शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२

अनंत चतुर्दशी


   🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️

           आजचा दिनविशेष 
 
         🙏अनंत चतुर्दशी🙏


अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला साजरी करतात. महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात.

भाद्रपद शुध्द चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणत असतात. या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात.

आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात.

पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत ब्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला. अशी कथा आहे.

दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन होते. तर त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येते. मात्र, अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणरायाचे विसर्जन का करण्यात येते? हे तुम्हाला माहिती आहे का? अनंत चतुर्दशीला विसर्जन करण्यामागे एक रंजक कथा आहे.

पौराणिक कथा आणि धार्मिक मान्यतेनुसार, ऋषी वेद व्यास यांनी ज्यावेळी संपूर्ण महाभारताची दृश्य आत्मसात केली त्यावळी ते सर्व लिहू शकत नव्हते. त्यानंतर त्यांनी महाभारत लिहिण्यासाठी गणेशजींना सांगितले. गणपती बाप्पाला वेद व्यास यांनी महाभारत सांगण्यास सुरुवात केली आणि गणेशजींनी सलग 10 दिवस ती कथा लिहिली.

महाभारत पूर्ण सांगून झाल्यावर जेव्हा वेद व्यास यांनी आपले डोळे उघडले त्यावेळी गणेशजींच्या शरीराचे तापमान खूपच वाढलेले दिसून आले. एकाच जागेवर दहा दिवस बसून राहिल्याने आणि सातत्याने लिहित राहिल्याने तापमान वाढले. त्यानंतर त्यांच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी गणरायाला शीतलता मिळावी यासाठी गणरायाच्या शरीराव मातीचा लेप लावण्यात आला. त्यानंतर सरोवरात डुबकी घेतली. कथेनुसार, ज्या दिवशी गणेशजींनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली तो दिवस भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षाची चतुर्थीचा दिवस होता. तर ज्यावेळी महाभारत पूर्ण लिहून झाले तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता. तेव्हापासून गणेश चतुर्थीला गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते आणि दहाव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केले जाते.

सर्वांना अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! गणपती बाप्पा तुम्हाला सुख समृद्धी आणि यश प्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया...

➖➖➖➖➖➖➖➖➖
श्री अविनाश काशिनाथ पाटील 
उपशिक्षक बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे 
➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२

श्री गणेश चतुर्थी


    🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           

           🌺गणेश चतुर्थी🌺

हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव

श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा "शिवा" असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला लाडू आणि मोदक खूप आवडतात. त्यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदक आणि लाडू अर्पण केले जातात, गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते.

              🪷गणेशोत्सव🪷

गणपती ही संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९४ साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात.

🏵️सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात :-🏵️

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती.भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगांचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला.
➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

भारतरत्न मदर टेरेसा

🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳
     ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                               
  ➿➿➿➿➿➿➿➿➿
  ✝️☪️🕉️🇮🇳👩‍⚕️🇮🇳🕉️☪️✝️

  
        महान समाज सेविका
        भारतरत्न मदर टेरेसा

“जर जीवन दुसऱ्या करता जगता आले नाही तर ते जीवन नाही"

    जन्म : 26 ऑगस्ट 1910
    ( स्कॉप्जे शहर, मसेदोनिया )

       मृत्यू : 5 सप्टेंबर 1997
             ( कलकत्ता, भारत )

नाव : अगनेस गोंझा बोयाजिजू
वडिल : निकोला बोयाजू
आई  : द्रना बोयाजू
कार्य : मिशनरी ऑफ चैरिटी ची
          स्थापना, मानवतेची सेवा

             या लेखाच्या सुरूवातीला लिहीलेले वाक्य महान समाज सेविका मदर टेरेसा यांचे आहे. या वाक्या नुसार समर्पित आयुष्य जगलेल्या मदर टेरेसा यांनी आयुष्यभर दुसऱ्याची सेवा आणि सहाय्य करत स्वतःला समर्पित केले. ती एक अत्यंत उदार, दयाळु आणि निस्वार्थ प्रेम करणारी महिला होती त्यांच्या रोमा रोमात दया आणि सेवेचा भाव भरून होता. निस्वार्थ भावाने मदर टेरेसा गरिब, आजारी, लाचार, असाहय्य आणि गरजवंतांची मदत करत असत. त्या स्वतःकरता नव्हे तर इतरांकरता जगत होत्या. त्या मुळात भारतिय वंशाच्या नव्हत्या परंतु त्या ज्यावेळी भारतात आल्या तेव्हां त्यांना येथील लोकांकडुन इतके प्रेम आणि स्नेह मिळाला की त्यांनी आपले उरलेले आयुष्य भारतात व्यतीत करण्याचा निर्णय घेतला, ईतकेच नव्हें तर भारतिय समाजात त्यांनी महत्वपुर्ण योगदान देखील दिलं. सामाजिक कार्यात दिलेल्या महत्वपुर्ण योगदानाकरता मदर टेरेसा यांना देशातील सर्वोच्च असा भारत सन्मान देखील मिळाला. पद्मश्री आणि नोबेल पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मदर टेरेसा यांच्याकडुन प्रत्येकाने प्रेरणा घेण्याची गरज आहे. मानवतेचे त्या एक उत्तम उदाहरण ठरल्या, निस्वार्थ आई प्रमाणे सेवाभावाने काळजी घेणाऱ्या मदर टेरेसा यांना गरीबांची कैवारी, दयाळु आई, मदर मेरी आणि विश्वजननी अश्या अनेक नावांनी ओळखत असत. आज या आर्टिकल मधुन आम्ही आपल्याला त्यांच्या जन्मापासुन त्यांचे भारत आगमन आणि समाजाकरता त्यांनी केलेल्या महान कार्यांची, त्यांच्या संघर्षाची माहिती सांगणार आहोत. 

👨‍👩‍👧‍👧 मदर टेरेसा यांचा जन्म आणि परिवार
             26 ऑगस्ट 1910 साली मसेदोनियातील स्कॉप्जे येथे एक साधारण व्यापारी निकोला बोयाजू यांच्या घरी अगनेस गोंझा बोयाजिजू ने जन्म घेतला होता. यानांच पुढे मदर टेरेसा म्हणुन जग ओळखु लागले. गोंझा चा अर्थ अलबेनियन भाषेत ’कळी’ (फुल) असा होतो. त्यांचे वडील निकोला बोयाजू धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व होते, ईसा मसीह यांच्यावर त्यांचा फार विश्वास. त्या ज्यावेळी 8 वर्षांच्या होत्या त्यावेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर तिचा सांभाळ तिची आई द्राना बोयाजूंनी केला. त्या एक धर्मपरायण आणि आदर्श गृहीणी होत्या, मदर टेरेसांवर आईच्या संस्कारांचा आणि शिक्षणाचा फार प्रभाव पडला. वडिलांच्या अकाली जाण्याने त्यांच्या घरातील परिस्थीती अत्यंत हालाखीची झाली होती त्यामुळे मदर टेरेसा यांचे लहानपण फार संघर्षमय परिस्थीतीतुन गेले. मदर टेरेसा लहानपणी आपल्या आई आणि बहिणीबरोबर चर्च मधे जाऊन धार्मिक गीत गायन करीत असे. ती ज्यावेळी केवळ 12 वर्षांची होती तेव्हां एका धार्मिक यात्रेला गेलेली असतांना येशुच्या परोपकार आणि समाजसेवेच्या शिकवणीला जगभरात पोहोचविण्याचा त्याचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय घेतला व आपले संपुर्ण जीवन गरिबांच्या सेवेत समर्पित करण्याचा तिने मनोमन निश्चय घेतला होता. 1928 साली ज्यावेळी मदर टेरेसा फक्त 18 वर्षांची होती तेव्हां त्यांनी नन चा समुदाय ’सिस्टर्स ऑफ लोरेटो’ त सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडले. पुढे त्या आयरलैंड येथे गेल्या आणि इंग्लिश भाषा शिकल्या कारण ’लोरेटो’ च्या सिस्टर्स इंग्रजी माध्यमातुनच भारतात लहान मुलांना शिकविण्याचे कार्य करत होत्या. या दरम्यान त्यांनी एका इन्स्टीटयुट मधुन नन होण्याचे ट्रेनिंग पुर्ण केले. नन झाल्यानंतर त्यांचे सिस्टर मेरी टेरेसा असे नामकरण करण्यात आले. पुढे आपले संपुर्ण जीवन गरीब आणि असाहय्य लोकांच्या मदतीकरता त्या व्यतीत करत्या झाल्या.

मदर टेरेसा यांचे भारतात आगमन
                    मदर टेरेसा आपल्या इन्स्टीटयुट मधील इतर नन समवेत 1929 साली भारतातील दार्जिलींग येथे आल्या. या ठिकाणी नन या रूपात त्यांनी पहिल्यांदा धार्मिक प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर त्यांना कलकत्ता येथे शिक्षीका म्हणुन पाठविण्यात आले. कलकत्ता येथे डबलिनच्या सिस्टर लोरेंटो यांनी संत मैरी स्कूल ची स्थापना केली होती. मदर टेरेसा याठिकाणी गरीब आणि असाहय्य मुलांना शिकवीत असत. त्यांचे हिंदी आणि बंगाली या दोन्ही भाषांवर चांगले प्रभुत्व होते. सुरूवातीपासुनच त्या अत्यंत मेहनती होत्या त्यामुळे त्यांनी हे काम देखील अत्यंत प्रामाणिकतेने आणि निष्ठापुर्वक केले, त्या विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षीका झाल्या. या दरम्यान त्यांच लक्ष आजुबाजुला पसरलेल्या गरीबी, अनारोग्य, लाचारी, व अज्ञानावर गेलं. ते पाहुन त्या अत्यंत दुःखी झाल्या. हा तो काळ होता जेव्हां दुष्काळामुळे कलकत्ता शहरात मोठया संख्येने मृत्यु होत होते व गरिबीमुळे तेथील जनतेची परिस्थीती अत्यंत हालाखीची झाली होती. हे पाहुन मदर टेरेसा यांनी गरीब, असाहाय्य, आजारी आणि गरजवंतांची सेवा करण्याचा निश्चय केला.

💒 मिशनरी ऑफ चॅरीटी ची स्थापना
              गरीब आणि गरजवंतांची मदत करण्याच्या हेतुने मदर टेरेसा यांनी पटना येथील होली फॅमिली हॉस्पीटल मधुन नर्सिंग चे प्रशिक्षण पुर्ण केले व पुढे 1948 ला कलकत्ता येथे येऊन त्यांनी स्वतःला गरीब, असाहाय्य आणि वृध्द लोकांच्या सेवेत झोकुन दीलं. खुप प्रयत्नांनंतर 7 ऑक्टोबर 1950 ला मदर टेरेसा यांना समाजाच्या हिताकरीता कार्य करणारी मिशनरी ऑफ चॅरिटी ही संस्था स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली. मदर टेरेसा यांच्या या संस्थेचा उद्देश केवळ गरीब, गरजवंत, रूग्णं, आणि लाचारांची सहाय्यता करणे आणि त्यांच्यात जगण्याची आस निर्माण करणे हाच होता. या व्यतिरीक्त करूणाहृदयी मदर टेरेसा यांनी ’निर्मल हृदय’ आणि ’निर्मला शिशु भवन’ नावाचे आश्रम सुरू केले. या आश्रमात गरीब आणि आजारी रूग्णांवर उपचार केले जात असत आणि अनाथ व बेघर मुलांची मदत केली जात असे.

👰 मदर टेरेसा यांचे निधन
            मदर टेरेसा यांना आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागला. 1983 साली ज्यावेळी त्या रोम ला पॉप जॉन पॉल व्दितीय यांच्या भेटीकरता गेल्या तेंव्हा त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर पुन्हा 1989 साली हृदयविकाराचा झटका आला तरी देखील त्यांनी त्यांचे सेवाकार्य सुरूच ठेवले. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती ढासळतच गेली, 1991 ला त्यांना किडनी आणि हृदयाचा त्रास सुरू झाला. 1997 ला मदर टेरेसा यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटी च्या प्रमुख पदावरून निवृत्ती घेतली व 5 सप्टेंबर 1997 ला कलकत्ता येथे अखेरचा श्वास घेतला. अश्या त-हेने या करूणाहृदयी आत्म्याने या जगाचा निरोप घेतला.

🏅 सन्मान/पुरस्कार
                         निस्वार्थ भावनेने गरीब असाहाय्य लोकांची सेवा केल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या मानवतेच्या सेवेला पाहुन भारत सरकारने त्यांना 1962 साली पद्मश्री पुरस्काराने गौरविलं. पुढे त्यांना देशातील सर्वोच्च असा ’भारतरत्न ’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या व्यतिरीक्त त्यांना मानव कल्याणार्थ केलेल्या उत्कृष्ट कार्याकरीता 1979 ला नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. या दयासागर हृदयाच्या मातेने नोबेल पुरस्काराची 192,000 डाॅलर धनराशी देखील गरीबांच्या मदतीकरता उपयोगात आणली. याशिवाय 1985 साली त्यांना मेडल ऑफ फ्रीडम अवार्ड ने देखील गौरवान्वित करण्यात आले. मदर टेरेसा यांनी मानव कल्याणाकरता ज्या निस्वार्थ भावनेने कार्य केलं ते खरोखर तारीफ ए काबिल आहे. सर्वांनीच मदर टेरेसा यांच्याकडुन परोपकार, दया, सेवा, यांची प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे. या महान आत्म्याला ज्ञानी पंडित च्या संपुर्ण

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🙏🌷
                 
             ♾♾♾ ♾♾♾
स्त्रोत ~ mazimarathi.com                                                                                                                                                                                                                                   ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२

भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी

⚜️ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ⚜️
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
       
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬             संकलन :- श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                             
    ➿➿➿➿➿➿➿➿➿
    ⚜️📝💥🇮🇳👨🏻🇮🇳💥📝⚜️                     
  भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी

      (भारताचे ११ वे पंतप्रधान)
   जन्म : २५ डिसेंबर १९२४
         (ग्वाल्हेर,  ब्रिटिश भारत)
   मृत्यू : १६ ऑगस्ट २०१८
(एम्स हॉस्पिटल, दिल्ली, भारत)
राष्ट्रीयत्व : भारतीय
राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष
व्यवसाय : राजकारणी, कवी
धर्म : हिंदू
              अटलबिहारी वाजपेयी हे माजी भारतीय पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते. ते १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. केवळ १३ दिवस टिकलेल्या ११ व्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत (१९ मार्च १९९८ ते १९ मे २००४) ते पंतप्रधान होते. यासोबतच त्यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८-१९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५-१९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७-१९८०), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८०-१९८६) आणि भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८०-१९८४, १९८६, १९९३-१९९६), ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ दरम्यान भारतीय परराष्ट्रमंत्री ही पदे भूषविली होती.               

🔆  शिक्षण
अटलबिहारी वाजपेयी यांनी व्हिक्टोरिया कॉलेजमधून राज्यशास्त्रात मास्टर्स पदवी संपादन केली होती. तसेच त्यांनी पत्रकारितेचेही काम केले होते. ते अविवाहित होते.

🎍 राजकीय प्रवासाची सुरूवात
राजकारणाशी वाजपेयी यांचा पहिला संबंध १९४२ मध्ये भारत छोडो चळवळीच्या निमित्ताने आला. तेव्हा त्यांना अटक झाली होती. नंतर ते थोड्याच दिवसांनी श्यामाप्रसाद मुखर्जी व पर्यायाने भारतीय जनसंघ यांच्या संपर्कात आले. भारतीय जनसंघाचे नेते म्हणूनच त्यांची कारकीर्द सुरू झाली. वाजपेयी १९५७ मध्ये संसदेवर बलारामपूरमधून निवडून आले. तरूणपणातच आपल्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षात असूनही सर्व स्तरावर वाहवा तसेच आदरही मिळवला. त्याची भाषणे अतिशय उत्तम व दर्जेदार म्हणून गणली जात. खुद्द जवाहरलाल नेहरूंनी वाजपेयी एकदिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान असतील अशा शब्दात त्यांचा गौरव केला होता.

जनसंघ
भारतीय जनसंघ विपक्षातला प्रबळ घटक असूनही तो राष्ट्रीय काँग्रेसला सत्तेवरून दूर सारू शकला नाही. दरम्यान नव्याने स्थापन झालेला काँग्रेस (आय) (Congress(I)) पक्ष सत्तेवर आला. तदनंतर १९७५ साली इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यांनी आणीबाणीला विरोध करणाऱ्या विविध पक्ष आणि घटकांसोबत हातमिळवणी केली. याच दरम्यान त्यांना विरोधाबद्दल तुरुंगवास भोगावा लागला. १९७७ मधे इंदिरा गांधी यानी राजीनामा दिला. यानंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी भारतीय जनसंघाने अनेक सामाजिक आणि प्रादेशिक पक्षांसोबत जनता पार्टीची निर्मिती केली. जनता पार्टीला निवडणुकांत बहुमत प्राप्त होऊन मोरारजी देसाई याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. वाजपेयी हे नवी दिल्ली येथून निवडून आले आणि परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी त्यानी स्वीकारली.

या दोन वर्षाच्या कारकिर्दीत वाजपेयी १९७९मध्ये चीन भेटीवर गेले. १९६२च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्‍न होता. त्यांनी नंतर पाकिस्तानला सुद्धा भेट दिली. १९७१च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता. वाजपेयी यानी Conference on Disarmament (निःशस्त्रीकरण परिषदे)मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणु-कार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. १९७७च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांनी हिंदीतून भाषण केले. अखेर १९७९मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरकारने केलेल्या कारवाईमुळे त्यांनी राजीनामा दिला.

🌷 भारतीय जनता पक्ष (भाजप) ची स्थापना
जनता पक्षाचे सरकार जास्त दिवस टिकले नाही. मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिला. तसेच अंतर्गत विरोधामुळे अखेर जनता पक्षाची शकले झाली. वाजपेयी यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यांतील मित्र, खासकरून लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंग शेखावत यांच्यासोबत मिळून भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० साली केली. वाजपेयी हे भाजपाचे पहिले अध्यक्ष बनले. भाजप हा काँग्रेसचा प्रबळ विरोधक होता. ऑपरेशन ब्ल्यू-स्टारला भाजपाचा पाठिंबा असला तरी अंगरक्षकाकडून झालेल्या इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये ज्या शीखविरोधी दंगली उसळल्या त्याचाही भाजपाने विरोध केला. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला केवळ २ जागा आल्या. तरीही भाजपा देशाच्या राजकारणात मुख्य प्रवाहात राहिला आणि वाजपेयी हेच पक्षाच्या केंद्रस्थानी राहिले. तरी भाजपावरील हिंदुत्वाचा प्रभाव वाढत होता, त्यामुळेच रामजन्मभूमीच्या विश्व हिंदू परिषदेच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रश्नाला भाजपाने राजकीय स्तरावर आवाज दिला. यात अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मुद्दा समाविष्ट होता. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद नावाची वास्तु पाडण्याच्या घटनेमुळे देशात जातीय हिंसाचार उसळला.

तरीही देशाच्या राजकारणातला भाजपाचा विस्तार होतच राहिला. १९९५च्या मार्चमध्ये गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांत भाजपाला विजय मिळाला. भाजपाच्या मुंबई येथील नोव्हेंबर १९९५च्या अधिवेशनात अडवाणी यानी वाजपेयी याचे नाव १९९६च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले.

⚜️ पंतप्रधान पद
पहिली खेप (मे १९९६)
१९९६ च्या निवडणुकात भाजप १६२ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. अनेक प्रादेशिक पक्ष तसेच छोट्या पक्षामुळे १९९६ ची लोकसभा त्रिशंकु राहिली. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण मिळाले. वाजपेयी यानी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पण लोकसभेत विश्वासमत प्रस्तावाच्या चर्चेवेळी इतर पक्षांकडून पाठिंबा मिळविणे भाजपाला शक्य झाले नाही. त्यामुळे बहुमत चाचणी न घेताच वाजपेयींनी १३ दिवसांत राजीनामा दिला आणि वाजपेयी सरकार कोसळले.

🔆 दुसरी खेप (मार्च १९९८)                                                  
 १९९६ ते ९८ दरम्यान तिसऱ्या आघाडीला सरकार स्थापनेच्या दोन संधी मिळाल्या. दैवेगोडा आणि इंद्रकुमार गुजराल भारताचे पंतप्रधान झाले. ही दोन्ही सरकारे लवकरच कोसळली. १९९८ च्या निवडणुकांत भाजप पुन्हा प्रबळ दावेदार झाला आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यावेळी भाजपाने इतर पक्षांसोबत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रा.लो.आ.) ( NDA - National Democratic Alliance), ची स्थापना केली. अखेर १९९८च्या अखेरीस अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआचा पाठिंबा काढला. यावेळी विश्वासमत प्रस्तावावेळी वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पडले. विरोधी पक्षसुद्धा सरकार स्थापन करू शकला नाही व अखेर भारत पुन्हा लोकसभा निवडणुकांना सामोरा गेला. त्यावेळी वाजपेयी हे काळजीवाहू पंतप्रधान बनले. या दुसऱ्या खेपेस वाजपेयींनी स्वतःच्या राजकारणाची आणि कणखरतेची छाप सोडली होती. त्याचे काही महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे होते.

💥 अणुचाचणी पोखरण 
मे १९९८ मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली ५ अणुचाचण्या केल्या. सत्ता प्राप्त केल्यावर केवळ एका महिन्यात करण्यात आलेल्या या चाचण्या जगाला, खास करून अमेरिकेला हादरवणाऱ्या ठरल्या, कारण भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या. पुढील २ आठवड्यांत पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या. रशिया आणि फ्रान्स यांनी भारताच्या स्वसंरक्षणासाठी आणि शांततापूर्ण उपयोगासाठी अण्वस्त्रक्षमतेचे समर्थन केले. तरी अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपीय महासंघ यांनी भारतावर अनेक क्षेत्रांत निर्बंध लादले, तरी वाजपेयींच्या आर्थिक धोरणांमुळे भारताला त्यांची झळ लागली नाही. अखेर भाजप आणि वाजपेयींच्या प्रतिमेच्या दृष्टीने या अणुचाचण्या लाभदायीच ठरल्या.

विशेष म्हणजे अमेरिकेने लादलेल्या आर्थिक प्रतिबंधांनंतरही वाजपेयींच्या काळात भारताच्या विदेशी गंगाजळीत, व्यापारात व विदेशी गुंतवणूकीच्या रूपात शंभर हजार कोटींपर्यंत वाढ होऊन आधीच्या सरकारांच्या काळात देशाला लागलेले 'कर्जबाजारी' हे विशेषण गळून पडले व भारत इतर देशांना कर्ज देऊ लागला.

🤝 लाहोर भेट आणि चर्चा
१९९८ च्या शेवटी वाजपेयींनी पाकिस्तान सोबत शांतता चर्चेसाठी मोठा पुढाकार घेतला. त्यांनी लाहोर-दिल्ली दरम्यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते स्वतः पहिल्या बसमधून पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी गेले. याचे भारतात, पाकिस्तानात आणि जागतिक स्तरावर उत्तम प्रतिसाद उमटले. वाजपेयीं सोबत पाकिस्तानला केवळ राजकारणी आणि मुत्सद्दीच नव्हे तर कला क्षेत्रातूनही अनेक मान्यवर गेले. देव आनंद यांचाही त्यात समावेश होता. कारगील युद्धानंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला त्यांनी " खेल भी जीतो और दिल भी" हा संदेश दिला होता. यानंतर अण्णाद्रमुकने पाठिंबा काढल्यावर त्यांनी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून ऑक्टोबरपर्यंत काम पाहिले.

🇮🇳 कारगील युद्ध
कारगील युद्धादरम्यानची मुत्सद्देगिरी वाजपेयींच्या कणखरतेची साक्ष देणारी आहे. लाहोर भेटीत दोन देशादरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी प्रयत्‍न करत असतांना पाकिस्तान काश्मीरमध्ये घुसखोरी करत होता. हिवाळ्यात काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील अतिउंचावर असलेल्या चौक्यांवर उणे ५० अंशापर्यंत तापमान घसरत असल्याने दोन्ही देशांकडून त्या चौक्या खाली केल्या जात. उन्हाळा सुरू होताच दोन्ही देशाचे सैनिक परत चौक्यांवर रुजू होत. पण १९९९ च्या प्रारंभी पाकिस्तानने आपले सैनिक आणि अधिकारी दहशतवाद्यांच्या वेशात भारतीय रिकाम्या चौक्यांवर घुसवले. त्यांतल्या कित्येक सैनिकांकडे व अधिकाऱ्यांजवळ त्यांची पाकिस्तानी ओळखपत्रेही होती. तसेच सोबतीला काही भाडोत्री दहशतवादीही होते.

उन्हाळा सुरू होताच भारतीय सैन्याच्या ध्यानात ही बाब आली. आणि जून १९९९मध्ये ऑपरेशन विजय सुरू केले. भारतीय सैन्याला अतिदुर्गम प्रदेश, अतिउंच शिखरे, बोचरी थंडी यांचा सामना करावा लागला. तरी हवाई दल आणि भूदलाच्या एकत्रित कारवाईने पाकिस्तानच्या सैन्याचा पराभव दिसू लागला. नवाझ शरीफ यानी याही परिस्थितीचे भांडवल करून त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप द्यायचा प्रयत्‍न केला. चीनला भेट देऊन त्यांनी मदतीची याचना केली. पण भारताने मोठ्या शिताफीने ऑपरेशन विजयची कारवाई नियंत्रण रेषेपर्यंतच मर्यादित ठेवली होती. भारताच्या पवित्र्यापुढे चीनने हस्तक्षेप नाकारला. नवाझ शरीफ यांनी मग अमेरिकेकडे मद्तीची याचना केली. तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मध्यस्थीची तयारी दाखवत.वाजपेयींना चर्चेसाठी वॉशिंग्टनला बोलावले. पण वाजपेयींनी बाणेदारपणे हे निमंत्रण सरळ धुडकावून लावत नकार दिला. यामुळे अमेरिकेला जागतिक पोलीस समजण्याच्या प्रवृत्तीला सणसणीत उत्तर गेलेच पण काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आणि तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप करवून शिमला करार मोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्नही शिताफीने उधळला.

तिसरी खेप (ऑक्टोबर १९९९ - मे २००४)
१९९९ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये (राष्ट्रीय लोकशाही आघाडीला(रालोआला) घवघवीत यश मिळाले आणि अटलबिहारी वाजपेयींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
           महत्त्वाच्या नोंदी
✈️ भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण
सन १९९९ साली तालीबान अतिरेक्यांनी IC - ८१४ या प्रवासी विमानाचे अपहरण केले . हे विमान नेपाळची राजधानी काठमांडूकडून दिल्लीला निघाले होते. अतिरेक्यांच्या या कृतीमुळे वाजपेयी सरकारने ३ अतिरेक्यांच्या बदल्यात प्रवासी विमानाची सुटका केली .

💥 २००१ संसदेवरचा हल्ला
२००१ साली दहशतवादी अफझल गुरू आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला . या हल्ल्यामध्ये ७ भारतीय सुरक्षा रक्षक मारले गेले. मात्र, दहशतवाद्याचा खात्मा पोलिसांनी केला म्हणून मोठा अनर्थ टळला, कारण एका दहशतवाद्याच्या अंगावर पूर्ण संसद उडवू शकेल एवढे RDX होते.

📜 पुरस्कार
२०१४, भारतरत्‍न, हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धिंगत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते.
१९९२, पद्मविभूषण पुरस्कार
१९९३, डी. लिट. कानपूर विश्वविद्यालय
१९९४, लोकमान्य टिळक पुरस्कार
१९९४, उत्कृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार

📰✍️ साहित्यिक प्रवास
वाजपेयी यानी राष्ट्रधर्म (मासिक), पाञ्चजन्य (साप्ताहिक) आणि स्वदेश व वीर अर्जुन या दैनिकांचे संपादक म्हणून काम पाहिले.                  

✍️ त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत.

अमर आग है (कवितासग्रह)
अमर बलिदान
A Constructive Parliamentarian (संपादक - एन.एम. घटाटे)
कुछ लेख कुछ भाषण
कैदी कविराज की कुंडलिया(आणीबाणीच्या काळात तुरुंगात लिहिलेल्या कविता)
जनसंघ और मुसलमान
न दैन्यं न पलायनम्‌ (कविता संग्रह)
नयी चुनौती नया अवसर
New Dimensions of India's Foreign Policy (a collection of speeches delivered as External Affairs Minister during 1977-79)
Four Decades in Parliament (भाषणांचे ३ खंड)
बिन्दु-बिन्दु विचार
मृत्यू या हत्या
मेरी इक्यावन कवितायें (कवितासंग्रह)
मेरी संसदीय यात्रा (चार खंड)
राजनीति की रपटीली राहें
Values, Vision & Verses of Vajpayee : India's Man of Destiny
लोकसभा मे अटलजी (भाषणांचा सग्रह)
शक्ति से शान्ति
संकल्प काल
संसद मे तीन दशक (speeches in Parliament - 1957-1992 - three volumes
Selected Poems
🪔 निधन
दीर्घ आजाराने दिल्लीच्या एम्स रूग्णालयात अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले.त्यांनी ५:०५ म.उ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता 'एम्स'च्या मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून ५:३५ म.उ जाहीर करण्यात आली.                                          
📒 प्रसिद्ध कविता
अंतरद्वंद्व
अपने ही मन से कुछ बोलें
ऊॅंचाई
एक बरस बीत गया
क़दम मिला कर चलना होगा
कौरव कौन, कौन पांडव
क्षमा याचना
जीवन की ढलने लगी सॉंझ
झुक नहीं सकते
दो अनुभूतियॉं
पुनः चमकेगा दिनकर
मनाली मत जइयो
मैं न चुप हूॅं न गाता हूॅं
मौत से ठन गई
हरी हरी दूब पर
हिरोशिमा की पीड़ा
📜 सन्मान
२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये वाजपेयी नवव्या क्रमांकावर होते.
📚 वाजपेयींवरील पुस्तके
अटलजी : कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी (सारंग दर्शने)
Atal Bihari Vajpayee : A Man for All Seasons (इंग्रजी, लेखक - किंगशुक नाग)
The Untold Vajpayee : Politician and Paradox (N. P. Ullekh)
काश्मीर : वाजपेयी पर्व (अनुवादित, अनुवादक - चिंतामणी भिडे; मूळ इंग्रजी लेखक - ए.एस. दुलत आणि आदित्य सिन्हा)
भारतरत्न अटलजी (डाॅ. शरद कुंटे)
हार नहीं मानूॅंगा : एक अटल जीवन गाथा (लेखक - विजय त्रिवेदी)

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
             ♾♾♾ ♾♾♾
         स्त्रोत ~ WikipediA                                                                    ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन

🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️
   ➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
              ▬ ❚❂❚❂❚ ▬            संकलन : श्री अविनाश पाटील
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, वलवाडी ता. जि. धुळे                                                        
   ➿➿➿➿➿➿➿➿➿
   🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
       भारतीय स्वातंत्र्य दिन
     (स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव)                                                             🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳                                                      स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

भारतीय स्वातंत्र्यदिवस 
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.

♨️ इतिहास
       इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.

दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला.

🇮🇳 स्वतंत्र भारत
           स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताची राज्यघटना तयार करण्यात बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा मोलाचा वाटा होता. प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ह्यांनी लिहिलेले वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले.

🏰 स्वातंत्र्य दिनाचा उत्सव
      भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते. सर्व शाळा, महाविद्यालये-कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. भारताचे पंतप्रधान हे दरवर्षी भाषण देतात. या दिवशी लाल किल्ला येथे भारताचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. त्यादिवशी बहुतांश रेडिओ केंद्रावर तसेच दूरदर्शनवर देशभक्तिपर गाणी, कार्यक्रम, चित्रपट लागतात.

🇮🇳🏺🇮🇳  अमृत महोत्सव
         भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१ सा ली देशभरात साजरा होत आहे. या दिवसाचे विशेष औचित्य साधून देशभरात विविध सामाजिक, ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव किंवा भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन किंवा आझादी का अमृत महोत्सव हा एक कार्यक्रम आहे,( ज्यामध्ये १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे.

🔆 स्वरूप
भारत सरकारने भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचा ७५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला. यानिमत्त देशभरात विविध कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. हा ​​महोत्सव १२ मार्च २०२२ रोजी सुरू झाला असून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा केला जाईल.
औपचारिकप्रथेप्रमाणे भारताचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भारतीय ध्वज फडकवतील आणि त्यानंतर भाषण देतील.
भारतातील विविध राज्ये आणि आणि केंद्रशासित प्रदेशदेखील त्यांच्या स्थानिक पातळीवर हा उत्सव गावोगावी साजरा करतील. महाराष्ट्रातील ठाणे शहरात अमृत महोत्सवाची स्वतःची संकल्पना तयार केली आहे, जी १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबवली जाईल. या उत्सवांमध्ये प्रत्येक राज्यातील विविध शहरात विविध कार्यक्रम, उत्सव, विविध रॅली, सामुदायिक कार्निव्हल इत्यादींचा समावेश आहे. ३१ जुलै २०२२ रोजी 'मन की बात' मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांना २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आपले सोशल मीडिया प्रोफाइल चित्र बदलून भारताच्या ध्वजासह लावण्याचे आवाहन केले आहे.
🌀 विविध उपक्रम
२००७ साली लाल किल्ला येथील समारोह
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनाच्या आधी शाळा आणि महाविद्यालये यांच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रभातफेरी, विविध स्पर्धा, देशभक्तीप्र गीत गायन, युवकांसाठी 'बढे चलो' अभियान असे विविध उपक्रम घेऊन देशाप्रती आदर व्यक्त करण्याची संधी घेतली जात आहे.
धरणाचे पाणलोट क्षेत्र, विविध मंदिरे , कार्यालये अशा ठिकाणी अमृत महोत्सवानिमित्त भारतीय ध्वजाची तिरंग्याची आरास किंवा सुशोभन करून उत्सव साजरा केला आहे.
मोठी शहरे तसेच लहान गावांमध्ये रोषणाई, आतषबाजी,वैचारिक व्याख्याने, स्पर्धा,ध्वजवंदन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
स्वातंत्र्यलढयाचा इतिहास माहिती होण्यासाठी विविध संग्रहालये, अभिलेखागार यांनीही प्रदर्शनाचे सादरीकरण करून जनतेला माहिती देण्याचा उपक्रम राबविला आहे.
🇮🇳 हर घर तिरंगा अभियान
भारत सरकारने हर घर तिरंगा (प्रत्येक घरात तिरंगा) ही मोहीम देखील सुरू केली आहे. यात प्रत्येक घरामध्ये ₹२५ च्या अनुदान दराने २०x३० इंच आकाराचा राष्ट्रध्वज वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येकाने आपल्या घरात अथवा कार्यालयात, संस्थेत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या काळात भारताचा राष्ट्रध्वज फडकवत ठेवणे असे या अभियानाचे स्वरूप आहे.

🗺️ भारताबाहेर
भारत देशाच्या बाहेर असलेल्या विविध देशातील भारतीय दूतावास तसेच भारतीय नागरिक यांनी या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत स्थानिक पातळीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संगीताचे कार्यक्रम, नृत्याचे कार्यक्रम, चित्र प्रदर्शन अशा विविध माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाचा आनंद साजरा केला जात आहे.
📚 संबंधित पुस्तके
        ते पंधरा दिवस.. : १ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट १९४७ या, भारताचे भवितव्य ठरविणाऱ्या पंधरा दिवसांची गाथा (लेखक - प्रशांत पोळ)                                                                                                                                                                                 ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०२२

रक्षाबंधन


  🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️
           
         🎀 रक्षाबंधन 🎀

रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन!
   या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे.
   स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणार्‍या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे, की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे.

 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:'
 
    जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे मनूने म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टीकोनाऐवजी पवित्र दृष्टीने, आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे.
    रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण! बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. राखी बांधणार्‍या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. मात्र आज तिची मस्करी करणार्‍या आणि जनावरांप्रमाणे वागणूक देणार्‍या भावांना समजावून सांगण्याची गरज आहे.
   बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्‍या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्‍या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो.
   भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून मदनाला भस्म केले होते. त्याप्रमाणे तिसर्‍या डोळ्याच्या रूपात बहिण भावाला आजार, वासना इत्यादी भस्म करण्याची सूचना करते.
   बहिण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही, तर सर्व स्त्री जातीच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते, तसेच बाह्य शत्रूपासून आणि अंतर्विकारांपासून आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो ही भावना पण त्यात असते. देवासुर संग्रामात देवांच्या विजयासाठी इंद्राणीने हिम्मत हरवलेल्या इंद्राच्या हातात राखी बांधली होती, असे वेदात सां‍गितले आहे. अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती आणि आपल्या संरक्षणासाठी राणी कर्मवतीने हुमायूँला राखी पाठवली होती. या राखीमध्ये सुरक्षिततेची भावना होती.
    रक्षाबंधन हे सुरक्षिततेचे स्मारक आहे. राखी बांधल्याने एक बंधन आपल्यावर असते. हे बंधन असते ध्येयच्युत न होण्याचे. या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची आठवण राखी देते. राखी बांधताना बहिण भावाचे बंधन किंवा ध्येयाचे रक्षण करण्याची सूचना करते.
'' स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा'' असा महान संदेश देणार्‍या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवले आहे. अशा सुंदर प्रेम आणि भावबंधनाच्या सणाला कुटूंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही. सख्या भावाकडे बहिणीची दृष्टी निर्मळ आणि प्रेमपूर्ण राहील. 
    समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. सख्ख्या बहिणीने सख्ख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्क एखाद्या बहिणीने दुसर्‍या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते. सारांश, रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे, रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे, रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर! भाऊ आणि बहिण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देन आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
Ⓜ️ 🇹 🇸🤳 Ⓜ️ 🇹 🇸🤳
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२

स्वराज्याची पहिली लढाई

⚜️ स्वातंत्र्याचा का अमृत महोत्सव ⚜️

       🇮🇳 यशोगाथा थोरांची 🇮🇳
             ▬ ❚❂❚❂❚ ▬ 

संकलन : श्री अविनाश पाटील 
बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वलवाडी ता. जि. धुळे                                                                                                  
      🚩🏇🤺🇮🇳🤴🏻🇮🇳🏇🤺🚩

    ⛳ स्वराज्यासाठी लढली गेलेली पहिली लढाई 🤺


          स्वराज्यासाठी लढली गेलेली पहिली लढाई म्हणजे खळद-बेलसरची लढाई. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली. तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले.

विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.

आदिलशहाने शहाजी राजांना कपटाने कैद करून शिवाजी राजांवर फतेहखानास पाठविले होते, बंगरुळास थोरले बंधू संभाजीराजांवर पण विजापुरी फौजा चालून गेल्या होत्या, राजकारणाचे धडे ज्यांच्या हाताखाली गिरवले होते ते गुरुतुल्य दादोजी कोंडदेव मृत्यू पावले होते.

अशा या संकटकाळी मनाचे स्थैर्य ढळू न देता शिवाजी राजांनी खळद- बेलसर येथील फतेहखानाच्या छावणीवरच हल्ला करण्याचा बेत आखला. या तुकडीचे नेतृत्व होते एका साठ वर्षाच्या तडफदार तरुणाकडे ते म्हणजे बाजी पासलकर. फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता.

छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एकारात्रीत गड सर केला.तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर,कान्होजी जेधे, बाजी जेधे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले, अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.

फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला, पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले. बाजी पासलकर,कान्होजी जेधे,गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली. फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले. दोघात तुंबळ युध्द झाले. अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला.

मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला. या लढाईत विजापुरी फौजेशी मावळ्यांनी कडवी झुंज दिली पण विजापुरी फौजेच्या रेट्यापुढे मावळ्यांना माघार घ्यावी लागली. या लढाईत बाजी पासलकरांनी पराक्रमाची शर्थ करून रणदेवतेला आपल्या प्राणाची आहुती दिली.

बाजी पासलकरांचा देह पडताच मराठा स्वारांचा जमाव फुटला. मराठ्यांच्या निशाणाचे पथक मुख्य फौजेपासून अलग पडले. निशाणाच्या तुकडीस यवनांच्या सैन्याचा गराडा पडला, एक एक स्वार कापू जाऊ लागला. निशाणाची होऊ घातलेली दुर्दशा पाहून एक मराठा स्वार विजेच्या चपळाईने त्या गर्दीत आपली तलवार चालवत घुसला.

एकाच झटक्यात पाच सहा शत्रू कापत त्याने निशाणाचा स्वार मोकळा केला आणि आपल्या बरोबर चालविला, एवढ्यात निशाणाच्या स्वारावर शत्रूचा घाव बसून तो घोड्याखाली आला. हे पाहताच त्या निशाणाच्या स्वारास आपल्या घोड्यावर बसवून निशाणाचा भाला आपल्या खांद्यावर टाकून तो शूर पुरंदरास सुखरूप परत आला. या लढवय्याचे नाव होते बाजी जेधे.

हे बाजी जेधे म्हणजे कान्होजी नाईक जेधे यांचे पुत्र आणि बाजी पासलकर यांचा नातू (मुलीचा मुलगा). याच लढाईत आणखीन एका बाजीने पराक्रम गाजविला होता ते म्हणजे बाजी नाईक बांदल, बांदलांच्या जमावाने मोठा पराक्रम गाजवत विजापुरी सैन्याचा मुकाबला केला होता, या लढाईत बांदलांचे सुमारे अडीचशे लोक कामाला आले.

या तिनही वीरांचा यथोचित सत्कार शिवाजी राजांनी पुरंदरची लढाई संपल्यावर केला. बाजी पासलकरांच्या धाकट्या बंधूंना मोसे खोऱ्याची देशमुखी देऊन “सवाई बाजी” हा किताब दिला. बाजी जेधे यांना “सर्जेराव” हा किताब देऊन वस्त्रे आणि दोन तेज तुर्की घोडे बक्षीस दिले. बाजी नाईक बांदल यांना शिवाजी राजांनी मौजे भाणसदरे व पऱ्हर खुर्द या गावचे महसूल इनाम म्हणून दिले.

स्वराज्यासाठी लढल्या गेलेल्या लढायांमध्ये खळद-बेलसरची लढाई हि एकमेव लढाई असेल ज्या लढाई मध्ये एक नाही, दोन नाही तर तीन तीन बाजींनी आपल्या प्राणांची “बाजी” लावून स्वराज्याठाई आपली निष्ठा दाखवून दिली होती. बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.
          🚩 हर हर महादेव 🚩        

             🇮🇳 जयहिंद 🇮🇳   
              
   स्त्रोत ~ infomarathi.com                                                                                                                                                                                 ➖➖➖➖➖➖➖➖➖                                          
     🔹🔸   🇲 🇹 🇸  🔸🔹
📡📲 तंत्रज्ञानाची धरुनी वाट,
महाराष्ट्र करू स्मार्ट 📡📲

बैलपोळा विशेष

               बैलपोळा   सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा.        श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंप...