अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
 
निधन - 
               ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.
        🇮🇳  जयहिंद  🇮🇳
🌹🙏 विनम्र अभिवादन 🙏🌷
            ♾♾♾♾♾♾
           संदर्भ - Wikipedia                                                                                                              ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शनिवार, २३ जुलै, २०२२

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती

विसपूते माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन...
टिळकांच्या विचारातून प्रेरणा घ्यावी - श्री डी. डी. पवार 
धुळे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री पी. बी. पाटील अध्यक्षस्थानी होते. मंचावर जेष्ठ शिक्षक श्री एस. आर. पाटील, श्री डी. डी. पवार, श्री ए. के. पाटील व श्री एस. बी. भदाणे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. इ. ८ वी च्या कु. भाग्यश्री गवळी, प्राची पाटील, प्रांजल व अक्षरा बळसाणे यांनी अतीथींच्या  स्वागतासाठी गीत सादर केले. वक्तृत्व स्पर्धेत चि. भावेश मोहीते, प्रथमेश, भाग्यश्री गवळी, प्राची पाटील, प्रांजल शिरसाठ, भारत जाधव, दिपक मोहीते, भाविका मोहीते, अंकिता मोरे, पुनम गवळी, समाधान लोंढे, भाग्यश्री मोहीते, कविता पाटील इ. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा पाटील यांनी केले. श्री डी. डी. पवार व श्री ए. के. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विजय देसले, श्री योगेंद्र पाटील, महेश पाटील, कुणाल साळुंके, श्रीमती राजश्री मासूळे, श्री तुषार कुलकर्णी, अभिज्ञ पवार, श्री महेश पवार व विलास भामरे यांनी मेहनत घेतली. 
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल प्राचार्य श्री पी. बी. पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री राजेंद्र गवळी, संस्थेच्या सचिव मा. स्मिताताई विसपूते, अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्र विसपूते यांनी अभिनंदन व कौतूक केले.

कार्यक्रमाची क्षणचित्रे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

शुक्रवार, २२ जुलै, २०२२

पोस्टर स्पर्धा दि. २२ | ७ | २२

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पोस्टर स्पर्धेचे आयोजन...
धुळे दि २२ 
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. शालेय विद्यार्थ्यांना या उत्साहात सहभागी करून घेण्यासाठी शालेय स्तरावर विवीध स्पर्धा घेण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. म्हणून आज आमच्या विद्यालयात पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. स्वातंत्र्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने १] पारंपरिक सण २] स्वातंत्र्य दिन ३] स्वातंत्र्योत्तर भारत या विषयांवर पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेचे श्री डी. डी. पवार, श्री विजय देसले, श्री महेश पाटील यांनी नियोजन  केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री एस. आर. पाटील, श्री ए. के. पाटील, श्री एस. बी. भदाणे, श्रीमती अपर्णा पाटील, श्री महेंद्र बाविस्कर, श्री योगेंद्र पाटील, श्री महेश पाटील, श्री साळूंके सर, श्रीमती राजश्री मासूळे, श्री तुषार कुलकर्णी, श्री अभिज्ञ पवार, श्री महेश पवार, श्री विलास भामरे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल 
विद्यालयाचे प्राचार्य श्री पी.बी. पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री राजेंद्र गवळी, संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्र विसपूते, सचिव मा.  स्मिताताई विसपूते यांनी अभिनंदन व कौतूक केले.

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...