सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

आचार्य विनोबा भावे

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
     ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन - श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                               
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
    ⚜️📚⛓️🇮🇳👨🏻🇮🇳⛓️✍️⚜️ 
          
           आचार्य विनोबा भावे


(अहिंसा आणि मानवाधिकाराचे भारतीय पुरस्कर्ता, भूदान चळवळीचे प्रवर्तक)

पुर्ण नाव : विनायक नरहरी भावे
        जन्म : ११ सप्टेंबर १८९५
         (गागोदे, पेण , जि. रायगड)
        मृत्यू : १५ नोव्हेंबर १९८२                          (लक्ष्मीपूजन -दिवाळी)
        (पवनार, महाराष्ट्र, भारत)
चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा,
भूदान चळवळ
पुरस्कार : भारतरत्न पुरस्कार (१९८३)
धर्म : हिंदू
प्रभाव : महात्मा गांधी
वडील : नरहर शंभूराव भावे
आई : रखुमाबाई नरहर भावे
                विनायक नरहरी भावे (आचार्य विनोबा भावे नावाने प्रसिद्ध)  हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४० मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२ मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.
💁🏻‍♂️ सुरुवातीचे जीवन
(११ सप्टेंबर १८९५ - १५ नोव्हेंबर १९८२). थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तहसिलातील गागोदे या गावी विनोबा तथा विनायक नरहर भावे यांचा जन्‍म झाला. आजोबांचे नाव शंभुराव भावे. शंभुराव भावे यांचे जन्मगाव वाई. त्यांच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य वाई येथे होते. वाईच्या ब्राम्हणशाही या मोहल्ल्यात कोटेश्वर मंदिर आहे. हे भावे यांच्या मालकीचे असून तेथे शंभुरावांनी अग्‍निहोत्र स्वीकारून अग्‍निहोत्र शाळा स्थापली होती. आजोबा आणि मातुश्रींपासून धर्मपरायणतेचे संस्कार विनोबांना मिळाले. त्यांचे वडील नरहरी शंभुराव भावे व आई रखुमाबाई. वडील नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेले. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. १९१६ साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस जाण्यास निघाले; परंतु वाटेतच सुरतेस उतरून आईवडिलांना न कळविताच वाराणसी येथे रवाना झाले. त्यांना दोन गोष्टींचे आकर्षण होते. एक हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक, वाराणसी येथे हिंदु विश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधीचे भाषण झाले. त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. हिमालयातील अध्यात्‍म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधीच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्त्वात त्यांना आढळल्या. त्यांनी महात्मा गांधींशी पत्रव्यवहार केला व गांधींची कोचरब आश्रमात ७ जून १९१६ रोजी भेट घेतली आणि तेथेच त्या सत्याग्रहश्रमात नैष्ठिक ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवनसाधना सुरू केली. ऑक्टोबर १९१६ रोजी महात्मा गांधींची एक वर्षांची रजा घेऊन ते वाई येथे प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताच्या अध्ययनाकरिता उपस्थित झाले. ब्रह्यविद्येची साधना त्यांचा जीवनोद्देश होता.

जीवन कार्य
🇮🇳 स्वातंत्र्य लढा
                     महात्मा गांधींसोबत
ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींसोबत होते. स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल सन १९३२ मध्ये त्यांना तुरुंगवास घडला.

🔮 सामाजिक व धार्मिक कार्य
            वाई येथील प्राज्ञपाठशाळा मंडळाचे संस्थापक व मुख्याध्यापक स्वामी केवलानंद सरस्वती (पूर्वाश्रमीचे नारायणशास्त्री मराठे) यांच्यापाशी विनोबांनी उपनिषदे, ब्रह्मसूत्र शांकरभाष्य, पांतजलयोगसूत्रे इ. विषयांचे अध्ययन केले. माहुली येथील स्वामी कृष्णानंद यांच्या आश्रमातील काही प्रौढ विद्यार्थी-शिवनामे, वि. का. सहस्रबुद्धे इत्यादी मंडळीही त्यांच्याबरोबर सहाध्यायी होती. दिनकरशास्त्री कानडे व महादेवशास्त्री दिवेकर हे प्राज्ञपाठशाळेची व्यवस्थापनाची व अन्य प्रकारची कामे पाहत होते. प्रत्येक सोमवार हा या पाठशाळेचा सुटीचा म्हणजे अनध्ययनाचा दिवस असे. त्या दिवशी पाठशाळेची अंगमेहनतीची कामे शिक्षक-विद्यार्थी उरकत असत आणि प्रज्ञानंदस्वामींच्या समाधिस्थानाच्या सभागृहात विद्यार्थी व शिक्षक यांच्या शास्त्रार्थ चर्चेकरता साप्ताहिक सभा भरत. चर्चेचे विषय सामाजिक, धार्मिक, तात्‍त्‍विक हे असतच; परंतु त्याबरोबर प्रचलित राजकारणाची अनेक बाजूंनी मीमांसाही चालत असे. दिनकरशास्त्री कानडे हे सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगी अरविंद घोष इत्यादी सशस्त्र क्रांतीकारकांच्या मार्गाने चालणाऱ्या एका गुप्त कटाचे सदस्य होते. सशस्त्र क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचा ते पुरस्कार करीत. विनोबांच्याप्रमाणेच त्यांचेही वक्‍तृत्व अमोघ होते. अहिंसक क्रांताची वैचारिक भूमिका विनोबा मोठ्या परिणामकारक रीतीने या साप्ताहिक सभांमध्ये मांडीत असत. १९१७ साली हिवाळ्यात वाई येथे प्लेगची साथ उद्‍‌भवली. कृष्णेच्या दक्षिण तीरावर राहुट्या आणि पर्णशाला उभारून त्यांत प्राज्ञपाठशाळेचे विद्यार्थी व शिक्षक जवळजवळ ४ महिने राहिले. वेदान्ताचे व इतर शास्त्रांचे पाठ त्यांतील एका विस्तृत पर्णशालेमध्ये चालत असत. विनोबा पर्णशालेबाहेरच्या कृष्णाकाठच्या आम्रवृक्षाच्या छायेखाली उपनिषदांचे व शांकरभाष्याचे उच्च स्वरात वाचन करीत, हळूहळू सावकाश फेऱ्या मारीत असत. त्यांचे ते प्रसन्न वाचन ऐकून स्वामी केवलनंदांच्या मनावर विनोबाजींच्या व्यक्तिमत्त्वाची खूप खोल छाप पडली, विनोबांनी वेदान्ताविषयामध्ये खूप वेगाने १० महिन्यांत प्रगती केली. आपण कोणकोणत्या ग्रंथांचे व विषयांचे अध्ययन केले याचा सविस्तर वृतान्त त्यांनी महात्मा गांधींना कळवला. गांधीं हे वृत्तान्तपत्र वाचून अत्यंत विस्मित झाले. त्या पत्राच्या उत्तरात म. गांधींनी अखेर म्हटले की, " ए गोरख, तूने मच्छिंदरको भी जीत लिया है !".

                    विनोबा वाईहून परत अहमदाबादला फेब्रुवारी १९१८ मध्ये परतले. १९१८ साली एन्फ्ल्यूएंझाची साथ देशभर पसरली. लक्षावधी लोक त्या साथीला बळी पडले. त्यात विनोबांचे वडील, मातुश्री आणि सगळ्यात धाकटा भाऊ दत्तात्रय हे आजारी पडले. ही गोष्ट महात्मा गांधीना कळल्यावर त्यांनी विनोबांना मातुश्रींच्या शुश्रूषेकरता बडोद्यास जाण्याचा आग्रह धरला. विनोबा तयार नव्हते. गांधीनी त्यांचे मन वळवले. आई आणि धाकटा भाऊ या रोगाला बळी पडले. वडील बरे झाले. विनोबा सर्वांत ज्येष्ठ पुत्र, म्हणून आईचा अंत्यविधी त्यांनीच करणे प्राप्त होते. पुरोहिताकडून अंत्यविधीचा संस्कार करवून घेणे विनोबांना मान्य नव्हते. म्हणून ते स्मशानात गेले नाहीत. वडिलांनी पद्धतीप्रमाणे अंत्यविधी उरकून घेतला.

१९२१ साली गांधींचे भक्त शेठ जमनालाल बजाज यांनी साबरमतीच्या सत्याग्रह आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. त्या शाखेचे संचालक म्हणून महात्मा गांधीनी विनोबांची रवानगी वर्ध्यास केली. ८ एप्रिल १९२१ रोजी विनोबा वर्ध्याला पोहोचले. आतापर्यंत संबंध आयुष्य -१९५१ ते ७३ पर्यंतची भूदानयात्रा सोडल्यास या वर्ध्याच्या आश्रमातच राहून विनोबांनी तपश्चर्या करीत जीवन घालविले. हा वर्ध्याचा आश्रम क्रमाने मगनवाडी, बजाजवाडी, महिलाश्रम, सेवाग्राम व पवनार ह्या ठिकाणी फिरत राहिला. ही सर्व ठिकाणे वर्ध्याच्या ८ किमी. परिसरातच आहेत. दिवसातले सात-आठ तास सूत कातणे, विणणे आणि शेतकाम यांमध्ये त्यांनी घालविले. रोज नेमाने शरीरश्रम प्रत्येक माणसाने करावे, असा त्यांचा सिद्धान्त होता. 'शरीरश्रमनिष्ठा' हे त्यांच्या जीवन-तत्त्वज्ञानाप्रमाणे महत्त्वाचे व्रत होते. शरीरश्रमांबरोबरच त्यांनी मानसिक, आधात्मिक साधनाही प्रखरतेने केली. १९३० व ३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी कारागृहवास भोगला. १९४० साली महात्मा गांधीनी स्वराज्याकरिता वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन आरंभले. त्यात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. जवाहरलाल नेहरू हे दुसरे निवडले. आध्यात्मिक साधनेला वाहून घेतलला शत्रुमित्रसमभावी तपस्वी मनुष्य सत्याग्रहाला अत्यंत आवश्यक, म्हणून त्यांनी विनोबांची निवड केली. कारण सत्याग्रह हे शत्रूच्या हृदयपरिवर्तनाचे नैतिक शुद्ध साधन होत, अशी महत्मा गांधीची मूलभूत राजकीय भूमिका होती. उच्चतम आध्यात्मिक जीवनसाधनेस वाहिलेला शत्रुमित्रभाव विसरलेला माणूसच असे हृदय-परिवर्तन करू शकतो, अशी गांधींची धारणा होती. २० ऑक्टोबर १९४० रोजी स्वसंपादित हरिजन साप्ताहिकात गांधींनी आपल्या या शिष्याची ओळख करून दिली आहे.

१९३२ सालच्या सविनय कायदेभंगाच्या सामुदायिक आंदोलनात विनोबांनी भाग घेतला. त्यांनी धुळे कारागृहामध्ये शिक्षा भोगली. सुप्रसिद्ध गीताप्रवचने या कारागृहात त्यांनी दिली. शंभरापेक्षा अधिक सत्याग्रही कैदी आणि इतर गुन्ह्यांसाठी शिक्षा झालेले कैदी या प्रवचनांच्या रविवारच्या सभेत उपस्थित असत. त्यांमध्ये शेठ जमनालाल वजाज, गुलजारीलाल नंदा, अण्णासाहेब दास्ताने, साने गुरूजी इ. मंडळी उपस्थित असत.

या प्रवचनांचा मुख्य दृष्टिकोन 'गीता ही साक्षात भगवंताची उक्ति होय', असा होता. त्या उक्तीला पूर्ण प्रमाण मानूनच, त्यासंबंधी कसलीही साधकबाधक चर्चा न करताच त्यांनी ती १८ प्रवचने दिली. लो. टिळकांच्या गीतारहस्याचा मुख्य दृष्टिकोन त्यांनी मानला नाही. आद्य शंकराचार्याचाच मुख्य दृष्टिकोन मान्य केला, असे दिसून येते. मोहनिरास म्हणजे अज्ञाननाश हे गीतेचे मुख्य उद्दिष्ट त्यांनी मानले. अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करणे हा उद्देश गृहीत धरून केलेला कर्मयोगाचाच उपदेश गीतेत आहे, हा टिळकांचा दृष्टिकोन विनोबांनी स्वीकारली नाही. विनोबांनी निष्काम कर्मयोग मान्य केला; परंतु युद्धोपदेशाकडे कानाडोळा केला. महात्मा गांधींच्या मताने गीतेमध्ये युद्धाचा आदेश हा भौतिक सशस्त्र युद्धाचा आदेश नाही. मानवी हृदयात चाललेल्या सद्‍भावना व असद्‍भावना यांच्या संघर्षाला काव्यमय बनवण्साठी योजलेले मानवी सशस्त्र युद्धाचे कविकल्पित रूपक गीतेने योजिलेले आहे; महाभारत हा इतिहासग्रंथ नाही म्हणून त्यातील योद्धे आणि युद्धात गुंतलेले शत्रुमित्रपक्ष हे केवळ कविकल्पित होत; असे महत्मा गांधी अनासक्ति योग या पुस्तकात प्रतिपादितात. विनोबा आणि गांधी हे दोघेही निरपवाद अहिंसा तत्त्वाचे पुरस्कर्ते. भगवद्‍गीता वाचत असताना विनोबा भगवद्‍गीता हा युद्धोपदेश नाही असे सांगतात आणि महत्मा. गांधी ते आध्यात्मिक भावनांचे युद्ध होय, असे सांगतात. हा युद्धाचा मुद्दा सोडला, तर सगळ्या एकेश्वरवादी धार्मिकांना प्रेरणा देणारे अत्युच्च जीवनविषयक व विश्वविषयक तत्त्वज्ञान अतिशय सुंदर रीतीने गीतेमध्ये सांगितले असल्यामुळे गीता हा हिंदूंनाच नव्हे तर जगातील अध्यात्मवाद्यांना मोहून टाकणारा ग्रंथ आहे, यात शंका नाही. म्हणूनच, गीता जरी सशस्त्र हिंसात्मक युद्धाचा पुरस्कार करत असली, तरी गांधींना आणि विनोबांना या गीतेने कायम मोहून टाकले आहे. म्हणून गांधींनी आणि विनोबांनी जन्मभर सकाळ-संध्याकाळ चालविलेल्या प्रार्थनासंगीतात भगवद्‍गीता ही कायमची अंतर्भूत केली होती.

वैयक्तिक सत्याग्रहानंतर ७ मार्च १९५१ पर्यंत पवनार येथील परंधाम आश्रमातच विनोबांनी शारीरिक आणि मानसिक तपश्चर्येत जीवन व्यतीत केले. १९३६ पासून म. गांधी साबरमतीचा आश्रम सोडून सेवाग्रामला म्हणजे पवनारजवळच येऊन राहिले. त्यामुळे गांधी आणि विनोबा यांचा चिरकाल संवाद चालू राहिला. गांधीच्या देहान्तानंतर सर्वसेवासंघ व सर्वोदय समाज या संस्थांची स्थापना झाली. मार्च १९४८ मध्ये विनोबा दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू यांच्या विनंतीवरून गेले. भारत-पाक फाळणी झाल्यानंतर परागंदा झालेले लक्षावधी शरणार्थी (सर्व बाजूंनी जीवन उद्‍ध्वस्त झालेले) दिल्ली, पंजाब, राजस्थान यांमध्ये आले. त्यांना धीर देण्याकरता विनोबांना पंडितजींनी बोलावून घेतले. या दौऱ्यात सर्वधर्मसमभावाचा आदेश देऊन प्रेम आणि सद्‍भावना निर्माण करण्याचा प्रयत्‍न विनोबांनी केला.

दिनांक १५ नोव्हेंबर १९८२ रोजी सकाळी ९.४० वाजता पवनार येथे परंधाम आश्रमात सतत सात दिवस प्रायोपवेशन करून भूदाननेते आचार्य विनोबा भावे यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी प्राणत्याग केला. त्यांच्या निधनाची वार्ता त्यांनी प्रायोपवेशन सुरू केल्यानंतर केव्हाही अपेक्षित होती. ५ नोव्हेंबर रोजी विनोबांना ताप आला, त्याबरोबरच हृदयविकारही उद्‍भवला आणि प्रकृती चिंताजनक झाली. उपचार त्वरित सुरू झाले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्‍णालयात उपचार करण्याकरता नेण्याचा विचार तज्‍ज्ञ डॉक्‍टरांनी विनोबांना सांगितला; परंतु त्यांनी परंधाम आश्रम सोडण्यास नकार दिला व तेथेच उपचार सुरू झाले. मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलचे तज्‍ज्ञ डॉ. मेहता मुंबईहून आले. हळूहळू प्रकृती सुधारेल अशी आशा उत्पन्न झाली. अ‍ॅलोपथीचे उपचारही विनोबांनी स्वीकारले, परंतु ८ नोव्हेंबर रोजी रात्री अन्नपाणी आणि औषधे या तिन्ही गोष्टी घेण्यास त्यांनी नकार दिला. आचार्यांचे बंधू शिवाजीराव भावे, मित्र दादा धर्माधिकारी इत्यादी मंडळींनी व आश्रमस्थ भक्तजनांनी आचार्यांना परोपरीने काकुळतीस येऊन, अन्नपाणी व औषधे घेण्याची विनंती केली. ती त्यांनी नाकारली. इंदिरा गांधी विनोबाजींना १० नोव्हेंबर रोजी भेटल्या. अन्नपाणी, औषधे घेण्याची विनंती त्यांनीही केली. प्रायोपवेशनाचा संकल्प करण्याचे कारण आचार्यांनी श्री. त्र्यं. गो. देशमुख व इतर भक्तांना स्पष्ट करून सांगितले. ते म्हणाले- " आता देह आत्म्याला साथ देत नाही. रखडत जगण्यात अर्थ नाही. जराजर्जर शरीर टाकणेच ठीक !"

🏛️ विनोबांची समाधी, परंधाम आश्रम, पवनार, वर्धा
                 आचार्यांच्या निधनाची वार्ता भारतभर व जगभर सर्व प्रचारमाध्यमांतून विद्युतवेगाने पसरली. या निधनाला कोणी महानिर्वाण म्‍हणाले, कोणी युगपुरुषाची समाधी म्‍हणाले. महात्‍मा गांधींच्या आध्यात्मिक परंपरेचे ते एक श्रेष्ठ वारस होते. त्यांचे हे प्रायोपवेशनाचे तंत्र हिंदू धर्म, बौद्ध व विशेषतः जैन धर्म या तिन्ही धर्मांना प्राचीन कालापासून मान्य असलेले तंत्र आहे. जैन धर्मात या तंत्रास 'सल्लेखना' अशी संस्कृत संज्ञा आणि 'संथारा' ही प्राकृत संज्ञा आहे. हिंदु धर्मात यास 'प्रायोपवेशन' म्हणतात. प्राय म्हणजे तप. तपाचा एक मुख्य अर्थ ' अनशन ' असा आहे. देहाचे दुर्घर व्याधी बरे होऊ शकत नाहीत, असे निश्चित झाल्यावर रूग्णाला जलप्रवेशाने, अग्‍निप्रवेशाने, भृगुपतनाने (उंच कड्यावरून उडी मारून), अनशनाने (अन्नपाणी वर्ज्य करून) किंवा अन्य कोणत्याही इष्ट मार्गाने देहविसर्जन करण्याची हिंदुधर्मशास्त्राने अनुमती दिली आहे. ज्ञानदेवादी संतांनी योगमार्गाने देहत्याग केला आहे. हा योगमार्ग गुरूगम्यच आहे. त्याचे वर्णन गीतेच्या आठव्या अध्यायात केले आहे. तात्पर्य, प्रायोपवेशन किंवा योगशास्त्रातील देहत्यागाची युक्ती हिंदुधर्मशास्त्राने मान्य केली आहे. विनोबांनी प्रायोपवेशनाच्या द्वारे देहत्याग केला. अनेक जैन साधू आणि साध्वी स्त्रिया आजही प्रतिवर्षी अशा प्रकारे देहत्याग करीत असतात आणि त्याची वार्ता वृत्तपत्रांतही केव्हा केव्हा येते. स्वातंत्र्यवीर सावरकर, धर्मानंद कोसंबी यांनी अशाच प्रकारे देहत्याग केला आहे.

विनोबांचे विचार
१) वर्तमानाला बंधन असावे म्हणजे वृत्ति मोकळी राहते. २) सत्य, संयम, सेवा ही पारमार्थिक जीवनाची त्रिसूत्री आहे . [१] ३) आध्यात्मिक व्यवहार म्हणजे स्वाभाविक व्यवहार म्हणजे शुद्ध व्यवहार . ४) हिंदुधर्माचे स्वरूप : आचार-सहिष्णुता, विचारस्वातंत्र्य, नीति- धर्माविषयी दृढता. ५) प्राप्तांची सेवा, संतांची सेवा, द्वेष कर्त्याची सेवा ही सर्वोत्तम सेवा. ६) असत्यात शक्ति नाही. आपल्या अस्तित्वासाठी हि त्याला सत्याचा आश्रय घेणे भाग आहे. ७) सत्य , संयम, सेवा ही पारमार्थिक जीवनाची त्रिसूत्री आहे. ८) ईश्वर, गुरु ,आत्मा, धर्म, आणि संत ही पाच पूजास्थाने . ९) इतिहास म्हणजे अनदिकालापासून आत्तापर्यंत चे सर्व जीवन. पुराण म्हणजे अनदिकालापासून आत्तापर्यंत टिकलेला अनुभवाचा अमर अंश.

🗽 विनोबांचे स्मारक
          विनोबांसह नरहर कुरुंदकर, वसंतदादा पटील, बालगंधर्व, जी.डी. बापू लाड, नागनाथ‍अण्णा नायकवाडी, बाळासाहेब देसाई (सातारा), भाई सावंत, बाळासाहेब सावंत (रत्‍नागिरी), चिंतामणराव देशमुख, संताजी घोरपडे, मारोतराव कन्नमवार, आदी व्यक्तीची स्मारके उभारण्याचे महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने ठरवले होते, पण यांतील एकही स्मारक पूर्णत्वास गेले नाही.

📙✍️ पुस्तके
अष्टादशी (सार्थ)
ईशावास्यवृत्ति
उपनिषदांचा अभ्यास
गीताई
गीताई-चिंतनिका
गीता प्रवचने
गुरुबोध सार (सार्थ)
जीवनदृष्टी
भागवत धर्म-सार
मधुकर
मनुशासनम्‌ (निवडक मनुस्मृती - मराठी)
लोकनीती
विचार पोथी
साम्यसूत्र वृत्ति
साम्यसूत्रे
स्थितप्रज्ञ-दर्शन
📚 चरित्रग्रंथ
आमचे विनोबा (राम शेवाळकर आणि इतर)
गांधी, विनोबा आणि जयप्रकाश (मिलिंद बोकील)
दर्शन विनोबांचे (राम शेवाळकर)
ब्रह्मर्षी विनोबा (बालसाहित्य, लेखक - विठ्ठल लांजेवार)
महर्षी विनोवा (राम शेवाळकर)
महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार विनोबा भावे (लेखक : किसन चोपडे.) (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)
विनोबांचे धर्मसंकीर्तन (राम शेवाळकर आणि इतर))
विनोबासारस्वत (राम शेवाळकर आणि इतर)
साम्ययोगी विनोबा (राम शेवाळकर)
          🇮🇳  जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌷🙏
         ♾♾♾  ♾♾♾
          स्त्रोत - WikipediA                                ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

आद्यक्रांतिकारक लहुजी साळवे

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
  🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳

          ▬ ❚❂❚❂❚ ▬

संकलन ~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 
➿➿➿➿➿➿➿➿➿
💥🏇🤺🇮🇳👳‍♀️🇮🇳🏇🤺💥
  
              आद्यक्रांतिकारक
                     धर्मवीर 
            लहुजी साळवे वस्ताद


      जन्म : १४ नोव्हेंबर १७९४                                                  
 (पेठ, पुरंदर जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत)
      मृत्यू : १७ फेब्रुवारी १८८१
            (पुणे, महाराष्ट्र, भारत)

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना : हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, नौजवान भारत सभा
प्रभावित : ज्योतिबा फुले, बळवंत फडके, बाळ गंगाधर टिळक, उमाजी नाईक इ.
वडील : राघोजी साळवे
आई : विठाबाई
पत्नी : ब्रम्हचारी

लहु राघोजी साळवे  हे भारतीय क्रांतिकारक होते. ते लहुजी वस्ताद नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका मातंग कुटुंबात झाला. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडून मिळाले होते. लहूजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. लहूजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराकर्मी पुरुष होते, युद्ध कलेमध्ये त्यांचा कोणीही हात धरत नसे. त वाघाबरोबर लढाई करण्याच्या पराक्रमामुळे लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे त्याकाळी प्रसिद्ध होते. एखदा राघोजी साळवे यांनी वाघाबरोबर युद्ध करून जिवंत वाघाला खांद्यावर घेऊन पेशव्यांच्या राजदरबारी सादर केले होते व आपल्या प्रचंड शक्तीचे प्रदर्शन केले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. साळवे घराने सशस्त्र विद्येमध्ये निपुण व तरबेज होते त्यामुळे, शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात साळवे घराण्याची योग्यता ओळखून पुरंदरकिल्ल्याच्या सरंक्षणाची जबाबदारी लहुजी साळवे यांचे आजोबा यांच्याकडे सोपवली होती. पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणासाठी साळवे घराण्यातील अनेक वीर पुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना 'राऊत ' या पदवीने गौरविले होते.

पुढे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व २३ वर्षे वयाच्या लहुजी यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. लहुजीं चे वडील राघोजी साळवे वाऱ्याच्या वेगाप्रमाणे शत्रू वर तुटून पडले होते व सपासप तलवारीचे वार करत शत्रुंना जमिनीवर लोळवत होते. अखेर या संकटातुन बाहेर पडण्यासाठी घाबरलेल्या इंग्रजांनी एकत्र वार करून राघोजींना संपवले.

राघोजी या युद्धात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. पुढे इ.स. १८१८मध्ये मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज शनिवारवाड्यावरून हटवून तेथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.

या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरले. आपल्या वडिलांना आपल्या डोळ्या समोरच शहीद झालेले पाहून लहूजींच्या तळपायाची आग मस्तकात गेली व भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणीच लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी उभारली. ही समाधी अजूनही पुणे-शिवाजीनगर जवळच्या ‘वाकडेवाडी’ येथे आहे.

दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्ध कले मध्ये लहुजी निपुण होते लहुजींचे पिळदार शरीर व त्यांची भरलेली छाती पाहून शत्रूला सुद्धा घाम फुटत असे. जीवघेण्या शस्त्रां बरोबर ते अगदी एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळत असतं. आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कला कौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.

२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका  समाधी संगमवाडी (पुणे) येथे आहे.

इ.स. १८४८ साली लहुजींच्या तालमीत सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भरत होती.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या ११वीच्या पुस्तकामध्ये वीर वस्ताद लहुजी साळवे यांचा जन्म इ.स.१८०० मध्ये झाल्याचे नमुद आहे. उपमा -धर्मवीर लहुजी वस्ताद, आद्य क्रांतीकारक लहुजी वस्ताद
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
        ♾️♾️♾️ ♾️♾️♾️
          स्त्रोत ~ WikipediA                                                               ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

पंडीत जवाहरलाल नेहरू

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️

       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬

संकलन ~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 
                                                  
      🌹🎓⛓️🇮🇳👨🏻‍🦱🇮🇳⛓️🎓🌹
     
        पंडित जवाहरलाल नेहरू
        (भारताचे पहिले पंतप्रधान)


    जन्म : 14 नोव्हेंबर 1889
        इलाहाबाद (उत्तर प्रदेश)
    मृत्यु : 27 मे 1964
               (नवी दिल्ली)

पुर्ण नाव: जवाहरलाल मोतीलाल नेहरू
वडिल : मोतीलाल नेहरू
आई : स्वरूपरानी नेहरु
पत्नी : कमला नेहरू
मुलगी : श्रीमती इंदिरा गांधीजी
शिक्षण : 1910 मधे केंब्रिज                  विश्वविद्यालयाच्या ट्रिनटी काॅलेज मधुन पदवी प्राप्त केली, 1912 ला ’इनर टेंपल’ या लंडन च्या काॅलेज मधुन बॅरिस्टर ची पदवी प्राप्त केली.

पुरस्कार : भारतरत्न (1955)

प्रधानमंत्री पदाचा कार्यकाळ: स्वतंत्र भारताचे पंतप्रधान (15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964)

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जिवन परिचय
         “अपयश तेव्हांच पदरी पडतं जेव्हां आपण आपले आदर्श, उद्देश आणि सिध्दांत विसरतो’’

पं. जवाहरलाल नेहरू हे आदर्शवादी आणि सिध्दांतिक प्रतिमेचे महानायक होते ते म्हणायचे जी व्यक्ती आपले उद्देश, सिध्दांत आणि आदर्श विसरते ती कधीही यशस्वी होत नाही.
            पंडित जवाहर लाल नेहरू एक असे राजनेता होते ज्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव प्रत्येकाच्या जीवनावर पाडला आहे. इतकेच नाही तर ते एक समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकतांत्रिक गणतंत्राचे गणितज्ञ देखील मानले जातात.
      पं. नेहरूंना आधुनिक भारताचे शिल्पकार देखील म्हंटल्या जाते. त्यांना लहान मुलांबद्दल अतिशय प्रेम होते आणि त्यामुळे लहान मुलं त्यांना चाचा नेहरू म्हणत असत. म्हणुन त्यांच्या जन्मदिनाला “बालदिवस” Children’s Day च्या रूपात साजरे केले जाते. ते म्हणत

“देशाच्या सेवेत नागरिकत्व आहे”

या विचाराच्या बळावरच त्यांना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा बहुमान प्राप्त झाला. ते आदर्शवादी आणि महान स्वातंत्र्य सेनानी होते, त्यांनी गुलाम भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता महात्मा गांधीना साथ दिली होती.
पं. नेहरूंमधे देशभक्तीची भावना सुरूवातीपासुनच होती आणि त्यांच्या जीवनाकडुन अनेक बाबी शिकायला मिळतात ते सर्वांनकरता एक प्रेरणास्त्रोत आहेत.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे प्राथमिक जीवन
      महान लेखक, विचारक आणि कुशल राजनेता पं. जवाहरलाल नेहरू कश्मीरी ब्राम्हण परिवारात 14 नोव्हेंबर 1889 ला अलाहाबाद येथे जन्माला आले. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित मोतिलाल नेहरू असे होते ते प्रसिध्द बॅरिस्टर आणि समाजसेवक होते त्यांच्या आईचे नाव श्रीमती स्वरूप रानी होते, त्या कश्मीरी ब्राम्हण परिवारातील होत्या.
पं. नेहरू हे तिघे बहीण.भाऊ होते, नेहरूजी सर्वात मोठे होते त्यांच्या मोठया बहिणीचे नाव विजया लक्ष्मी (या पुढे संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या) त्यांच्या लहान बहिणीचे नाव कृष्णा हठिसिंग असे होते (या एक उत्तम आणि प्रभावशाली लेखिका होत्या).
त्यांनी आपले भाऊ पं. नेहरू यांच्या जिवनावर प्रकाश टाकत अनेक पुस्तकं लिहीली होती.
जन्मतः नेहरूजी कुशाग्र बुध्दीमत्तेचे आणि ओजस्वी व्यक्तिमत्वाचे होते ते ज्यालाही भेटत ती व्यक्ती नेहरूजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होत असे. या कारणांमुळेच मोठेपणी ते एक कुशल राजकारणी, आदर्शवादी, विचारक आणि महान लेखक झालेत. त्यांचे कौटुंबिक मुळ कश्मीरी पंडित समुदायाशी जोडले असल्याने त्यांना पंडित नेहरू या नावाने ओळखल्या जायचे.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आरंभिक शिक्षण
        त्यांचे प्रारंभिक शिक्षण घरीच झाले आणि पुढे 1890 ला पंडित नेहरूंनी जगभरातील प्रसिध्द शाळा आणि विश्वविद्यालयांमधुन शिक्षण प्राप्त केले. वयाच्या 15 व्या वर्षी 1905 ला नेहरूंना इंग्लंड येथील हॅरो स्कुल मध्ये शिक्षणाकरता पाठवण्यात आले.

लाॅ (वकीली) चे शिक्षण
                    2 वर्षांपर्यंत हैरो येथे राहिल्यानंतर पं. जवाहरलाल नेहरूंनी लंडन येथील ट्रिनिटी काॅलेज मधुन लाॅ ला प्रवेश घेतला त्यानंतर त्यांनी कैम्ब्रिज विश्वविद्यालयातुन न्याय शास्त्रातील शिक्षण पुर्ण केले.
कॅम्ब्रिज सोडल्यानंतर लंडनच्या इनर टेंपल येथे 2 वर्ष पुर्ण केल्यानंतर त्यांनी वकिलीचे शिक्षण पुर्ण केले. 7 वर्ष इंग्लंड ला राहुन पं. नेहरूंनी फैबियन समाजवाद आणि आयरिश राष्ट्रवाद याची देखील माहिती घेतली. 1912 ला ते भारतात परतले आणि वकिली सुरू केली.

पं. नेहरू यांचा विवाह आणि कन्या इंदिरा गांधीचा जन्म
              भारतात परतल्यानंतर 4 वर्षांनी 1916 ला पं. जवाहरलाल नेहरू यांचा विवाह कमला कौर यांच्याशी झाला. त्या दिल्लीत वसलेल्या कश्मीरी परिवारातील होत्या.
                1917 ला त्यांनी इंदिरा प्रियदर्शिनी ला जन्म दिला ज्या भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री झाल्या. त्यांना आपण इंदिरा गांधी या नावाने परिचीत आहोत.

महात्मा गांधीजींच्या संपर्कात आले पंडित नेहरू (राजकारणात प्रवेश)
            जवाहरलाल नेहरू 1917 ला होमरूल चळवळ  मधे सहभागी झाले त्याच्या 2 वर्षांनंतर 1919 ला त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला आणि तेव्हांच त्यांचा महात्मा गांधीसोबत परिचय झाला.
हा तो काळ होता जेव्हां महात्मा गांधींनी रौलेट अधिनियम – Rowlatt Act विरोधात एक मोहिम सुरू केली होती. पं. नेहरू महात्मा गांधीच्या शांतीपुर्ण सविनय कायदेभंग आंदोलनाने फार प्रभावित झाले.
पं. नेहरू महात्मा गांधींना आपला आदर्श मानु लागले, इथपर्यंत की त्यांनी विदेशी वस्तुंचा त्याग केला आणि खादी ला वापरू लागले. त्यानंतर 1920-22 मधल्या गांधीजींच्या असहकार आंदोलनाला पाठिंबा दिला. त्या दरम्यान त्यांना अटक देखील झाली होती.

संपुर्ण स्वराज्याची मागणी (राजनैतिक जीवन)
              पं. जवाहरलाल नेहरूंनी 1926 ते 1928 पर्यंत अखिल भारतीय काॅंग्रेस समितीची महासचिव म्हणुन देखील सेवा केली आहे. काॅंग्रेस च्या वार्षिक सत्राचे आयोजन 1928-29 ला करण्यात आले त्याचे अध्यक्ष त्यांचे वडिल मोतिलाल नेहरू हे होते.
त्या सत्रा दरम्यान पंडित नेहरू आणि सुभाष चंद्र बोस यांनी पुर्ण राजकिय स्वातंत्र्याच्या मागणीचे समर्थन केले होते आणि तेव्हांच मोतीलाल नेहरू आणि अन्य नेता ब्रिटिश शासनाच्या अखत्यारीतच संपन्न राज्याची ईच्छा धरून होते. 1929 ला डिसेंबर मधे लाहौर येथे काॅंग्रेसच्या वार्षिक अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं.
यात पं. जवाहरलाल नेहरूंची काॅंग्रेस पार्टीचे अध्यक्ष म्हणुन निवड झाली. या सत्रातच एक प्रस्ताव देखील पास करण्यात आला ज्यात ’पुर्ण स्वराज्याची’ मागणी करण्यात आली.

26 जानेवारी 1930 (राजनितीक प्रवासातील संघर्ष)
               26 जानेवारी 1930 ला लाहौर इथं पं. जवाहरलाल नेहरूंनी स्वतंत्र भारताचा झेंडा फडकवला. या दरम्यान महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगांच्या आंदोलनाची सुरूवात केली होती. या आंदोलनाला यश मिळालं सोबतच या शांतीपुर्ण आंदोलनाने ब्रिटिश शासनाला राजकारणात परिवर्तन आणण्यास भाग पाडलं.
आता पर्यंत नेहरूजींना राजकारणाचे चांगलेच ज्ञान प्राप्त झाले होते शिवाय त्या विषयावर त्यांची पकड देखील मजबुत झाली होती. या नंतर 1936-37 ला जवाहरलाल नेहरू यांना काॅंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवडण्यात आले. इतकेच नाही तर 1942 ला त्यांना महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलना दरम्यान अटक झाली होती आणि 1945 रोजी त्यांची कैदेतुन सुटका करण्यात आली. पं. नेहरूंनी पारतंत्र्यात असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता आपले महत्वपुर्ण योगदान दिले. 1947 मधे भारताला स्वातंत्र्य मिळतांना इंग्रज सरकार सोबत झालेल्या चर्चेदरम्यान महत्वाची भुमिका बजावली. यामुळे देशवासियांसमोर त्यांची वेगळी छाप पडत गेली आणि भारतिय त्यांना आपला आदर्श मानु लागले.
पंडित नेहरू महात्मा गांधींच्या निकटतम होते असं म्हंटलं जातं की पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधींच्या फार जवळचे मित्र होते दोघांचे कौटुंबिक संबंध देखील मजबुत होते. महात्मा गांधींच्या सांगण्यानुसारच पं. नेहरूंना प्रधानमंत्री करण्यात आले होते.
         नेहरूजी देखील गांधीजींच्या विचारांनी फार प्रभावित होते. पंडित नेहरूंना गांधीजींच्या शांततापुर्ण आंदोलनांनी नवी शिकवण आणि उर्जा मिळत असे आणि याच कारणामुळे ते त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी त्यांना साथ दिली. परंतु नेहरूजींचा राजकारणात आल्यानंतर धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन गांधीजींच्या धार्मिक आणि पारंपारिक दृष्टीकोनापेक्षा थोडा वेगळा होता.
प्रत्यक्षात गांधीजी प्राचीन भारताच्या गौरवावर जोर देत आणि नेहरू जी आधुनिक विचारधारेची कास धरणारे होते.

भारताचे पहिले प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू
            1947 साली जेंव्हा भारत स्वतंत्र झाला, देशवासी स्वतंत्र भारतात श्वास घेत होते त्याच वेळेला देशाच्या उज्वल भविष्याकरता लोकतांत्रिक व्यवस्था देखील तयार करायची होती.
            म्हणुनच देशात पहिल्यांदा प्रधानमंत्री पदाकरीता निवडणुक झाली ज्यात काॅंग्रेस च्या पंतप्रधान पदाकरीता निवडणुक घेण्यात आली. यामधे लोह पुरूष सरदार वल्लभभाई पटेल आणि आचार्य कृपलानी यांना जास्त मतं मिळाली होती. परंतु गांधीजींच्या सांगण्यावर पंडित जवाहरलाल नेहरूंना भारताचा पहिला प्रधानमंत्री बनवण्यात आले. त्यानंतर नेहरूजी सलग तीनदा पंतप्रधान पदावर विराजमान राहिले आणि भारताच्या प्रगतीकरता प्रयत्नरत सुध्दा राहिले. प्रधानमंत्री पदावर असतांना पंडित नेहरूंनी देशाच्या विकासाकरता अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले, त्यांनी मजबुत राष्ट्राचा पाया ठेवला, भारताला आर्थिक स्वरूपात सक्षम करण्यात महत्वाची भुमिका निभावली तव्दतच भारतात विज्ञान आणि प्रौद्योगिकी विकासाला प्रोत्साहन दिले.
       पं. नेहरू आधुनिक भारताच्या बाजुने होते म्हणुन त्यांनी नव्या विचारांच्या भारताकरता मजबुत पाया उभारला आणि शांततापुर्ण वातावरण व संघटन या करता निरपेक्ष आंदोलनाची रचना केली. सोबतच त्यांनी कोरिया युध्द, स्वेज नदी विवाद सोडवण्याकरता व कांगो करारात आपले महत्वपुर्ण योगदान दिले.

पं. जवाहरलाल नेहरूंना मिळालेले सर्वोच्च सन्मान
               नेहरूंनी देशवासियांच्या मनातुन जातियवादाची भावना संपवण्याकरता व गरीब लोकांना सहाय्य करण्याकरता जनतेला जागरूक केले आणि लोकतांत्रिक मुल्यांप्रती त्यांच्या मनात सन्मान निर्माण केला.
या व्यतिरीक्त त्यांनी संपत्तीच्या प्रकरणात विधवांना पुरूषांप्रमाणेच समान हक्क मिळवुन दिला अशी अनेक समाजउपयोगी कार्ये त्यांनी केली.
               पश्चिम बर्लिन, आॅस्ट्रिया आणि लाओस सारख्या अनेक विस्फोटक मुद्यांच्या समाधानात, कित्येक करारांमधे, युध्दांत त्यांचे महत्वपुर्ण योगदान राहिले आहे. त्यामुळे त्यांना 1955 साली भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लेखक स्वरूपात पं. जवाहरलाल नेहरू
                  पं. जवाहरलाल नेहरू एक चांगले राजकारणी आणि प्रभावशाली वक्ता तर होतेच शिवाय एक उत्तम लेखक देखील होते, त्यांचे लिखाण वाचकावर एक गडद प्रभाव पाडत असे. वाचक त्यांची पुस्तकं वाचण्याकरता फार उत्साही राहात. 1936 ला त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आले होते.

पं. जवाहरलाल नेहरूंची पुस्तकं
भारत और विश्व
सेवियत रूस
विश्व इतिहास की एक झलक
भारत की एकता और स्वतंत्रता
दुनिया के इतिहास का ओझरता दर्शन (1939)

डिस्कव्हरी ऑफ इंडिया
            (डिस्कव्हरी आॅफ इंडिया) हे पुस्तक नेहरूंनी 1944 ला एप्रील.सप्टेंबर दरम्यान अहमदनगर येथे जेल मधे असतांना लिहीले. या पुस्तकाचे लिखाण त्यांनी इंग्लिश भाषेत केले होते पुढे या पुस्तकाचा हिंदी सहीत अनेक भाषांमधे अनुवाद करण्यात आला.
           या पुस्तकात नेहरूंनी सिंधु सभ्यतेपासुन, भारताचे स्वातंत्र्य, भारतीय संस्कृती, धर्म आणि संघर्षाचे वर्णन केले आहे.

पं. जवाहरलाल नेहरूंचा मृत्यु
            चिन सोबतच्या संघर्षानंतर काही दिवसात नेहरूजींची प्रकृती बिघडली, त्यानंतर 27 मे 1964 ल ह्नदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
          पंडित नेहरू लहान मुलांवर फार प्रेम करायचे आणि तेवढेच ते आपल्या देशाप्रती देखील समर्पित होते.
                      जवाहरलाल नेहरू राजकारणातील असा चकाकता तारा होते की त्यांच्या अवतीभवती संपुर्ण राजकारण फिरत होते भारताचा पहिला पंतप्रधान बनुन त्यांनी भारताला गौरवान्वित केले आहे. सोबतच त्यांनी भारताचा मजबुत पाया निर्माण केला शांतता आणि संघटन याकरता निरपेक्ष आंदोलनाची रचना केली. स्वातंत्र्य संग्रामातील एक योध्दा म्हणुन त्यांना यश मिळालं, आधुनिक भारताच्या निर्माणाकरता त्यांचे योगदान अमुल्य आणि अभुतपुर्व असे होते.

पुर्व प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विचार
            देशाच्या सेवेत नागरिकत्व आहे. संस्कृती मन आणि आत्म्याचा विस्तार आहे.
अपयश तेव्हांच येतं जेव्हां आपण आपले आदर्श, उद्देश, आणि सिध्दांत विसरतो.
दुस-याला आलेल्या अनुभवाने स्वतःचा फायदा करून घेणारा बुध्दीमान असतो.
लोकतंत्र आणि समाजवाद ध्येय प्राप्त करण्याची साधनं आहेत.
लोकांच्यात असलेली कला त्यांच्या बुध्दीचा खरा आरसा असतात.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या खास गोष्टी
              पंडित नेहरूंना आधुनिक भारताचा शिल्पकार म्हंटल्या जाते.
नेहरूजींचा जन्मदिन 14 नोव्हेंबर ‘बाल दिवस’ म्हणुन साजरा केल्या जातो.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचे रस्ते, शाळा, युनिव्हर्सिटी आणि हाॅस्पिटल्स्
               पं. नेहरूंचा मृत्यु भारता करता मोठे नुकसान होते यामुळे भारतियांना अतिशय दुःख झाले कारण प्रत्येकावर त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप सोडली होती. ते लोकप्रीय राजनेता होते त्यांच्या योगदानाला आणि त्यांच्या त्यागाला कधीही विसरता येणार नाही. म्हणुन त्यांच्या स्मरणार्थ अनेक मार्ग, जवाहरलाल नेहरू शाळा, जवाहरलाल नेहरू टेक्नाॅलाॅजी युनिव्हर्सिटी, जवाहरलाल नेहरू कॅंसर हाॅस्पिटल बनविण्यास सुरूवात करण्यात आली.
त्यांचा मुख्य उद्देश त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळात लोकतांत्रिक परंपरांना मजबुत करणे, राष्ट्राच्या आणि संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेला स्थायीभाव मिळवुन देणे, योजनांच्या माध्यमातुन देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरळीत करणे हा होता.
या संकल्पांनी आणि उद्देशांनी त्यांना महान बनविले ते सर्वांकरता प्रेरणादायी आहेत.

*पं. जवाहरलाल नेहरू यांची थोडक्यात महत्वपुर्ण माहिती –*
               1912 मधे इंग्लंड येथुन परतल्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी आपल्या वडिलांचा ज्युनियर बनुन अलाहाबाद उच्च न्यायालयात वकीलीचा व्यवसाय सुरू केला.
1916 राजकारणात येण्याच्या उद्देशाने पंडित नेहरू गांधीजींना भेटले. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभागी व्हावे अशी त्यांची ईच्छा होती.
          1916 मधे त्यांनी डाॅ. अॅनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीत प्रवेश घेतला, पुढे 1918 ला ते या संघटनेचे सेक्रेटरी झाले शिवाय भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस च्या कार्यात देखील त्यांनी सहभाग घेतला.
1920 ला महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात नेहरूजी सहभागी झाले. यामुळे त्यांना सहा वर्षांची कैद झाली.
1922-23 नेहरूजी अलाहाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष निवडल्या गेले.
             1927 ला पं. नेहरू यांची सोव्हियत युनियन बरोबर भेट झाली. समाजवाद प्रयोगाने ते प्रभावित झाले आणि त्या विचारांकडे खेचले गेले.
                  1929 ला लाहौर इथं झालेल्या राष्ट्रिय काॅंग्रेस च्या ऐतिहासीक अधिवेशनाचे ते अध्यक्ष निवडल्या गेले. याच अधिवेशनात काॅंग्रेस ने संपुर्ण स्वातंत्र्याची मागणी लावुन धरली. या अधिवेशनानेच भारताला स्वतंत्र बनविण्याचा निर्णय घेतला. नंतर ‘संपुर्ण स्वातंत्र्याचा’ संकल्प पास करण्यात आला.
              हा निर्णय संपुर्ण भारतात पोहोचवण्याकरता 26 जानेवारी 1930 हा दिवस राष्ट्रीय सभेत ठरविण्यात आला. प्रत्येक गावांमधे मोठया सभांचे आयोजन करण्यात आले सामान्य जनांनी स्वातंत्र्या करता लढण्याच्या शपथा घेतल्या. म्हणुन 26 जानेवारी हा दिवस महत्वाचा मानला जातो.
       1930 ला महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले ज्याला पं. नेहरूंनी पाठिंबा देणे महत्वाचे मानले गेले.
1937 ला काॅंग्रेस ने प्राथमिक कायदे मंडळाची निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आणि भरपुर यश देखील मिळवले त्याच्या प्रचाराचा भार पं. नेहरूंच्या खांद्यावर होता.
                   1942 ला ’चले जाव' आंदोलनाला भारतिय स्वातंत्र्य संग्रामात विशेष दर्जा आहे. काॅंग्रेस ने हे आंदोलन सुरू करावयास हवे याकरता गांधीजींना तयार करण्यासाठी पं. नेहरू पुढे आले. त्यानंतर लगेच सरकारनं त्यांना कैद करून अहमदनगर जेल मधे टाकले तिथेच त्यांनी डिस्कव्हरी आॅफ इंडिया हा ग्रंथ लिहीला.
1946 ला स्थापीत झालेल्या अंतरिम सरकारने पंतप्रधान रूपात नेहरूंजींना निवडले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे ते पहिले प्रधानमंत्री झाले. मृत्यु पर्यंत ते या पदावर राहिले 1950 ला नेहरूजींनी नियोजन आयोगाची स्थापना केली.
पंडित जवाहरलाल नेहरू उर्फ चाचा नेहरू  यांनी आपल्या जीवनात कधीही हार मानली नाही. ते सतत भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता इंग्रजांशी लढत राहीले. एक यशस्वी आणि पराक्रमी नेता अशी त्यांची सर्वत्र ख्याती पसरली. ते नेहमी गांधीजींच्या आदर्शांवर चालत राहिले. त्यांचा नेहमी हा विचार होता की,
“अपयश तेव्हांच येतं जेव्हां आपण आपले आदर्श, उद्देश, आणि सिध्दांत विसरतो”

        🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
         ♾♾♾ ♾♾♾
स्त्रोत ~ majhimarathi.com
➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

वसंतदादा पाटील

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿

       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
            ▬ ❚❂❚❂❚ ▬
संकलन ~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 
   ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  
🤝🏭🏤🇮🇳👨🏻‍🦱🇮🇳🏤🏭🤝
        
वसंतराव दादा बंडूजी पाटील
     (सहकारातील योगदान)


जन्म : १३ नोव्हेंबर १९१७
    (पद्माळे, सांगली, महाराष्ट्र)
 मृत्यू : १ मार्च १९८९
                (मुंबई)
महाराष्ट्राचे ६ वे मुख्यमंत्री
          कार्यकाळ
१७ एप्रिल, इ.स. १९७७ – ८ जुलै, इ.स. १९७८
पुढील : शरद पवार
         कार्यकाळ
२ फेब्रुवारी, इ.स. १९८३ – १ जून, इ.स. १९८५
पुढील : शिवाजीराव निलंगेकर
राष्ट्रीयत्व : भारतीय
राजकीय पक्ष : अखिल भारतीय काँग्रेस
आई : रुक्मिणीबाई बंडूजी पाटील
वडील : बंडूजी पाटील
प्रथम पत्नी : मालतीबाई पाटील
द्वितीय पत्नी : शालिनीताई पाटील
नाते : प्रतीक पाटील (नातू)
अपत्ये : प्रकाशबापू पाटील
निवास : सांगली
धर्म : हिंदू
                  महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होत. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी - असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो.
                     त्यांचे वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले.
                   सांगली जिल्ह्यातील, मिरज तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. तसेच स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढील काळात सुमारे २५ वर्षे त्यांनी सांगलीचेच प्रतिनिधित्व (विधानसभेत व लोकसभेत) केले. राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदी संस्था-संघटनांची अध्यक्षपदे सांभाळली. पक्ष कार्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले. वसंतदादांनंतर काँग्रेस पक्ष संघटनेला एवढे बळ देणारा नेता पुढे काँग्रेसला महाराष्ट्रात मिळालाच नाही. (तसेच प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात व वाढण्यात दादांचाच वाटा मोठा आहे,) असे राजकीय निरीक्षक म्हणतात. सत्तेची हाव नसलेला सत्ताधारी, असे दादांबद्दल म्हटले जाते.
            महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दादांनी अनेक समाजहितकारक, दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले. १९८३ मध्ये त्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतन विद्यालये विनाअनुदान तत्त्वावर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होण्याबरोबरच, या निर्णयामुळे शैक्षणिक व (पर्यायाने) औद्योगिक विकासालाही चालना मिळाली. वसंतदादांनी राज्याचा विकासविषयक आढावा घेण्यासाठी अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांची सत्यशोधन समिती नेमली. यातूनच समतोल विकास, विदर्भ-मराठवाड्याचा अनुशेष (बॅकलॉग) अशा संज्ञा पुढे आल्या. शालेय विद्यार्थ्यांना मोफत एस.टी. प्रवास, परगावी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्यांची मोफत वाहतूक, शेतकर्‍यांना कमी व्याज दराने कर्जपुरवठा इत्यादी महत्त्वाचे निर्णय दादांनी त्यांच्या काळात घेतले. पाणी अडवा, पाणी जिरवा हे सूत्र प्रथम दादांनी महाराष्ट्रासमोर आणले. दादांच्या या लोकहितकारक निर्णयांची बीजे त्यांच्या देशभक्तीत व त्यांनी केलेल्या क्रांतिकार्यांत आढळतात.

वसंतदादा अगदी लहान वयातही (१९३०) स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले होते. १९४० पासून त्यांनी लढ्यात जोमाने सहभाग घेतला. फोनच्या तारा तोडणे, पोस्ट जाळणे, रेल्वेचे नुकसान करणे, पिस्तुल-बाँबचा वापर करून ब्रिटिशांमध्ये दहशत निर्माण करणे इत्यादी कामांच्या माध्यमातून त्यांनी सांगली जिल्ह्यात, १९४२ मध्ये आपला ब्रिटिश विरोध प्रखर केला. कायदेभंग चळवळीच्या काळात सोलापूरला चार युवक हुतात्मे झाले. या हौतात्म्याची आठवण म्हणून दादांनी चहा सोडला होता. दादा काही काळ भूमिगत होते. त्यांना सुमारे ३ वर्षे तुरुंगवासही भोगावा लागला. १९४३ मध्ये दादांनी तुरुंगातून निसटण्याचा प्रयत्‍न केला असता, त्यांना खांद्याला गोळी लागली होती, व त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला होता. दादांच्या सुटकेसाठी सांगलीकरांनी सभा-मोर्चा या माध्यमातून प्रयत्न केले होते. या प्रयत्‍नांत रामानंद भारती, बॅ. नाथ पै देखील सहभागी होते. सातारा-सांगली या भागांत दादा स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर आघाडीवर होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर स्थानिक स्वातंत्र्य-सैनिकांकडून शस्त्रास्त्रे परत घेऊन, त्यांच्यामध्ये विधायक कार्य करण्याची प्रेरणा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम दादांनी केले होते.
              वसंतदादांचे महाराष्ट्राच्या उभारणीतील सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी सहकार क्षेत्राचा केलेला विकास व विस्तार होय. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास व कृषी-उद्योग विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कुक्कुटपालन, दुग्धविकास या क्षेत्रांत सहकाराचा प्रसार प्रामुख्याने दादांनी केला. खत कारखाने, सूत गिरण्या, तेल गिरण्या, कागद कारखाने, सिमेंट पाईपचे कारखाने, कृषी अवजारांचे उत्पादन व कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योग राज्यात वसंतदादांनी सहकारी तत्त्वावर सुरू केले. १९५६-५७ मध्येच त्यांनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. त्या वेळी त्यांनी स्वत:शेतांमध्ये जाऊन ऊस कसा लावायचा, याचे शेतकर्‍यांना प्रात्यक्षिक दिले होते. सहकारी साखर कारखान्यांनी साखरेसह उप-उत्पादनांचीही निर्मिती करावी असा आग्रह दादांनी धरला. तसेच कारखान्याच्या परिसरात शिक्षण, आरोग्य, इतर उद्योग व मूलभूत सोयीसुविधा या क्षेत्रांत विकास साधण्यासाठी विकास निधी वेगळा काढण्याची कल्पना त्यांनी रुजवली. त्यामुळे आज महाराष्ट्रात कारखान्यांना जोडून निर्माण झालेली विकास केंद्रे आपल्याला दिसतात. दादांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना करून संशोधनाला चालना दिली. याच संस्थेचे नाव आज वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिटयूट आहे. आज राज्यात छोट्या-मोठ्या सहकारी पतसंस्थांचे जाळे उभे राहिलेले दिसते. यामध्येही वसंतदादांचा मोठा वाटा आहे.

सहकार क्षेत्रातील या अद्वितीय कामगिरीमुळेच १९६७ मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले. वसंतदादा १९५२ पासून लोकप्रतिनिधी होते, १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले, व नंतर मंत्री -मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. विशेष म्हणजे १९५२ ते १९७२ दरम्यान त्यांनी सहकार क्षेत्रातील बहुतांश कार्य केले. या पार्श्वभूमीवर दादांनी ज्या काळात सहकार क्षेत्राची पायाभरणी व विस्तार केला तो काळ १९५२ ते १९७२ असल्याचे लक्षात येते. विशेष म्हणजे सत्तास्थानांवर नसताना त्यांनी सहकाराचा प्रचार-प्रसार-विकास केला हे लक्षणीय ठरते.
         स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या विविध प्रकारच्या अनुभवांचे संचित, स्मरणशक्ती, नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, समाजमन-आकलन शक्ती, निर्णयक्षमता, शेतकरी व ग्रामीण समाज जीवनाची अचूक, परिपूर्ण जाणीव - इत्यादी गुणांच्या आधारे वसंतदादांनी महाराष्ट्राचा विकास साधला. १९१८ मध्ये प्लेगच्या साथीत दादांच्या आई-वडिलांचा एकाच दिवशी मृत्यू झाला होता. त्या वेळी केवळ एक वर्षाचे असणार्‍या दादांचा सांभाळ, पुढील आयुष्यात त्यांच्या आजीने केला होता. या परिस्थितीत दादा जास्त शिकू शकले नाहीत. पण पुढील आयुष्यात त्यांनी केलेल्या विकास-कार्याची फळे आज महाराष्ट्र चाखतो आहे. म्हणूनच दुर्दैवाने फार शिकू न शकलेला, पण तरीही सर्वांत शहाणा नेता या समर्पक शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते.

🏭 वसंतदादा पाटील यांच्या नावाच्या संस्था
▪️वसंतदादा पाटील साखर कारखाना
▪️वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट (आधीचे नाव डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट), वाकडेवाडी (पुणे)
▪️डॉ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन, शुक्रवार पेठ (पुणे)
▪️पद्मभूषण डॉ वसंतदादा पाटील कॉलेज ऒफ आर्किटेक्चर, पिरंगूट (पुणे)
▪️वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, सायन (मुंबई)
▪️वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, बुधगाव (सांगली)
▪️वसंत दादा पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज, रहिमतपूर
⚜️ वसंतदादा पाटील यांनी ️भूषविलेली पदे
▪️महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष (१९६५)
▪️राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे संचालक व अध्यक्ष (१९७०-७२)
▪️साखर निर्यात मंडळाचे अध्यक्ष (१९७०-७१) होते.
▪️राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ आदी संस्थांचेही ते कैक वर्षे अध्यक्ष होते.
▪️महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९६७).
▪️१९६९ साली काँग्रेसचे विभाजन झाले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईस काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम केले.
 ▪️१९७१ मध्ये अमेरिकेतील लुइझिॲना येथे भरलेल्या चौदाव्या आंतरराष्ट्रीय ऊस तज्‍ज्ञांच्या परिषदेस भारतीय शिष्टमंडळाचे नेते म्हणून हजर राहिले. यापूर्वी तीन वेळा त्यांनी जागतिक प्रवास केला होता.
 
       🇮🇳 जयहिंद 🇮🇳

      🙏 विनम्र अभिवादन🙏                  ♾♾♾  ♾♾♾
       स्त्रोत ~ WikipediA
➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१

सेनापती बापट

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची  🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬
  संकलन ~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 
   ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  
🔥📰⛓️🇮🇳👨🏻‍🦱🇮🇳⛓️📰💥

           पांडुरंग महादेव बापट
             उर्फ सेनापती बापट

              (भारतीय क्रांतिकारक)
       जन्म: १२ नोव्हेंबर १८८०
                       (पारनेर)
       मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६७
                        (बाम्बे)

टोपणनाव : सेनापती बापट
चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
वडील : महादेव
आई : गंगाबाई
शिक्षण : डेक्कन कालेज पुणे
                  पांडुरंग महादेव बापट हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना सेनापती असे संबोधण्यात येऊ लागले. 

📚 जन्म व शिक्षण
                 महादेव तसेच गंगाबाई बापट यांचे हे पुत्र होत. त्यांचा जन्म पारनेर (जिल्हा अहमदनगर) येथे झाला.  त्यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक आणि बी. ए. पर्यंतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. त्यांनी अहमदनगरला मॅट्रिकची परीक्षा दिली, तेव्हा त्यांना संस्कृतची 'जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती' मिळाली. त्यांना बी. ए. परीक्षेत इ. स. १९०३ साली उत्तीर्ण झाल्यावर मुंंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून ते इंग्लंडला गेले. एडिंबरो येथे त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पारनेर तालुक्यातील गणेशखिंड येथील गणपती मंदिरात ते राहत असत. या मंदिरापासून सेनापती बापटांचे पारनेर शहरातील मूळ घर यांदरम्यान मोठा भुयारी मार्ग आहे. या मार्गाची सध्या पडझड झाली आहे. त्यांचे पारनेर मधील घर सेनापती बापट स्मारक म्हणून ओळखले जाते.

💁‍♂ कार्य
          स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी गुप्तपणे बॉम्ब तयार करण्याची कला शिकून घेतली आणि त्यानंतर सेनापती बापट आणि हेमचंद्र दास या आपल्या सहकारी मित्रांना हे तंत्र शिकण्यासाठी पॅरिसला पाठविले. असे असले तरी "माझ्या बाँबमुळे एकही बळी गेला नाही. ते फक्त आमच्या कार्याकडे ल़क्ष वेधण्यास केले गेले होते" असे त्यांचे म्हणणे होते. मात्र तरीही अलीपूर बाँब खटल्यात सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. इ. स. १९२१ पर्यंत ते स्वतःच्या जन्मगावी शिक्षक म्हणून राहिले आणि त्यांनी समाजसेवा हेच व्रत घेतले. पहाटे उठल्याबरोबर गावचे रस्ते झाडणे व शौचकूप साफ करणे हे व्रत त्यांनी जन्मभर निभावले.
                  इ. स. १९२१ ते इ. स. १९२४ या कालखंडात पुणे जिल्हयातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळविण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालवले. या आंदोलनादरम्यान बापट यांना सेनापती म्हणून ओळखले जाऊ लागले. या आंदोलनात त्यांना तीनदा कारागृहावासाची शिक्षा झाली. शेवटची सात वर्षे सक्तमजुरीची होती. संस्थानांतल्या प्रजाजनांच्या हक्कांकरिता चालू असलेल्या आंदोलनांत भाग घेऊन त्यांनी संस्थानाच्या प्रवेशबंद्या मोडल्या व त्याबदल कारागृहवासही सोसला. स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इत्यादी आंदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.
                   नोव्हेंबर १९१४ मध्ये सेनापती बापटांना मुलगा झाला. त्याच्या बारशाच्या निमित्ताने बापटांनी पहिले भोजन हरिजनांना दिले. एप्रिल १९१५ मध्ये ते पुण्यात वासूकाका जोशी यांच्या 'चित्रमयजगत' या मासिकात नोकरी करू लागले. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी वृत्तपत्रात, दैनिक मराठातही नोकरी केली आहे. दैनिक मराठा सोडल्यानंतर ते लोक-संग्रह नावाच्या दैनिकात राजकारणावर लिखाण करू लागले. त्याचबरोबर डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ज्ञानकोशाचे कामही ते बघत. बापटांच्या पत्नीचे ४ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले. त्यानंतर सेनापती बापट मुंबईतीत झाडूवाल्यांचे नेतृत्व करू लागले. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या 'संदेश' नावाच्या वृत्तपत्रात एक मोठे निवेदन दिले. झाडू-कामगार मित्रमंडळ नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. सप्टेंबर १९२९ मध्ये, झाडूवाल्यांशी मानवतेने वागण्याचा पुकारा करीत बापटांनी गळ्यात पेटी लटकावून भजन करीत शहरातून मुंबईच्या चौपाटीपर्यंत मोर्चा काढला. शेवटी त्यांनी पुकारलेल्या संपाची यशस्वी सांगता झाली.
              अंदमानमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगताना इन्द्रभूषण सेन यांनी आत्महत्या केली होती, उल्लासकर दत्त हे भयंकर यातना सहन करीत वेडे झाले होते. हे पाहून, सेनापती बापटांनी अंदमानमध्ये काळ्या पाण्याची जन्मठेप भोगत असलेल्या कैद्यांच्या सुटकेसाठी डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्यासह एक सह्यांची मोहीम चालविली. त्यासाठी ते घरोघर फिरत, लेख लिहीत, सभा घेत. या प्रचारासाठी बापटांनी ’राजबंदी मुक्ती मंडळ' स्थापन केले होते. इ.स.१९४४ साली नागपूर येथे सेनापती बापट यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले.

🏵 गौरव
       पुण्यातील १५ ऑगस्ट, इ. स. १९४७ साली ध्वजारोहण सेनापती बापटांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यातील एका सार्वजनिक रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

🎞 लघुपट
     सेनापती बापट यांच्या कार्यावर राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान (NCERT) यांनी एका लघु माहितीपटाची निर्मिती केलेली आहे.

             🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
          ♾♾♾ ♾♾♾
          स्त्रोत ~ WikipediA
➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
     ➿➿➿➿➿➿➿➿➿

       🇮🇳 यशोगाथा थोरांची  🇮🇳
             
   
             ▬ ❚❂❚❂❚ ▬

 संकलन ~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
                                                       🏢📰⛓️🇮🇳👨🏻‍🦱🇮🇳⛓️📰🏢
          
      भारतरत्न मौलाना अबुल
            कलाम आझाद


    जन्म : 11 नवम्बर 1888
         (मक्का, सउदी अरब)
   मृत्यु : 22 फ़रवरी 1958
         (मृत्यु स्थान दिल्ली)

पूरा नाम : मौलाना अबुलकलाम मुहीउद्दीन अहमद
अन्य नाम : मौलाना साहब
अभिभावक : मौलाना खैरूद्दीन    
                     और आलिया
पत्नी : ज़ुलैख़ा
नागरिकता : भारतीय
प्रसिद्धि : स्वतन्त्रता सेनानी, क्रान्तिकारी, पत्रकार, समाजसुधारक, शिक्षा विशेषज्ञ
पार्टी : कांग्रेस
पद : भूतपूर्व शिक्षा मंत्री
भाषा : उर्दू, फ़ारसी और अरबी
पुरस्कार-उपाधि : भारत रत्न
विशेष योगदान : वैज्ञानिक शिक्षा को प्रोत्साहन, कई विश्वविद्यालयों की स्थापना, उच्च शिक्षा और खोज को प्रोत्साहन, स्वाधीनता संग्राम

रचनाएँ : इंडिया विन्स फ्रीडम अर्थात् भारत की आज़ादी की जीत, क़ुरान शरीफ़ का अरबी से उर्दू में अनुवाद, तर्जुमन-ए-क़ुरान, ग़ुबारे-ए-खातिर, हिज्र-ओ-वसल, खतबात-ल-आज़ाद, हमारी आज़ादी और तजकरा

      मौलाना अबुल कलाम आज़ाद या अबुल कलाम गुलाम मुहियुद्दीन  एक प्रसिद्ध भारतीय मुस्लिम विद्वान थे। वे कवि, लेखक, पत्रकार और भारतीय स्वतंत्रता सेनानी थे। भारत की आजादी के वाद वे एक महत्त्वपूर्ण राजनीतिक रहे। वे महात्मा गांधी के सिद्धांतो का समर्थन करते थे। उन्होंने हिंदू-मुस्लिम एकता के लिए कार्य किया, तथा वे अलग मुस्लिम राष्ट्र (पाकिस्तान) के सिद्धांत का विरोध करने वाले मुस्लिम नेताओ में से थे। खिलाफत आंदोलन में उनकी महत्वपूर्ण भूमिका रही। 1923 में वे भारतीय नेशनल काग्रेंस के सबसे कम उम्र के प्रेसीडेंट बने। वे 1940 और 1945 के बीच काग्रेंस के प्रेसीडेंट रहे। आजादी के वाद वे भारत के उत्तर प्रदेश राज्य के रामपुर जिले से 1952 में सांसद चुने गए और वे भारत के पहले शिक्षा मंत्री बने।                                वे धारासन सत्याग्रह के अहम इन्कलाबी (क्रांतिकारी) थे। वे 1940-45 के बीट भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष रहे जिस दौरान भारत छोड़ो आन्दोलन हुआ था। कांग्रेस के अन्य प्रमुख नेताओं की तरह उन्हें भी तीन साल जेल में बिताने पड़े थे। स्वतंत्रता के बाद वे भारत के पहले शिक्षा मंत्री बने और विश्वविद्यालय अनुदान आयोग की स्थापना में उनके सबसे अविस्मरणीय कार्यों में से एक था।

💁‍♂ जीवन
             मौलाना आज़ाद अफग़ान उलेमाओं के ख़ानदान से ताल्लुक रखते थे जो बाबर के समय हेरात से भारत आए थे। उनकी माँ अरबी मूल की थीं और उनके पिता मोहम्मद खैरुद्दीन एक फारसी (ईरानी, नृजातीय रूप से) थे। मोहम्मद खैरुद्दीन और उनके परिवार ने भारतीय स्वतंत्रता के पहले आन्दोलन के समय 1857 में कलकत्ता छोड़ कर मक्का चले गए। वहाँ पर मोहम्मद खॅरूद्दीन की मुलाकात अपनी होने वाली पत्नी से हुई। मोहम्मद खैरूद्दीन 1890 में भारत लौट गए। मौहम्मद खैरूद्दीन को कलकत्ता में एक मुस्लिम विद्वान के रूप में ख्याति मिली। जब आज़ाद मात्र 11 साल के थे तब उनकी माता का देहांत हो गया। उनकी आरंभिक शिक्षा इस्लामी तौर तरीकों से हुई। घर पर या मस्ज़िद में उन्हें उनके पिता तथा बाद में अन्य विद्वानों ने पढ़ाया। इस्लामी शिक्षा के अलावा उन्हें दर्शनशास्त्र, इतिहास तथा गणित की शिक्षा भी अन्य गुरुओं से मिली। आज़ाद ने उर्दू, फ़ारसी, हिन्दी, अरबी तथा अंग्रेजी़ भाषाओं में महारथ हासिल की। सोलह साल उन्हें वो सभी शिक्षा मिल गई थीं जो आमतौर पर 25 साल में मिला करती थी।

तेरह साल की आयु में उनका विवाह ज़ुलैखा बेग़म से हो गया। वे देवबन्दी विचारधारा के करीब थे और उन्होंने क़ुरान के अन्य भावरूपों पर लेख भी लिखे। आज़ाद ने अंग्रेज़ी समर्पित स्वाध्याय से सीखी और पाश्चात्य दर्शन को बहुत पढ़ा। उन्हें मुस्लिम पारम्परिक शिक्षा को रास नहीं आई और वे आधुनिक शिक्षावादी सर सैय्यद अहमद खाँ के विचारों से सहमत थे।

📰 क्रांतिकारी और पत्रकार
            आजाद अंग्रेजी हुकूमत के खिलाफ़ थे। उन्हेंने अंग्रेजी सरकार को आम आदमी के शोषण के लिए जिम्मेवार ठहराया। उन्होंने अपने समय के मुस्लिम नेताओं की भी आलोचना की जो उनके अनुसार देश के हित के समक्ष साम्प्रदायिक हित को तरज़ीह दे रहे थे। अन्य मुस्लिम नेताओं से अलग उन्होने 1905 में बंगाल के विभाजन का विरोध किया और ऑल इंडिया मुस्लिम लीग के अलगाववादी विचारधारा को खारिज़ कर दिया। उन्होंने ईरान, इराक़ मिस्र तथा सीरिया की यात्राएं की। आजाद ने क्रांतिकारी गतिविधियों में भाग लेना आरंभ किया और उन्हें श्री अरबिन्दो और श्यामसुन्हर चक्रवर्ती जैसे क्रांतिकारियों से समर्थन मिला।
          आज़ाद की शिक्षा उन्हे एक दफ़ातर (किरानी) बना सकती थी पर राजनीति के प्रति उनके झुकाव ने उन्हें पत्रकार बना दिया। उन्होने 1912 में एक उर्दू पत्रिका अल हिलाल का सूत्रपात किया। उनका उद्येश्य मुसलमान युवकों को क्रांतिकारी आन्दोलनों के प्रति उत्साहित करना और हिन्दू-मुस्लिम एकता पर बल देना था। उन्होने कांग्रेसी नेताओं का विश्वास बंगाल, बिहार तथा बंबई में क्रांतिकारी गतिविधियों के गुप्त आयोजनों द्वारा जीता। उन्हें 1920 में राँची में जेल की सजा भुगतनी पड़ी।

🚷 असहयोग आन्दोलन
               जेल से निकलने के बाद वे जलियांवाला बाग हत्याकांड के विरोधी नेताओं में से एक थे। इसके अलावा वे खिलाफ़त आन्दोलन के भी प्रमुख थे। खिलाफ़त तुर्की के उस्मानी साम्राज्य की प्रथम विश्वयुद्ध में हारने पर उनपर लगाए हर्जाने का विरोध करता था। उस समय ऑटोमन (उस्मानी तुर्क) मक्का पर काबिज़ थे और इस्लाम के खलीफ़ा वही थे। इसके कारण विश्वभर के मुस्लिमों में रोष था और भारत में यह खिलाफ़त आंन्दोलन के रूप में उभरा जिसमें उस्मानों को हराने वाले मित्र राष्ट्रों (ब्रिटेन, फ्रांस, इटली) के साम्राज्य का विरोध हुआ था।
गाँधी जी के असहयोग आन्दोलन में उन्होंने सक्रिय रूप से भाग लिया।

🇮🇳 आज़ादी के बाद
         स्वतंत्र भारत के पहले शिक्षा मंत्री थे। उन्होंने ग्यारह वर्षों तक राष्ट्र की शिक्षा नीति का मार्गदर्शन किया। मौलाना आज़ाद को ही 'भारतीय प्रद्योगिकी संस्थान' अर्थात 'आई.आई.टी.' और 'विश्वविद्यालय अनुदान आयोग' की स्थापना का श्रेय है। उन्होंने शिक्षा और संस्कृति को विकिसित करने के लिए उत्कृष्ट संस्थानों की स्थापना की।

संगीत नाटक अकादमी (1953)
साहित्य अकादमी (1954)
ललितकला अकादमी (1954)
केंद्रीय सलाहकार शिक्षा बोर्ड के अध्यक्ष होने पर सरकार से केंद्र और राज्यों दोनों के अतिरिक्त विश्वविद्यालयों में सारभौमिक प्राथमिक शिक्षा, 14 वर्ष तक की आयु के सभी बच्चों के लिए निःशुल्क और अनिवार्य शिक्षा, कन्याओं की शिक्षा, व्यावसायिक प्रशिक्षण, कृषि शिक्षा और तकनीकी शिक्षा जैसे सुधारों की वकालत की।

📜 पुरस्कार
     उन्हे वर्ष 1992 में मरणोपरान्त भारत रत्न से सम्मानित किया गया।
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
         ♾♾♾ ♾♾♾
            स्त्रोत ~ WikipediA 
➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

नवोपक्रम स्पर्धेला मुदत वाढ...

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२१-२२ ला १० नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. नुकत्याच आलेल्या परिपत्रकानुसार त्यास २५ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे....
सविस्तर वाचण्यासाठी खालील परिपत्रक वाचा...

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...