मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१

शिरीष कुमार मेहता

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️

       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
              ▬ ❚❂❚❂❚ ▬          संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                         
   ⚜️🙋🏻‍♂️🔫🇮🇳👦🏻🇮🇳🙋🏻‍♂️🔫⚜️

               बालशहीद
         शिरीषकुमार मेहता


     जन्म : 28 डिसेंबर 1926
     (नंदुरबार , महाराष्ट्र , भारत)

वीरमरण : 9 सप्टेंबर 1942 
                 (वय 15) 
      (नंदुरबार , महाराष्ट्र , भारत)

राष्ट्रीयत्व : भारतीय

साठी प्रसिद्ध : भारतीय स्वातंत्र्य  
                     चळवळ

           पाताळगंगा नदीच्या काठी चार डोंगराच्या कुशीत वसलेल्या नंदनगरी अर्थात नंदुरबार शहराची पूर्वापार ओळख ही व्यापाऱ्यांची वसाहत म्हणूनच. या गावात १९२६ मध्ये एका व्यापाऱ्याच्या घरात शिरीषकुमारांचा जन्म झाला. त्याच्यासह पाच संवगड्यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती दिली. त्यामुळे या गावाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले. नंदुरबार हे आता कुठे अंदाजे एक लाख लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. परस्परांना ओळखणारे आणि स्नेह जाणणारे लोक आहेत. घराघरांतून चालणारा व्यापार आणि देवाणघेवाण हे महत्त्व जाणून पूर्वापार अनेक ज्येष्ठ प्रवाशांनी या गावाला भेटी दिल्या आहेत. प्रसिद्ध प्रवासी ट्‌वेनियरने १६६० ला श्रीमंत आणि समृद्धनगरी असे नंदुरबारचे वर्णन केले आहे, तर नंद नावाच्या गवळी राजाने हे गाव वसविल्याची आख्यायिका आहे. ऐन-ए-अकबरी (इ.स. १५९०) मध्ये नंदुरबारचा उल्लेख किल्ला असलेले आणि सुबक घरांनी सजलेले शहर असा आहे.

         नंदुरबारमध्ये बाळा शंकर इनामदार नावाचे एक व्यापारी होते. त्यांचा तेलाचा व्यापार होता. त्यांना मुलगा नसल्याने ते काहीसे दु:खी होते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी दुसरा विवाह केला. त्यांना कन्याप्राप्ती झाली. ही कन्या त्यांनी पुष्पेंद्र मेहता यांना सोपवली. १९२४ ला पुष्पेंद्र व सविता यांचा विवाह झाला. २८ डिसेंबर १९२६ ला या दांपत्याच्या पोटी, मेहता घराण्यात शिरीषकुमारचा जन्म झाला. या काळात देशातील अन्य गावे व शहरांप्रमाणेच नंदुरबारचेही वातावरण स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेने भारलेले होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सामान्यांनी काय करायचे तर हाती तिरंगा झेंडा घेऊन प्रभातफेरी, मशाल मोर्चे काढायचे. देशप्रेमांनी ओतप्रोत घोषणा द्यायच्या! नंदुरबारमधील अशा कामात मेहता परिवाराचा सहभाग होता. शिरीष वयपरत्वे शाळेत जाऊ लागला होता आणि त्याच्यावर महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मोठा प्रभाव होता. त्या काळात "वंदे मातरम्‌' आणि "भारत माता की जय' असा जयघोष करणाऱ्या कोणालाही पोलिस अटक करू शकत होते.

🇮🇳 नहीं नमशे, नहीं नमशे !
        महात्मा गांधींनी ९ ऑगस्ट १९४२ ला इंग्रजांना "चले जाव'चा आदेश दिला. त्यानंतर गावोगावी प्रभात फेऱ्या, ब्रिटिशांना इशारे दिले जाऊ लागले. बरोबर महिनाभरानंतर, ९ सप्टेंबर १९४२ ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत आठवीत शिकत असलेला शिरीष सहभागी झाला होता. गुजराथी मातृभाषा असलेल्या शिरीषने प्रभात फेरीत घोषणा सुरू केल्या, "नहीं नमशे, नहीं नमशे', "निशाण भूमी भारतनु'. भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. शिरीषकुमारच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकांनी ते आवाहन झुगारले आणि "भारत माता की जय', "वंदे मातरम्‌'चा जयघोष सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. एका पोलिस अधिकाऱ्याने मिरवणुकीत सहभागी मुलींच्या दिशेने बंदूक रोखली. तेव्हा त्या अधिकाऱ्याला एका चुणचुणीत मुलाने सुनावले, "गोळी मारायची तर मला मार!'. ती वीरश्री संचारलेला मुलगा होता, शिरीषकुमार मेहता! संतापलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या, एक, दोन, तीन गोळ्या शिरीषच्या छातीत बसल्या आणि तो जागीच कोसळला. त्याच्यासोबत पोलिसांच्या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्‍यामदास शहा हे अन्य चौघेही शहीद झाले.
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🙏🌹 विनम्र अभिवादन 🌷🙏
                 
         ♾♾♾ ♾♾♾
     संदर्भ~ WikipediA                     ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

रविवार, २६ डिसेंबर, २०२१

महामानव बाबा आमटे

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬             संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                               
➿➿➿➿➿➿➿➿➿
🩸💉👨‍⚕️🇮🇳👨🏻🇮🇳👨‍⚕️💉🩸
            
          महामानव बाबा आमटे
        (मुरलीधर देवीदास आमटे)


    जन्म : 26 डिसेंबर 1914
    (हिंगनघाट, वर्धा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत)

    मृत्यु : 9 फेब्रुवारी 2008
            (वय 94)
(आनंदवन,वरोरा, चंद्रपूर, महाराष्ट्र, भारत)
राष्ट्रीयता : भारतीय
पत्नी : साधना आमटे
अपत्ये : डॉ. विकास आमटे
            डॉ.  प्रकाश आमटे

             मुरलीधर देविदास आमटे यांनाच लोक बाबा आमटे म्हणून ओळखतात. हे महाराष्ट्राचे एक थोर सुपुत्र असून भारतातील सामाजिक कार्यकर्ता होते. विशेषतः कुष्ठरोग्यांची सेवा व गोरगरीबांची व्यथा ऐकुन त्यांना मदतीचा हात देणारे एक थोर सक्रीय सामाजिक कार्यकर्ता होते. गरीबांच्या कल्याणा साठी त्यांनी नेहमीच सकारात्मक भुमिका घेतली.

💁‍♂ समाजसेवी बाबा आमटे यांचे जीवनचरीत्र
                       बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्हयातील हिंगणघाट शहरात झाला. त्यांच्या वडीलांचे नाव देविदास आमटे व आईचे नाव लक्ष्मीबाई आमटे होते त्यांचे वडील मोठे सावकार होते घरी संपत्तीचा अंबार होता, बालपणीच मुरलीधर यांचे टोपण नाव बाबा ठेवले गेले होते. बालपणापासुन बाबा फार दयाळु होते.
                   गरीबांचे दुःख त्यांना असहय व्हायचे. परिवाराचे ते एकुलते एक अपत्य होते, त्यामुळे त्यांचे फार लाड व्हायचे, वयाच्या 14 व्या वर्षी वडीलांनी त्यांना एक बंदुक भेट दिली होती. त्या बंदूकीने बाबा छोटया मोठया जंगली प्राण्यांची शिकार करायचे, जेव्हा ते 18 वर्षाचे झाले त्यांना वडीलांनी एक अॅम्बेसिडर गाडी भेट दिली होती. त्यांना निच्च जातींच्या मूलांसोबत खेळण्यास कधीच मनाई केली गेली नाही. स्वतः बाबांनाही जाती व्यवस्था मान्य नव्हती.
                     शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी वर्धा येथून कायदयाचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. महात्मा गांधी जेव्हां वर्ध्यात सेवाग्राम येथे आले होते तेथे ते गांधीजींना भेटले त्यांच्या मनात याचा फार प्रभाव पडला. पुढे त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढयात सक्रीय सहभाग दर्शवीला.
                       त्यांनी गांधीजींच्या खादी बनवण्याच्या चरख्याचा स्विकार केला व खादी कपडेच घालायचे ठरविले. अनेक नेत्यांच्या तुरूंगवासा दरम्यान त्यांची कायदयाची बाजू बाबा सांभाळत. गांधीजींनी त्यांचे अभय साधक असे नामकरण केले होते.
                     त्याकाळात कुष्ठरोग समाजात फार तेजीने पसरत चालला होता. अनेक लोक या रोगामुळे बाधीत झाले होते यामुळे ते सामान्य जीवनापासुनच नाही तर त्याचे कुटूंबही कुष्ठ रोग्यांना त्याग करून घराबाहेर काढू लागले होते. कुष्ठरोग पापी माणसाची निशाणी बनली होती, समाजात त्यांना फारच हिन भावनेचा सामना करावा लागत होता.
               बाबांनी अशाच निराधार लोकांची सेवा करायचे ठरविले लोकांना ते या आजाराबद्दल जागरूक करून याची लक्षणे व प्रतिबंध कसा करायचा याचीही माहिती देत. कुष्ठरोग्यांना योग्य सामाजिक स्थान मिळविण्यासाठी त्यांनी आपली कंबर कसली. त्यांनी 15 आॅगस्ट 1949 रोजी महाराष्ट्रात तीन आश्रमांची स्थापना केली, त्यांना त्यांनी नंदनवन हे नाव दिले येथे कुष्ठरोग्यांना राहण्या व उपचाराची सोय उपलब्ध होती त्यासोबत त्यांना रोजगाराची सोयही उपलब्ध करून दिली.
              1973 साली गडचिरोली जिल्हयातील माडिया गोंड जमातीच्या आदिवासी समुदायांना संघटीत करून त्यांनी लोक बिरादरी प्रकल्प स्थापन केला.
               बाबा आमटे हे आपल्या जीवना अखेरपर्यंत सामाजिक कार्यात मग्न होते. सामाजिक एकता व समभाव निर्माण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जंगली जनावरांच्या कत्तली व तस्करी करण्यापासुन रोखण्यास लोकांना प्रेरीत केले.
त्यांनी नर्मदा बचाओ आंदोलनातही सहभाग घेतला. त्यांच्या असाधारण समाजसेवेसाठी भारत सरकारने त्यांना 1971 साली पद्मश्री पुरस्कार देवून सन्मानीत केले.
                 परिवाराची त्यांना फार सहाय्यता मिळाली त्यांची पत्नी इंदु घुले ज्यांना ते साधना असे म्हणत त्यांनी फार सोबत केली. नेहमी त्या बाबांच्या पाठीशी राहील्या. त्यांचे दोन मुलं आहेत डाॅ. विकास आमटे व डाॅ. प्रकाश आमटे यांनीही आपल्या व्यवसायातुन मोलाचा वेळ काढुन बाबांना मदत केली. बाबांच्या दोन्ही सुना डाॅ. मंदाकिनी आणि डाॅ. भारती हया देखील बाबांच्या कार्यात सहभागी आहेत. डाॅ. प्रकाश आमटे हे आपल्या पत्नी डाॅ. मंदाकिनी सोबत गडचिरोली येथील हेमलकसा गावात माडिया गोंड जमातीच्या लोकांसाठी एक शाळा व एक हाॅस्पीटल चालवतात.
                      डाॅ.मंदाकिनी यांनी सरकारी नौकरी सोडून डाॅ. प्रकाश आमटे यांच्या सोबत हेमलकसा येथे स्थायीक झाल्या त्या गोरगरीबांची व जखमी जनावरांची सेवा करतात.
                  त्यांचे दोन मुले आहेत दिगंत जो डाॅक्टर असुन हेमलकसा येथेच काम करतो दुसरा मुलगा अनिकेत जो एक इंजिनियर आहे ज्याचा स्वतंत्र व्यवसाय आहे. 2008 रोजी प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांना सामाजिक कार्यासाठी मॅगसेसे अवाॅर्ड मिळाला आहे.
                        बाबांचे थोरले पुत्र विकास आमटे व त्यांची पत्नी भारती आमटे आनंदवनातील हाॅस्पीटल ची जवाबदारी सांभाळतात.
                   वर्तमानात हेमलकसा येथे एक मोठी शाळा व हाॅस्पीटल आहे. तर आनंदवन येथे एक युनिव्हर्सिटी एक अनाथाश्रम आणि अंध व गोर गरीबांच्या मुलांसाठी शाळा आहे. आजही स्वसंचालीत आनंदवन आश्रमात जवळपास 5000 लोक राहतात.
                महाराष्ट्रातील आनंदवन सामाजिक विकास प्रकल्प आज जगात जाणल्या व प्रशंसेचे पात्र ठरले आहे. आनंदवनात बाबांनी कुष्ठरोगींच्या उपचारासाठी सोमनाथ व अशोकवन आश्रम स्थापन केले होते.
 
🎖 पद्मश्री बाबा आमटे यांना मिळालेले पुरस्कार

पद्मश्री पुरस्कार सन् 1971
रमण मॅगसेसे पुरस्कार 1985
पद्म विभूषण 1986
मानव अधिकार क्षेत्रात अतुल्य योगदानासाठी संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार 1988
गांधी शांती पुरस्कार 1999
राष्ट्रीय भूषण 1978
जमनालाल बजाज अवार्ड 1979
एन.डी. दीवान अवाॅर्ड 1980
रामशास्त्री अवार्ड 1993 ( रामशासत्री प्रभुणे संस्था महाराष्ट्र )
इंदिरा गांधी मेमोरियल अवार्ड 1985
राजा राममोहन राॅय अवार्ड 1986 दिल्ली सरकार
फ्रांसीस मश्चियो प्लॅटिनम ज्युबिली अवार्ड 1987
जी.डी. बिरला इंटरनॅशनल अवार्ड 1987
आदिवासी सेवक अवार्ड 1991 भारत सरकार
मानव सेवा अवार्ड 1997 यंग मॅन गांधीयन असोसिएशन राजकोट, गुजरात.
सारथी अवाॅर्ड 1997 नागपुर
महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट अवार्ड 1997 नागपुर
कुमार गंधर्व पुरस्कार 1998
सावित्रीबाई फुले अवाॅर्ड 1998 भारत सरकार
फेडरेशन आॅफ इंडियन चेम्बर आॅफ काॅमर्स अॅंण्ड इंडस्ट्रिी अवार्ड 1988
आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र सरकार 1998
महाराष्ट्र भुषण अवार्ड 2004 महाराष्ट्र सरकार

🏵 सन्मानीत पदव्या

डी.लिट – टाटा इंस्टीटयुट आॅफ सोशल सायन्स मुंबई , भारत 1999
डी.लिट – 1980 नागपुर युनिव्हर्सिटी नागपुर , भारत
डी लिट – 1985 – 86 पुणे युनिव्हर्सिटी महाराष्ट्र
देसिकोत्तमा 1988 – सन्माननीय डाॅक्टरेट, विश्वभारती युनिव्हर्सिटी, शांतीनिकेतन पश्चिम बंगाल, भारत

💎 बाबा आमटे यांचे सुविचार

“मी एक महान नेता बनण्यासाठी काम करीत नाही तर मी गरजु गोरगरीबांची मदत करू ईच्छितो.”      
                – बाबा आमटे

“या संसारातील काही लोक स्वतःसाठी जगतात तर काही देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करतात काही लोक समाजासाठी जगतात, असे जीवन जगणारे फार थोडे व्यक्ती या जगात आहेत.”
                  – बाबा आमटे
                       बाबा आमटे यांनी आपले संपुर्ण जीवन गोरगरीब व कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी समर्पित केले त्यांची आदिवासींविषयी आदरभाव व उत्कंठा त्यांच्या कार्यातून दिसून येते त्यांचे कुष्ठरोगींसाठीचे कार्य जागतीक आरोग्य संघटनेव्दाराही प्रशंसीत आहे. संयुक्तराष्ट्राच्या आरोग्य संघटनेत बाबा आमटेंविषयी एक छोटा लघुपट दाखवण्यात आला होता. जी आपणा सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. महाराष्ट्र पुत्र असल्यामुळे आपण सर्व महाराष्ट्रीयांसाठी ते प्रेरणेचे सागर आहेत.
         
            🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
          ♾♾♾  ♾♾♾
         स्त्रोत ~ WikipediA                                                                  ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

मातृह्रदयी साने गुरूजी

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन : श्री अविनाश काशिनाथ पाटील
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                            
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
   💥📝✍️🇮🇳👨🏻🇮🇳✍️📝💥
   
              साने गुरुजी
          पांडुरंग सदाशिव साने
(मराठी लेखक ,स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारक)


      जन्म : २४ डिसेंबर १८९९
  ( पालगड, रत्नागिरी, महाराष्ट्र )

      मृत्यू : ११ जून १९५०

व्यवसाय: लेखक, शिक्षक,    
               सामाजिक कार्यकर्ते, 
                स्वातंत्र्यसैनिक
राष्ट्रीयत्व : भारतीय
उल्लेखनीय कामे : श्यामची आई

💁‍♂ जीवन
                     साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.
                  शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
                     इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले. इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली.
             ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.

साने गुरुजी यांच्या हस्ताक्षरातील एक कविता
बलसागर भारत होवो। विश्वात शोभुनी राहो।।
राष्ट्रार्थ प्राण हे उरले। मी सिद्ध मराया हो ।।

साने गुरुजीकृत काव्यपंक्ती
                 समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला; तो शेवटपर्यंत मिळाला नाही.. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.
                स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित 'गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या 'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. नंतर फ्रेंच भाषेतील Les Misérables या कादंबरीचे 'दु:खी' या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्‍री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञाच्या The story of human race या पुस्तकाचे मराठीत 'मानवजातीचा इतिहास' असे भाषांतर केले. 'करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे 'मोरी गाय' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर 'मोलकरीण' नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला. गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही कविता :-

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्‍त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे

ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तित्वाने पुढील पिढीतील अनेक थोर व्यक्तित्वे घडविली. उदा. - एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान, दादा गुजर, ना.ग. गोरे, प्रकाशभाई मोहाडीकर, प्रा. प्र.द. पुराणिक, मधु दंडवते, यदुनाथ थत्ते, रा.ग. जाधव,राजा मंगळवेढेकर, वा.रा. सोनार, शांतीलाल पटणी, सी.न. वाणी, इ.

आंतरभारती
               १९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषिकांशी त्यांचा संबंध आला. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची. यातूनच 'आंतरभारती'ची संकल्पना त्यांना सुचली.
            प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनाप्रमाणे काही सोय करावी, ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असतानाच ११ जून, इ.स. १९५० रोजी त्यांनी आत्महत्या केली.

🗽माणगावचे आणि पुण्याचे साने गुरुजी स्मारक
              साने गुरुजींच्या स्मरणार्थ 'साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक' या नावाची संस्था महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीकच्या वडघर या निसर्गरम्य गावात आहे. १९९९मध्ये ३६ एकर जागेवर या संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.. यामध्ये विद्यार्थांच्या शिबिरासाठी दोन डॉरमेट्रीज आणि कॅम्पिंग ग्राउंड्ज बांधण्यात आली होती. साडेतीनशे विद्यार्थी मावतील इतकी या डॉरमेट्रींची क्षमता आहे. युवा श्रमसंस्कार छावणी, वर्षारंग, प्रेरणा प्रबोधन शिबिर मालिका, मित्रमेळावा, अभिव्यक्ती शिबिर, राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरे, साहित्यसंवाद, भाषा अनुवाद कार्यशाळा असे अनेक उपक्रम या संस्थेत नियमित होत असतात. शाळांच्या अनेक उपक्रमांसाठीही या डॉरमेट्री उपलब्ध करून दिल्या जातात.
                          या संस्थेने आता (२००९ साली) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले आहे. या दुसऱ्या टप्प्यात 'साने गुरुजी भवन' आणि 'आंतरभारती अनुवाद केंद' अशा दोन प्रकल्पांची योजना आखली आहे. साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे कायमस्वरूपी प्रदर्शन 'सानेगुरुजी भवना'मध्ये होणार आहे. साने गुरुजींचे स्मारक उभारणे हा या भवनामागचा उद्देश आहे. तसेच 'आंतरभारती अनुवाद केंद्र' हे साने गुरुजींनी पाहिलेल्या स्वप्नांची प्रतिकृती असेल. हे केंद काँप्युटर, इंटरनेट, ऑडियो-व्हिज्युअल रूम अशा सोयीसुविधांनी सज्ज असेल. इथे सुसज्ज लायब्ररीही सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. या लायब्ररीमध्ये लेखक, अभ्यासक, साहित्यिक शांतपणे संशोधन, अभ्यास करू शकतील, अशी संस्थेची योजना आहे. साने गुरुजींचे आंतरभारतीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ही संस्था झटत आहे.
               पुण्यातही साने गुरुजींचे स्मारक आहे. प्रायोगिक रंगभूमीच्या विविध विषयांवरील नाटकांच्या सादरीकरणासाठी या स्मारकाजवळ बॅ.नाथ पै रंगमंच या छोट्या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे.

🔮 आंतरभारती साहित्य संवाद संमेलन
          २०१२ सालचे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन माणगावला याच संस्थेत झाले. आधीची संमेलने मुंबईत झाली होती.

📙 साहित्य
                          गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांची एकूण ७३ पुस्तके आहेत. वरदा प्रकाशनाने ती ३६ खंडांत पुन:प्रकाशित केली आहेत. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रितीने वर्णन केले आहेत. कुमारांच्यासाठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली, प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले, माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली. त्यांची ’श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने गाजली.

📝 साने गुरुजी यांचे प्रकाशित साहित्य
                              अमोल गोष्टी (हे पुस्तक बोलके पुस्तक-Audio book म्हणून पण मिळते), आपण सारे भाऊ भाऊ, आस्तिक, इस्लामी संस्कृति, ईश्वरचंद्र विद्यासागर (चरित्र), कर्तव्याची हाक, कला आणि इतर निबंध, कला म्हणजे काय? कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य
'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर, क्रांति, गीताहृदय, गुरुजींच्या गोष्टी, गोड गोष्टी (कथामाला), भाग १ ते १०, भाग १ - खरा मित्र, भाग २ - घामाची फुले, भाग ३ - मनूबाबा, भाग ४ - फुलाचा प्रयोग, भाग ५ - दुःखी, भाग ६ - सोराब आणि रुस्तुम, भाग ७ - बेबी सरोजा, भाग ८ - करुणादेवी, भाग ९ - यती की पती, भाग १० - चित्रा नि चारू, गोड निबंध भाग १, २, गोड शेवट, गोष्टीरूप विनोबाजी, जीवनप्रकाश, जीवनाचे शिल्पकार (राजवाडे, टागोर, ईश्वरचंद्र, शिशिरकुमार आणि काही इतर चरित्रे), तीन मुले, ते आपले घर, त्रिवेणी, दिल्ली डायरी, देशबंधु दास (चरित्र), धडपडणारी मुले, नवा प्रयोग, नामदार गोखले (चरित्र), पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, पत्री, बेंजामिन फ्रँकलिन (चरित्र)
भगवान श्रीकृष्ण (चरित्र, ८ भाग)
भारतीय संस्कृती (मराठीसह इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांत), मानवजातीचा इतिहास, मोरी गाय, मृगाजिन, इतिहासाचार्य राजवाडे (चरित्र), रामाचा शेला, राष्ट्रीय हिंदुधर्म. (भगिनी निवेदिता यांच्या मूळ पुस्तकाचा अनुवाद)
विनोबाजी भावे, विश्राम, श्याम खंड १, २ (हे पुस्तकही बोलके पुस्तक म्हणून मिळते.)
श्यामची आई, श्यामची पत्रे, श्री शिवराय (चरित्र, ८ भाग), सती, संध्या, समाजधर्म. (लेखक : भगिनी निवेदिता व साने गुरुजी), साधना (साप्ताहिक) (संस्थापक, संपादक), सुंदर पत्रे, सोनसाखळी व इतर कथा, सोन्या मारुती, स्त्री जीवन, स्वप्न आणि सत्य, स्वर्गातील माळ, हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे

📚 चरित्रे
                  साने गुरुजींवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. त्यांतल्या काही पुस्तकांची आणि लेखकांची नावे :-
आपले साने गुरुजी (लेखक - डॉ. विश्वास पाटील), जीवनयोगी साने गुरुजी (डॉ. रामचंद्र देखणे), निवडक साने गुरुजी (रा.ग. जाधव), महाराष्ट्राची आई साने गुरुजी (वि.दा. पिंपळे), मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी (आचार्य अत्रे), साने गुरुजी (यदुनाथ थत्ते, रामेश्वर दयाल दुबे), साने गुरुजी आणि पंढरपूर मंदिरप्रवेश चळवळीचे अध्यात्म (आत्माराम वाळिंजकर), साने गुरुजी : एक विचार (संजय साबळे), साने गुरुजी गौरव ग्रंथ (संपादक - रा.तु. भगत), साने गुरुजी जीवन परिचय (यदुनाथ थत्ते), साने गुरुजी - जीवन, साहित्य आणि विचार (लेखक ?), साने गुरुजी पुनर्मूल्यांकन (भालचंद्र नेमाडे), साने गुरुजी यांची सुविचार संपदा (वि.गो. दुर्गे), साने गुरुजी साहित्य संकलन (प्रेम सिंह), सेनानी साने गुरुजी (राजा मंगळवेढेकर)

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
         ♾♾♾ ♾♾♾
          स्त्रोत ~ WikipediA                                                                ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

ताणतणाव व्यवस्थापन व्याख्यान

ताणतणाव मुक्त जीवन, अभ्यासाचे नियोजन, ध्येय व प्रेरणा  हेच विद्यार्थ्यांच्या यशाचे गमक : प्रा. डाॅ. जीवन पवार

धुळे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज इ. १० व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेच्या सचिव मा. स्मिताजी विसपूते अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयाचे मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमूख प्रा. डाॅ. जीवन पवार मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य श्री पी. बी. पाटील उपस्थित होते. 
मार्गदर्शन करतांना डाॅ. जीवन पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत अभ्यास कसा करावा, काय करू नये, ध्येय ठरवले पाहीजे, आयुष्यात रोल मॉडेल समोर ठेवून त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहीजे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रम घेण्याशिवाय पर्याय नाही. प्रामाणिक पणे अभ्यास करून जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय ठरवा व ते गाठण्यासाठी मेहनत घेण्याचा सल्ला सुद्धा डाॅ. साहेबांनी दिला. 
अध्यक्षीय मनोगतातून मा. सौ. स्मिताजी विसपूते यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. जीवनात यशस्वी होऊन आपल्याकडून इतरांनाही प्रेरणा मिळाली पाहीजे. मोठे होऊन आपल्या आईवडिलांचे, गुरूजणांचे व शाळेचे नाव मोठे करावे, असे सांगीतले. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्र विसपूते यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री महेश पाटील यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी व आभार श्री ए. के. पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. योगेंद्र पाटील, श्री एस. आर. पाटील, श्री डी. डी. पवार, श्री एस. बी. भदाणे, श्री विजय देसले, श्रीमती अपर्णा पाटील, श्री तुषार कुलकर्णी, श्री अभिज्ञ पवार, श्री महेश पवार व विलास भामरे यांनी परिश्रम घेतले.

सोमवार, २० डिसेंबर, २०२१

राष्ट्रसंत गाडगेबाबा

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬          संकलन -  श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                           
➿➿➿➿➿➿➿➿➿
💥🙋🏻‍♂️⛓️🇮🇳👨🏻🇮🇳⛓️🙋🏻‍♂️💥

           स्वच्छतेचे पुजारी
          संत गाडगे महाराज


  डेबूजी झिंगराजी जानोरकर
             (समाज सुधारक)

     जन्म : 23 फेब्रुवारी 1876
 (शेणगाव,महाराष्ट्र , ब्रिटिश भारत)

    निधन : 20 डिसेंबर 1956
                (वय 80)
  ( वलगाव, अमरावती , महाराष्ट्र )

मुख्य स्वारस्ये : धर्म , कीर्तन ,    
                      नीतिशास्त्र
प्रभाव : डाॕ. बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील , भाऊराव कृष्णाजी गायकवाड , तुकडोजी महाराज आणि मेहेर बाबा
                     गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.
                 संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.
         गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
                    समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांत होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून् सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाजथरातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहात आहे, असे दिसते.
 
👬 गाडगेबाबा आणि बाबासाहेबांची भेट
                         14 जुलै 1941 मध्‍ये संत गाडगेबाबा यांची प्रकृती ठीक नव्‍हती. ते मुंबईत होते. ही माहिती एका सहका-याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यापर्यंत पोहोचवली. बाबासाहेब तेव्‍हा कायदेमंत्री होते. त्‍याच दिवशी सायंकाळी कामानिमित्‍त त्‍यांना दिल्‍लीला जायचे होते. पण गाडगेबाबांच्‍या प्रकृतीची बातमी ऐकताच त्‍यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले. दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामी या बातमी घेऊन येणा-या सहका-यासोबत हॉस्‍पिटलमध्‍ये पाहोचले. गाडगेबाबा कधीही कुणाकडून काही स्‍वीकारत नसत. पण त्‍यांनी बाबासाहेबांकडून घोंगड्या स्‍वीकारल्‍या.
गाडगेबाबा तेव्‍हा म्‍हणाले होते, "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर, तुमचा एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."
डॉ. बाबासाहेब म्हणाले, "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.
📚 गाडगे महाराजांची चरित्रे
  असे होते गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
ओळख गाडगेबाबांची (प्राचार्य रा.तु. भगत)
कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे)
गाडगेबाबा (चरित्र, प्रबोधनकार ठाकरे)
गाडगे बाबांचा पदस्पर्श (केशव बा. वसेकर)
श्री गाडगेबाबांचे शेवटचें कीर्तन (गो.नी. दांडेकर)
Shri Gadge Maharaj (इंग्रजी, गो.नी. दांडेकर)
गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी)
गाडगे माहात्म्य (काव्यात्मक चरित्र, नारायण वासुदेव गोखले)
गोष्टीरूप गाडगेबाबा (विजया ब्राम्हणकर)
निवडक गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
मुलांचे गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत)
लोकोत्तर : गाडगेबाबा जीवन आणि कार्य (डॉ. द.ता. भोसले)
The Wandering Saint (इंग्रजी, वसंत शिरवाडकर)
संत गाडगेबाबा (गिरिजा कीर)
संत गाडगेबाबा (दिलीप सुरवाडे)
संत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
Sant Gadagebaba (इंग्रजी, प्राचार्य रा.तु. भगत)
संत गाडगेबाबांची भ्रमणगाथा (प्राचार्य रा.तु. भगत)
श्रीसंत गाडगे महाराज (मधुकर केचे)
श्री संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पां.बा. कवडे, पंढरपूर)
संत श्री गाडगे महाराज (डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर)
गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार)
समतासूर्य गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत )
स्वच्छतासंत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
🎥 गाडगेबाबांच्या जीवनावरील  चित्रपट
                डेबू : हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - नीलेश जलमकर
देवकीनंदन गोपाळा : हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - राजदत्त

📖 साहित्य संमेलन
               महाराष्ट्रात गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरते.

मृत्यू
                       गाडगे महाराजांचे अमरावती जवळ पेढी नदीच्या काठावर, वडगाव जि. अमरावती 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. 

🏵 सन्मान
                       त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रकल्प २०००-०१ मध्ये सुरू केला. हा कार्यक्रम स्वच्छ गावे सांभाळणार्‍या ग्रामस्थांना बक्षिसे देतो.  याव्यतिरिक्त, भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ स्वच्छता व पाणी यासाठी राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना केली.  त्यांच्या सन्मानार्थ अमरावती विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे.
🏵 सन्मान
            भारताच्या टपाल खात्याने त्यांच्या नावावर स्मारक शिक्के जारी करुन गाडगे महाराजांचा गौरव केला होता.

 🙏🌹 गोपाला... गोपाला... देवकीनंदन गोपाला...🌹🙏
        

🙏🌹 विनम्र अभिवादन🌹🙏
         ♾♾♾ ♾♾♾
           स्त्रोत ~ WikipediA                                                              ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

प्रभू दत्तात्रय

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
   ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 गाथा बलिदानाची 🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬          संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                             
➿➿➿➿➿➿➿➿➿
🚩🚩🚩🛕👤🛕🚩🚩🚩

             प्रभू दत्तात्रेय


हा लेख भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी श्रीदत्तात्रेय याबद्दल आहे. 
दत्त (दत्तात्रेय) हे एक योगी असून हिंदू धर्मात त्यांना देव मानले जाते. स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची जोपासना व संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य दत्त संप्रदायाने केले. दत्त ही देवता अत्रि ऋषी व त्यांची पत्‍नी अनुसया यांचा पुत्र असून त्याला दुर्वास व सोम नावाचे दोन भाऊ आहेत.

दत्तात्रेय : मराठी
दत्तात्रेय : संस्कृत
दत्तात्रेयः
निवासस्थान : श्री क्षेत्र गाणगापूर
शस्त्र : त्रिशूळ, चक्र
वडील : अत्री ऋषि
आई : अनुसया
पत्नी : अनघालक्ष्मी
🔆 अन्य नावे/ नामांतरे
दत्त, अवधूत, गुरुदेव, श्रीपाद, दिगंबर
या देवतेचे अवतार
श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ
या अवताराची मुख्य देवता
ब्रह्मा, विष्णू, महेश (शिव)
मंत्र
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरूदेव दत्त
नामोल्लेख
गुरुचरित्र ,नवनाथ भक्तिसार
तीर्थक्षेत्रे
औदुंबर, नरसोबाची वाडी, पिठापूर, गाणगापूर, माहूर, गिरनार पर्वत
हिंदू पौराणिक साहित्यानुसार दत्त, सोम व दुर्वास हे तिघे भाऊ विष्णू, ब्रह्मा व शिव यांचे अवतार मानले जातात. पूर्वकाळात विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या दत्ताचे स्वरूप उत्तरकाळात ब्रह्मा, विष्णु व महेश या तिन्ही देवांचे अंशरूप सामावून घेत त्रिमुखी रूपात उत्क्रमत गेले. त्रिमूर्तीचे उल्लेख मल्लीनाथ, बाण, कालिदास इत्यादींनी तसेच शूद्रकाने केला दिसतो. आहे. दत्त्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे, अशी मान्यता आहे. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम आदी संतांनी दत्तांचया त्रिमुखी असण्याचा उल्लेख आपल्या अभंगातून केला आहे..

⚜️ स्वरूप
दत्तात्रेय ही तीन तोंडे असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते. गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्री, मागे गाय असा परिसर दिसून येतो., स्वरूप दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेले असा अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसतात. चार कुत्री हे चार वेद आणि शंकराचे भैरव मानले जातात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून तो स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते.

👤 जन्म कथा/आख्यायिका
एकदा श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री महेश (शिव) यांनी अत्रि ऋषी यांची पत्नी अनसूया हिची परीक्षा घेण्याचे ठरवतात. हे तिघेही त्यांच्या आश्रमात ऋषींचा वेष धारण करून भिक्षा मागण्यासाठी जातात आणि भिक्षा म्हणून स्तनपान करण्यासाठीचे मागणी करतात. परंतु माता अनसूया पतिव्रता नारी असल्यामुळे त्यांना निराश न करण्याचे वचन देऊन त्यांचे लहान बालकांत रूपांतर करते व स्तनपान करून त्यांना जेवू घालून झोपवते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिच्यावर प्रसन्न होऊन त्यांचे खरे रूप दाखवत वर मागण्यास सांगतात. अनसूया त्यांच्याकडे तुम्ही माझी बालके व्हावीत म्हणून वर मागते. तेव्हापासून ह्या तिघांचा एकत्रित संगम म्हणजे श्री दत्तात्रेय होय.

📙 इतिहास
दत्तात्रेय हे इसवी सनाच्या सुमारे पाचव्या शतकापासून पुराण वाङ्मयात प्रसिद्ध झाले आहेत. मार्कंडेय पुराणात सतराव्या-अठराव्या अध्यायात दत्तात्रेयांचा उल्लेख आहे.

दत्ताचा उल्लेख त्याचे साधक, परंपरेने गुरुदेव असा करतात. दत्तात्रेयाचे पिता अत्रि ऋषी, हे ऋग्वेदातल्या पाचव्या मंडलातील ऋचांचे लेखक किवा संकलक होते; माता अनसूया ही सांख्य तत्त्वज्ञानी कपिलमुनींची बहीण, तर महाभारतात कुंतीस असामान्य आशीर्वाद देणारे तापट ऋषी दुर्वास हे अनसूयाचे पुत्र. ही दत्ताची नातेवाईक मंडळी विशेष उल्लेखनीय आहेत. पुराणांत वर्णन केलेल्या दत्तशिष्यापैकी यदु, आयु, अलर्क, सहस्रार्जुन व परशुराम हे क्षत्रिय वृत्तीचे आहेत. उपनिषदांत उल्लेख असलेला सांकृती हा दत्तशिष्य एक महामुनी होता असे मानले जाते.

💎 संप्रदाय
एक महान योगी म्हणून दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, आद्य ग्रंथ लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक इत्यादी संप्रदायांतील साधक उपास्यदैवत मानतात.

नाथ संप्रदायात 'राऊळ' अथवा रावळ या नावाने एक उपपंथ आहे. पंथाचे प्रवर्तक नागनाथ हे सिद्धपुरुष होते. या उपपंथात मुसलमान धर्मातील अनेक मंडळी उपासना करताना आढळतात. महानुभाव संप्रदाय हा दत्त संप्रदायच आहे. या संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधर यांची परंपरा दत्तात्रेय-चांगदेव राऊळ-गुंडम राऊळ-चक्रधर अशी आहे. चक्रधरांनी दत्तात्रेयाला पूज्य मानले आहे. श्रीचांगदेव राऊळ यांना इसवी सन ११००च्या सुमारास दत्तदर्शन झाले असा लिखित उल्लेख आहे.

समावेशकता
गोरक्षनाथाने अकराव्या शतकात अनेक शैव, शाक्त, वैदिक, अवैदिक धर्मपंथांना एकत्र केले व नाथपंथाची स्थापना केली. दत्तात्रेय हा वारकऱ्यांनाही पूज्य आहे. श्री ज्ञानदेव आणि श्री एकनाथ हे दत्तोपासक होते. आनंद संप्रदायाची गुरुपरंपरा ही दत्तात्रेयादी आहे. चैतन्य संप्रदायाची गुरुपरंपरा राघव-चैतन्य-केशव-बाबाजी- तुकाराम अशी आहे. या परंपरेतील राघव चैतन्यांनी दत्ताची उपासना केली होती. मुस्लिमांत या देवतेचा निर्देश शहा फकीर म्हणून होतो. भक्तांसाठी दत्तप्रभू मलंग वेश धारण करतात, अशी धारणा आहे. यामुळे दत्ताचे अनेक भक्त मुसलमान असतात.

🏟️ आखाडे
दशनामी नागा साधूंचे सहा मुख्य आखाडे आहेत. हे शैवपंथाचे आखाडे आहेत. हे आखाडे सर्वात जुने समजले जातात. त्यातील एक आखाडा हा भैरव आखाडा म्हणूनही ओळखला जातो. या आखाड्याची देवता पूर्वी भैरव असावी. त्यावरूनच हे नाव पडले असावे. आज मात्र दत्तात्रेय ही या आखाड्याची प्रमुख देवता आहे.

🛕 महाराष्ट्रातील दत्त मंदिर व तीर्थ क्षेत्रे                                                                      श्री क्षेत्र प्रयाग दत्त मंदिर कोल्हापूर
श्री क्षेत्र अक्कलकोट
श्री क्षेत्र अंतापूर
श्री क्षेत्र अनसूयातीर्थ
श्री दत्त मंदिर संस्थान, रावेर, जळगांव
श्री क्षेत्र नगांव बु ( धुळे , महाराष्ट्र )
श्री क्षेत्र अंबेजोगाई
श्री क्षेत्र अमरकंटक
श्री क्षेत्र अमरापूर
श्री क्षेत्र आष्टी दत्तमंदिर
श्री क्षेत्र आष्टे दत्तमंदिर
श्री एकमुखी दत्तमूर्ती (कोल्हापूर, फलटण)
श्री क्षेत्र औदुंबर
श्री क्षेत्र कडगंची
श्री क्षेत्र करंजी
श्री क्षेत्र कर्दळीवन
श्री क्षेत्र कारंजा
श्री क्षेत्र कुबेरेश्र्वर (बडोदा)
श्री क्षेत्र कुमशी
श्री क्षेत्र कुरवपूर
श्री क्षेत्र कोळंबी
श्री क्षेत्र खामगाव दत्त मंदिर
श्री क्षेत्र गरुडेश्वर (गुजराथ)
श्री क्षेत्र गाणगापूर
श्री क्षेत्र गिरनार गुरुशिखर (गुजराथ)
श्री सद्गुरू गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर (पुणे)
श्री क्षेत्र गुरुशिखर अबू (राजस्थान)
श्री क्षेत्र गेंडीगेट दत्तमंदिर (बडोदा)
श्री गोरक्षनाथ मंदिर श्रीक्षेत्र भामानगर (धामोरी)
श्री क्षेत्र चिकुर्डे दत्त देवस्थान
श्री क्षेत्र चौल दत्तमंदिर
श्री जंगली महाराज मंदिर (पुणे)
श्री क्षेत्र जबलपूर पादुकामंदिर
श्री क्षेत्र जवाहरद्वीप (बुचर आयलंड, मुंबई)
श्री क्षेत्र टिंगरी
श्री क्षेत्र डभोई (बडोदा)
श्री दत्तमंदिर (डिग्रज)
श्री तारकेश्र्वर स्थान
श्री दगडूशेठ दत्तमंदिर (पुणे)
श्री क्षेत्र दत्तभिक्षालिंग
श्री क्षेत्र दत्तवाडी (सांखळी गोवा)
श्री क्षेत्र दत्ताश्रम (जालना)
श्री क्षेत्र देवगड नेवासे
श्री क्षेत्र नरसी
श्री क्षेत्र नारायणपूर
श्री क्षेत्र नारेश्र्वर
नासिक रोड दत्तमंदिर
श्री क्षेत्र नीलकंठेश्र्वर (बडोदा)
श्री क्षेत्र नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी)
श्री क्षेत्र पवनी
श्री क्षेत्र पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ
श्री क्षेत्र पिठापूर
श्री गुरुदेवदत्त मंदिर (पुणे)
श्री दत्तमंदिर रास्तापेठ (पुणे)
श्री क्षेत्र पैजारवाडी
श्री क्षेत्र पैठण
श्री क्षेत्र बसवकल्याण
श्री क्षेत्र बाचणी दत्तपादुका
श्री क्षेत्र बासर आणि ब्रह्मेश्वर
श्री क्षेत्र बाळेकुंद्री
श्री भटगाव दत्तमंदिर (नेपाळ)
श्री भणगे दत्त मंदिर (फलटण)
श्री क्षेत्र भामानगर (धामोरी)
श्री क्षेत्र भालोद (गुजराथ)
श्री क्षेत्र मंथनगड
श्री क्षेत्र माणगांव
श्री क्षेत्र माचणूर
श्री क्षेत्र माणिकनगर
माधवनगर - फडके दत्तमंदिर
श्री क्षेत्र माहूर
श्री क्षेत्र मुरगोड
श्री क्षेत्र राक्षसभुवन
श्री क्षेत्र रुईभर दत्तमंदिर
श्री क्षेत्र लोणी भापकर दत्तमंदिर
श्री दत्तमंदिर (वाकोला)
श्री क्षेत्र विजापूर नृसिंह मंदिर
श्री क्षेत्र वेदान्तनगरी (दत्तदेवस्थान नगर)
श्री क्षेत्र शिरोळ भोजनपात्र
श्री क्षेत्र शिर्डी
श्री क्षेत्र शिवपुरी दत्तमंदिर
श्री क्षेत्र शुचिन्द्रम दत्तमंदिर
श्री क्षेत्र शेगाव
श्री क्षेत्र सटाणे
श्री साई मंदिर (कुडाळ गोवा)
श्री क्षेत्र साकुरी
श्री क्षेत्र सुलीभंजन
श्री स्वामी समर्थ मठ चेंबूर
श्री स्वामी समर्थ मठ दादर
श्री स्वामी समर्थ संस्थान (बडोदा)
श्री हरिबाबा मंदिर (पणदरे)
श्री हरिबुवा समाधी मंदिर (फलटण)
श्री हिंगोलीचे दत्त मंदिर
श्री दत्त मंदिर बु. अल्लुर (निपाणी गडहिंग्लज रोड)
📿 उपासनेची वैशिष्ट्ये                 दत्तात्रेयाची उपासना दत्ताला मुख्यत्वे गुरू मानून केली जाते. सगुण प्रतीके उपलब्ध असली तरी उपासनेत पादुकांना प्राधान्य दिलेले आढळते.

🛕 दत्तात्रेयाची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि अन्य राज्यांतली तीर्थक्षेत्रे

औदुंबर :
कोल्हापूर - श्री क्षेत्र प्रयाग करवीर काशी कोल्हापूर हे एक अत्यंत महत्वाचे व पवित्र असे ठिकाण कोल्हापूर पासून अवघ्या 7किलोमीटर च्या अंतरावर वसलेले आहे ,येथे पवित्र पाच नद्यांचा संगम आहे याचे महत्व श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये पंधरा व सोळाव्या ओवीमध्ये व श्री करवीर माहात्म्य या ग्रंथामध्ये याची नोंद आहे.येथे श्री दत्तात्रेय रोज नित्यनियमाने स्नानास येतात व चंदन उटी लावतात अशी आख्यायिका आहे.तसेच येथे श्री दत्तगुरूंचे मंदिर आहे त्यामध्ये श्रींच्या स्वयंभू पाषाणी पावदका आहेत. माघ महिन्यामध्ये माघ स्नान यात्रा भरते.या यात्रे साठी व स्नानासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.येथील श्रींची पूजा वंशपरंपरेनुसार श्री अभिनव अशोक गिरीगोसावी यांचेकडे आहे.
कडगंची : कडगंची सायंदेव दत्तक्षेत्र हे कर्नाटक राज्यात गुलबर्गा शहरापासून २१ किलोमीटरवर गुलबर्गा-आळंद रस्त्यावर असलेले दत्तक्षेत्र सायंदेवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीसरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ येथे लिहिला. कडगंची इथे असलेली श्रीगुरुचरित्राची मूळ प्रत आहे.
कर्दळीवन : अक्कलकोट स्वामींची बखर, गुरुचरित्र, द्विसहस्र गुरुचरित्र, पंतमहाराज बाळेकुंद्रीकर यांचे चरित्र, श्रीपाद वल्लभ यांचे चरित्र, इत्यादी दत्त संप्रदायातील साहित्यामध्ये कर्दळीवनाचा उल्लेख आहे.
कारंजा : लाड कारंजे, श्रीगुरु नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान.
कुरवपूर : श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे वास्तव्य आणि पादुका.
गरुडेश्वर : योगी श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी यांची समाधी असलेले गरुडेश्वर हे एक दत्तस्थान आहे. नर्मदा नदीच्या काठावरील हे एक अत्यंत निसर्गरम्य असे ठिकाण आहे. नर्मदा परिक्रमा करताना हे स्थान लागते. येथील दत्तमूर्ती तीनमुखी सहा हातांची आहे. दत्तजयंती आणि श्री टेंबेस्वामींची पुण्यतिथी हे येथील प्रमुख उत्सव होत.
गाणगापूर : नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने गाणगापूर आणि नरसोबाची वाडी ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत. ते औदुंबर क्षेत्रीही राहिले होते. हे स्थानसांगली पासून चाळीस किलोमीटरवर आहे. तसेच श्रीगुरुचरित्रात गाणगापूरचा उल्लेख गाणगापूर, गाणगाभवन, गंधर्वभवन आणि गंधर्वपूर या नावांनी येतो.
गिरनार हे गुजराथमधील दत्तक्षेत्र दत्तात्रेय आणि नाथ संप्रदाय या दोघांसाठी महत्त्वाचे आहे. येथे दत्तगुरूंनी साडेबारा हजार वर्षे तप केले असे मानतात. गुजराथमधल्या जुनागढ स्टेशनपासून गिरनार पर्वत ७ कि.मी. अंतरावर आहे. येथे जैन गुरू नेमिनाथांचे मंदिर आहे. तसेच गोरखनाथ मंदिर आणि दत्तधुनी आहे. इथे सोमवारी सकाळी ७ ते ९ या वेळात सर्व धुनी सामुग्री रचल्यावर आपोआप अग्नी प्रज्वलित होतो, असे सांगितले जाते. तेथे कमंडलू कुंड नावाचे एक कुंड आहे. या जागी दत्तात्रेयांनी आपला कमंडलू फेकल्याने तिथे गंगा अवतरली असे मानतात.
नरसोबाची वाडी : नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने गाणगापूर आणि नरसोबाची वाडी ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत. ते औदुंबर क्षेत्रीही राहिले होते. हे स्थानसांगली पासून चाळीस किलोमीटरवर आहे. तसेच श्रीगुरुचरित्रात गाणगापूरचा उल्लेख गाणगापूर, गाणगाभवन, गंधर्वभवन आणि गंधर्वपूर या नावांनी येतो. या स्थानाल नृसिंहवाडी म्हणतात. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केले आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले. विजापूरच्या आदिलशाहने आपल्या मुलीचे आंधळेपण जावे म्हणून येथे दत्ताची प्रार्थना केली होती. त्या मुलीला दृष्टी आल्यामुळे आदिलशहाने या मंदिराचे बांधकाम करून दिले असे एक मत आहे.
नारेश्वर : हे रंगावधूत महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेले क्षेत्र गुजरात राज्यात आहे. रंगावधूत स्वामींनी खास स्त्रियांसाठी 'दत्त बावनी' हा ग्रंथ लिहिला. श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी हे त्यांचे गुरू. गुजरातमधील वडोदरापासून सुमारे ६० कि.मी.वर हे स्थान आहे. नर्मदा परिक्रमा करताना हे स्थान लागते. या ठिकाणी दत्त जयंती आणि गोकुळाष्टमी हे उत्सव साजरे होतात.
नेपाळच्या भटगाव अथवा भक्तपूर येथेसुद्धा दत्तात्रेयाचे मंदिर आणि उपासना आढळते. चित्रकूटाजवळील अनसूया पर्वत ही श्रीदत्तात्रेयांची जन्मभूमी असल्याचे भक्त मानतात. तसेच येथील एकमुखी आणि द्विभुज अशी दत्तमूर्ती असलेले स्थान हे दत्तात्रेयांचे आद्य स्वरूप म्हणून नेपाळमध्ये पूजले जाते.
पीठापूर
बसवकल्याण
बाळेकुंद्री
माणगाव
माहूर : चांगदेव राऊळ हे माहूरच्या यात्रेनिमित्त फलटणहून निघाले होते. तसेच ते द्वारका येथे असताना बावन्न पुरुषांना त्यांनी विद्यादान केले असा लिखित उल्लेख आहे. या गोष्टीवरून माहूरच्या दत्तस्थानाचा महिमा अकराव्या शतकापूर्वी दूरवर पसरलेला होता हे सिद्ध होते.
अक्कलकोट : स्वामी समर्थ महाराज १८५७ मध्ये अक्कलकोट येथे वास्तव्यास आले व अखेरपर्यंत तेथेच राहिले. सोलापूरजवळ असलेल्या अक्कलकोट या गावाचे मूळ नाव प्रज्ञापुरी होते.
श्रीक्षेत्र रुईभर श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर ता. जि. उस्मानाबाद
🛕 इतर मंदिरे व स्थाने                                             
अंबेजोगाई : आद्यकवी मुकुंदराज आणि संत दासोपंत यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान आहे. दासोपंती पंथाचे हे स्थान आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा दत्त एकमुखी आणि द्विभुज असतो. दासोपंत हे दत्तभक्त होते. श्री दत्तात्रेयांनी त्यांना सगुण रूपात दर्शन दिले होते, असे मानतात. दासोपंतांनी स्थापन केलेले दत्त मंदिर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात या अंबेजोगाई येथे आहे
अष्टे :
कोल्हापूर : भिक्षा-लिंग-स्थान या नावाचे अजून एक दत्तमंदिर कोल्हापुरात आहे.
खामगाव : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे दत्त-स्थान आहे. येथे संत पाचलेगावकर महाराजांचा मुक्तेश्वर आश्रम आहे. निर्गुण पादुका, टेंबेस्वामींनी दिलेली दत्तमूर्ती यामुळे हे स्थान जागृत मानले जाते. मार्गशीर्ष वद्य द्वादशीला येथे उत्सव असतो.
चौल : चौलपासून जवळच असलेल्या एका टेकडीवर दत्तस्थान आहे. याचे मूळ नाव चंपावतीनगर होते. आज हे गाव म्हणजेच चेऊल अथवा चौल नावाने ओळखले जाते. हे महाराष्ट्रात कोकणामध्ये रेवदंड्यापासून ५ कि.मी.वर आहे. चौल हे या अष्टागरांचे राजधानीचे ठिकाण होते. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला येथे यात्रा भरते.
फलटण (सातारा जिल्हा) : येथे एकमुखी दत्ताचे एक देऊळ आहे. गोंदवलेकर महाराजांनी दिलेली मूर्ती या देवळात आहे. महाराजांचे भाचे भणगे यांचे वंशज हे देवस्थान सांभाळतात.
माणिकनगर : बीदर येथील हुमणाबाद या तालुक्याच्या ठिकाणापासून एक कि.मी.वर असलेले हे क्षेत्र दत्तभक्तांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. श्रीमाणिकप्रभू यांच्या वास्स्तव्याने ही भूमी पावन आहे. अहमदाबाद येथील बाबा त्रिवेदी महाराज या सिद्ध पुरुषास माणिकप्रभूंचा साक्षात्कार आणि दर्शन याच क्षेत्री घडले असे सांगतात. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी नानासाहेब पेशव्यांनी रंगराव यांना माणिकप्रभूंच्या दर्शनासाठी आणि त्यांचा या युद्धाला आशीर्वाद मिळवण्यासाठी माणिकनगरला पाठवले होते. जवळचे गुलबर्गा रेल्वे स्टेशन असून इथून हुमणाबाद ६५ कि.मी. अंतरावर आहे. येथे अन्नदान वेदपाठशाळा, संस्कृत पाठशाळा, संगीत विद्यालय, अनाथालय, असे उपक्रम चालवले जातात.
विजापूर : विजापूरला इब्राहिम आदिलशाहनी बांधलेले दत्तमंदिर आहे.
सांखळी (गोवा) : डिचोली तालुक्यात सांखळी हे गाव आहे. येथे हे मंदिर आहे. या ठिकाणाला क्षेत्र दत्तवाडी म्हणून ओळखतात. या ठिकाणी रामनवमी, अक्षय्य तृतीया, नवरात्रोत्सव, महाशिवरात्री आणि दत्त जयंती असे उत्सव साजरे होतात. लक्ष्मण कामत या दत्तभक्ताने या मंदिराची स्थापना केली.
श्रीक्षेत्र रुईभर श्रीदत्त मंदिर संस्थान रुईभर ता. जि. उस्मानाबाद पासून १२ कि. मी. अंतरावरील गाव.
🔮 शिष्य व कार्य
श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती हे इ. स. १३७८ साली जन्मले. या दोघांनी दत्तसंप्रदायाचे पुनरुज्जीवन केले, असे काहीजण मानतात. तत्कालीन मुसलमानांच्या आक्रमणापासून जनजागृती करून आपल्या धर्माचे रक्षण यांनी केले.

📚 संप्रदायाचे ग्रंथ
अथर्ववेदात दत्तात्रेय उपनिषदाचा समावेश आहे.
अवधूतगीता नावाचा ग्रंथ एक प्रमाणग्रंथ म्हणून प्रतिष्ठा पावला आहे.
गुरुगीता
गोरक्षनाथ लिखित हिंदी रचनांचे संकलन गोरखबानी या ग्रंथात झाले आहे.
श्री दत्तगुरूंनी 'दत्त संहिता' नावाचा ग्रंथ लिहिला.
दत्तप्रबोध हा ग्रंथ कावडीबुवा यांनी लिहिला.
परशुरामांनी त्यावर आधारित 'परशुराम कल्पसूत्र' नावाची पन्‍नास खंडांची रचना केली.
सुमेधाने या दोन ग्रंथांच्या आधाराने त्रिपुररहस्य नावाचा ग्रंथ रचला.
महानुभावांच्या आद्य ग्रंथापैकी 'साती ग्रंथ' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सात ग्रंथातील 'उद्धवगीता' या भास्करभट बोरीकर नावाच्या एकादशटीकेत प्रारंभीच दत्तात्रेयाला नमन केलेले आहे.
मुकुंदराज या आद्य मराठी कवीचे नाथपरंपरेशी जोडणारे उल्लेख आढळतात.
दत्तमहिमा गाण्यासाठी लिहिलेला सैदाद्रवर्णन हा ग्रंथ आहे.
दासबोधाच्या रचनेसाठी रामदास स्वामी यांनी दत्तप्रणीत अवधूतगीतेचा आणि गुरुगीतेचा उपयोग केला होता असे दिसून येते.

📚 संबंधित ग्रंथ
श्रीगुरुचरित्र लेखक सरस्वती गंगाधर
दत्तप्रबोध
दत्तमाहात्म्य
गुरुलीलामृत
नवनाथभक्तिसार
नवनाथ सार - लेखक धुंडिसुत मालू
दक्षिणामूर्ती संहिता
दत्तसंहिता
आधुनिक पुस्तके संपादन करा
आध्यात्मिक साधना पूर्वतयारी - लेखक श्री. कुलदीप निकम दत्तप्रबोधिनी प्रकाशन
दत्त अनुभूती : स्वामिकृपेने घडलेल्या ११ गिरनार वाऱ्यांमधील चमत्कारिक अनुभव (आनंद कामत)
दत्त संप्रदायाचा इतिहास - लेखक डॉ. रा.चिं. ढेरे पद्मगंधा प्रकाशन
श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश - संपादक डॉ. प्र.न. जोशी
'मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास : तंत्र, योग आणि भक्ती' - लेखक डॉ. सुधाकर देशमुख, पद्मगंधा प्रकाशन
दत्त माझा दिनानाथ (डाॅ. ॐश्रीश श्रीदत्तोपासक)
🎤  गीते
आर. एन. पराडकर या दत्ताचे भक्त असलेल्या गायकाने यमन, दरबारी कानडा, पहाडी, भैरवी असे अनेक राग वापरून दत्ताची गीते म्हटली आहेत. पराडकर यांच्या निधनानंतर त्यांची परंपरा गायक अजित कडकडे हे चालवत आहेत. ’ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरीं बसले, मला हे दत्तगुरू दिसले’ हे आशा भोसले यांनी गायलेले ’आम्ही जातो आमुच्या गावा’ या चित्रपटातले गीतही प्रसिद्ध आहे. अजित कडकडे यांनी गायलेेले प्रवीण दवणे यांचे आणखी एक गीत : 'निघालो घेऊन दत्ताची पालखी'; संगीतकार नंदू होनप.

🎼🎤 पराडकर यांची सुप्रसिद्ध गीते
अनुसूयेच्या धामी आले (कवी सुधांशु, संगीत विठ्ठल शिंदे)
आज मी दत्तगुरू पाहिले
कृष्णाकाठी दत्तगुरूंचा नित्य असे संचार (कवी डॉ. व्ही.टी. पंचभाई, संगीत आर.एन. पराडकर)
गगनिचे नंदादीप जळती (कवी डॉ. व्ही.टी. पंचभाई, संगीत आर.एन. पराडकर)
गुरुदत्त पाहिले कृष्णातिरीं
गेलो दत्तमयी होउनी (कवी गिरिबाल, संगीत शांताराम पाबळकर)
जय जय दत्तराज माऊली (कवी सुधांशु, संगीत विठ्ठल शिंदे)
दत्तगुरूंना स्मरा
दत्तगुरू सुखधाम, माझा दत्तगुरू सुख धाम
दत्त दिगंबर दैवत माझे (कवी सुधांशु, संगीत आर.एन. पराडकर)
दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनी
दत्ता दिगंबरा या हो
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. (कवी सुधांशु; राग यमन)
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची (पारंपरिक गीत)
निघालो घेऊन दत्ताची पालखी (संगीत-सद्गुरू नंदू होनप)
पुजा हो दत्तगुरू दिनरात (कवी गुलाब भेदोडकर)
मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता
माझी देवपूजा पाय तुझे (कवी शिवदीन केसरी),
वगैरे. .

        🙏🌹 🛕 🌹🙏
      ♾♾♾ ♾♾♾
       स्त्रोत ~ WikipediA                        ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

महाराणी ताराबाई भोसले

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन :   श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                            
     ➿➿➿➿➿➿➿➿➿
    🚩🏇🤺🇮🇳👸🏻🇮🇳🏇🤺🚩
   
         महाराणी ताराबाई
        राजारामराजे भोसले


    जन्म : 14 एप्रिल 1675
         (जन्मस्थान : तळबिड)

    मृत्यू : 9 डिसेंबर 1761
         (मृत्यूस्थान : सिंहगड)

उपाधी = महाराणी.
राज्यकाळ : १७०० - १७०७
राज्याभिषेक : इ.स. १७००
राज्यव्याप्ती : पश्चिम महाराष्ट्र, कोकण,दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानी : पन्हाळा
पूर्वाधिकारी : छत्रपती 
                  राजारामराजे भोसले
उत्तराधिकारी : शाहू भोसले
वडील : हंबीरराव मोहिते
राजवंश : भोसले
राजचलन : होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन)

महाराणी ताराबाई (१६७५-१७६१)  ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्‍नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या होती. छत्रपती ताराराणी भोसले यांचा जन्म १६७५ साली झाला. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८३-८४ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली. सन १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या. ९ जून १६९६ रोजी ताराबाईंना शिवाजी हा पुत्र झाला.
                 राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक कठीण प्रसंगांनी खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी ताराराणीने आक्रमक भूमिका घेतली. मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून तिने शत्रू थोपवून धरला. लष्कराचा आत्मविश्वास वाढवला. मोगलांना कर्दनकाळ वाटावेत असे कर्तृत्ववान सरदार त्यांच्यासमोर उभे केले. दिल्लीच्या राजसत्तेवर स्वतःचा असा धाक निर्माण केला. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी तिने मोगली मुलुखावर स्वाऱ्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ वाढवले. सन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.
                      करवीर राज्याची, कोल्हापूरच्या राजगादीची तिने स्थापना केली. ताराबाई मराठ्यांच्या इतिहासातील ही एक कर्तबगार राजस्त्री होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज यांच्यामागे त्यांनी कणखरपणे राज्याची धुरा सांभाळली. सरसेनापती संताजी, धनाजी यांना बरोबर घेऊन मोगलांना सळो की पळो करून सोडणारी ही रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रियांमधील एक मानाचे पान आहे.

💠 कारकीर्द
                  घोडेस्वारीमध्ये निपुण असलेल्या ताराबाई जात्याच अत्यंत बुद्धिमान, तडफदार होत्या. त्यांना युद्धकौशल्य आणि राजकारणातल्या उलाढालींचे तंत्र अवगत होते. इ.स. १७०० ते १७०७ या काळात शिवाजी महाराजांच्या या सुनेच्या तडफदार धोरणामुळे आणि मुत्सद्देगिरीमुळे औरंगजेबाला मराठ्यांशी झुंज देत सात वर्षे दक्षिणेत मुक्काम करावा लागला आणि अखेरीस अपयश घेऊन येथेच देह ठेवावा लागला. या काळात ताराबाई आणि दुसरा शिवाजी (कोल्हापूर) यांचा मुक्काम अधिक तर पन्हाळ्यावरच असे.

ताराबाई
                  वास्तविक सन १७०० साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार छत्रपती शाहू महाराजांकडे जायला हवे होते. पण शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि नंतरच्या काळात मोगलांच्या कैदेत होते. महाराणी ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी ह्याला गादीवर बसवले, आणि रामचंद्रपंत अमात्य यांच्या सल्ल्याने मराठा राज्याचा कारभार पाहण्यास सुरुवात केली..

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संभाजी राजांचे पुत्र शाहू यांची मोगलांनी सुटका करताना महाराष्ट्रात दुहीचे बीज पेरले. शाहू हेच मराठा राज्याचे उत्तराधिकारी असल्याचे अनेक सरदार, सेनानी यांना वाटू लागले. दोन्ही बाजूंनी छत्रपतीपदाच्या वारसा हक्कावरून संघर्ष सुरू झाला. या काळात ताराबाईच्या पक्षातले खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव यांसारखे सेनानी आणि मुत्सद्दी शाहूंच्या पक्षात गेले. शाहूराजांनी महाराणी ताराबाई आणि त्यांचा पुत्र शिवाजी दुसरा ह्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारले. १७०७ साली खेड येथे झालेल्या ह्या युद्धात बाळाजी विश्वनाथ ह्या पेशव्याच्या कुशल नेतृत्वाखाली शाहूराजांची सरशी झाली आणि महाराणी ताराबाईंनी साताऱ्याहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली.

सन १७१४ साली राजमहालात झालेल्या घडामोडींनंतर शिवाजीला पदच्युत करून राजे संभाजी ह्या राजारामाच्या दुसऱ्या मुलाला छत्रपती म्हणून नेमले. सरतेशेवटी वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली.

राजकीय परिस्थिती
                       सन १७०० साली जिंजी मोगलांच्या ताब्यात आली. पण तत्पूर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले. ताराबाई व इतर लोक मात्र मोगलांचा सेनापती जुल्फिखारखान यांच्या तावडीत सापडले. पण जुल्फिखारखानने सर्वांची मुक्तता केली. २ मार्च १७०३ रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सूत्रे ताराबाईंच्या हाती आली. त्यांच्या सैन्यामध्ये बाळाजी विश्वनाथ, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे आदी मात्तबर सेनानी होते. त्यांनी मोगलांची पळता भुई थोडी अशी अवस्था केली. सन १७०५ साली त्यांनी मोगलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून कारंजा ही राजधानी बनविली.

🌀 कारकीर्द

छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली.

सन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.मराठी राज्याच्या अडचणीच्या काळात कोणी कर्तबगार पुरुष घरात नसताना आणि औरंगजेबसारखा बलाढ्य शत्रू आपल्याच राज्यात आलेला असताना एका स्त्रीने राज्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. राज्याला,गादीला आणि समाजाला खंबीर नेतृत्व दिले. सर्वाचे नीतिधैर्य टिकवून ठेवले. वयाच्या ८६ व्या वर्षी ताराबाईचे सिंहगडावर निधन झाले. मराठ्यांच्या इतिहासातील स्वातंत्र्य युद्ध महाराणी ताराबाई हे एक ज्वलंत पर्व आहे. या काळात मुघल सत्तेच्या विरुद्ध लढा उभारुन मराठी राज्याला नेतृत्व बहाल करण्याचे काम महाराणी ताराबाई यांनी केले. त्यांनी या काळात आपले कार्य आणि कर्तृत्त्व निर्विवादपणे सिद्ध केले. राजारामां नतर मराठी राज्याला नेतृत्व नसताना, ताराबाई यांनी मराठी राज्य टिकवूना ठेवले. मराठी राज्य जिंकण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या देहाची आणि कीर्तीची कबर महाराष्ट्राच्या भूमीतच खोदली गेली. 

👑 राजाराम
                  वास्तविक सन १७०३ साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार संभाजीपुत्र शाहूकडे जायला हवे होते. पण शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि मोगलांच्या कैदेत होते. त्यामुळे महाराणी ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी ह्याला गादीवर बसवले.
                     सन १७०७ साली औरंगजेबाचा औरंगाबादजवळ मृत्यू झाला. त्यानंतर मोगलांनी मराठी राज्यात भाऊबंदकी सुरू व्हावी म्हणून शाहूंची सुटका केली आणि त्यांच्या डोक्यात ह्या उत्तराधिकाराचे बीज पेरले. परिणामी, ताराबाई व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी संघर्ष सुरू झाला. १२ ऑक्टोबर १७०७ रोजी ताराराणी व शाहू यांच्यात खेड-कडूस येथे लढाई झाली त्यात शाहूंचा विजय झाला.
                   ताराराणीने जिंकलेले सर्व किल्ले शाहूला आपसूकच मिळाले. शाहूच्या पक्षात गेलेले बाळाजी विश्वनाथ यांनी ताराराणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे आदी सेनानींना शाहूच्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला. शाहूंनी सातार्‍याला गादीची स्थापना केली आणि महाराणी ताराबाईंनी सातार्‍याहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली.
त्यानंतर वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली आणि मराठी साम्राज्यात सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या.
पुढे शाहूच्या मध्यस्थीने ताराबाईंची कैदेतून सुटका झाली. त्यानंतर त्या सातारा येथे राहावयास गेल्या. शाहूंना पुत्र नसल्यामुळे त्यांनी ताराबाईंचा नातू रामराजा यांस दत्तक घेतले. ताराबाईंचे निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी साताऱ्यातील अजिंक्यतारयावर झाले. त्यांची समाधी क्षेत्र माहुली, ता. सातारा येथे कृष्णेच्या काठावर असून पावसाळ्यात ही समाधी नदीच्या प्रवाहात पाण्याखाली असते.

संभाजीनंतर कोल्हापूरच्या गादीवर शिवाजी द्वितीय (कोल्हापूर) या दत्तक पुत्राची कारकीर्द इ.स. १७६२ ते १८१३ अशी झाली. याच्या कारकीर्दीत १ ऑक्टोबर १८१२ रोजी कोल्हापूर संस्थानाचा ईस्ट इंडिया कंपनी सरकारबरोबर संरक्षणात्मक करार होऊन ते ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आले. त्यानंतर १८१३ मध्ये शिवाजी महाराज द्वितीय (कोल्हापूर) यांचे निधन झाले.

             कवी गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.

दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।।
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।।

📙 पुस्तके

महाराणी ताराऊसाहेब (अशोकराव शिंदे सरकार)

   हर हर महादेव......!!!     

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
         ♾♾♾ ♾♾♾
          स्त्रोत ~ WikipediA                                                                  ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...