बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

राष्ट्रसंत गाडगेबाबा

      ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬          संकलन : श्री अविनाश काशिनाथ पाटील   
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                           
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
   💥🙋🏻‍♂️⛓️🇮🇳👨🏻🇮🇳⛓️🙋🏻‍♂️💥

            स्वच्छतेचे पुजारी 
          संत गाडगे महाराज

     डेबूजी झिंगराजी जानोरकर
             (समाज सुधारक)

     जन्म : 23 फेब्रुवारी 1876
 (शेणगाव,महाराष्ट्र , ब्रिटिश भारत)

    निधन : 20 डिसेंबर 1956
                (वय 80)
  ( वलगाव, अमरावती , महाराष्ट्र )

मुख्य स्वारस्ये : धर्म , कीर्तन ,    
                      नीतिशास्त्र
प्रभाव : डाॕ. बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील , भाऊराव कृष्णाजी गायकवाड , तुकडोजी महाराज आणि मेहेर बाबा
                     गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.
                 संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.
         गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
                    समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांत होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून् सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाजथरातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहात आहे, असे दिसते.
 
👬 गाडगेबाबा आणि बाबासाहेबांची भेट
                         14 जुलै 1941 मध्‍ये संत गाडगेबाबा यांची प्रकृती ठीक नव्‍हती. ते मुंबईत होते. ही माहिती एका सहका-याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यापर्यंत पोहोचवली. बाबासाहेब तेव्‍हा कायदेमंत्री होते. त्‍याच दिवशी सायंकाळी कामानिमित्‍त त्‍यांना दिल्‍लीला जायचे होते. पण गाडगेबाबांच्‍या प्रकृतीची बातमी ऐकताच त्‍यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले. दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामी या बातमी घेऊन येणा-या सहका-यासोबत हॉस्‍पिटलमध्‍ये पाहोचले. गाडगेबाबा कधीही कुणाकडून काही स्‍वीकारत नसत. पण त्‍यांनी बाबासाहेबांकडून घोंगड्या स्‍वीकारल्‍या.
गाडगेबाबा तेव्‍हा म्‍हणाले होते, "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर, तुमचा एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."
डॉ. बाबासाहेब म्हणाले, "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.
📚 गाडगे महाराजांची चरित्रे
  असे होते गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
ओळख गाडगेबाबांची (प्राचार्य रा.तु. भगत)
कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे)
गाडगेबाबा (चरित्र, प्रबोधनकार ठाकरे)
गाडगे बाबांचा पदस्पर्श (केशव बा. वसेकर)
श्री गाडगेबाबांचे शेवटचें कीर्तन (गो.नी. दांडेकर)
Shri Gadge Maharaj (इंग्रजी, गो.नी. दांडेकर)
गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी)
गाडगे माहात्म्य (काव्यात्मक चरित्र, नारायण वासुदेव गोखले)
गोष्टीरूप गाडगेबाबा (विजया ब्राम्हणकर)
निवडक गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
मुलांचे गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत)
लोकोत्तर : गाडगेबाबा जीवन आणि कार्य (डॉ. द.ता. भोसले)
The Wandering Saint (इंग्रजी, वसंत शिरवाडकर)
संत गाडगेबाबा (गिरिजा कीर)
संत गाडगेबाबा (दिलीप सुरवाडे)
संत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
Sant Gadagebaba (इंग्रजी, प्राचार्य रा.तु. भगत)
संत गाडगेबाबांची भ्रमणगाथा (प्राचार्य रा.तु. भगत)
श्रीसंत गाडगे महाराज (मधुकर केचे)
श्री संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पां.बा. कवडे, पंढरपूर)
संत श्री गाडगे महाराज (डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर)
गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार)
समतासूर्य गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत )
स्वच्छतासंत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
🎥 गाडगेबाबांच्या जीवनावरील  चित्रपट
                डेबू : हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - नीलेश जलमकर
देवकीनंदन गोपाळा : हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे. दिग्दर्शक - राजदत्त

📖 साहित्य संमेलन
               महाराष्ट्रात गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरते.

मृत्यू
                       गाडगे महाराजांचे अमरावती जवळ पेढी नदीच्या काठावर, वडगाव जि. अमरावती 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. 

🏵 सन्मान
                       त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रकल्प २०००-०१ मध्ये सुरू केला. हा कार्यक्रम स्वच्छ गावे सांभाळणार्‍या ग्रामस्थांना बक्षिसे देतो.  याव्यतिरिक्त, भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ स्वच्छता व पाणी यासाठी राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना केली.  त्यांच्या सन्मानार्थ अमरावती विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आलेले आहे.
🏵 सन्मान
            भारताच्या टपाल खात्याने त्यांच्या नावावर स्मारक शिक्के जारी करुन गाडगे महाराजांचा गौरव केला होता.

 🙏🌹 गोपाला... गोपाला... देवकीनंदन गोपाला... 🌹🙏
        

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
       ♾♾♾  ♾♾♾
      स्त्रोत ~ WikipediA                                                              ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

राणी चेन्नम्मा

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन : श्री अविनाश काशिनाथ पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                         
   ➿➿➿➿➿➿➿➿➿
   🔫🏇🤺🇮🇳👸🏻🇮🇳🏇🤺🔫

        🏇 राणी चेन्नम्मा 🤺


  जन्म :  23 आॕक्टोबर 1778
          (बेलगाम, कर्नाटक)

वीरमरण : 21 फेब्रुवारी 1829
             (बैलहोंगल)

             कित्तूरची राणी चेन्नम्मा दक्षिण भारतातील झाशीची राणी लक्ष्मीबाईच समजली जाते. राणी लक्ष्मीबाई इतकाच तिचा देशाभिमान जाज्ज्वल्य होता. या अत्यंत सुदंरीचा जन्म काकतीय वंशातील देसाई घराण्यात झाला होता. तिच्या वडिलांचे नाव धुलाप्पा देसाई व आईचे नाव पदमावती होते. ती अपरूप सुंदरी असल्यानेच त्या अर्थाचे तिचे नाव चेन्नम्मा असे ठेवण्यात आले. बालपणापासूनच  ती अत्यंत स्वाभिमानी बाणेदार होती. शिक्षणातही तिला अत्यंत रस होता. कन्नड, मराठी, उर्दू व संस्कृत या चार भाषांचे ज्ञान तिने किशोर वयात येण्या आधीच प्राप्त करून घेतले होते. त्याचप्रमाणे घोडेस्वारी व शस्त्रविद्येतही ती प्रवीण झाली होती. कित्तूरचा राजा मल्लराज एकदा शिकारीला गेला असताना त्याने चेन्नम्माला वाघाची शिकार करतना पाहिले. तिचा पराक्रम व रूपलावण्य पाहून त्याने धुलाप्पा देसाई यांच्याकडे चेन्नम्माशी विवाह करण्याची मागणी घातली. मल्लसर्जचा विवाह आधी रुद्रव्वा हिच्याशी झालेला होता. धुल्लाप्पा देसाईना हे स्थळ आवडले व त्यांनी चेन्नम्माचा विवाह मल्लसर्ज राजाशी करून दिला. विवाहानंतर चेन्नम्मा ही बुद्धिमान, विद्वान, चतुर व धोरणी असल्याचे राजा मल्लसर्जांच्या लक्षात आले. तो राज्यकारभाराविषयी चेन्नम्माशी विचारविनिमय करू लागला.
             पुणे - बंगलोर मार्गावर बेळगावपासून पाच मैल अंतरावर कित्तूरनगर व कित्तूरचा किल्ला आहे. राजा मल्लसर्च्या कारकीर्दीत कित्तूर राज्य वैभवसंपन्न होते. राज्यात ७२ किल्ले व ३५८ गावे होती. कित्तूर नगरी व्यापाराचे मोठे केंद्र होती. सोने, चांदी, जड-जवाहीरांचा व्यापार तेथे चालायचा. दूर-दूरचे व्यापारी कित्तूरला यायचे. राज्यातील जमीनही अत्यंत सुपीक असल्याने शेतीचे उत्पन्नही फार मोठे होते. 
            राजा मलसर्ज मोठा वीर, पराक्रमी व मानी होता. प्रजेवर त्याचे अत्यंत प्रेम होते, त्याच्या राज्यात प्रजा सुखासमाधाने व आनंदाने जगत होती. तो विद्याप्रेमी व कलासक्त होता. त्याच्या दरबारी नेहमी मोठमोठे पंडित व कलावंत येत असत. त्यांचा मान तो ठेवीत असे व त्यांना भरघोस बिदागीही देत असे. 
           राजा मल्लसर्जचे आपल्या दोन्ही राण्यांवर प्रेम होते. तो त्यांचा मान ठेवूनच त्यांच्याशी वागायचा . रूद्रव्वा ही धार्मिक वृत्तीची, शांत स्वभावाची व समंजस होती. राणी चेन्नन्मा तिला आपली मोठी बहीणच मानायची. दोन्ही राण्यांनी एक एक पुत्राला जन्म दिला होता. पण चेन्नम्माचा पुत्र बालपणीच वारला. रुद्रव्वाच्या पुत्राचे नाव शिवालिंग रुद्रसर्ज होते. राणी चेन्नमाचे त्याच्यावर पुत्रवत प्रेम होते. 
          राजा मल्लसर्जचा प्रधान गुरुसिद्दप्पा हा मोठा विचारी, धोरणी व राजव्यवहारकुशल होता. आपल्या राज्याचा हिताचा विचार करूनच तो राजाला सल्ला द्यायचा. त्याची सत्तरी उलटून गेली होती. तरीही तो आपल्या राज्याचा काराभार चोखपणे बजवायचा पण मल्लप्पाशेट्टी व वेंकटराय हे दोन्ही मंत्री कारस्थानी होते. मल्लप्पाशेट्टीचा डोळा राज्याच्या प्रधानपदावर होता. गुरुसिद्दप्पा प्रधानपदावरून निवृत्त कधी होतो व त्याचे प्रधानपद आपल्याला केव्हा मिळते, असा विचार त्याच्या मनात सतत घोळत असायचा पण गुरुसिद्दप्पावर कितूरच्या प्रजेची श्रद्धा होती. त्यामुळे हे दोघे मंत्री काहीही करु शकत नव्हते.
             दुसरा बाजीराव पेशवा याने १८०२ साली वसईला इंग्रजांशी तह करून मराठा राज्य इंग्रजांकडे गहाण टाकले व तो इंग्रजांच्या अधीन होऊन कारभार करु लागला. तो अतिशय कामुक व लोभी होता. त्याने जनतेवर अत्याचार करून सरदारांना त्रासवून सोडून संपत्ती गोळा करण्याचे सत्रच सुरु केले होते. आता त्याची नजर कितूरच्या संपन्न राज्याकडे वळली, तो आपले सैन्य घेऊन कृष्णा नदीकाठी यडूर येथे आपली छावणी देऊन राहिला होता. त्याने राजा मल्लसर्ज याला आपल्या भेटीसाठी निरोप पाठविला. त्याप्रमाणे राजा मल्लसर्ज गुरूसिद्दप्पाच्या सल्ल्याने त्याच्या भेटीस गेला. बाजीराव त्याच्यासह पुण्यास गेला व त्याने राजा मल्लसर्ज यालाही पुण्यास नेऊन कैदेत ठेवले. 
          एक आठवडा होऊन गेला तरीही राजा मल्लसर्ज कित्तूरला परत आला नाही. म्हणून राणी चेन्नम्माने गुरसिद्दप्पाला येडूरला पाठविले. गुरुसिद्दप्पा येडूरला पोचला, तेव्हा तेथे पेशव्यांची छावणी नव्हती. त्याला समजले की, बाजीराव मल्लसर्जला घेऊन पुण्यास निघून गेला आहे. गुरुसिद्दप्पा पुण्याला गेला. त्याने बाजीरावाशी बोलणी केली. पेशव्यांना दरवर्षी १ लाख ७५ हजार रूपये खंडणी देण्याच्या अटीवर बाजीरावने राजा मल्लसर्ज याला कैदेतून सोडून गुरुसिद्दप्पा याच्या हवाली केले. त्यावेळी राजा मल्लसर्ज याची प्रकृती अतिशय खंगलेली होती. तो कैदेत असताना  बाजीरावाने त्याचे खूप हाल केले होते व त्याला अन्नातून विषही चारले होते. त्यामुळे राजा मल्लसर्ज अतिशय दुर्बल झाला होता. वास्तविक पाहता मल्लसंर्जाने पेशव्यांविरूद्ध काहीही केलेले नव्हते. पण धनलोभापायी बाजीरावाने हे नीचकर्म केले होते.
             कितूरला आल्यावर मल्लसर्जची तब्येत अधिकच खालावली. त्याचे वय त्यावेळी अवघे ३४ वर्षांचे होते. आता त्याला जगण्याची आशा वाटत नव्हती, त्याने गुरुसिद्दप्पाला बोलावून तसे सांगितले व राज्याचा भार त्याच्यावर व राणी चेन्नम्मावर सोपवून त्याने डोळे मिटले. राज्यातील प्रजा दुःखाने 'हाय हाय' करू लागली. दोन्ही राण्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. गुरुसिद्दप्पाने दोन्ही राण्यांचे सांत्वन केले. राणी चेन्नम्मा हिने रुद्रव्वाचा पुत्र शिवलिंग रूद्रसर्ज याला युवराजपदी बसवून राज्याचा कारभार आपल्या हाती घेतला. गुरुसिद्दप्पाने कठीण प्रसंग ओळखून राणी चेन्नम्माला चांगली साथ दिली. परंतु ११ सप्टेंबर १८२४ साली शिवलिंग रुद्रसर्ज याचे दुर्दैवाने निधन झाले. राजवाड्यावर शोककळा पसरली.
             राणी चेन्नमाने राजाच्या संबंधातील मास्त मरडीगोंडा याच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे नाव 
'गुरूलिंग मल्लसर्ज ' असे ठेवले. मल्लप्पाशेट्टी याच्या दृष्ट बुध्दीला हे मानवले नाही. त्याने धारवाड येथे जाऊन तेथला इंग्रज कलेक्टर थॕकरे यांची भेट घेतली व राणी चेन्नम्माने दत्तक घेणे बेकायदेशीर आहे, असे त्याला सांगितले. कारण आता त्याचा हेतू कित्तूरचे राज्य बळकावण्याचा होता. वास्तविक पाहता दत्तक समारंभाच्या वेळी कित्तूर येथील इंग्रज प्रतिनिधींनाही राणी चेन्नम्मा व गुरुसिद्दप्पा यांनी उपस्थित ठेवले नव्हते. तेव्हा त्यांनी दत्तक घेण्याबद्दल कसलाही आक्षेप घेतला नव्हता. 
          आता थॕकरेच्या मनात कित्तूरचे राज्य बळकावण्याचा विचार घर करून बसला. त्याला माहीत होते की, कित्तुरला अलोट संपत्ती आहे. मल्लप्पा शेट्टी व वेंकटराय हे कित्तूरचे मंत्री त्याला साथ देऊ लागले. या दोघांनी थॕकरे याला सर्व सहाय्य  करण्याचे वचन दिले आणि त्यांनी थॕकरे याला असेही सांगितले की, " जोपर्यंत राणी चेन्नम्मा जिवंत आहे, तो पर्यंत कित्तूरवर कब्जा करणे शक्य नाही." म्हणजे हे दोघे देशद्रोही राणी चेन्नम्माच्या जिवावरच उठले होते, हे यावरून स्पष्टपणे दिसून येते. 
          थॕकरे याने एका पत्रान्वये राणीला कळविले की, '"तुम्ही आमच्या परवानगीशिवाय दत्तक का घेतला ? आम्ही तुमच्या या दत्तकाला परवानगी देणार नाही. असे तुमचा मंत्री मल्लप्पाशेट्टी याने तुम्हाला सांगितले असतांनाही तुम्ही दत्तक घेतला. तो आम्हास मंजूर नाही. तुम्ही राज्याचा कारभार मल्लप्पाशेट्टीकडे सोपवावा." 
            राणीने थॕकरेच्या या पत्राला कवडीइतकीही किंमत दिली नाही, आता युद्ध अटळ आहे, हे तिला व गुरुसिद्दप्पाला कळून चुकले. त्यांनी युद्धाची तयारी सुरु केली. आपल्या राज्यातील जनतेला युद्धासाठी सज्ज राहण्याचे व सैन्यात तरुण वीरांनी सामील होण्याचे आवाहन केले. शेकडो तरूण वीर युद्धासाठी तयार झाले. राणीच्या पाठीशी प्रधान गुरूसिद्दप्पा तसेच रायण्णा, बालण्णा, गजवीर आणि चेन्नबसप्पा असे अनेक वीर उभे  राहिले. राणीने गुरूसिद्दप्पाशी विचार-विनिमय करून थॕकरेला एक पत्र देऊन कळविले
की, "कित्तूर एक स्वतंत्र  राज्य आहे व ते स्वतंत्रच राहील. याची जाणीव ठेवावी. जर तुम्हाला युद्ध करायचे असेल, तर आम्हीही युध्दासाठी तयार आहोत. अशी तुमच्यासारख्यांचे गुलाम होण्यापेक्षा मरण पत्करु, पण शरण जाणार नाही."
     राणीचे हे बाणेदार उत्तर वाचताच थॕकरेच्या तळपायाची आग मस्तकात शिरली आणि त्याने युद्धाची तयारी सुरू केली. आपले सैन्य घेऊन तो कित्तूरच्या किल्ल्याबाहेर येऊन ठाकला. २१ ऑक्टोबर  १८२४ रोजी त्याने राणीला निरोप पाठविला की, "तुम्ही तुमच्या प्रधानांसह आम्हास येऊन भेटावे, 
"राणीने भेटण्यास नकार दिला व किल्ल्याचे सर्व दरवाजे बंद करून प्रत्येक दरवाजावर कडा पहारे बसविले. प्रत्येक बुरुजांवर तोफांची मोर्चेबांधणी केली. राणीची सगळी युद्धाची तयारी व किल्ल्याची सर्व माहिती मल्लप्पाशेट्टी व वेंकटराय यांनी थॕकरेला सांगितली. मल्लप्पा शेट्टीने राणीच्या पाकशाळेच्या प्रमुख बाईला पैशांची लालूच दाखवून आपल्याकडे वळवून घेतले आणि राणीला खिरीतून विष देण्यास सांगितले. राणीला हे आपल्या गुप्तहेरांकरवी आदल्या दिवशीच कळले होते. दुस-या दिवशी राणी जेवायला बसली, तेव्हा तिने त्या बाईचे पानही आपल्यासमोर वाढायला सांगितले व माझ्याबरोबर तू ही जेव, अशी आज्ञा तिला केली. ती बाई लटलटा कापू लागली. तिचा चेहरा पांढराफटक पडला व ती जेवायला नकार देऊ लागली. तेव्हा राणीने आपल्या स्त्री सैनिकांकरवी ती खीर तिला खायला लावली. थोडयाच वेळात तिचे शरीर काळे निळे पडले, तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितले की, ‘मल्लप्पाशेट्टीने मला हे कृत्य  करायला लावले.'
           युद्ध सुरू झाले. दोन्ही बाजूंनी तोफांचा मारा सुरु झाला. बंदुकीच्या गोळीबारांनी आकाश दुमदुमून गेले. कित्तूरचा प्रत्येक सैनिक प्राणपणाने लढत होता. पहिल्या दिवशी इंग्रजांना माघार घ्यावी लागली. इंग्रजाकडचे अनेक युद्धकैदी पकडले गेले. त्यात मल्लप्पा शेट्टी व वेंकटराय हे सुद्धा होते, त्यांना तुरूंगात डांबण्यात येऊन तुरूंगावर विश्वासू सैनिकांचा कडक पहारा बसविला. दुस-या दिवशी पुन्हा युद्ध अधिक जोमाने सुरू झाले. थॕकरेला आपल्या पराभवाची कल्पना येऊ लागली. राणी स्वतः लढत होती. ती जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत आपला विजय होणं अशक्य आहे,  हे त्याने हेरले व अचुक नेम धरून राणीवर बंदुकीने गोळी झाडली. तिच्या अंगरक्षकाने ती गोळी आपल्या छातीवर घेतली व तो धाडकन खाली पडला. हे पाहताच राणीने एकाच गोळीत थॕकरेला त्याच्या घोड्यावरून उडवून लावले. थॕकरे ठार झाल्यावर इंग्रजांच्या सैन्याची दाणादाण  उडाली. अनेक इंग्रज सैनिक कित्तूरच्या वीरांनी कापून काढले. अनेक वाट फुटेल तिकडे पळून गेले .
देशद्रोही मल्लप्पाशेट्टी व वेंकटराय यांना बेड्या घालून राणीने दरबारात आणविले. मंत्री मंडळाच्या सल्ल्यावरुन त्यांना हत्तींच्या पायी तुडविण्यात आले. त्यांच्याबरोबरच स्टिव्हनसन व  इलियट हे दोन इंग्रज अधिकारी पकडले होते." युद्ध पूर्णपणे बंद कराल, तर या दोन्ही अधिका-यांना सोडून देण्यात येईल, असा निरोप राणीने इंग्रजकडे पाठविला. या दोघांना सोडून दिले, तर युद्ध करणार नाही, असे प्रत्युत्तर छावणीतील इंग्रज अधिका-यांनी राणीकडे पाठविले. त्यावर विश्वास ठेवून राणीने त्या दोन्ही इंग्रज कैद्यांना सोडून दिले. इंग्रज हे विश्वासघातकी व शब्दाला न जागणारी जमात आहे, हे राणीला माहित नव्हते.
             कित्तूरच्या पराभवाचे वृत्त समजताच दक्षिण हिंदुस्थानचा कमिशनर चॕपलिन, कॕ.जेम्सन व  कॕ. स्पिलर घोडेस्वारांची मोठी सेना घेऊन ३० नोव्हेंबर १८२४ रोजी कित्तूरच्या किल्ल्यावर चालून आले. त्यांनी किल्ल्याला वेढा दिला. त्याच रात्री कित्तूरचा किल्लेदार शिवबसप्पा कमिशनरला भेटला व त्याने या युद्धात मदत करण्याचे आश्वासन चॕपलिनला दिले. तेव्हा "याच्या मोबदल्यात तुला काय हवे आहे ?" असा प्रश्न चॅपलीनने त्याला केला. शिवबसप्पाने उत्तर दिले, 
"कित्तूरचे राज्य" 'ठिक आहे', असे म्हणून चॅपलीनने त्याला निरोप दिला. शिवबसप्पाने लगेच कित्तूरच्या किल्ल्याचा नकाशा व किल्ल्याची सर्व माहिती चॕपलिनला दिली. व तो परत किल्ल्यात आला. 
            स्टिव्हनसन व इलियट इंग्रज छावणीत परतले. लगेच २ डिसेंबर १८२४ रोजी चॕपलीनने युद्धाची घोषणा केली. कर्नल वॉकर व कर्नल डिकन्स हे आपल्या फौजा घेऊन कित्तूरच्या राज्यात शिरले. आणि कित्तूरच्या आसपासचा प्रदेश त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. कित्तुरवर इंग्रजांनी चहुबाजुनी हल्ला केला. पहिल्या दिवशी इंग्रजांना माघार घ्यावी लागली. ४ डिसेंबरला इंग्रजांनी कित्तूरच्या तटावर तोफगोळयांचा मारा सातत्याने केला. तटाला भगदाड पडले. राणीकडे १८ पौंडी व ६ पौंडी गोळे फेकणा-या उत्तम तोफा होत्या. पण त्या तोफांतून दारुगोळाच उडेना. गुरुसिद्दप्पांनी तपास केला. किल्लेदार शिवबसप्पाने दारुच्या कोठारातील दारुत बाजरी व शेण मिसळून ठेवले होते. तो  दारुगोळा त्यामुळे निकामा झाला होता.  गुरुसिद्दप्पाने राणीला सल्ला दिला की, 
"आता किल्ला सोडून जाणेच श्रेयस्कर आहे ." पण राणी माघार घ्यायला तयार नव्हती. तरीही स्वामिभक्त गुरुसिद्दपाने तिला किल्ल्याबाहेर पडण्यारा राजी केले. तिलाही ते पटले. त्याच रात्री गुप्तमागनि राणी चेनम्मा, राणी रुद्रव्वा, छोटा राजा, वीरव्वा आणि शिवलिंगव्वा किल्ल्याबाहेर पडले. त्यांना तात्काळ इंग्रज सैन्याने गिरप्तार केले. युद्ध बंद झाले. कित्तूरच्या किल्ल्यावर इंग्रजांचे
युनियन जॅक फडकू लागले. गुरुसिद्दप्पा, सैदनसाहेब पकडले गेले. इंग्रजांनी त्यांना कित्तूरच्या चौकात फाशी दिली.
             राणी चेन्नम्माला व तिच्या राज परिवाराला बैलहोंगलच्या किल्ल्यातील तुरुंगात ठेवण्यात आले. त्या तुरुंगातून कित्तूरवर फडकणारे इंग्रजांचे युनियन जैक पाहून तिच्या अंतःकरणात भयंकर वेदना उठत असत. कित्तूर परतंत्र झाल्याचे भयानक दुःख सहन करीत ती जगायचे म्हणून जगत होती. राज परिवाराचे लोक तिच्या सोबतीला होते. हाच फक्त तिला दिलासा होता. इंग्रजांनी तोही हिरावून घेतला. राणी रुद्रव्वासह सगळया राज परिवाराला कुसुगलच्या तुरुंगात इंग्रजांनी पाठवून दिले. राणी आता बैलहोंगलच्या किल्ल्यात एकटीच कडक पहा-यात होती. एकांतातले जिणे तिला असहय झाले. तेव्हा तिचा वेळ शिवलिंगाची पूजा करण्यातच व्यतीत होऊ लागला. तिने आपला आहारही कमी करुन टाकला. 
          शेवटच्या युद्धात कित्तूरचे स्वामिभक्त वीर रायण्णा व  बालण्णा हे निसटून जंगलात निघून गेले होते. त्यांनी कित्तूर जिंकण्याचा चंग बांधला. कित्तूर राज्यातील गावागावातून तरुण वीर गोळा करुन आपले सैन्य उभारले. सुरपूरच्या व शिवगुत्तीच्या राजांनाही रायण्णाने पटवून दिले की, "कित्तूर इंग्रजांच्या ताब्यात राहिले , तर तुमचे राज्यही इंग्रज बळकावतील. म्हणून तुम्ही आपल्या सैन्यासह या व कित्तूर स्वतंत्र करण्यास मदत करा." त्या राजांनाही ते पटले. आपल्या सैन्यासह ते रायण्णाला येऊन मिळाले. ते सैन्य चार मैलापर्यंत पसरले पाहून इंग्रजच्या पोटात भीतीचा गोळा उठला. त्यांनी काही फितूर मिळविले. त्या फितुरांनी रायण्णा नदीत आंघोळ करीत असतांना त्याला पकडले व इंग्रजांच्या हवाली केले. रायण्णाला धारवाड येथे नेऊन फाशी देण्यात आले. कित्तूरवर चालून आलेल्या सैन्यातही इंग्रजांनी फूट पाडली व तिचा पराभव केला. 
          कित्तूरचा किल्लेदार इंग्रज कमिशनरला मोठया आशेने भेटला व त्याने ठरल्याप्रमाणे कित्तूरच्या राज्याची मागणी चॕपलीनकडे केली. तेव्हा चॕपलीन त्याला म्हणाला, "ठीक आहे. इंग्लंडमध्ये देशद्रोह करणा-यांना जे बक्षीस देण्यात येते, तेच तुम्हांला देऊ" लगेच शिवबसप्पाच्या हातात बेड्या ठोकण्यात आल्या. कित्तूरमध्ये गाढवावरुन त्याची धिंड इंग्रजांनी काढली व नंतर त्याला तोफेच्या तोंडी देण्यात आले.
           रायण्णाला फाशी दिल्याची बातमी राणी चेन्नमाला समजली. ती ऐकताच ती मुर्च्छित झाली. डॉक्टरला बोलावण्यात आले. आधीच तिने अन्नत्याग केला होता. डाॕक्टर म्हणाला,
 "आता हिच्या जगण्याची आशा नाही." थोड्याच वेळात स्वातंत्र्यासाठी तडफणारा राणीचा आत्मा अनंतात निघून गेला. कित्तूरचा प्राणच नाहीसा झाला. ही बातमी राणी रुद्रव्वा, वीरव्वा आणि नवा दत्तकराजा गुरुलिंग मल्लसर्ज यांना कळली. तेव्हा त्यांचा आकांत काय वर्णावा? त्या तिघांनी आपल्या छातीत खंजीर खुपसून घेऊन तुरुंगात प्राणत्याग केला. संपली ! राणी चेन्नम्माच्या स्वातंत्र्य लढण्याची कहाणीची इतिश्री झाली ! त्या थोर क्रांतिकारक राणीला कर्नाटकच काय पण सारा भारत कधीही विसरणार नाही. 
            त्यांच्या सन्मानार्थ २२ ते २४ आॕक्टोबरला कित्तुर येथे दरवर्षी उत्सव साजरा केला जातो. नवी दिल्ली येथिल पार्लमेंट हाऊस मध्ये राणी चेन्नम्मा यांच्या मुर्तीची स्थापना केलेली आहे.
            त्यांचे जीवन नारी शक्तीची प्रतिकच नाही तर प्रेरणास्त्रोत सुध्दा आहे. आपल्या शर्थीनुसार जीवन जगायला कोणतेही मूल्य कमी पडते.

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏

            ♾♾♾ ♾♾
स्त्रोत ~ महान भारतीय क्रांतिकारक 
               - श्री. स. ध. झांबरे                    
➖➖➖➖➖➖➖➖➖     
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

छत्रपती शिवाजी महाराज

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
     ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                          
     ➿➿➿➿➿➿➿➿➿
    🤺🚩🏇🇮🇳🤴🏻🇮🇳🏇🚩🤺
          
      छत्रपती शिवाजी राजे भोसले

     जन्म : १९ फेब्रुवारी १६३०
     मृत्यू  : ३ एप्रिल १६८०
           राजधानी - रायगड

     🚩🏇🚩🤺🚩🏇🚩🤺

          *"प्रौढ प्रताप पुरंदर"*
      *"महापराक्रमी रणधुरंदर"*
        *"क्षत्रिय कुलावतंस्"*
          *"सिंहासनाधीश्वर"*
          *"महाराजाधिराज"*
              *"महाराज"*
               *"श्रीमंत"*
                 *"श्री"*
                 *"श्री"*
                 *"श्री"*
              *"छत्रपती"*
              *"शिवाजी"*
              *"महाराज"* 
                 *"की"*
                 *"जय"*
   *!! जय भवानी ~ जय शिवाजी !!*

    🚩🚩 🏇🤺🏇🚩🚩

हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक , सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही  वंदिले जातात. शत्रुविरुध्द लढण्याकरीता  महाराष्ट्रातील डोंगरद-यांमध्ये  अनुकूल असलेली गनिमी काव्याची पध्दत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघल साम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त  स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती.  ते सरदार/किल्लेदार  जनतेवर अन्याय-अत्याचार  करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.
छत्रपतींच्या व्यक्तीमत्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेतल्यास... शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन , कडक व नियोजनबध्द प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा... असे उच्चकोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तीमत्वात एकवटलेले दिसतात.

*छत्रपती शिवाजी महाराजांनी.....*

* बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढविण्यासाठी स्वतः कष्ट घेतले.

* पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला.

* साध्या-भोळ्या मावळयांचा संघटन करुन त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला.

* स्वतः शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या  कार्यात स्वतःला घट्टपणे बांधून घेतले.

* महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले व नविन निर्माण केले.

* योग्य त्यावेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्यावेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरुन अनेक शत्रुंना  नामोहरम केलेच, तसेच  फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला.

 आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला.

 सामान्य रयतेची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था ... अशा अनेक व्यवस्था लावुन दिल्या.

 सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करुन हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली.

 राजभाषा विकसित करण्याचा गांभिर्यपूर्वक प्रयत्न केला, विविध कलांना राजाश्रय दिला.

 तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला.

सतीप्रथेला विरोध केला.

स्त्रियांना मान- सन्मान-प्रतिष्ठा देऊन त्यांचा आदर केला.

या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या ५० वर्षाच्या आयुष्यात  !!

सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला  प्रेरणा देते.

🚩 राज्य व्हावे हीच श्रींची इच्छ 🚩

          🙏🚩🕉🚩🙏

शिवजयंतीच्या आपण सर्वांना हटवार परिवार ब्रम्हपुरी तर्फे हार्दिक शुभेच्छा !!

      🚩 हर हर... महादेव 🚩

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌸 विनम्र अभिवादन 🌸🙏
                 
         ♾♾♾  ♾♾♾
          स्त्रोत ~ WikipediA                                                                                                                                                                                                                                                                     ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी)

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
   ➿➿➿➿➿➿➿➿➿
     🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
               ▬ ❚❂❚❂❚ ▬
   संकलन ~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
   ⚜️✍⛓🇮🇳👨‍🦰🇮🇳⛓✍️⚜️
           
      गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी)


(महाराष्ट्रीय समाजसुधारक)

जन्म : १८ फेब्रुवारी १८२३            मृत्यू : ९ ऑक्टोबर १८९२                                                             
हे इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुंटे हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली. लोकहितवादींनी समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीचा आग्रह धरला होता.आपल्या समाजातील दोषांवर त्यांनी टीका केली समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार सर्वांनी केला पाहिजे समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वतःची उन्नती साधावी. अंधश्रद्धा भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्याग करावा असे ते सांगत. भारतीय समाजातील जातीव्यवस्था ही समाजाच्या अधोगतीला कारणीभूत झालेली आहे असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांचा जातीव्यवस्था, वर्णभेद याला विरोध होता. उच्चवर्णीयांनी आपल्या वर्णश्रेष्ठत्वाच्या कल्पनांचा त्याग करून देशहितासाठी नव्या आचार विचारांचा अंगीकार करावा असे त्यांनी म्हटले होते. लोकहितवादींनी बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्वाची पद्धती, अशा अनिष्ट प्रथांवर टीका केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले पाहिजेत. त्यांना शिक्षण व विवाह याबाबत स्वातंत्र्य असावे विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार असावा, असे विचार त्यांनी स्पष्टपणे मांडले होते. सुधारणावादाचा विचार मांडणारे आणि स्वकियांवर प्रखरपणे टीका करणारे, त्यांचे दोष त्यांच्या लक्षात आणून देणारे तत्कालीन सुधारकामध्ये महत्त्वाचे सुधारक म्हणजे गोपाळ हरी देशमुख हे होत. समाजाचे उन्नती झाली पाहिजे आणि त्यासाठी संघटितपणे सर्वांनी प्रयत्न करावेत असे त्यांना वाटत होते. शिक्षण हे त्यासाठी महत्त्वाचे माध्यम असले पाहिजे, सामाजिक भेद दूर करून समाजामध्ये ऐक्य निर्माण व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपल्या लिखाणातून त्यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या भागांमध्ये सरकारी अधिकारी म्हणून ते गेले, त्या भागांमध्ये त्यांनी ग्रंथालय चळवळीला चालना आणि प्रेरणा दिली. तत्कालीन सनातनी समाजाला उद्बोधन करताना त्यांनी समाजाची करीला गरज लक्षात आणून दिली अशा या सामाजिक सुधारणेच्या काळामध्ये लोकहितवादींनी समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य केलं.    सरदार गोपाळ हरी देशमुखांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले. गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस म्हणून काम करीत होते. गोपाळराव देशमुखांना ग्रंथसंग्रहाची व वाचनाची विलक्षण आवड होती. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी त्या विषयावर सुमारे दहा पुस्तके लिहिली आहेत.

इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षितांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी होत. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला. त्यांच्या वयाच्या २१व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले. ’सदर अदालती’ची मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८६२पासून ते मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले. त्या पदावर त्यांनी अहमदाबाद, नाशिक आणि सातारा येथल्या कोर्टांत काम केले.लोकहितवादीनी कोणाची मजुरी पत्करली नाही.लोकांनी ज्ञानी व्हाव आणि ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या बाजूला ठेवाव्यात.इग्रंजी भाषेवर प्रभुत्व असावे असे लोकहितवादीना वाटायचे.

श्रमातून संपत्ती निर्माण होते या सूत्रातून गोपाळराव देशमुखांना दारिद्र्य निर्मूलनासाठी काय करायला पाहिजे याची दिशा समजली. हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही त्यांची तळमळ होती. स्वदेशात विद्यावृद्धी होऊन स्वभाषेत नवे नवे ज्ञान प्रसारित झाल्याशिवाय हिंदुस्थानला जगातील इतर प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीचे स्थान मिळणार नाही, असे त्यांना तीव्रपणे वाटे.

✍️ लेखन
रेव्हरंड जी.आर. ग्लीन यांच्या ‘हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया‘ या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी इ.स.१८४२मध्ये, म्हणजे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हिंदुस्थानचा इतिहास ‘हे पुस्तक लिहिले. पुस्तकाचे प्रकाशन मात्र इ.स.१८७८मध्ये झाले. इ.स. १८४८ पासून त्यांनी मुंबईहून निघणाऱ्या प्रभाकर या साप्ताहिकात(संपादक :भाई महाजन), लोकहितवादी या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. त्या नावाने त्यांचा पहिला लेख त्या वर्षी १२मार्च रोजी प्रसिद्ध झाला. लेखाचा विषय होता..’इंग्लिश लोकांच्या व्यक्तिमात्राच्या गैरसमजुती’. याशिवाय, लोकहितवादींनी ‘एक ब्राह्मण‘ या नावानेही लिखाण केले आहे. त्या काळी लहान वयातच लग्न करून द्यायची प्रथा होती. लहान वयातील लग्नामुळे काय अडचणी होतात हे त्यांनी प्रभाकरमध्ये पत्र लिहून लोकांच्या नजरेस आणले. पुढील काळात त्यांनी अनेक समस्यांबाबत, विविध विषयांवर पत्रद्वारा लेखन केले.

इ.स. १८४८ ते इ.स. १८५० या काळात त्यांनी १०८ छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहानमोठे असे सुमारे ३९ ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली, आणि ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला. लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले. लोकहितवादी हे एकोणिसाव्याशतकाच्या पूर्वाधातील,म्हणजे रानडेपूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ज्ञ. ‘लक्ष्मीज्ञान‘ या ग्रंथाद्वारे त्यांनी अ‍ॅडम स्मिथ‘प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. "मातृभाषेतून शिक्षण" या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला.

मराठीप्रमाणेच त्यांनी गुजरातीतही लिखाण केले आहे.
📚 लोकहितवादींचे ग्रंथसाहित्य
इतिहास : (एकूण १० पुस्तके)
भरतखंडपर्व (हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास,१८५१)
पाणिपतची लढाई (काशिराज पंडित यांच्या मूळ फार्सी ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतरावरून, १८७७.)
ऐतिहासिक गोष्टी भाग १ (१८७७)
ऐतिहासिक गोष्टी भाग २ (१८७८)
ऐतिहासिक गोष्टी भाग ३ (१८८०)
हिंदुस्थानचा इतिहास - पूर्वार्ध (१८७८)
गुजरात देशाचा इतिहास (१८८१)
लंकेचा इतिहास (१८८८)
सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास (गुजरातीवरून अनुवादित,१८९१)
उदेपूरचा इतिहास (कर्नल टॉडच्या ‘अ‍ॅनल्स ऑफ राजस्थान‘चे भाषांतर, १८९३)
चरित्रे : (एकूण २ पुस्तके)
पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास (चांद बारदाई यांच्या ‘पृथ्वीराज रासो‘ नावाच्या इ.स.११९१मध्ये मूळ प्राकृत भाषेत लिहिल्या गेलेल्या काव्यावर आधारित, १८८३)
टीप : पृथ्वीराज चव्हाण इ.स. ११९२मध्ये लढाईत मारले गेले. म्हणजे ‘पृथ्वीराज रासो‘ पृथ्वीराजांच्या हयातीत लिहिले गेले होते.
पंडित स्वामी श्रीमद्‌दयानंद सरस्वती (१८८३)
धार्मिक-नैतिक : (एकूण ७ पुस्तके)
खोटी साक्ष आणि खोटी शपथ यांचा निषेध (१८५९)
गीतातत्त्व (१८७८)
सुभाषित अथवा सुबोध वचने (संस्कृत ग्रंथांतील सुभाषितांचे भाषांतर, १८७८)
स्वाध्याय
प्राचीन आर्यविद्यांचा क्रम, विचार आणि परीक्षण (१८८०)
आश्वलायन गृह्यसूत्र (अनुवाद, १८८०)
आगमप्रकाश (गुजराती, १८८४). या ग्रंथाचे मराठी भाषांतर पुढे रघुनाथजी यांनी केले.
निगमप्रकाश (मूळ गुजराती, इ.स. १८८४)
राज्यशास्त्र-अर्थशास्त्र : (एकूण ५ पुस्तके)
लक्ष्मीज्ञान (क्लिफ्टच्या पॉलिटिकल इकॉनॉमी या पुस्तकाचे मराठी रूपांतर, १८४९)
हिंदुस्थानात दरिद्रता येण्याची कारणे आणि त्याचा परिहार, व व्यापाराविषयी विचार (दादाभाई नौरोजी यांच्या ‘पॉव्हर्टी इन इंडिया’ या निबंधाच्या आधारे, १८७६)
स्थानिक स्वराज्य व्यवस्था (१८८३)
ग्रामरचना त्यातील व्यवस्था आणि त्यांची हल्लीची स्थिती (१८८३)
स्वदेशी राज्ये व संस्थाने (१८८३)
समाजचिंतन : (एकूण ५ पुस्तके)
जातिभेद (१८८७)
भिक्षुक (मुंबई आर्यसमाजात दिलेले व्याख्यान, १८७७)
प्राचीन आर्यविद्या व रीती (१८७७)
कलियुग (मुंबई आर्यसमाजात दिलेले व्याख्यान, १८७७)
निबंधसंग्रह (शतपत्रे आणि इतर निबंध, १८६६)
विद्यालहरी (?)
संकीर्ण : (एकूण ७ पुस्तके)
होळीविषयी उपदेश (१८४७)
महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण (१८४८)
सरकारचे चाकर आणि सुखवस्तू हिंदुस्थानातील साहेब लोकांशी संभाषण (१८५०)
यंत्रज्ञान “इन्ट्रॉडक्शन टु फिजिकल सायन्सेस‘ ह्या पुस्तकाचा अनुवाद, १८५०)
पदनामा (फार्सी पुस्तकाचा अनुवाद,१८५०)
पुष्पयन(शेख सादीच्या ‘गिलिस्तों‘तील आठव्या अध्यायाचा अनुवाद, १८५१)
शब्दालंकार (१८५१)
हस्तलिखित न सापडल्याने प्रसिद्ध करता न आलेली पुस्तके :(एकूण ४ पुस्तके)
आत्मचरित्र
एका दिवसात लिहिलेले पुस्तक
विचारलहरी
हिंदुस्थानातील बालविवाह
लोकहितवादींनी चालवलेली नियतकालिके : (एकूण २ )
लोकहितवादी (डेमी आकारमानाचे वीस पृष्ठांचे मासिक, ऑक्टोबर १८८२पासून १८८७पर्यंत)
लोकहितवादी (ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशित करणारे त्रैमासिक, एप्रिल१८८३पासून ते १८८७पर्यंत)
निबंध : (एक)
लोकहितवादींची शतपत्रे : (डाॅ. अ.का. प्रयोळकर यांनी 'लोकहितवादीकृत निबंध संग्रह' या नावाने ह्या शतपत्रांचे पुनःसंपादन करून ती प्रसिद्ध केली आहेत -ललित प्रकाशन)
🔰 अन्य सामाजिक कार्य
मुंबई प्रांताचे तेव्हाचे गव्हर्नर हेन्‍री ब्राऊन यांच्या पुढाकाराने गोपाळ हरी देशमुखांनी इ.स. १८४८ साली पुण्यात एक ग्रंथालय काढले. पूना नेटिव जनरल लायब्ररी या नावाने स्थापन झालेले हे ग्रंथालय पुढे पुणे नगरवाचन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. प्रामुख्याने महाराष्ट्रात व गुजरातमध्ये त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला.

त्यांची निस्पृह व निःपक्षपाती म्हणून ख्याती होती. साताऱ्याचे प्रिन्सिपॉल सदर अमीन यांना काही कारणास्तव निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागी गोपाळरावांची नेमणूक करण्यात आली. सदर अमीन यांची चौकशी चालू झाल्यावर चौकशी प्रमुख म्हणून त्यांनी गोपाळरावांचेच नाव सुचविले. त्यांचा गोपाळरावांच्या निःपक्षपातीपणावर विश्वास होता. इ.स. १८५६ साली गोपाळराव ‘असिस्टंट इनाम कमिशन‘ या पदावर नेमले गेले. इ.स. १८६७ साली त्यांनी अहमदाबाद येथे स्मॉल कॉज कोर्टात जज्ज म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गुजरातमधील वास्तव्यात त्यांनी विविध उपक्रम कार्यान्वित केले. येथील प्रेमाभाई इन्स्टिट्यूटतर्फे ते दरवर्षी व्याख्यानमाला करवीत आणि स्वतःही अनेक विषयांवर भाषणे देत. तेथे त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली, तसेच गुजराती पुनर्विवाह मंडळ स्थापन केले. गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटी ऊर्जितावस्थेत आणली. गुजराती व इंग्लिश भाषा भाषेत हितेच्छु नावाचे साप्ताहिक काढले. त्यांनी गुजरातमध्ये गुजराती वक्तृत्वसभा स्थापन केली. गुजरातमध्ये त्यांनी सुमारे बारा वर्षे वैचारिक उद्‌बोधनाचे कार्य केले. गुजराथमधील अनेक सामाजिक व अन्य संस्थांचे ते पदाधिकारी होते.

गोपाळरावांना सामाजिक वर्तन व नीती या घटकांना धार्मिक समजुती आणि चालीरीती यांच्या वर्चस्वापासून मुक्त करायचे होते. धर्मसुधारणेची कलमे म्हणून त्यांनी पंधरा तत्त्वांचा उल्लेख या संदर्भात केला होता. धर्माचे काम एका विशिष्ट वर्गाकडे सोपवले गेल्याने हिंदू धर्माला दौर्बल्य आले आहे असा सिद्धान्त त्यांनी मांडला. त्यांचा मूर्तिपूजेला विरोध होता. त्यांनी आर्यसमाज या पंथाचा स्वीकार केला होता. समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीकत्व यांसारख्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणांतून हल्ला चढविला.

इ.स. १८७७ साली दिल्ली दरबारप्रसंगी ब्रिटिश शासनाने रावबहादूर ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते.

♻️ समाजकार्य
अहमदाबादेत प्रार्थना समाज व पुनर्विवाह मंडळाची स्थापना
हितेच्छू ह्या गुजराती नियतकालिकाच्या स्थापनेत सहाय्य
गरजूंसाठी आपल्याच घरात मोफत दवाखाना
गुजराती वक्तॄत्त्व मंडळाची स्थापना व त्याद्वारे व्याख्यानांचे आयोजन
गरजू विद्यार्थांना आर्थिक व शैक्षणिक मदत
पंढरपूर येथील अनाथबालकाश्रम व सूतिकागृह स्थापनेत सहभाग
🔮 इतर
अध्यक्ष, आर्य समाज मुंबई
अध्यक्ष, थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ बॉंबे
अध्यक्ष, गुजराती बुद्धिवर्धक सभा
१८७८मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे फेलो झाले.
सन १८८०मध्ये गोपाळराव देशमुख मुंबई कायदे कौन्सिलचे सदस्य झाले.
📜 पुरस्कार
ब्रिटिशांनी गोपाळराव देशमुखांना ‘जस्टिस ऑफ पीस‘ या पदवीने आणि १८७७मध्ये‘रावबहाद्दूर‘ या पदवीने सन्मानिले.
१८८१मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘फर्स्ट क्लास सरदार‘ म्हणून मान्यता दिली.                                                                                                                                                
                                        
          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
      ♾️♾️♾️ ♾️♾️♾️ 
      स्त्रोत ~ WikipediA                                            
➖➖➖➖➖➖➖➖➖    
🇲 🇹 🇸   🇲 🇹 🇸  🇲 🇹 🇸
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬
संकलन ~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
   ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  
  💥🤺⛓️🇮🇳👨🏻‍🦱🇮🇳⛓️🏇🔫                

       आद्यक्रांतिकारक वासुदेव
              बळवंत फडके


       जन्म : 4 नोव्हेंबर 1845
 (शिरढोण, ता. पनवेल, जि. रायगड)
       मृत्यू : 17 फेब्रुवारी 1883
                (एडन, येमेन)

    वडील : बळवंत फडके

 प्रभाव : महादेव गोविंद रानडे, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे

     वासुदेव बळवंत फडके यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते. फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर ते पुण्याला आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले. येथे असतांना त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती हे त्यांच्या लक्षात आले. त्याच वेळी क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंच्याही प्रभावात होते. स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि  मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्त्वाचे असल्याचे रानड्यांना पटवून दिले.

     आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाई पर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली. 1870 च्या दशकातील पडलेल्या दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाऊन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली.

      1879 नंतर फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणी जवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले. 25 ते 27 फेब्रुवारी 1879 रोजी लोणी व खेड वर दरोडा टाकून लुटमार केली. 5 मार्च 1879 रोजी जेजुरी जवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला.  या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रुपयांचे कापड मिळाले. यानंतर त्यांनी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु प्रतिसाद मिळाला नाही.

      फडक्यांनी मग तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. मातंग, रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या सैन्यात भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली. शिरुर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालविला. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता शहरावर कब्जा मिळवला. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या चालीला यश मिळाले नाही आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चंग बांधला. धानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीयांत फितूरी लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले. याचबरोबर साप-किरड्यांना मारल्यावर मिळणाऱ्या बक्षिसाप्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्याबद्दलही त्यांनी इनाम जाहीर केले. या लढाईनंतर फडके अरब व रोहिल्यांकडून मदत मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानात गेले तेथील निजामाच्या सेवेत असलेल्या अब्दुल हक आणि मेजर हेन्री विल्यम डॅनियेल या अधिकाऱ्यांनी फडक्यांचा पिच्छा पुरवला आणि त्यांना परत महाराष्ट्रात पळून येण्यास भाग पाडले. 

      1879 रोजी पंढरपूर कडे जात असताना कलदगी गावातील देवळात तुंबळ लढाई पश्चात इंग्रज सरकारने फडक्यांना जिवंत पकडले व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दर्शवली नाही. शेवटी सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. त्यांना अरेबियातील एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले. तेथे आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांना फेब्रुवारी 17 इसवी सन 1883 रोजी मृत्यू आला.

      त्यांच्या स्मरणार्थ भारतीय टपाल खात्याने फडक्यांचे चित्र असलेले 50 पैशांचे तिकीट प्रकाशित केलेले.

 मुंबईतील मेट्रो सिनेमा जवळच्या चौकाला वासुदेव बळवंत फडके यांचे नाव दिलेले आहे.

             🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🌹🙏 विनम्र अभिवादन🙏🌹
           ♾♾♾ ♾♾♾
          संदर्भ ~ WikipediA
➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

थोरले माधवराव पेशवे

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
   ➿➿➿➿➿➿➿➿➿
     🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
            ▬ ❚❂❚❂❚ ▬
संकलन ~ श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे 
  ➿➿➿➿➿➿➿➿➿
  🚩🏇🤺🇮🇳👨🏻🇮🇳🤺🏇🚩

  श्रीमंत थोरले माधवराव पेशवे


     जन्म : १६ फेब्रुवारी १७४५
     मृत्यू : १८ नोव्हेंबर १७७२
       (थेऊर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र)

अधिकारकाळ
      जुलै २७, १७६१ - 
      नोव्हेंबर १८, १७७२

अधिकारारोहण : जुलै २७, १७६१
राजधानी : पुणे
पूर्ण नाव : माधवराव बाळाजी भट 
                      (पेशवे)
पूर्वाधिकारी : नानासाहेब पेशवे
उत्तराधिकारी : नारायणराव पेशवे
वडील : नानासाहेब पेशवे
आई : गोपिकाबाई
पत्नी : रमाबाई
       श्रीमंत थोरले माधवराव पेशवे हे मराठी राज्याचे चौथे पेशवे (पंतप्रधान) होते.

बाळाजी बाजीरावास विश्वासराव, माधवराव,व नारायणराव असे तीन पुत्र होते. विश्वासराव हा पानिपतच्या तिसऱ्या युद्धात पडल्यामुळें माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्या वेळी माधवरावाचें वय अवघे सोळा वर्षांचे असल्यामुळे त्याचा चुलता रघुनाथराव हा कारभार पाहू लागला. वास्तविकपणे माधवराव हा जरी अल्पवयीन होता, तरी तो बुद्धिमान असल्यामुळे त्याने पेशवाईतील घडामोडी मोठया सूक्ष्म रितीने अवलोकन केल्या होत्या. म्हणून राज्यकारभार स्वतः चालविण्याची धमक व बुद्धी ही त्याच्या अंगी होती.

🤺 शत्रूचा उठाव
               पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले, तेव्हा ही संधी मराठ्यांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून निजामाने लढाई सुरू केली. त्यावेळी राघोबा प्रमुख असल्यामुळे सेनापती राघोबाने राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात राघोबाचा पराभव व्हावयाचा परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला. त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाऊन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला. परंतु पुढे राघोबा व माधवराव यांच्यांत वैमनस्य आले, ती संधी साधून निजामाने मराठ्यांकडील बराच मुलूख परत घेतला.
निजामाप्रमाणे हैदरानेहि या संधीचा फायदा घेऊन दक्षिणेत मराठ्यांचा बराच मुलूख हस्तगत केला. तेव्हा इ.स. १७६४ मध्ये राघोबाशी समेट केल्यावर माधवरावाने हैदरवर स्वारी केली. या प्रसंगी हैदरने पेशव्यांचा मोड करण्याकरिता आपल्या सर्व प्रयत्नांची शिकस्त करून पाहिली; पण माधवराव पेशव्यांपुढे त्याचा टिकाव लागेना. म्हणून सावनूर व इतर बराच मुलूख, त्याचप्रमाणे लढाईचे खर्चाबद्दल म्हणून ३२ लक्ष रूपये देऊन त्याने पेशव्यांशी तह केला.
या नंतर इ.स. १७७० मध्ये माधवरावांनी पुनः हैदरवर स्वारी केली.
इ.स. १७६० मध्ये म्हैसूरचा नामधारी राजा चिक्ककृष्णराज मरण पावला. त्याच्या जागी हैदरने त्याचा वडील मुलगा नंदराज यास गादीवर बसविले. परंतु पुढे नंदराज स्वतंत्र होण्याची खटपट करीत आह, असे पाहून हैदरने त्यास बंदीखान्यात टाकले व त्याची मालमत्ता आपणाकडे घेतली. या वर्तनाचा माधवराव पेशव्यांस राग येऊन, त्यांनी निजामांशी दोस्ती करून हैदरवर स्वारी केली. तेव्हा हैदरने मुलूख उजाड करून तलाव फोडून व विहिरीत विष टाकून मराठ्यांस अटकाव करण्याची शिकस्त केली. परंतु मराठे पुढे येऊ लागल्यामुळे निरुपाय होऊन त्याने अप्पाजीराव नावाचा वकील तह करण्याकरिता मराठ्यांकडे पाठविला. त्याने पेशव्यांस २६ लक्ष रुपये लढाईचा खर्च म्हणून् व १४ लक्ष दरसाल खंडणी म्हणून देण्याचे कबूल केल्यावरून पेशव्यांनी हैदरशी तह केला.

🚩 दिल्लीकडील राजकारण
                पानिपत येथे मराठ्यांस आलेले अपयश धुवून कढण्याची माधवरावास फार इच्छा होती. पण इ.स. १७६८ पर्यंत राज्य कारभाराची सूत्रे राघोबा याजकडे असल्यामुळे माधवरावास विशेष काही करता आले नाही. तदनंतर राघोबास ठिकाणी बसविल्यावर रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण यांजबरोबर ५०,००० फौज देऊन माधवरावाने त्यांची उत्तर हिंदुस्थानांत रवानगी केली. तिकडे शिंदे, होळकरांचे सैन्य त्यास मिळाले.
मग त्या सर्वांनी मिळून रजपूत व जाट या लोकांकडून राहिलेली खंडणी वसूल केली व पानिपतमध्यें रोहिल्यांनी त्रास दिल्याबद्दल त्यांचा मुलूख लुटून रोहिलखंडातून पुष्कळशी लूट आणली. त्यात पानिपत येथें मराठ्यांनी गमविलेली काही लूट होती. या वेळेच्या मराठ्यांच्या स्वारीने रोहिले लोकांस एवढी दहशत बसली की, मराठे येतात अशी नुसती हूल उठली की, रोहिले पळत सुटत.
या वेळी मराठ्यांनी दुसरेही एक महत्त्वाचे कारस्थान तडीस नेले. त्यांत महादजी शिंदे प्रमुख होते. इ.स. १७५४ मध्ये निजाम उल्मुल्काचा नातू गाझीउद्दीन याने वजिराचे पद बळकावून दुसरा आलमगीर यास तख्तावर बसविले. त्या वेळी आलमगीरचा पुत्र मिर्झा अबदुल्ला हा दिल्लीतून पळून गेला होता. तो शहाआलम या नावाने प्रसिद्ध होता. त्याने इंग्रजांचा आश्रय करून अलाहाबादेस रहाणे केले होते. त्याला या वेळी मराठ्यांनी दिल्लीस आणून तख्तावर बसविले.

🌀 त्यावेळच्या किरकोळ संस्मरणीय गोष्टी
                       इ.स. १७६५ मध्ये मल्हारराव होळकर मरण पावले. तेव्हा त्यांची सून अहिल्याबाई होळकर ह्या जहागिरीची व्यवस्था पाहू लागल्या. त्यांचा कारभार प्रजेस अत्यंत सुखदायक झाल्यामुळे त्यांचे नाव उत्तर हिंदुस्थानात सर्वांच्या तोंडी होते. दुसरी गोष्ट म्हणजे महादजी शिंद्यांची दौलतीवर नेमणूक होणे ही गोष्ट होय. तिसरी संस्मरणीय गोष्ट म्हणजे साडेतीन शहाण्यांची प्रसिद्धी. निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर, भोसल्यांचा दिवाण जिवाजीपंत चोरघडे, व पेशव्यांकडील मुत्सद्दी सखाराम बापू हे त्‍या वेळी तीन शहाणे असे समजले जात. तर नाना फडणवीस हा, लढाया न खेळणारा, म्हणून अर्धा शहाणा मानला जाई. जिवा, सखा, विठा, नाना अशी संक्षिप्त रूपे वापरली जात.

🪔 माधवरावांचा मृत्यू
                        इ.स. १७७२ मध्ये हैदरवरील स्वारीत असतानाच माधवराव आजारी पडले. पुढे ते दुखणे क्षयावर जाऊन त्यात त्यांचा अंत झाला. मरणसमयी त्यांचे वय अवघे २८ वर्षाचे होते. या वेळी त्यांची पत्नी रमाबाई ही सती गेली. तिचे वृंदावन थेऊर येथे अद्याप आहे. मराठेशाहीतील हा अखेरचा पेशवा निष्कलंक चारित्र्याचा, कर्तबगार पुरुष होता. अकरा वर्षांच्या कारकीर्दीत त्याने पानिपतच्या पराभवानंतर राज्याची पुन्हा उभारणी केली. हैदर अली, निजाम यांसारखे शत्रू आणि रघुनाथरावसारखा चुलता यांना वठणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासनव्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीत मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण केला. त्याच्या अकाली मृत्यूनंतर मराठी सत्तेच्या ऱ्हासाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला.

📚 माधवराव पेशव्यांच्या जीवनावरील पुस्तके
माधवराव पेशवा (बालसाहित्य, लेखक मदन पाटील)
रमा माधव (ऐतिहासिक चित्रपट. दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी)
श्रीमंत थोरले माधवराव पेशवे (सखाराम अच्युत सहस्रबुद्धे)
स्वामी (कादंबरी, रणजित देसाई)
  
        🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
       ♾♾♾ ♾♾♾
        स्त्रोत ~ WikipediA                                                                                                                                                                                                                                                     ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

सरोजिनी नायडू

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬          संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                           
   ➿➿➿➿➿➿➿➿➿                                                           ⚜️✍📚🇮🇳👨🏻🇮🇳📚✍⚜️

           भारतिय कोकिळा
             सरोजिनी नायडू


     जन्म : 13 फेब्रुवारी 1879        
          (हैद्राबाद, आंध्रप्रदेश)
     मृत्यु : 2 मार्च 1949
         (अलाहाबाद, उत्तरप्रदेश)

पति : डॉ. एम. गोविंदराजलु नायडू
मुलं : जयसूर्य, पद्मजा नायडू, रणधीर आणि लीलामणि
विद्यालय : मद्रास विश्वविद्यालय, किंग्ज़ कॉलेज लंडन, गर्टन कॉलेज कैम्ब्रिज
नागरिकत्व  : भारतीय
पुरस्कार उपाधी : केसर ए हिंद
रचना : द गोल्डन थ्रेशहोल्ड, बर्ड ऑफ टाईम, ब्रोकन विंग

भारताची कोकिळा सरोजीनी नायडु त्या अमर आत्म्याचे नाव आहे ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य समरात आपले महत्वपुर्ण योगदान दिले. सरोजिनी नायडु त्या क्रांतिकारी महिलांपैकी एक आहेत ज्यांनी गुलामगिरीत अडकलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता प्रचंड संघर्ष केला.

सरोजिनी नायडू एक उत्तम राजकारणी आणि महान स्वातंत्र्य सेनानी होत्या या शिवाय त्या एक फेमिनिस्ट, कवयित्री, आणि आपल्या काळातील एक महान वक्त्या देखील होत्या. त्यांचे भाषण ऐकुन मोठ मोठे दिग्गज देखील मंत्रमुग्ध होऊन जात. त्या इंडियन नॅशनल कॉंग्रेस च्या पहिल्या प्रेसिडेंट होत्या. त्या उत्तरप्रदेशाच्या राज्यपाल म्हणुन नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतिय महिला होत्या.

भारतिय स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांना भारताची नाइटिंगेल व भारताची कोकिळा देखील म्हंटल्या जात होतं. त्यांच्या कवितांमधे लहान मुलांच्या, निसर्गाच्या, देशभक्तीच्या, प्रेमाच्या आणि मृत्युच्या कविता आहेत विशेषतः लहान मुलांच्या कविता करण्याकरीता त्या प्रसिध्द होत्या. त्यांच्या कविता वाचुन अधिकतर लोक आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये रममाण होत असत त्यांच्या कवितांमधे एक खोडकरपणा आढळुन यायचा त्यांच्या कवितांमध्ये त्यांच्या लहानपणाची झलक सापडायची आणि म्हणुनच त्यांना ’भारताची कोकिळा’ म्हंटले जात होते.

वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षीच सरोजिनीं मधली प्रतिभा दिसायला लागली या लहान बालिकेच्या कविता वाचुन प्रत्येकजण आश्चर्यचकीत व्हायचा. त्यांनी तेव्हांपासुनच वृत्तपत्रांमधे लेख आणि कविता लिहीण्यास सुरूवात केली होती. देशप्रेमाची भावन देखील त्यांच्यात ओतप्रोत भरली होती आणि म्हणुनच राष्ट्रीय आंदोलना दरम्यान त्या महात्मा गांधीच्या सोबत होत्या, त्यांच्या समवेत त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात हिरीरीने सहभाग घेतला.

सरोजिनी नायडुंची कन्या पद्मजा हिने देखील स्वातंत्र्य संग्रामात सहभाग नोंदवला आणि ती भारत छोडो आंदोलनाचा हिस्सा होती. आज जेव्हां ही भारताच्या महान क्रांतिकारी महिलांची चर्चा होते त्यावेळी सरोजिनी नायडुंचे नाव सर्वात आधी घेण्यात येते. सरोजिनी नायडु सगळया भारतीय महिलांकरीता एक आदर्श होत्या.

💁🏻‍♀ महान क्रांतिकारी महिला सरोजिनी नायडूंचे प्रारंभिक जीवन, कुटूंब आणि शिक्षण
                            भारतिय महान क्रांतिकारक सरोजिनी नायडूंचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 ला एका बंगाली कुटूंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अघोरनाथ चट्टोपाध्याय होते ते वैज्ञानिक, शिक्षाशास्त्री, डॉक्टर आणि शिक्षक होते हैद्राबाद येथील निज़ाम कॉलेजची स्थापना त्यांनी केली होती. पुढे त्यांच्या वडिलांना प्रिंसिपल पदावरून कमी करण्यात आले होते त्यानंतर ते नॅशनल काँग्रेस हैद्राबाद चे पहिले सदस्य बनले. आपली नौकरी सोडुन त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली होती.

स्वातंत्र्य सेनानी सरोजिनी नायडु यांच्या आईचे नाव वरद सुंदरी देवी होते त्या बंगाली भाषेत कविता करीत असत. सरोजिनी नायडुंना एकुण 8 बहिण भाऊ होते त्यांच्यात सरोजिनी या सर्वात मोठया होत्या. त्यांचा एक भाऊ विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय क्रांतिकारी होता त्याने बर्लिन कमेटीत आपली महत्वपुर्ण भुमिका बजावली होती. त्याला 1937 साली एका इंग्रजाने मारून टाकले. सरोजिनींचे दुसरे बंधु हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय एक प्रसिध्द कवि, कथाकार, व कलाकार होते या व्यतिरीक्त ते नाटकं सुध्दा लिहीत असत. त्यांची बहिण सुनालिनी देवी या एक उत्तम नृत्यांगना व अभिनेत्री होत्या.

बालपणापासुन सरोजिनी या एक हुशार विद्यार्थिनी होत्या त्यांना उर्दू, तेलगू, इंग्लिश, बांग्ला आणि फारसी भाषेचे चांगले ज्ञान होते. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी मॅट्रिक परिक्षा त्यांनी उत्तीर्ण केली मद्रास प्रेसीडेंसीत प्रथम स्थान मिळवीले. देशाकरीता स्वतःला समर्पित करणाऱ्या महान क्रांतिकारी सरोजिनीने गणितज्ञ किंवा वैज्ञानिक व्हावं अशी त्यांचे वडिल अघोरनाथ चट्टोपाध्याय यांची ईच्छा होती परंतु सरोजिनी यांना लहानपणापासुन कविता लिहीण्याचा छंद होता. कविता लिहीण्याची आवड त्यांच्यात आईकडुन आली होती.

बालपणी त्यांनी चक्क 1300 ओळींची कविता लिहीली होती. त्यांच्या कविता आणि लिखाण प्रत्येकाला प्रभावित करीत असे त्यांच्या कवितेने हैद्राबाद चे निजाम देखील प्रभावित झाले होते आणि त्यांनी सरोजिनींना विदेशात अध्ययन करण्याकरीता शिष्यवृत्ती देखील दिली होती. वयाच्या 16 व्या वर्षी जेव्हां त्या इंग्लंड येथे गेल्या तेव्हां त्यांनी प्रथम किंग्स काॅलेज लंडन येथे प्रवेश घेतला.

पुढे कैम्ब्रिज च्या ग्रिटन कॉलेज मधुन शिक्षण प्राप्त केले त्याठिकाणी त्यांची भेट त्या काळातील इंग्लिश चे प्रसिध्द कवि आर्थन साइमन आणि इडमंड गोसे यांच्याशी झाली. त्यांनी सरोजिनींना भारतिय विषयांना लक्षात ठेवत लिखाण करण्यास व डेक्कन (दक्षिण पठार) ची भारतिय कवयित्री होण्याचा सल्ला दिला.
               त्यानंतर महान कवयित्री सरोजिनी नायडुंना भारतातील पर्वत, नद्या, मंदिरे आणि सामाजिक बाबींना आपल्या कवितांमध्ये समाविष्ट करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे सरोजिनी भारतातील एक महान कवियत्री झाल्या त्यांच्या कवितांमुळे त्यांनी लाखो हृदयांमध्ये स्थान मिळविले.

👫🏻 सरोजिनी नायडुंचा विवाह
                        भारताच्या महान कवियित्री सरोजिनी नायडु ज्यावेळी इंग्लंड येथे शिक्षण घेत होत्या त्या दरम्यान त्यांची भेट गोविंद राजुलू नायडूंशी झाली त्यावेळीच त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. नायडू हे त्या वेळी इंग्लंड येथे फिजिशियन होण्याकरता गेले होते. शिक्षण पुर्ण केल्यानंतर भारतात परतल्यावर आपल्या परिवाराच्या संमतीने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्यांचा गोविंद नायडूंशी विवाह झाला.
                    1898 साली त्यांचा विवाह हा ब्राम्हो मॅरेज अॅक्ट अंतर्गत मद्रास येथे संपन्न झाला. त्यांचा विवाह हा आंतरजातिय होता त्याकाळी वेगवेगळया जातींमध्ये लग्न होणे हे एखाद्या गुन्हयापेक्षा कमी समजले जात नव्हते कारण त्यावेळी आंतर जातिय विवाहांना भारतिय समाजात मान्यता मिळाली नव्हती.
                      हे एक क्रांतिकारी पाऊल होते याकरता त्यांना फार संघर्ष करावा लागला होता परंतु त्यांच्या वडिलांनी समाजाची चिंता न करता आपल्या निर्भय आणि सुशिक्षीत अश्या सरोजिनीला तिच्या निर्णयात पुर्ण सहाय्य केले. या सर्व विपरीत परिस्थीती पश्चात त्यांचे वैवाहीक जीवन यशस्वी ठरले विवाहापश्चात त्या चार मुलांच्या आई झाल्या जयसुर्या, पद्मजा, रणधीर आणि लीलामणी अशी चार अपत्ये त्यांना झाली.
                      सरोजिनींची कन्या पद्मजा त्यांच्यासारखीच कवियित्री झाली शिवाय ती सक्रीय राजकारणात उतरली आणि 1961 ला पश्चिम बंगाल ची गव्हर्नर देखील झाली.

सरोजिनी नायडुंचे राजनितीक जीवन आणि स्वातंत्र्य संग्रामातील भुमिका
                    सामान्य महिलांपेक्षा सरोजिनी अगदी भिन्न होत्या त्यांच्यात कायम काहितरी करण्याची उर्जा आणि उमेद होती त्यामुळे विवाहानंतर देखील त्यांनी लिखाण सुरू ठेवले त्यांच्या कवितांच्या प्रशंसकांमध्ये देखील हळुहळु वाढ होत गेली व लोकप्रियता देखील वाढत गेली.

कविता लिहीण्यात त्यांचे प्रभुत्व होते आणि साहित्याची देखील त्यांना चांगली जाण होती. आपल्या अवती भवतीच्या गोष्टी, भारताचे प्राकृतिक सौंदर्य आणि इतर ही विषयांना त्या आपल्या कवितांच्या माध्यमातुन अतिशय सुरेख पणे मांडत असत. त्यांच्या कवितांवर प्रेम करणारा फार मोठा रसिक वर्ग होता जो त्यांच्या कवितांना गाण्यांसारखे गुणगुणायचा.

1905 साली त्यांची बुल बुले हिंद ही कविता प्रकाशित झाली त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत आणखीन भर पडली त्यानंतर एकामागोमाग सलग त्यांच्या कविता प्रकाशित होत गेल्या ज्यामुळे वाचकांच्या मनात त्यांनी एक जागा निर्माण केली. सरोजिनींच्या प्रशंसकांच्या यादीत जवाहरलाल नेहरू, रविन्द्रनाथ टागौर यांसारखे महान व्यक्तिमत्व देखील होते. सरोजिनी आपल्या कविता इंग्लिश भाषांमधुन देखील लिहीत असत.
                   त्यांच्या कवितांमधुन भारताच्या संस्कृतीचे अनोखे चित्र पहावयास मिळते. अश्या महान कवियित्री सरोजिनी नायडूची भेट ज्यावेळी भारताचे स्वातंत्र्य सेनानी गोपाळ कृष्ण गोखले यांच्याशी झाली तेव्हां त्यांच्या जीवनात मोठा बदल घडला. गोखलेंनी सरोजीनींना आपल्या लिखाणाची ताकद स्वातंत्र्याच्या लढाईत वापरण्याचा सल्ला दिला.
             गोपाळ कृष्ण गोखलेंनी सरोजिनींना आपली बुध्दी आणि शिक्षण पुर्णपणे देशाला समर्पित करण्यास सुचविले. शिवाय ते त्यांना हे देखील म्हणाले की तुम्ही क्रांतीकारी कविता लिहा आणि स्वातंत्र्याच्या या लढाईत लहान लहान गांवामधील लोकांना प्रोत्साहीत करा जेणेकरून वर्षानुवर्ष गुलामगिरीत अडकलेले सामान्यजन मोकळा श्वास घेऊ शकतील आणि या समरात सहभागी होतील. सरोजिनींनी गोपाळकृष्ण गोखलेंच्या या सल्ल्यावर सखोल विचार केला आणि आपले व्यावसायिक लिखाण बंद करून स्वतःला राजकारणात पुर्णपणे समर्पित करून टाकले.
              1905 साली बंगालच्या विभाजना वेळी महान क्रांतीकारी महिला सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधे सहभागी झाल्या होत्या. विभाजनामुळे त्या फार व्यथीत देखील होत्या पुढे त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. भारताला स्वातंत्र्य मिळण्याकरता त्या एक निष्ठावान देशभक्ता प्रमाणे सतत प्रयत्नं करत होत्या सामान्य जनांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत चेतवण्याकरीता संपुर्ण भारत त्यांनी पिंजुन काढला व लोकांमध्ये देशप्रेमाची भावना वाढीस लावण्यात आपले महत्वपुर्ण योगदान दिले.
                      सरोजिनी नायडुंनी मुख्यतः स्त्रियांच्यात जाऊन देशाला स्वातंत्र्य प्राप्त होण्याकरीता आपले क्रांतिकारी विचार प्रगट केले. ज्या सुमारास सरोजिनी नायडू महिलांमध्ये हे क्रांतीकारी विचार पेरत होत्या त्यावेळेसच्या काळात महिलांनी स्वतःला घराच्या चार भिंतींमध्ये कैद करून घेतले होते. त्या काळात महिलांची स्थिती फार मागासलेली होती. अश्या काळात स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेणे तर दुर स्त्रियांना घराबाहेर पाऊल ठेवण्याची देखील परवानगी नव्हती.
                अश्या परिस्थीतीत चुल आणि मुल सांभाळणाऱ्या स्त्रियांची मानसिकता बदलणे हे कार्य अजिबात सोपे नव्हते परंतु या स्त्रियांना स्वातंत्र्य समरात येण्यास प्रोत्साहीत करणे हे अवघड काम सरोजिनी नायडू मोठया निष्ठेने करीत होत्या. सरोजिनी नायडू गावां गावांमध्ये जाऊन स्त्रीयांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दयायच्या आपल्या विचारांनी त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहीत करीत असत या शिवाय त्यांनी महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या अधिकारांकरता सुध्दा आपला आवाज बुलंद केला होता.
                   1916 ला जेव्हां त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या संपर्कात आल्या त्यावेळी त्या गांधीजींच्या विचारांनी अत्यंत प्रभावित झाल्या आणि त्यांची विचारसरणी पुर्णपणे बदलुन गेली. सरोजिनी गांधीजींना आपला आदर्श मानु लागल्या, गांधीजींपासुन प्रेरणा घेत त्यांनी आपली पुर्ण ताकत देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यात लावली.
                       1919 साली क्रुर ब्रिटीश शासनकर्त्यांनी  रॉलेट एक्ट समंत केला या अंतर्गत राजद्रोह दस्तऐवजावर कब्जा करणे अवैध मानण्यात आले होते. महात्मा गांधीजींनी या एक्ट विरोधात असहकार आंदोलनाचे नेतृत्व केले होते. या आंदोलनात सरोजिनी नायडूंनी गांधीजींचे पुर्णपणे समर्थन केले. गांधीजींच्या शांततापुर्ण नितीचे आणि अहिंसावादी विचारांचे पालन देखील केले.
                     या व्यतिरीक्त त्यांनी मोंटगु-चेम्सफोर्ड सुधारणा, खिलाफत आंदोलन, साबरमती संधी सत्याग्रह आणि नागरिक अवज्ञा आंदोलना सारख्या इतर आंदोलनांचे देखील समर्थन केले. एवढेच नव्हें तर सविनय कायदेभंग आंदोलनात त्या गांधीजींसमवेत कारागृहात देखील गेल्या. 1942 च्या भारत छोडो आंदोलनात त्यांना 21 महिने कारागृहात राहावे लागले होते या दरम्यान त्यांना कित्येक यातना देखील सहन कराव्या लागल्या होत्या. अश्या त-हेने स्वातंत्र्य संग्रामा दरम्यान त्यांनी कित्येक दिवस जेल मध्ये काढले आणि एक सच्च्या देशभक्ताचे कर्तव्य पार पाडले.

राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष आणि राज्यपालाच्या रूपात सरोजीनी नायडू
                       सरोजिनी नायडूंचे स्वातंत्र्याच्या लढाईतील योगदान आणि स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या सहभागामुळे त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव सामान्य जनतेवर पडला होता त्या दरम्यान त्यांची लोकप्रियता आणखीन वाढली होती. त्यांच्या विचारांनी स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री जवाहर लाल नेहरू अत्यंत प्रभावित झाले होते.
          त्यांची प्रतिभा पाहुन 1925 साली त्यांना काँग्रेस अधिवेशनाची अध्यक्षा म्हणुन नियुक्त करण्यात आले पुढे 1932 ला भारताच्या प्रतिनिधी या नात्याने त्या दक्षिण अफ्रिकेत देखील गेल्या होत्या. भारताच्या क्रांतिकारी महिला सरोजिनी नायडूंनी भारताच्या स्वांतत्र्याकरता भारतियांव्दारे केल्या जाणाऱ्या अहिंसात्मक संघर्षाचे बारकावे सादर करण्यात आपली महत्वपुर्ण भुमिका बजावली होती.
                           एवढेच नव्हें तर त्यांनी गांधीवादी सिध्दांताचा प्रसार करण्याकरता केवळ युरोपातच नव्हे तर संयुक्त राज्य अमेरीकेपर्यंतची यात्रा केली व भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर उत्तरप्रदेशाच्या पहिल्या गव्हर्नर (राज्यपाल) झाल्या. स्वतंत्र भारताच्या त्या पहिल्या गव्हर्नर होत्या भारताच्या सर्वात मोठया राज्याच्या त्या राज्यपाल झाल्या. सरोजिनी नायडूंनी आपल्या महान विचारांनी आणि गौरवपुर्ण व्यवहाराने आपल्या राजनितीक कर्तव्यांना उत्तम रितीने पार पाडले आणि त्यामुळे त्यांचे आजही स्मरण केले जाते.

🕯 सरोजिनी नायडूंचा मृत्यु
             देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता कठोर संघर्ष करणाऱ्या महान स्वातंत्र्य सेनानी व महात्मा गांधीजींच्या प्रिय शिष्या सरोजिनी नायडूंना 2 मार्च 1949 ला कार्यालयात काम करत असतांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यु झाला.
                   अश्या तऱ्हेने आपलं संपुर्ण आयुष्य सरोजिनींनी देशाला समर्पित केलं. आपल्या जीवनात त्यांनी भरपुर ख्याती आणि सन्मान प्राप्त केला होता शिवाय त्या लोकांकरता प्रेरणास्त्रोत देखील ठरल्या.
                13 फेब्रुवारी 1964 ला भारत सरकारनं त्यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांच्या सन्मानार्थ 15 पैश्यांचे डाकतिकीट प्रकाशित केले होते.

सरोजिनी नायडूंचे साहित्यातील योगदान
             सरोजिनी नायडूंनी केवळ एक महान क्रांतिकारी आणि चांगल्या राजनितीज्ञ म्हणुनच ख्याती प्राप्त केली नाही तर त्या एक चांगल्या कवियित्री म्हणुन देखील प्रसिध्द होत्या. आपल्या कवितांमधुन लोकांमध्ये क्रांतिकारी विचारांचे बीज तर पेरलेच शिवाय भारतिय संस्कृतीची देखील अद्भुत अशी व्याख्या केली. बालकांच्या साहित्याचे त्यांनी विपुल लेखन केले आणि त्याकरता देखील त्या प्रसिध्द झाल्या.
              ईतकेच नव्हे तर त्यांच्या सुरेख कविता आणि गीतांमुळे त्यांना भारताची कोकिळा (भारताची नाइटिंगल) म्हणुन सन्मानित करण्यात आले होते. 1905 ला त्यांच्या कवितांचा संग्रह “गोल्डन थ्रेसहोल्ड” नावाने प्रकाशित झाला त्यांनतर त्यांनी आपले अन्य दोन संग्रह “दी बर्ड ऑफ टाईम” आणि “दी ब्रोकन विंग्स” देखील प्रकाशित केले या कवितांना केवळ भारतातील लोकांनीच पसंती दिली असे नव्हें तर या पुस्तकांना इंग्लंड मधे देखील मोठया संख्येने वाचकांनी पसंत केले आणि या मुळेच त्यांना एक शक्तीशाली लेखीका म्हणुन ओळख मिळाली.

प्रख्यात कवियित्री सरोजिनींनी कवितां व्यतिरीक्त काही आर्टिकल आणि निबंधांचे सुध्दा लिखाण केले होते जसे “वर्ड्स ऑफ़ फ्रीडम” हे त्यांच्या राजनितीक विचारांवर आधारीत होते. या शिवाय त्यांनी महिला सशक्तिकरणासारख्या सामाजिक मुद्दयाला देखील आपल्या पुस्तकांच्या माध्यमातुन वाचा फोडली होती. समाजात या लिखाणाचा खोलवर परिणाम झाला.

द फेदर ऑफ द डॉन ला त्यांची कन्या पद्मजाने 1961 ला एडिट करून प्रकाशित केले होते. त्यांचे इतर साहित्य “दी बर्ड ऑफ़ टाइम: साँग ऑफ लाइफ, डेथ अँड दी स्प्रिंग, दी ब्रोकन विंग: साँग ऑफ़ लव्ह, डेथ अँड स्प्रिंग, मुहम्मद जिन्नाःअन एम्बेसिडर ऑफ़ यूनिटी, दी सेप्ट्रेड फ्लूट: साँग्स ऑफ़ इंडिया, अलाहाबाद: किताबिस्तान, दी इंडियन वीवर्स, फीस्ट ऑफ़ यूथ, दी मैजिक ट्री एंड दी विज़ार्ड मास्क देखील फार चर्चित आणि प्रसिध्द आहेत. या व्यतिरीक्त त्यांच्या काही कवितांमधील सुंदर आणि लयबध्द शब्दांमुळे त्या कवितांना गाता येणे सुध्दा शक्य आहे.

🔮 सरोजिनी नायडूंविषयी थोडक्यात महत्वपुर्ण माहिती
              वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी सरोजिनींनी 1200 ओळींचा ‘ए लेडी ऑफ लेक’ नावाचा खंडकाव्य लिहीला.
               1918 ला त्यांनी मद्रास प्रांतिय संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले.
1919 ला अखिल भारतीय होमरूल लीग प्रतिनीधी मंडळातील सदस्य या नात्याने त्या इंग्लंड दौऱ्यावर जाऊन आल्या.
1930 ला महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले गुजरात येथे धारासना मधील ‘मिठाच्या सत्याग्रहाचे’ नेतृत्व सरोजिनी नायडूंनी मोठया धैर्याने केले.
1942 साली ‘चले जाव’ आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि जेल मध्ये गेल्या.
1947 ला दिल्लीत झालेल्या आशियाई परिषदेचे त्यांनी अध्यक्षपद भुषविले.
1947 साली स्वतंत्र भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या राज्यपाल म्हणुन त्यांची निवड झाली.
              🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
       ♾️♾️♾️ ♾️♾️♾️ 
स्त्रोत ~ mazimarathi.com                                                                                                                                                                                                                                                      ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...