रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

गुरूदेव रविंद्रनाथ टागोर

⚜️ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ⚜️

       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
            ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                                      ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  
     ⚜️📰✍️🇮🇳👨🏻🇮🇳📰✍🏢
  
          गुरुदेव रवींद्रनाथ टागोर


            जन्म : ७ मे , १८६१
             (कोलकाता, भारत)

        मृत्यू : ७ ऑगस्ट , १९४१
              (कोलकाता, भारत)

राष्ट्रीयत्व : भारतीय 
कार्यक्षेत्र : साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान, नाटक
भाषा : बंगाली
साहित्य प्रकार : कविता, नाटक
प्रसिद्ध साहित्यकृती : जन गण 
                       मन, गीतांजली
प्रभावित : द.रा.बेन्द्रे,पु.ल.देशपांडे
वडील : देवेंद्रनाथ टागोर
आई : सरला देवी
पत्नी : मृणालिनी देवी 
    (विवाहः ९ डिसेंबर, १८८३)

पुरस्कार :  साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१३)

ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेल विजेते होते.
बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात येते; यावरून बंगाली साहित्यावरील रवीन्द्रनाथांचा प्रभाव लक्षात यावा.

कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी वयाच्या ८व्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. शांतिनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.

🧔 जीवनपट
प्रारंभिक आयुष्य (१८६१ - १९०१)
कोलकात्याच्या जोराशंका ठा़कूर बाडी येथे रवींद्रनाथ टागोर (टोपणनाव रवि) यांचा जन्म झाला. वडील देवेन्द्रनाथ टागोर (१८१७-१९०५) व आई शारदा देवी (१८३० - १८७५) यांच्या १४ अपत्यांमध्ये रवींद्रनाथ हे १३वे होत. ११व्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडिलांसोबत १४ फेब्रुवारी १८७३ रोजी भारत भ्रमणार्थ कलकत्ता सोडले. या भ्रमंतीत त्यांनी विविध ठिकाणे पाहिली. वडिलांची शांतिनिकेतन येथील मालमत्ता (येथे आता आजचे विश्वभारती विद्यापीठ आहे), अमृतसर व हिमालयातील थंड हवेचे ठिकाण डलहौसी इत्यादी. येथे रवींद्रनाथांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली, इतिहास, खगोलशास्त्र, विज्ञान , कालिदासाचे काव्य व संस्कृत आदींचे अध्ययन केले.

१८७७ साली प्रकाशित झालेल्या रचनांमुळे रवींद्रनाथ प्रथम लोकांसमोर आले. यात मैथिली कवीच्या विद्यापतीप्रवर्तित शैलीत रचलेल्या काही दीर्घ कविता होत्या. विनोदाने रवींद्रनाथांनी प्रथम ह्या भानुसिंह नामक वैष्णव कवीने १७ व्या शतकात रचलेल्या व नंतर गहाळ झालेल्या रचना आहेत, असा आविर्भाव केला व नंतर त्यांचे कवित्व मान्य केले. याच काळात त्यांनी संध्या-संगीत(१८८२), बंगाली भाषेतील पहिली लघुकथा "भिकारिणी" व सुप्रसिद्ध कविता "निर्झरेर स्वप्नभंग" आदी रचना लिहिल्या.

👫 पत्‍नी मृणालिनीदेवी व रवींद्रनाथ
बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज येथे प्रवेश घेतला परंतु १८८० मध्ये कोणत्याही पदवीशिवाय ते बंगालला परतले. ९ नोव्हेंबर १८८३ रोजी त्यांनी मृणालिनी-देवी (जन्मनाव भावतारिणी १८७३ -१९००) यांच्याशी विवाह केला. या विवाहापासून त्यांना पाच अपत्ये (पैकी दोघांचा बालमृत्यू) झाली.१८९० साली रवींद्रनाथांनी सध्याच्या बांग्लादेशातील सियाल्दा येथील टागोर घराण्याची मालमत्ता सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांची पत्‍नी व मुले १८९८ साली येथे त्यांच्या सोबत आली. या काळात ते जमीनदार बाबू या नावाने ओळखले जात होते. हा काळ रवींद्रनाथांचा "साधना काळ" म्हणून ओळखला जातो. त्यांनी नंतर गल्पगुच्छ (मराठी अर्थ: कथा-गुच्छ) नावाचा ८४ कथा असलेले तीन खंडी पुस्तक प्रकाशित केले. आवेग व विरोधाभासयुक्त असे ग्रामीण बंगालचे सुरेख चित्र यात रवींद्रनाथांनी रेखाटले आहे.

🏤 शांतिनिकेतन (१९०१ - १९३२)

१९०१ साली रवीन्द्रनाथ सियाल्दा सोडून शांतिनिकेतन येथे राहण्यास आले. एका आश्रमाची स्थापना करणे हा त्यांचा उद्देश होता . या आश्रमात त्यांनी एका प्रार्थना-गृहाची, प्रयोग-शील शाळेची, बागबगिचा व ग्रंथालयाची स्थापना केली. रवीन्द्रनाथांच्या पत्‍नीचा व दोन मुलांचा मृत्यू येथेच झाला. वडिलांचे देहावसान १९ जाने. १९०५ ला घडले व वारसदार म्हणून रवींद्रनाथांन नियमित मासिक उत्त्पन्न मिळू लागले. याशिवाय त्यांना त्रिपुराच्या महाराजांकडून आर्थिक साहाय्य, कौंटुबिक दागदागिने व पुरी, ओडिशा येथील बंगला विकून काही प्राप्ती झाली. या काळात त्यांचे साहित्य बंगाली व विदेशी वाचकांचे आधिकाधिक लक्ष खेचू लागले होते. नैवेद्य (१९०१) व खेया (१९०६) या रचना या काळात प्रकाशित झाल्या. याशिवाय कवितांचा free verse या नावाने अनुवाद करणेही सुरू होते. १४ नोव्हे. १९१३ रोजी स्वीडिश अकादमीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी रवीन्द्रनाथांना समजली. गीतांजली या रचनेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. गीतांजलीचे भाषांतर स्वतः रवीन्द्रनाथांनीच केले होते. १९१५ साली त्यांना ब्रिटिश सरकारने "सर" ही पदवी दिली. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली.

१९२१ साली रवीन्द्रनाथ व कृषी-अर्थतज्ज्ञ लिओनार्ड के एल्महिर्स्ट् यांनी शांतिनिकेतन जवळील सुरुल येथे एका ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली. याच संस्थेचे रवीन्द्रनाथांनी पुढे "श्री-निकेतन" असे नामकरण केले. श्री-निकेतनच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या प्रतिकात्मक स्वराज्य चळवळीला पर्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. ज्ञानसंवर्धनातून अज्ञानी व असहाय्य ग्रामीण भागाची सुटका होईल या उदेशाने त्यांनी विविध देशातील विद्वान, दाते व अधिकाऱ्यांस या उपक्रमात सहभागी करून घेतले. १९३० सालापासून त्यांनी भारतातील पराकोटीच्या जातीयतेविरुद्ध प्रचार सुरू केला. नाट्य-कविता यांद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केरळच्या गुरुवायुर मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी आवाहन केले.

🗃 अखेरची वर्षे  
              (१९३२-१९४१)
जीवनाच्या शेवटच्या दशकात रवींद्रनाथ पूर्णपणे जनसन्मुख होते. त्यांची लोकप्रियता विशेषतः बंगालमध्ये शिखरावर होती. १५ जानेवारी १९३४ रोजी बिहारमध्ये झालेल्या भूकंपाची, महात्मा गांधींनी "दलित अत्याचाराचा परमेश्वराने घेतला सूड" अशी संभावना केली. या वक्तव्याचा रवींद्रनाथांनी निषेध केला. बंगालच्या आर्थिक व सामाजिक अवनतीबाबत व कोलकत्यातील भयावह दारिद्‌र्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या दारिद्र्यावर केलेल्या मुक्तछंदातील १०० ओळींच्या कवितेचा प्रभाव सत्यजित रे यांच्या अपुर संसार ( अपूचे जग) या चित्रपटावरही पडलेला दिसतो. पुनश्च (१९३२), शेष सप्तक (१९३५), पत्रपुत (१९३६) आदी गद्यपद्यांचा (prose-prose) समावेश असलेले स्वतःच्या लिखाणाचे १५ खंड संपादित केले. याशिवाय 'चित्रांगदा', श्यामा (१९३९), चंडालिका (१९३८) सारख्या नृत्य-नाटिकांवर विविध प्रयोग केले. याशिवाय दुई बोन (दोन बहिणी) (१९३३), मलंच (१९३४), आणि चार अध्याय (१९३४)आदी कादंबऱ्या लिहिल्या. अखेरच्या काळात विज्ञानात रवींद्रनाथांनी विशेष रस घेतला. यातूनच त्यांच्या विश्वपरिचय या निबंधसंग्रहाची निर्मिती झाली. जीवशास्त्र, भौतिकी व खगोलशास्त्राचा त्यांनी केलेल्या अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या कवितेवरही जाणवतो. त्यांच्या कवितेतून झळकणारा निसर्गवाद(naturalism) हा त्यांना वैज्ञानिक नियमांप्रती त्यांना असलेला आदर अधिरेखित करतो. विज्ञानाची प्रगती त्यांनी आपल्या विविध रचनांमधून मांडली आहे जसे से (तो) (१९३७),तीन संगी (१९४०).
रवींद्रनाथांच्या आयुष्यातील शेवटची चार वर्षे प्रदीर्घ व्याधी व आजारपणांनी व्यापली. १९३७ साली शुद्ध हरपून ते बराच काळ कोमात होते. पुन्हा १९४० सालचा कोमा जीवघेणा ठरला. या शेवटच्या काळात लिहिलेल्या काव्यरचना रवींद्रनाथांच्या काव्यरचनांत सर्वश्रेष्ठ मानण्यात येतात. त्यांचे मृत्युविषयक चिंतन या रचनांतून प्रकटते. ७ ऑगस्ट १९४१ रोजी रवींद्रनाथांचा कोलकात्याच्या त्यांच्या वडिलोपार्जित जोरशंका ठाकूर बाडी येथे मृत्यु झाला.

📯 रवींद्रनाथ आणि महाराष्ट्र

रवींद्रनाथकालीन भारतामध्ये सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळींचे प्रमुख केन्द्रांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राचा प्रभाव रवींद्रनाथांवरही पडला होता. संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत.
       कारवार येथील सृष्टिसौन्दर्यामुळे रवींद्रनाथांना आपल्या पहिल्या नाटकाची प्रेरणा मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनही त्यांच्या साठी प्रेरणास्थान होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी एक खंडकाव्य ही त्यांनी रचले आहे. रवींद्रनाथांचा नेता व क्रांतिकारक या रूपांत भारतीय स्वातंत्र्य संग्रामात थेट सहभाग नव्हता म्हणून व त्यांच्या संस्कृतीपिपासू वृत्तीमुळे त्यांच्यावर महाराष्टात टीका झाली होती. रवीन्द्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वाने काही महाराष्ट्रीयही प्रभावित झाले होते. रविंद्रनाथ मूळ बंगालीतून वाचण्याच्या इच्छेने पु.ल.देशपांडे हे बंगाली भाषा शिकले. मराठी व कानडी भाषेत लेखन केलेले व कानडी भाषेतील आधुनिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवी व जन्माने महाराष्ट्रीय असलेल्या द.रा. बेन्द्रे यांच्या साहित्यावरही रवीद्रनाथांचा प्रभाव आहे.

गीतांजलीचे इंग्रजी भाषांतर रवींद्रनाथांनीच केले होते. याशिवाय तिचे जगातील अनेक भाषांत अनुवाद झाले. मराठीतले पहिला गद्य अनुवाद हरि नारायण फडके यांनी केला होता. अमरावतीचे डॉक्टर राम म्हैसाळकर (जन्म : २९ मे, १९२९) यांनी रवींद्रनाथांच्या गीतंजली सकट एकूण चार पुस्तकांचा ‘रवींद्र गीतांजली...’ नावाचा गद्यानुवाद केला आहे. ह्या अनुवादला मसापचे उत्कृष्ट भावानुवादाचे स.ह. मोडक पारितोषिक मिळाले होते.
याव्यतिरिक्त सौ. ज्योती कुलकर्णी यांनी ‘गीतांजली रविंद्रनाथांच्या - माझ्या मराठीत’ नावाचे पद्यमय भाषांतर केले आहे. (२००८)

कार्य
पारंपारिक हैदा कोरीवकाम शैलीतील बंगाली लिपीतील रवींद्रनाथांची आद्याक्षरे "र-ठ" रवींद्रनाथ स्वतःची हस्तलिखिते अनेकदा अशा कलेने सजवत असत.
संगीत,साहित्य, तत्वज्ञान, चित्रकला ,नृत्य,शिक्षण अशा बहुविध क्षेत्रात रवींद्रनाथांनी संचार केला. संख्या व दर्जा या दोन्ही कसोट्यांवर रवींद्रनाथांची निर्मिती खरी उतरते.

रवींद्रनाथाच्या बहुमुखी निर्मितीत कविता जरी प्रमुख असली तरी त्यांनी कादंबऱ्या, निबंध, लघुकथा, प्रवासवर्णने, नाटके अशा बहुविध साहित्याची निर्मिती केली. यमकप्रचुरता, आशावाद व गेयता ही त्यांच्या कृतींची प्रमुख वैशिष्ट्ये. कवितेनंतर रवींद्रनाथांची लघुकथा ही प्रमुख रचना मानली जाते. रवींद्रनाथ हे बंगाली भाषेतील आद्य लघुकथाकार समजले जातात. सामान्य माणसांचे जीवन हे त्यांच्या कथांचे बीज आहे.

🎼 काव्य
१५-१६ व्या शतकातील वैष्णव रचनांचा रवींद्रनाथांवर प्रभाव होता. भारतीय परंपरेतील 'ऋषी' संकल्पनेचाही रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव दिसून येतो. गावोगावी गीत गात फिरणाऱ्या फकिरांसारख्या 'बाऊल' कलाकारांची ग्रामीण बंगालमध्ये परंपरा आहे. बाऊल स्वतःस कोणत्याही एका धर्माचे मानत नाहीत. त्यांच्या गीतांत हिंदू, मुस्लिम अशा दोन्ही धर्माची शिकवण दिसून येते. रवींद्रनाथांनी या परंपरेस बुद्धिजीवी वर्तुळात पूर्वी नसलेली प्रतिष्ठा दिली. त्यांच्या बाऊल परंपरेच्या अभ्यासाने त्यांच्या स्वतःच्या काव्यकृतीस नवा आयाम मिळाला. 'मनेर मानुष' (मनातील माणूस) आणि 'जीवन देवता' ही दोन रूपके टागोरांच्या कवितेत बऱ्याचदा दिसतात.

रवींद्रनाथांच्या गीतांजलीचे १९१३ सालची आवृत्ती..
गीतांजलीतील (গীতাঞ্জলি) चौथ्या कवितेचे (शीर्षकः प्रार्थना) *मराठी भाषांतर 👇

विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर 
ही माझी प्रार्थना नाही;
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये
एवढीच माझी इच्छा !

दुःखतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे 
तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही.
दुःखावर जय मिळवता यावा 
एवढीच माझी इच्छा !

जगात माझे नुकसान झाले
केवळ फसवणूक वाट्याला आली;
तर माझे मन खंबीर व्हावे
एवढीच माझी इच्छा !

माझे तारण तू करावेस वा मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही.
तरून जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे एवढीच माझी इच्छा !

माझे ओझे हलके करून 
तू माझे सांत्वन केले नाहीस तरी माझी तक्रार नाही
ते ओझे वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी 
एवढीच माझी इच्छा !

सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखावा
दुःखांच्या रात्री जेव्हा, सारे जग फसवणूक करील, तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका मात्र निर्माण होऊ नये, एवढीच माझी इच्छा !

📚 कादंबऱ्या व इतर साहित्य
रवींद्रनाथांनी 'चतुरंग', 'शेषेर कबिता' (शेवटच्या कविता), 'चार अध्याय', 'नौका डुबी', 'घरे बाईरे' या सारख्या ४ लघुकांदबऱ्या व ८ मोठ्या कादंबऱ्या लिहिल्या. 'चतुरंग' ही सचिश नावाच्या परस्परविरोधी संकल्पनांत अडकलेल्या पात्राची कहाणी आहे. धार्मिक गूढतेतून आयुष्याचा अर्थ शोधणाऱ्या कथानायकाचा अंती होणारा भ्रमनिरास टागोरांनी या कादंबरीतून मांडला आहे.

गोरा कांदबरीतील मुख्य पात्र पारंपरिक हिंदू सनातनी मताचे समर्थक आहे. ह्या गौरवर्णीय पात्र व इतर पात्रातील संवादातून ही कांदबरी उलगडत जाते. सनातनी गोराच्या विचारामुळे त्याचे सनातनी वडील प्रभावित होत नाहीत. धर्मांधता ही श्रद्धेमुळे नव्हे तर व्यक्तीच्या उग्र प्रकृतीने बनते असे टागोर या कादंबरीतून सांगतात.

'शेषेर कबिता' (शेवटच्या कविता) ही कवितेने नटलेली कादंबरी. यात 'रवींद्रनाथ ठाकूर' हे स्वतःचेच नाव सांगणाऱ्या 'प्रसिद्ध कवी'वर टागोर त्रयस्थपणे टीका करतात. 'चार अध्याय' ही रवींद्रनाथांची शेवटची कांदंबरी. 'राष्ट्रभक्ती' म्हणजे काय?, राष्ट्र कसे बनते?, केवळ घोषणाबाजी, कठोर शिस्त यातून खरे स्वातंत्र्य शक्य आहे काय? अशा प्रश्नांचा धांडोळा ही कादंबरी घेते.

📒 जीवनकहाणी
रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलेल्या बालपणापासूनच्या आठवणी त्यांव्या ’जीवनस्मृती’ या पुस्तकात आहेत. पुस्तकाचा मराठी अनुवाद नीलिमा भावे यांनी केला आहे.

🎻  रवींद्रसंगीत
रवींद्रनाथांनी रचलेल्या व चाल दिलेल्या जवळपास २२३० गीतांना एकत्रितपणे रवींद्रसंगीत असे संबोधले जाते. गगनेर खाले रबि चन्द्र दीपक ज्बले हे रवींद्रनाथांनी रचलेले पहिले व हे नूतन देखा दिक आरो बारो हे शेवटचे गीत मानण्यात येते. भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते असलेल्या जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना मूलतः रवींद्रसंगीताचा हिस्सा आहेत. सांगीतिकदृष्ट्या अभिजात भारतीय संगीत, बंगाली लोकसंगीत व अभिजात पाश्चात्त्य संगीत ह्या रवींद्रसंगीताच्या प्रेरणा मानल्या जातात. अभिजात भारतीय संगीतातील ठुमरी शैलीचा रवींद्रसंगीतावर मुख्य प्रभाव आहे. ही गीते रवींद्रनाथांच्या स्वतःचे तत्त्वचिंतन दाखवत असली तरी त्यांवर वैष्णव व उपनिषदीय तत्त्वज्ञानाचीही झलकही दिसते. रवींद्रसंगीतातील गीते ही विविध रागांमध्ये बांधण्यात आली असून रागाचा व गीताचा भाव यात सुसंगती असते. अनेक गीतांमध्ये विविध रागांना एकत्र बांधून नवसृजन केलेले दिसते. अभिजात भारतीय संगीतातून प्रेरणा घेतलेल्या रवींद्रसंगीत हे नंतर अनेक अभिजात भारतीय संगीताच्या गायकवादकांचे प्रेरणास्रोत ठरले. रवींद्रसंगीताने प्रभावित गायक-वादकात विलायत खान (सतार), अमजद अली खान (सरोद) आदींचा समावेश आहे.

🎨 चित्रकला
वयाच्या ६० च्या वर्षी रवींद्रनाथांनी चित्रे काढण्यास सुरुवात केली. द. फ्रान्स मधील कलाकारांच्या प्रेरणेवरुन त्यांच्या चित्रांची पॅरिस मधील पहिल्या प्रदर्शनासह युरोपभर अनेक प्रदर्शने झाली. आयुष्याच्या या काळात रवींद्रनाथांना रंगांधळेपणाचा त्रास सुरू झाला होता. सौन्दर्यदृष्टी व रंगछटांमध्ये रवींद्रनाथांच्या चित्रशैलीची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. रवींद्रनाथांनी रचनेत वेगवेगळ्या शैलींचे अनुसरण केले. यात उत्तर आयर्लॅडमधील मलनगान कारागिरीपासून कॅनडाच्या हैदा कोरीवकाम प्रकारापर्यंतच्या चित्र व शिल्पकलेतील शैली येतात. आपल्या कृतींची हस्तलिखितेही अनेकदा रवींद्रनाथांनी कलाकारीने सजवली आहेत.

🎭 नाट्य
वयाच्या विसाव्या रवींद्रनाथांनी 'वाल्मिकी प्रतिभा' नावाचे पहिले नृत्य-नाट्य लिहिले. यात भजनांच्या स्वरूपात असलेले पारंपरिक बंगाली कीर्तन व युरोपीय गीत-शैलींचा संमिश्र वापर केला आहे. ऐहिक सुखोपभोगांपासून पारमार्थिकाकडे हा विषय डाकघर नावाच्या नाटकात रवींद्रनाथांनी हाताळला आहे. 'अभिनयापेक्षा भावनांवर भर' असे रवींद्रनाथ स्वतःच्या नाटकांचे वर्णन करतात. 'चंडालिका', 'विसर्जन', चित्रांगदा', 'राजा', 'मायार खेला' ही रवींद्रनाथांची इतर नाटके. नाटकांसोबत टागोरांच्या 'नृत्य-नाटिका' विशेष प्रसिद्ध आहेत. मणिपुरी शैलीच्या अभिजात नृत्य शैलींचा टागोरांनी वापर केला आहे.

🛎 लघुकथा
'गल्पगुच्छ'(कथागुच्छ) नावाचा रवींद्रनाथांचा ८४ लघुकथांचा ३ खंडी संग्रह प्रसिद्ध आहे. आजूबाजूचा परिसर,आधुनिक कल्पना व बौद्धिक कूटप्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न टागोर यांतून करतात. 'काबुलीवाला' या सुप्रसिद्ध प्रथमपुरुषी कथेत दूरदेशी असलेल्या आपल्या मुलीची आठवण कशी येत राहते हे अफगाण फळवाल्याच्या तोंडून टागोर सांगतात.

इस्रायलमधील सार पब्लिशिंग हाऊस या प्रकाशनसंस्थेने रविंद्रनाथांच्या कथांचा हिब्रू भाषेतील अनुवाद 'एप' या नावाने इ.स. २००६ साली प्रकाशित केलेला आहे.

🎯 राजकीय मते
चरखा-पंथी असे संबोधून त्यांनी तत्कालीन स्वदेशी चळवळीची खिल्ली उडवली होती. ब्रिटिश साम्राज्यवादापेक्षाही 'सामाजिक अनारोग्य' त्यांना मोठा शत्रू वाटत असे. स्वयंसहायता व सर्वसामान्यांचा बौद्धिक उद्धार आदींवर त्यांचा जास्त भर होता. आंधळ्या क्रांतीपेक्षा सावकाश होणाऱ्या शैक्षणिक उत्क्रांतीवर त्यांचा जास्त विश्वास होता. या मतांमुळे रवींद्रनाथांना शारीरिक हल्ल्यांना सामोरे जावे लागले. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्यांकाडाचा निषेध म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारची सर्वोच्च पदवी परत केली. टागोरांनी रचलेली 'एकला चलो रे' व 'चित्त जेथा भयशून्य' ह्या दोन कविता भारतीय स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणा गीते म्हणून वापरण्यात आल्या. महात्मा गांधींशी मतभेद असतानाही स्वतंत्र मतदारसंघाविषयी असलेला गांधी-आंबेडकर वाद मिटवण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

प्रभाव व वारसा
रवींद्रनाथांचा प्रभाव दाखवणारे अनेक समारंभ जगभरात होत असतात. बंगालमध्ये त्यांच्या जोराशंका ठाकूर बाडी गावी रवींद्रनाथांच्या पुण्यतिथीस मोठा उत्सव होतो. अमेरिकेतील इलिनॉय येथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वार्षिकोत्सव होतो. रवींद्रनाथांमुळे प्रभावित व्यक्तींत अमर्त्य सेन, अँन्द्रे गिडेल (फ्रान्स), यसुनारी कावाबाता (जपान) आदी नोबेल विजेते, याशिवाय सलमान रश्दी, पाब्ले नेरुदा यांचा समावेश आहे. रवींद्रनाथांचे साहित्य जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे , विख्यात भारतीय चित्रकार नंदलाल बोस यांच्या जडणघडणीवर रवींद्रनाथांचा प्रभाव आहे.

 *निवडक साहित्य सूची*

📚  कादंबऱ्या
गोरा (१९१०), घरे बाईरे (१९१६), चतुरंग (१९१६), चार अध्याय (१९३४) चोखेर बाली (१९०२), गोरा (१९१०), जोगाजोग (१९३०), मुक्तधारा (१९१६), राज ऋषि (१९१६), राजा आर रानी (१९१६), शेषेर कबिता (१९२९)

📝 लघुकथा
काबुलीवाला, दृष्टिदान, क्षुधित पाषाण

💃 नृत्य-नाटिका
चंडालिका (१९३८), चित्रांगदा (१९३६), मालिनी (१८९५), श्यामा (१९३८)

🎪 नाटके
बिसर्जना (१८९०), बैकुण्ठेर खाता (१८९७),  राजा ओ रानी (१८८९)

📖 काव्य व पुस्तके
गीतांजली (१९१०), जन्मदिने (१९४१), नैबेद्य (१९०१), पत्रपूत (१९३६), पूरबी (१९२५), पुनश्च (१९३२),शेष सप्तक (१९३५), श्यामली (१९३६), सोनार तारी (१८९३) 

🎞 चित्रपट
रवींद्रनाथांच्या अनेक कादंबऱ्या आणि लघुकथांवर बंगाली आणि हिंदी चित्रपट निघाले आहेत. उदा० परिणीता, काबुलीवाला वगैरे वगैरे. मराठीतही दृष्टिदान नामक लघुकथेवर त्याच नावाचा मराठी चित्रपट झाला आहे.

रवींद्रसंगीतातील काही निवडक गीते
आमार शोनार बांग्ला 
आमी चिनी चिनी गो तोमारे ओ गो बिदेशिनी | (मी तुला ओळखतो गं विदेशिनी --- रवींद्रसंगीतातील एक अतिशय लोकप्रिय गीत)
जन गण मन....

         🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🌹🙏 विनम्र अभिवादन 🙏🌷
                 
          ♾♾♾ ♾♾♾
       संदर्भ~ WikipediA ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२

थोर क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील

⚜️ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ⚜️
   ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
              ▬ ❚❂❚❂❚ ▬                संकलन : श्री अविनाश पाटील,  
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
                                                                                            
     🔫⛓️💥🇮🇳👨🏻🇮🇳💥⛓️🔫           

        क्रांतिसिंह नाना पाटील
          (क्रांतिकारक व समाजसुधारक)
जन्म : ३ ऑगस्ट १९००
(येडे मच्छिंद्र, वाळवा तालुका सांगली)
मृत्यू : ६ डिसेंबर, १९७६ (वय ७६)                           
(वाळवा)
चळवळ :  भारतीय स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ
धर्म : हिंदू                                    क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते. क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मानले जातात. त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये होते.                                                                                             नाना पाटील यांच्या वरती प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता. पुढील काळात ब्रिटिशांच्या अन्याय कारक राजवटीस आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला. साताऱ्यातील प्रतिसरकारच्या स्थापनेत त्यांचा वाटा महत्त्वाचा होता. नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना करून महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला मोठे योगदान दिले. भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. प्रतिसरकारची स्थापना झाल्यावर ग्रामीण भागात ब्रिटिशांचे अस्तित्व नाममात्र राहिले. नाना पाटील यांनी युवकांची संघटना स्थापन करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान निर्माण केले. प्रती सरकारचे नेते या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले. महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीच्या भूमिगत कार्यकर्त्यांमध्ये नाना पाटलांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. या काळामध्ये महाराष्ट्रातील सातारा, सांगली या परिसरात नाना पाटलांची ब्रिटिशांवर एक मोठी दहशद निर्माण झाली होती. प्रतिसरकार अथवा 'पत्री सरकार' म्हणून या काळात ते ओळखले गेले. मंत्र प्राप्तीनंतर हे नाना पाटील यांनी सातारा सांगली परिसरामध्ये आपले सामाजिक कार्य पुढे चालू ठेवले कारमध्ये त्यांना मोठी लोकप्रियता देखील मिळाली.ते महत्त्वाचे क्रांतिकारक होते.

🔮 जीवन -           
महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.

नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र या गावी झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते. 

💥 स्वातंत्र्य लढा -
१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्‍न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय.

ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.

नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या एका दलाचे-तुफान दलाचे- फील्ड मार्शल जी.डी. लाड (बापू) आणि कॅप्टन आकाराम (दादा) पवार होते. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बॉंबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली.

या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणाऱ्या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.[२]

नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्याच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत.                        १९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कऱ्हाड तालुक्यात प्रकट झाले.

यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणाऱ्या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर इ.स. १९७६ वाळवा मध्ये निधन झाले. मला वाळव्यामधेच दहन करण्यात यावे ही त्याची इच्छा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करण्यात आले.                ♨️  *स्वातंत्र्योत्तर काळ*                            

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.

📚 संबंधित साहित्य -                                                   क्रांतिसिंह नाना पाटील (लेखक : विलास पाटील, क्रांतिवैभव प्रकाशन)
सिंहगर्जना : क्रांतिसिंह नाना पाटील यांची निवडक भाषणे. (संपादक: रा.तु. भगत, क्रांतिवैभव प्रकाशन)
क्रांतिसिंह नाना पाटील आणि शेतकरी चळवळ (लेखक : दिनकर पाटील, कीर्ती प्रकाशन)
क्रांतिसिंह नाना पाटील: चरित्र आणि कार्य (लेखक : दिलीप मढीकर, ललितराज प्रकाशन)
पत्री सरकार : चरित्र, व्यक्तिमत्त्व आणि चळवळ (लेखक : प्राचार्य व.न. इंगळे)
               
       🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🌹🙏 विनम्र अभिवादन 🙏🌷

         ♾♾♾ ♾♾♾
     स्त्रोत ~ Wikipedia                              

सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

⚜️ आझादी का अमृत महोत्सव ⚜️     
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳

लोकमान्य टिळक पुण्यतीथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती
                ▬ ❚❂❚❂❚ ▬
संकलन ~ अविनाश काशिनाथ पाटील
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे   
                                                  
   ✍️⛓️💥🇮🇳👨🏻🇮🇳💥⛓️✍️           
                लोकमान्य
        बाळ गंगाधर टिळक

जन्म: २३ जुलै १८५६
(चिखली, दापोली,रत्‍नागिरी, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत)

मृत्यू: १ ऑगस्ट १९२०
(पुणे, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत)

चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस
पत्रकारिता/ लेखन: केसरी, मराठा
पुरस्कार: लोकमान्य, भारतीय असंतोषाचे जनक
प्रमुख स्मारके: मुंबई, दिल्ली इ.
धर्म: हिंदू
प्रभाव: शिवाजी महाराज, तात्या टोपे, महाराणा प्रताप
प्रभावित: महात्मा गांधी, चाफेकर बंधु, स्वातंत्र्यवीर सावरकर, देवेंद्र फडणविस, बाळासाहेब ठाकरे
वडील: गंगाधर रामचंद्र टिळक
आई: पार्वतीबाई टिळक
पत्नी: सत्यभामाबाई
अपत्ये: श्रीधर बळवंत टिळक
 घोषणा : "स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. "
      हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक आणि वक्ते होते. 'लोकमान्य' या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.

👦 बालपण
टिळकांचा जन्म २३ जुलै इ.स. १८५६ मध्ये रत्‍नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखली हे त्यांचे मूळ गाव होय.

समवयस्क मुलांपेक्षा भिन्नता
आपल्या समवयस्क मुलांपेक्षा ते भिन्न प्रकृतीचा होते. एकदा शाळेत त्यांच्या गुरुजींनी गणित घातले. ‘पाच बकर्‍या १ कुरण २८ दिवसांत खातात, तर तेच कुरण २० दिवसांत किती बकर्‍या संपवतील ? बाळने उत्तर दिले, ‘गुरुजी, सात बकर्‍या.’ गुरुजी बाळाजवळ गेले आणि वही उचलून तीवर दृष्टी फिरवली. ‘वहीत उदाहरण उतरवून तरी घ्यायचे! कुठे सोडवले आहेस ?’ गुरुजींनी विचारले. ‘मी तोंडी करू शकतो, मग लिहिण्याची आवश्यकता काय ?’ बाळ तत्काळ म्हणाला. कितीतरी कठीण गणिते ते सहज सोडवत असत.

🏇 क्रांतीवीरांच्या कथा ऐकणे
        त्यांना कहाण्या ऐकण्याचा भारी नाद होता. अभ्यास संपला की, बाळ आजोबांकडे स्वातंत्र्ययुद्धाच्या गोष्टी ऐकण्याकरिता धाव घेई. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी या क्रांतीवीरांच्या कथा ऐकतांना तो उत्तेजित होत असे. ‘मोठा झाल्यावर मीही मातृभूमीची अशीच सेवा करीन’, हा विचार त्याच्या अंतःकरणात खोल रुजून बसला होता.

🏢 महाविद्यालयीन जीवन
         टिळकांची प्रकृती अशक्त आणि सुकुमार होती. अशाने देशाचे कार्य कसे होणार म्हणून त्यांनी प्रकृती बळकट करण्याचा निश्चय केला. महाविद्यालयाचे प्रथम वर्ष शरीर साधनेत निघून गेले. नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार यांमुळे त्यांनी सर्व खेळांत प्रथम क्रमांक पटकावला. ते उत्तम मल्ल आणि पोहणारे म्हणून नावाजले. सन १८७७ मध्ये टिळक बी.ए. झाले. त्यांना गणितात प्रथम वर्ग मिळाला. पुढे त्यांनी एल्.एल्.बी.चीही पदवी संपादन केली.

🚿 प्लेगच्या फवारणीस विरोध
       लोकमान्य टिळकांच्या पत्‍नी
 सत्यभामाबाई उर्फ तापीबाई आणि मुली व नातवंडे यांच्याबरोबर प्लेगविरोधी फवारणीस विरोध.
इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी पत्रकारितेत मोठे योगदान दिले. तथापि, त्यांनी पुण्यातील प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका महत्वपूर्ण ठरली . उंदीर नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुण्यात फवारणी मोहीम सुरू केली तेव्हा, पुणेकरांनी विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट वॉल्टर चार्लस रँड याने लष्कराची मदत घेतली. व त्यांचे जवान पुण्यात आरोग्य विभागाच्या मदतीला आले, घरात घुसून जबरदस्तीने फवारणी करवून घेऊ लागले. आणि साथीचा फैलाव झाल्याचे कारण सांगून लोकांचे सामान, कपडे-लत्ते सर्रास जाळून टाकू लागले, यामुळे पुण्यात एकच हाहाकार उडाला. रँडसाहेब मुद्दाम आमची घरे जाळीत आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. टिळकांनी केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले. "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा टिळकांनी अग्रलेख याच संदर्भातील आहे. टिळक लिहितात : रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहोचला आहे. रँडसाहेबांचे लाडके सोल्जर पायातल्या खेटरांसकट फवारणीचे धोटे घेऊन आमच्या घरात घुसतात. घरातले सामान रस्त्यावर फेकून देतात, जाळून टाकतात, हे कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरांबरोबर आमच्या विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे.

🧭 टिळक-आगरकर मैत्री व वाद
डेक्कन कॉलेजमध्ये असतांना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली. आगरकरांकडे केसरीच्या संपादकपदाची धुरा टिळकांनी दिली होती. पण नंतर दोघांत बिनसले. राजकीय स्वातंत्र्य आधी की, समाज सुधारणा आधी या मुद्यावर त्यांच्यात मतभेद झाले. त्यातून दोघांची मैत्री तुटली. आगरकरांना केसरी सोडावे लागले.
        
दुष्काळ
इ.स. १८९६ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकर्‍यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार ’दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच सरकारच्या 'Famine Relief Code' नुसार दुष्काळ पडला असतांना शेतकऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरीद्वारे केले. त्यांच्या स्वयंसेवकांनी महाराष्ट्रभर गावागावात फिरून लोकांना 'Famine Relief Code' बद्दल माहिती देणारी पत्रके वाटली. याबरोबरच धनिकांनी व दुकानदारांनी अन्न व पैसा दान करावे असे आवाहन केले व यातून अनेक ठिकाणी सार्वजनिक खानावळी चालवल्या गेल्या.

जहालवाद विरुद्ध मवाळवाद
तत्कालीन भारतीय नेतृत्त्वात भारतास स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते. इंग्रजांशी जुळवून घेउन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे हा मतप्रवाह मवाळवाद समजला जातो तर इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करुन वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे हा मतप्रवाह जहालवाद समजला जातो. टिळक जहालवादी होते.

🔮 लाल-बाल-पाल
लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले.लृ
               बंगालच्या फाळणी विरुद्धचा लढा ८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्‍न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.
        टिळकांच्या बाबतीमध्ये राम गणेश गडकरी असे म्हणाले होते की, बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून या पुणे शहरात दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी विझवावी, या लायकीचे कोणी राहिलेले नाहीत.

✒ 'केसरी व मराठा' तील अग्रलेख
टिळकांनी आगरकर, चिपळूणकर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने इ.स. १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता. जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृती करणे या विचारांनी केसरी सुरू झाले. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यांवरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. इ.स. १८८२च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.
       सुरुवातीला आगरकरांकडे 
' केसरी ' चे संपादकपद तर टिळकांकडे ' मराठा ' या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही 'केसरी' त प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ' केसरी ' चे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ' केसरी ' चा आत्मा होता. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ', ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,' ' टिळक सुटले पुढे काय ', ' प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ', ' टोणग्याचे आचळ ', 'हे आमचे गुरूच नव्हेत ’, ' बादशहा ब्राह्मण झाले ' हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.

📝 साहित्य आणि संशोधन
                  टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) ही त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्‌गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. त्यांच्या लिखाणाचे इतर संग्रह खालीलप्रमाणे आहेत :-
The Hindu philosophy of life, ethics and religion (१८८७ मध्ये प्रकाशित).
वेदांचा काळ व वेदांग ज्योतिष 
टिळक पंचांग पद्धती. (ही आज कित्येक ठिकाणी विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात वापरली जाते.)
टिळकांची पत्रे, एम. डी. विद्वांस यांनी संपादित.

 👪 कौटुंबिक जीवन
कौटुंबिक स्तरावर १९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला.  त्यांची दोन्ही धाकटी मुले टिळकबंधू म्हणून ओळखली जात, आणि ती आगरकरांच्या विचारांशी जवळीक ठेवणारी होती.

💎 प्रसिद्ध घोषणा/वचने
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.

📚 *टिळकांवर लिहिलेली पुस्तके*
टिळक आणि आगरकर - तीन अंकी नाटक -व लेखक विश्राम बेडेकर
टिळक भारत - लेखक शि.ल. करंदीकर
टिळकांची पत्रे - संपादक : एम. धोंडोपंत विद्वांस
मंडालेचा राजबंदी - लेखक अरविंद व्यं. गोखले
लोकमान्य टिळक चरित्र व आठवणी (भाग १ ते ६) - लेखक प्रा.वामन शिवराम आपटे
लोकमान्य टिळक दर्शन -लेखक  भालचंद्र दत्तात्रेय खेर
लोकमान्य टिळक -  लेखक : पु.ग. सहस्रबुद्धे
लोकमान्य टिळक यांचे चरित्र (३ खंड) - लेखक न.चिं. केळकर
लोकमान्यांची सिंहगर्जना - लेखक गिरीश दाबके
लोकमान्य ते महात्मा - लेखक सदानंद मोरे
लोकमान्य व लोकराजा लेख -  लेखक इंद्रजित नाझरे
लाल,बाल,पाल लेख - लेखक इंद्रजित नाझरे

♦ टिळकांवर निघालेला चित्रपट
"लोकमान्य : एक युगपुरुष" (दिग्दर्शक - ओम राऊत, टिळकांच्या भूमिकेत सुबोध भावे) - इ.स. २०१५.

🔹 सामाजिक योगदान
इ.स. १८९३ साली टिळकांनी गणेशोत्सव आणि ई.स १८९५ साली शिवाजी जयंती हे सार्वजनिक व सामाजिक सण म्हणून साजरे केले. त्यांत मिरवणूक हा मोठा भाग होता.

🪔 देवाज्ञा
        टिळकांचे जीवन दिव्य होते. लोकांच्या सन्मानाला आणि श्रद्धेला ते प्रत्येक दृष्टीने पात्र होते. तन, मन आणि धन सर्व अर्पण करून त्यांनी देशसेवा केली. शरीर थकलेले असतांनाही त्यांचा लोकजागृतीसाठी सतत प्रवास, व्याख्याने हा कार्यक्रम चालूच होता. जुलै १९२० मध्ये त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आणि १ ऑगस्टच्या प्रथम प्रहरी त्यांचा जीवनदीप मालवला. ही दुःखद वार्ता वार्‍यासारखी सर्व देशभर पसरली. आपल्या या प्रिय नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी जनतेचा महासागर लोटला. आपल्या प्रत्येक कृतीतून जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत देशाकरिता लढत राहिलेल्या ध्येयवादी थोर राष्ट्रभक्ताला आमचे विनम्र अभिवादन !’
              
🌹🙏 विनम्र अभिवादन 🙏💐

     🤝📚✍️🇮🇳👨🏻‍🦱🇮🇳📚✍️🤝
   
         साहित्यरत्न लोकशाहीर  
              अण्णाभाऊ साठे

जन्म :  १ ऑगस्ट, १९२०
            (वाटेगाव, ता. वाळवा,
                           जि. सांगली) 
मृत्यू :  १८ जुलै, १९६९
          ( गोरेगाव, मुंबई )

जन्म नाव :  तुकाराम भाऊराव 
                   साठे
टोपणनाव :   अण्णाभाऊ साठे
शिक्षण : अशिक्षित
राष्ट्रीयत्व : भारतीय 
कार्यक्षेत्र : लेखक, साहित्यिक
भाषा : मराठी
साहित्य प्रकार : शाहिर, कथा,    
                       कादंबरीकार
चळवळ : संयुक्त महाराष्ट्र चळवळ
प्रसिद्ध साहित्यकृती : फकिरा
प्रभाव : बाबासाहेब आंबेडकर, 
            कार्ल मार्क्स
वडील :  भाऊराव साठे
आई : वालुबाई साठे
पत्नी : कोंडाबाई साठे,
           जयवंता साठे
अपत्ये : मधुकर, शांता आणि      
             शकुंतला

            तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक,  लोककवी आणि लेखक होते. साठे एका अस्पृश्य मांग समाजामध्ये जन्मलेले एक दलित व्यक्ती होते, त्यांची उपज आणि ओळख त्यांचे लेखन आणि राजकीय कृतीशीलतेचे केंद्रबिंदू होते.
       कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक. ब्रिटिशराज्यकर्त्यांनी ‘गुन्हेगार’ म्हणून शिक्का मारलेल्या एका जमातीत त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे, तर आईचे नाव वालबाई होते. त्यांचे मूळ नाव तुकाराम. जन्मस्थळ वाटेगाव (ता.वाळवा; जि. सांगली ). त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले. १९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले.
        मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली. पक्षाचे कामही ते करीत होतेच; तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर,  पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले. तेथे बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. पुढे १९४२ च्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पकडवॉरंट काढले. पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले. मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला. त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्घ झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
         संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाटये आदींचा समावेश होता. ‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला;  त्याचप्रमाणे मुंबई कुणाची ?  ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची अन्य काही लोकनाटये. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.
           अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांची कथा-कादंबरीची निर्मितीही ठळकपणे नजरेत भरते. जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्याकंजारी (१९६०), चिरानगरची भुतं (१९७८), कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह; त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा (१९४५) हीत्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर ३४ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांत फकिरा (१९५९, आवृ.१६– १९९५), वारणेचा वाघ (१९६८), चिखलातीलकमळ, रानगंगा, माकडीचा माळ (१९६३), वैजयंता ह्यांसारख्या कादंबऱ्यांचा समावेश होतो. त्यांच्या फकिरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण त्या कादंबरीत आहे. सत्प्रवृत्तीचा, माणुसकीचा विजय हे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचे मुख्यसूत्र होय. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले : वैजयंता (१९६१, कादंबरी वैजयंता ), टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी आवडी ),डोंगरची मैना (१९६९, कादंबरी माकडीचा माळ ), मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी चिखलातील कमळ ), वारणेचा वाघ (१९७०, कादंबरीवारणेचा वाघ ), अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी अलगूज ), फकिरा (कादंबरी फकिरा ). या शिवायव इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन,सुलतान ही नाटकेही त्यांनी लिहिली.
         उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेले, दलित आणि श्रमिक यांच्या समृद्घीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते. ‘जग बदल घालुनी घाव। सांगूनि गेले मज भीमराव॥’ हे त्यांचे गीतखूप गाजले. त्यांनी लिहिलेल्या लावण्यांत ‘माझी मैना गावावर राहिली’ आणि ‘मुंबईची लावणी’ या अजोड आणि अविस्मरणीय आहेत.
          अतिशय तळमळीने लिहिण्याची त्यांची वृत्ती होती. ‘पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे’, असे ते म्हणत; आणि हाच त्यांच्या लेखनाचा प्रेरणा स्रोत होता. मानवी जीवनातील संघर्ष, नाटय, दुःख, दारिद्र्य त्यांच्या साहित्यातून प्रकट होते. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून त्यांनी उभ्या केलेल्या माणसांत जबरदस्त जीवनेच्छा दिसते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दलित लेखकांची एक प्रतिभावान पिढी निर्माणझाली. त्यात बाबूराव बागूल, नामदेव ढसाळ, लक्ष्मण माने, यशवंत मनोहर, दया पवार, केशव मेश्राम, शरणकुमार लिंबाळे आदींचा अंतर्भाव होतो.
        अण्णाभाऊंची निरीक्षणशक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. त्यांच्या लेखन शैलीला मराठमोळा, रांगडा पण लोभस घाट आहे. नाट्यमयता हाही त्यांच्यालेखनशैलीचा एक खास गुण. ज्या विपर्यस्त जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभव आत्मसात केले, त्यांतील क्षणांचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवतो. लवचिक भावचित्रे अंगासरशा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखनावर त्यांनी जीव जडवला होता; त्यांनी ते विपुल केले.
         रशियाच्या ‘इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी’ च्या निमंत्रणावरून ते १९६१ साली रशियाला गेले. तेथील अनुभवांवर आधारित माझा रशियाचाप्रवास हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले.
          पुढे पुढे मात्र दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला प्रकर्षाने आले मराठी साहित्यातील प्रतिष्ठितांकडून त्यांची उपेक्षा झाली. विपन्नावस्थेत गोरेगाव (मुंबई) येथे त्यांचे निधन झाले.

महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अकरा प्रबंध प्रसिद्घ केले गेले आहेत. पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘अण्णाभाऊ साठे’ अध्यासन सुरु करण्यात आले आहे. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची केवळ भारतीयच नव्हे, तर २२ परकीय भाषांत भाषांतरे झाली आहेत.

          ♾♾♾ ♾♾♾
     स्त्रोत ~ wikaspedia
➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

गुरुवार, २८ जुलै, २०२२

दिप अमावस्या

दिप आमावस्या  ,चातुर्मासातील पहिली अमावास्या म्हणून आषाढ अमावास्येकडे पाहिले जाते.अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला'दीपपूजन' केले जाते. आषाढ अमावास्येला 'दीपान्वित अमावास्या' असेही म्हणतात.कोणत्याही शुभ कार्याची, कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने केली जाते. सत्कर्माचा साक्षीदार दिवा होत असतो. अगदी.प्राचीन काळापासून दररोज सायंकाळी तिन्ही सांजेला देवासमोर तेलाचा वा तुपाचा दिवा लावण्याची आपली संस्कृती आहे. दिव्याची ज्योत ही अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे. तर, दिवा मांगल्याचे प्रतिक आहे. अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला 'दीपपूजन' केले जाते...

बुधवार, २७ जुलै, २०२२

भारतरत्न डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

        🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
               ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                                       ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  
  📡🚀🛰️🇮🇳👮‍♂️🇮🇳🛰️🚀📡
                 भारतरत्न
अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम
                       तथा  
        ए. पी. जे. अब्दुल कलाम

(भारताचे ११ वे राष्ट्रपती,  वैज्ञानिक, अभियंता)
       जन्म : १५ ऑक्टोबर १९३१
                (रामेश्वर)
       मृत्यू : २७ जुलै २०१५
                (शिलाँग)
सन्मान : भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण
                   कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य 
लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

🚀 कार्य 🛰
                १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
 📚 शिक्षण
             त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत.त्यांचे वडील व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते.त्यांच्यातील अध्यात्मिक चर्चा कलाम ऐकत असत.डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

 ♦ स्वभाव
    विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
 
🥇 गौरव -
                    अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
 
निधन - 
               ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.
        🇮🇳  जयहिंद  🇮🇳
🌹🙏 विनम्र अभिवादन 🙏🌷
            ♾♾♾♾♾♾
           संदर्भ - Wikipedia                                                                                                              ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शनिवार, २३ जुलै, २०२२

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती

विसपूते माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन...
टिळकांच्या विचारातून प्रेरणा घ्यावी - श्री डी. डी. पवार 
धुळे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री पी. बी. पाटील अध्यक्षस्थानी होते. मंचावर जेष्ठ शिक्षक श्री एस. आर. पाटील, श्री डी. डी. पवार, श्री ए. के. पाटील व श्री एस. बी. भदाणे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. इ. ८ वी च्या कु. भाग्यश्री गवळी, प्राची पाटील, प्रांजल व अक्षरा बळसाणे यांनी अतीथींच्या  स्वागतासाठी गीत सादर केले. वक्तृत्व स्पर्धेत चि. भावेश मोहीते, प्रथमेश, भाग्यश्री गवळी, प्राची पाटील, प्रांजल शिरसाठ, भारत जाधव, दिपक मोहीते, भाविका मोहीते, अंकिता मोरे, पुनम गवळी, समाधान लोंढे, भाग्यश्री मोहीते, कविता पाटील इ. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा पाटील यांनी केले. श्री डी. डी. पवार व श्री ए. के. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विजय देसले, श्री योगेंद्र पाटील, महेश पाटील, कुणाल साळुंके, श्रीमती राजश्री मासूळे, श्री तुषार कुलकर्णी, अभिज्ञ पवार, श्री महेश पवार व विलास भामरे यांनी मेहनत घेतली. 
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल प्राचार्य श्री पी. बी. पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री राजेंद्र गवळी, संस्थेच्या सचिव मा. स्मिताताई विसपूते, अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्र विसपूते यांनी अभिनंदन व कौतूक केले.

कार्यक्रमाची क्षणचित्रे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

शुक्रवार, २२ जुलै, २०२२

पोस्टर स्पर्धा दि. २२ | ७ | २२

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पोस्टर स्पर्धेचे आयोजन...
धुळे दि २२ 
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. शालेय विद्यार्थ्यांना या उत्साहात सहभागी करून घेण्यासाठी शालेय स्तरावर विवीध स्पर्धा घेण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. म्हणून आज आमच्या विद्यालयात पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. स्वातंत्र्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने १] पारंपरिक सण २] स्वातंत्र्य दिन ३] स्वातंत्र्योत्तर भारत या विषयांवर पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेचे श्री डी. डी. पवार, श्री विजय देसले, श्री महेश पाटील यांनी नियोजन  केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री एस. आर. पाटील, श्री ए. के. पाटील, श्री एस. बी. भदाणे, श्रीमती अपर्णा पाटील, श्री महेंद्र बाविस्कर, श्री योगेंद्र पाटील, श्री महेश पाटील, श्री साळूंके सर, श्रीमती राजश्री मासूळे, श्री तुषार कुलकर्णी, श्री अभिज्ञ पवार, श्री महेश पवार, श्री विलास भामरे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल 
विद्यालयाचे प्राचार्य श्री पी.बी. पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री राजेंद्र गवळी, संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्र विसपूते, सचिव मा.  स्मिताताई विसपूते यांनी अभिनंदन व कौतूक केले.

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...